तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 29 July 2017

भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल दोन शिक्षकांवर सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


_________________________

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वॉट्सअप ग्रूपवर टाकल्याबद्दल दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील एका वॉट्सअप ग्रूपवर राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरण्यात आले. एका मुख्याध्यापकाने ही पोस्ट एका वॉट्सअप ग्रूपवर टाकली आणि दुस-या एका मुख्यध्यापकाने त्याचे समर्थन केले. यावरुन दोघांविरोधात सोनपेठ ग्रामिण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनपेठ भाजप तालुका अध्यक्ष महादेव गिरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही शिक्षक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळं सोनपेठच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मिडीयाचा वापर विविध गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात केला जातोय. सोशल मिडियावर आलेल्या मेसेजेस मुळं मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होण्याचे प्रकारही घडू लागलेत. सध्या सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर सोशल मीडियातून टीका टिप्पणी होत आहे. अशाच एका पोस्टवर टिप्पणी करणे दोन शिक्षकांना चांगलंच भोवलं आहे. व्हाट्सअप वरील एका ग्रुप मध्ये भारताचे नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. एका खाजगी संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या राजकुमार धबडे याने ही टिप्पणी केली. त्यांवर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या दत्ता पवार याने समर्थन दिलं. या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पोलिसांकडं करण्यात आली होती. या तक्रार अर्जावरून सोनपेठ पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांविरुद्ध भा.दं.व कलम 500, 501 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सपोनि सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी बाबुराव जाधव हे करत आहेत.

वाघाळा येथील गोरगरीब, शेतक-यांना स्वस्त धान्याची प्रतिक्षा

★जोडणी नंतर ही तहसील प्रशासना कडून धान्य देण्याची कार्यवाही होईना
प्रतिनिधी
पाथरी:- तालुक्यातील वाघाळा येथिल ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर चौकशी पथकाच्या अहवाला नंतर १३ जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हाअधिकारी परभणी यांच्या आदेशान्वये रद्द झाला त्या नंतर मुदगल येथिल स्वस्त धान्य दुकानदाराला येथिल कोठा जोडून तात्पूर्त्या व्यस्थेचे लेखी आदेश तहसीलदारांनी २६ जुलै रोजी काढून ही स्वस्त धान्य देण्याची कार्यवाही होत नसल्याने या योजनेचे लाभार्थी स्वस्त धान्या पासुन वंचीत राहात आहेत.
वाघाळा येथिल स्वस्तधान्याचा परवाना रद्द झाल्या नंतर गावात सुरू असलेले जुन महिण्याचे वाटप अर्धवट अवस्थेत बंद केले. त्या नंतर जुलैचा कोठा नविन जोडणी नंतर गोरगरीब आणि शेतकरी लाभार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पाथरी तहसीलदारांनी तात्पुर्ती व्यवस्था म्हणून मुदगल येथिल स्वस्तधान्य दुकानाला जोडणीचे लेखी आदेश २६ जुलै रोजी काढल्या नंतर जुलै महिण्याचे तरी स्वस्तधान्य नागरीकांना मिळेल अशी अपेक्षा असतांना तहसील प्रशासन मात्र धान्य देण्याची कार्यवाही का करत नाही. असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे.दुबार,तिबार पेरणी करून ही पावसा अभावी पीके करपुन गेल्याने दुष्काळाचे सावट गडद होत असतांना किमान शासनाच्या वतिने देण्यात येणारे या महत्वपुर्ण योजनेचे धान्य गोरगरीबांना त्वरीत देण्याची तसदी तहसील प्रशासनाने घ्यावी आणि गरीबांची होत असलेली उपासमार थांबवावी अशी मागणी या योजनेच्या लाभार्थ्यां मधून होत आहे.

लोणी खुर्द येथील सप्ताहास हरिभाऊ नाना बागडे यांची भेट.

लोणी खुर्द / प्रतिनिधी

लोणी खुर्द तालुका वैजापूर येथे सुरु असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराजांच्या 272 व्या अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताहनिमित्त महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांनी दि. 29 शनिवार रोजी सायंकाळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी लोणी खुर्द ग्रामस्थानी शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

नांदेड = धर्माबाद येथील शेतकरी व अयशस्वी उद्योजकाने मागितले मुख्यमंत्र्यांकडे ईच्छामरण; बँकेच्या जुलमी धोरणास कंटाळून उचलले पाऊल ; मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्र्याना दिले निवेदन; बँक अधिकारी घामाघुम

उस्मानाबाद = खुलेआम बेकायदेशीर मटका  जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे पुढेआलेय. याचे स्टिंगऑपरेशन करण्यात आलेय. त्यामुळे पोलिसांचे भिंग फुटलेय.

