तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

स्वदेशी सुरक्षा जागरण रॅलीचे आज आयोजन

महादेव हरणे

मालेगांव :-- स्वदेशी जागरण मंच मालेगाव तर्फे मालेगाव शहरात रविवार ६ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजता भव्य पायदळ रॅलीचे आयोजन केले आहे. आपल्या देशात चिनी वस्तु खुप मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्यामुळे चिनची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. त्यामुळे चिनची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चिनमध्ये बनविलेल्या वस्तु भारतीय बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात दाखल आहेत. चिनी बनावटीच्या वस्तुचा व्यापार मोठ्या प्रमाणात आहे.  आपण सर्व भारतीयांनी ठरविले तर आपण चिनला धडा शिकवू शकतो.
देशाच्या एकुण आर्थीक उलाढालीत स्वदेशी वस्तुंच्या विक्रीबाबतची टक्केवारी घसरती आहे. आज भारतीय बाजारपेठेत जेवढ्या पण चिनी वस्तु आहेत तेवढ्या जर आपण खरेदी केल्या नाहीत तर चीनची अर्थव्यवस्था कमजोर होईल. चीन आज रोजी आपला कट्टर शत्रु असणारा पाकीस्थानला मोठ्या प्रमाणात आर्थीक मदत करतो. त्या आर्थीक मदतीच्या जोरावर पाकीस्थान आपल्या देशाचे रक्षण करनारे सैनीकावर गोळीबार करतो, तसेच सिमेवर राहत असणार्या आपल्या भारतीय नागरीकावर अमानुष अत्याचार करत आहे. या मुज्जोर पाकीस्थानला योग्य धडा शिकवायचा असेल तर पहिले आपल्या शत्रु राष्ट्राला मदत करणार्या चीनला धडा शिकवणे गरजेचे आहे.
आपण एक भारतीय या नात्याने चीनला धडा शिकवलाच पाहीजे. कारण भारत हा चीनची सर्वात मोठी