वंदे मातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले. आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी  यावेळी शिवसेनेने केली.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर तिरंगा फडकवायला काश्मीर मध्ये कोणीही नसेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलं.

देशात 6 लाख कोटींची कामं केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही : नितीन गडकरी

गोंदिया = आमगाव तालुक्यातील सुपलीपार येथील शेतक-याचा शेतात काम करीत असताना मृत्यू. ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता.

नाशिक = त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताजवळ झाडाची फांदी पडून जखमी झालेल्या भाविकाचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू.

औरंगाबाद = एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरींचे जात प्रमाणपत्र रद्द.

गडचिरोली = भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी उभारलेले दोन स्मारके पोलीस व सीआरपीएफच्या पथकानी केले उद्ध्वस्त.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज करणार मंत्रिमंडळ विस्तार, जेडीयू, भाजपा आणि एलजेपीचे 27 जण मंत्रिपदाची शपथ घेतील.

भारतीय नागरिक नसल्यामुळे अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी यांना तात्काळ प्रभावाने सेवेवरुन हटवण्यात आलं आहे.

लातूर  जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून ट्रक लुटल्या प्रकरणी तिघांना अटक, शनिवारी दुपारी घडला थरार.

पुढच्या 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

औरंगाबाद = पुंडलिक नगर मधील सद्भावना गणेश मंदिरावर मनपा व कोर्टाच्या आदेशानुसार हातोडा चालविण्यात आला.

नांदेड = पीक विमा भरणा रांगेत एका शेतक-याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. भोकर तालुक्यातील किनी येथील घटना. मृताचे नाव रामा लक्ष्मण पोतरे.

भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा चीनने केला निषेध.

आम्ही लबाडी एकट्यासाठी नाही तर अधिकार्यांसाठीही केली. माजी खासदार गजानन बाबर.

यापूर्वी जर आम्ही अफरातफरी करून पैसे लाटले असतील तर त्यातील वाटा हा शासकीय सेवेतील अधिकारी यांना देखील दिला. गजानन बाबर

अन्न पुरवठ्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना :माजी खासदार गजानन बाबर.

औरंगाबाद-जळगाव रस्ता चार पदरी करणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं सिल्लोड येथे आश्वासन.

पनामा पेपर प्रकरणात नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे नावही त्यात होते पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही - राहुल गांधी.

मुंबई = चेंबूर येथील अमर महल पुलाच्या तोडकामावेळी जेसीबी पुलावरुन खाली कोसळला.

अहमदनगर = कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे किरकोळ वादातून बलिराम उर्फ तबाजी बाळू थोरात (45) यांची हत्या. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुलावरून अज्ञातानं पाण्यात उडी मारली. दोन लहान मुलांना पुलावर ठेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

भाजपाला सत्तेची भूक असून त्यासाठीच त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, मणिपूर, गोवा, बिहार, गुजरात आणि आता उत्तरप्रदेशात जे घडले त्यावरुन भाजपा पासून लोकशाहीला धोका असल्याचे सिद्ध झाले आहे - मायावती, बसप प्रमुख.

उत्तर प्रदेशातील शेतक-यांची कर्जमाफी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे ओझे का वाटते..?-शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष.

पीकविम्यासाठी उद्या बँका सुरू राहणार, पीकविम्याचे जमा करण्यासाठी रविवारीही बँका सुरू राहणार.

मंगरुळपीर तालुका 2 ऑक्टोबरला हागणदारी मुक्त करा उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांचे निर्देश


फुलचंद भगत
मंगरुळपीर- दि 29
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत मंगरुळपीर तालुका येणाज्या 2 ऑक्टोबरला अर्थात महात्मा गांधी जयंतीला  हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश स्वच्छ भारत मिशन ग्रामिणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे  यांनी शुक्रवारी  दिले. मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये सर्व मिनी बीडीओ आणि ग्रामसेवक यांच्या पाणी गुणवत्ता व स्वच्छता बाबत त्यांनी आढावा बौठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी खैरे, विस्तार अधिकारी शेळके आणि पद्मणे यांच्यासह जिल्हा कक्षाचे IE राम श्रृंगारे, रविचंद्र पडघाण, अभिजित दुधाटे यांची उपस्थिती होती.
उप  मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे  यांनी उपस्थित ग्रामसेवकांकडुन ग्रामपंचायत निहाय शौचालयाचे किती शोषखड्डे खोदण्यात आले आणि किती शौचालयाचे बांधकाम झाले याचा आढावा घेतला. तसेच याबाबत दररोज माहिती घेऊन जिल्हा कक्षाला कळविण्याच्या सुचना गटविकास अधिकारी खैरे यांना दिल्या.  यावेळी तालुक्यातील कोणत्याच गावात जलजन्य आजार होणार नाही याची दखल सर्व ग्रामसेवकांनी घेण्याच्या सुचना उप मुकाअ ईस्कापे व पाणी गुणवत्ता निरीक्षक  अभिजित दुधाटे यांनी दिल्या. तालुक्यातील सर्व गावात गुड मॉर्निंग मोहिम सक्रिय करण्याच्या व काही गावात गटविकास अधिकारी आणि मिनी बीडीओ यांनीसुध्दा गुड मॉर्निंग करण्याचे निर्देश उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी दिले.
*तालुक्यातील 8 ग्रामसेवकांची सिईओंच्या दालनात हजेरी:*
शौचालयाचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोट न करणार्‍या तालुक्यातील 8 ग्रामसेवकांची दा. ३१ अॅागष्ट रोजी सकाळी ११ वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात हजेरी लावण्यात आली असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी दिली. भडकुंभा, चेहेल, कळंबा बोडखे, माळशेलु, मोतसावंगा, नांदगाव, पिंप्री बु. आणि तपोवन बु. या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत एकही फोटो अपलोड केला नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगुन ईस्कापे यांनी संबंधित ग्रामसेवकांची चांगलीच कानउघडणी केली.
येणार्‍या 15 ऑगस्ट 2017 पर्यंत सर्व गावात शंभर टक्के फोटो अपलोड करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी जि. प. मध्ये नुकत्याच झालेल्या बौठकीत दिल्या होत्या.
*5 ऑगस्ट पर्यंत तालुक्यात 6 हजार खड्डे खोदणार:*
तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी येणार्‍या 5 ऑगस्ट 2017 पर्यंत 6 हजार शोषखड्डे खोदण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असुन त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दररोज माहिती सादर करण्यात येणार आहे.  याबाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी उपस्थितांना सुचना व डेली रिपोर्टींग फॉर्मेट दिले आहेत.
फुलचंद भगत
9763007835
---***---

अन्द्यात वाहनाच्या धडकेत 1.5 वर्षाच बिबट्या ठार

     ओमप्रकाश देशमुख यवतमाळ
    रा. महामार्गावरील माहुर आर्णी रोडमध्ये येणार्या कोसदणी या घाटात एक 1.5 वर्षीय बिबट्याला अन्द्यात वाहनाने धडक दिल्याने डागीच ठार झाला ही बाब लक्षात येताच आर्णी उत्तर परीसरातील वनपरीक्षेत्रीतील अधीकारी गावंडे यांनी घटना स्थळ गाठुन पंचनामा करून बिबट्याला ताब्यात घेतले .
   प्राथमीक अंदाज नुसार बिबट्या रस्ता पार करत असतांना 1 लहान अन्द्यान वाहणाची धडक लागल्याचे कळते.
   विषेश म्हणजे आज आंतरराष्ट्रीय वाघ दिवस आजच एका बिबट्याठार झाल्याने वाघाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.


*माहिती अधिकाराचे द्वितीय अपील आजपासून ऑनलाईन करता येणार प्रदिप कोकडवार जिंतूर (संकलितवृत्त) : माहिती अधिकारासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजपासून द्वितीय अपील ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले. राज्य माहिती आयोगात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे द्वितीय अपिल प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तसेच राज्य माहिती आयोगाच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी आयोगाच्या  द्वितीय ऑनलाईन अपील आज्ञावली प्रणालीचे  उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय भवनातील तेराव्या मजल्यावरील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय उपस्थित होते.   राज्यभरात  माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई येथे राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर  सात ठिकाणी आयोगाची खंडपीठे देखील आहेत. मुख्यालय व अन्य सात खंडपीठातील कार्यालयांमध्ये दरवर्षी राज्यभरातून  मोठ्या प्रमाणात अपील दाखल केले जातात. २०१४ पर्यंत राज्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावरुन माहितीचा अर्ज व त्यावरील कार्यवाही आणि प्रथम अपील व त्यावरील निर्णय ही प्रक्रिया पोस्टाद्वारे (मॅन्युअली) करण्यात येत होती. मात्र २०१५ पासून मंत्रालयीन स्तरावरील तसेच २०१६ पासून सर्व क्षेत्रीय स्तरावरील सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्यामार्फत केली जाणारी ही कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झाली.  तथापि, द्वितीय स्तरावरील अपील प्रक्रिया मात्र अद्यापही कागदोपत्रीच करण्यात करण्यात येत होती. राज्य माहिती आयोगात संपूर्ण राज्यभरातून प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ४० हजार द्वितीय अपील प्रकरणे दाखल होतात. या मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या अपिलांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी आता सदरची प्रक्रिया देखील ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून बृहन्मुंबई खंडपीठापासून झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना माहितीचा अर्ज, प्रथम अपील अर्ज याबरोबरच द्वितीय अपील अर्जदेखील थेट ऑनलाईन पध्दतीने राज्य माहिती आयोगाकडे सादर करता येईल. तसेच अर्जांची तपासणी, अर्जांच्या सद्य:स्थितीची माहिती, शुल्क भरणा, सुनावणीची नोटीस व अपिलावरील निर्णय निर्गमित अशा सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील, असे सांगत मुख्य सचिवांनी राज्य माहिती आयोगाचे अभिनंदन केले. यावेळी राज्य माहिती आयुक्त श्री. जैन यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन प्रक्रियेबाबतचे सादरीकरण देखील करण्यात आले. *अशी आहे द्वितीय अपिल ऑनलाईन प्रक्रिया* नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पध्दतीने द्वितीय अपील सादर करता येईल. त्यासाठी पोस्टल व्यवहार किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आयोगाच्याhttps://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन द्वितीय अपील करणे शक्य होणार आहे. या अपिलासाठी आकारण्यात येणाऱ्या विहित शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन ई-पेमेंटद्वारे करता येईल. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर तयार झालेला नोंदणी क्रमांक अपिल करण्याऱ्या व्यक्तीस एसएमएस द्वारे प्राप्त होईल. प्राप्त द्वितीय अपील अर्जांची छाननी नोडल ऑफिसर यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येईल. द्वितीय अपिलांची छाननी केल्यानंतर जर तो अपूर्ण असेल तर तो अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने कारणासहित परत पाठविण्यात  येईल. तसेच अन्य खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील असल्यास तो संबंधित खंडपीठाकडे पाठवून त्याची कल्पना अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते

माहिती अधिकाराचे द्वितीय अपील आजपासून ऑनलाईन करता येणार
प्रदिप कोकडवार
जिंतूर (संकलितवृत्त) : माहिती अधिकारासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजपासून द्वितीय अपील ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले.

राज्य माहिती आयोगात मोठ्या प्रमाणात दाखल होणारे द्वितीय अपिल प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तसेच राज्य माहिती आयोगाच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी आयोगाच्या  द्वितीय ऑनलाईन अपील आज्ञावली प्रणालीचे  उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय भवनातील तेराव्या मजल्यावरील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्य माहिती आयुक्त अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय उपस्थित होते.  

राज्यभरात  माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई येथे राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर  सात ठिकाणी आयोगाची खंडपीठे देखील आहेत. मुख्यालय व अन्य सात खंडपीठातील कार्यालयांमध्ये दरवर्षी राज्यभरातून  मोठ्या प्रमाणात अपील दाखल केले जातात.

२०१४ पर्यंत राज्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावरुन माहितीचा अर्ज व त्यावरील कार्यवाही आणि प्रथम अपील व त्यावरील निर्णय ही प्रक्रिया पोस्टाद्वारे (मॅन्युअली) करण्यात येत होती. मात्र २०१५ पासून मंत्रालयीन स्तरावरील तसेच २०१६ पासून सर्व क्षेत्रीय स्तरावरील सार्वजनिक प्राधिकरणे/प्रशासकीय विभाग यांच्यामार्फत केली जाणारी ही कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने करण्यास सुरुवात झाली.

 तथापि, द्वितीय स्तरावरील अपील प्रक्रिया मात्र अद्यापही कागदोपत्रीच करण्यात करण्यात येत होती. राज्य माहिती आयोगात संपूर्ण राज्यभरातून प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ४० हजार द्वितीय अपील प्रकरणे दाखल होतात. या मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या अपिलांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी आता सदरची प्रक्रिया देखील ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून बृहन्मुंबई खंडपीठापासून झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना माहितीचा अर्ज, प्रथम अपील अर्ज याबरोबरच द्वितीय अपील अर्जदेखील थेट ऑनलाईन पध्दतीने राज्य माहिती आयोगाकडे सादर करता येईल. तसेच अर्जांची तपासणी, अर्जांच्या सद्य:स्थितीची माहिती, शुल्क भरणा, सुनावणीची नोटीस व अपिलावरील निर्णय निर्गमित अशा सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील, असे सांगत मुख्य सचिवांनी राज्य माहिती आयोगाचे अभिनंदन केले.

यावेळी राज्य माहिती आयुक्त श्री. जैन यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन प्रक्रियेबाबतचे सादरीकरण देखील करण्यात आले.
अशी आहे द्वितीय अपिल ऑनलाईन प्रक्रिया

नागरिकांना घरी बसून ऑनलाईन पध्दतीने द्वितीय अपील सादर करता येईल. त्यासाठी पोस्टल व्यवहार किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आयोगाच्याhttps://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन द्वितीय अपील करणे शक्य होणार आहे. या अपिलासाठी आकारण्यात येणाऱ्या विहित शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन ई-पेमेंटद्वारे करता येईल.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केल्यानंतर तयार झालेला नोंदणी क्रमांक अपिल करण्याऱ्या व्यक्तीस एसएमएस द्वारे प्राप्त होईल. प्राप्त द्वितीय अपील अर्जांची छाननी नोडल ऑफिसर यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येईल. द्वितीय अपिलांची छाननी केल्यानंतर जर तो अपूर्ण असेल तर तो अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने कारणासहित परत पाठविण्यात  येईल. तसेच अन्य खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील असल्यास तो संबंधित खंडपीठाकडे पाठवून त्याची कल्पना अपिल करणाऱ्यास ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते

देवानंद सौंदळे व गजानन चिकणे यांची वृत्तपत्र विक्रेते  संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड


सोनपेठ : येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते   संघटनेची तालुका कार्यकारणी निवडी साठी बैठक घेण्यात आली व सर्वानुमते अध्यक्षस्थानी देवानंद सौंदळे यांची निवड करण्यात आली.  या बैठकीसाठी संघटनेचे  मराठवाडा सचिव अंबादास खेडकर (वाकोडे), जिल्हा अध्यक्ष नरहरी लिंगायत, उपाध्यक्ष बबन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार शिवमल्हार वाघे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक शहरातील  खंडोबा मंदिर येथे घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक सोनपेठ येथे संपन्न होऊन या वेळी वृत्तपत्र वितरकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सोनपेठ तालुका  कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करण्यात आली .देवानंद सौंदळे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ,तर उपाध्यक्ष पदी गजानन चिकणे,सचिव पदी परमेश्वर जाधव ,कोषाध्यक्ष पदी दिगांबर गाजरे , जेष्ठ मार्गदर्शक म्हणुन  शिवमल्हार वाघे , मंजुर मुल्ला, सदस्यपदी सुहास बागडे, विद्यासागर बागडे ,रामेश्वर पोटे ,राजेभाऊ जगताप ,शिवाजी कुंभारीकर यांची निवड करण्यात आली आहे . यावेळी पञकार सुधिर बिंदु यांनी मनोगत व्यक्त केले,अध्यक्षीय समारोप शिवमल्हार वाघे यांनी केला.
या बैठकीला पञकार संघाचे अध्यक्ष सुग्रीव दाढेल ,पञकार  राधेश्याम वर्मा ,सय्यद खदीर ,सुभाष सुरवसे ,गणेश पाटील ,सुधीर बिंदु ,कृष्णा पिंगळे ,भागवत पोपडे  यांची उपस्थिती होती. सर्वांनी सौंदळे यांचे अभिनंदन केले.

आक्षेपार्ह नसताना त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत - पुरोगामा संघटनांची मागणी


परभणी :  सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (ता.सोनपेठ) येथे कै.बाजीराव देशमुख या शाळेवर कार्यरत असलेले मुख्याध्यापक राजकुमार धबडे  आणि मुख्याध्यापक दत्ता पवार हे पुरस्कारप्राप्त व प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांच्या पुरोगामी विचाराने सामाजिक प्रबोधनाने  अंधश्रेध्देत पार बुडालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच त्यांचे पालकांचे ते सतत प्रबोधन करत असतात. तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रमात तसेच सर्व महामानवांच्या जयंती उत्सवामधे त्यांचा नेहमीच खारिचा वाटा असतो.
या दोन्ही शैक्षणिक प्रवाहात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व देशभक्त मावळ्यांवर, एका व्हॉटस अँप ग्रुपवर  वरील पोस्टवर नाराजी व्यक्त केल्याने कोणताही तपास न करता फौजदारी गुन्हा काही सनातनी RSS,BJP च्या लोकांनी मनामधे आकस ठेवून दाखल केला आहे.आमच्या काही भाबडया समाजबांधवाना पुढे करुन कार्यवाही करणारे व या मागील मास्टरमाइंड बहुजन समाजाला कळाले आहेत. वैचारिक प्रतिवाद करायला त्यांची बुद्धी कोती पडत असल्यामुळे सत्तेचा गैरवापर करुन हे बांडगुळ असे प्रकार करत आहेत.पुरोगामी चळवळीतील एकाही बांधवाला इथून पुढे त्रास झाला तर संपुर्ण पुरोगामी नागरीक, सकळ मराठा समाज, मराठा शिवसैनिक, संभाजी ब्रिगेड व पुरोगामी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या मास्टरमाइंड ना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.श्री पवार व श्री धबडे यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत दाखल झालेला खोटे सायबर गुन्हे मागे घ्यावेत म्हणुन पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले असून वरिल बाबी त्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.

चारठाणा API सुदर्शन भांगे झाले पोलीस निरीक्षक

जिंतूर
जिंतूर ता मधील चारठाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुदर्शन भांगे यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर जालना प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे
त्यांच्या पदोन्नती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

पीक विमा भरण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

अंबाजोगाई : तालुक्यातील जोडवाडी येथील शेतकरी मंचक इंगळे (वय ५०) यांचा आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उजनी पाटीजवळ अपघाती मृत्यू झाला. ते पीकविमा भरण्यासाठी घाटनांदूरकडे निघाले होते.

मंचक इंगळे हे मागील सतत तीन दिवसापासून पीकविमा भरण्यासाठी घाटनंदुरला चकरा मारत होते. परंतु, वेबसाईट खूपच संथ गतीने चालत असल्याने त्यांना विमा भरणे शक्य झाले नव्हते. त्यासाठी त्यांनी दोन रात्रीसुद्धा जागून काढल्या, परंतु उपयोग झाला नाही. आज सकाळी ते मुलगा शिवराज यांच्यासोबत पीकविमा भरण्यासाठी पुन्हा घाटनांदूरकडे निघाले असता सततच्या जागरणामुळे आणि थकव्यामुळे चक्कर येऊन गाडीवरून खाली पडले आणि मार लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला असे शिवराज इंगळे यांनी सांगितले.

दरम्यान, संथ वेबसाईटमुळे पीकविमा भरताना खूप अडचणी येत आहेत, सर्व कामे सोडून दिवसरात्र संगणक केंद्राच्या बाहेर थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरु असून मंचक इंगळे यांच्या मृत्यूस प्रशासनाची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला

जुन्या भांडणाच्या कारणावरून चावा घेऊन लचका तोडला

शिरूर : जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाने हाताला चावा घेऊन लचका तोडल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील बहिरवाडी येथे घडली.

बहिरवाडी येथील रावसाहेब रामा बडे हे काल सायंकाळी घरासमोर बसले असताना गावातीलच आरोपी बाळू बलभीम बडे, विष्णू बलभीम बडे, भगवान बलभीम बडे आणि अर्जून बलभीम बडे यांनी तिथे येत जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ सुरु केली. रावसाहेब बडे यांनी याबाबत जाब विचारला असता बाळू बलभीम बडे याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेत लचका तोडला. यावेळी रावसाहेब बडे यांची सून आणि मुलगा भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली अशी तक्रार रावसाहेब बडे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरोधात कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे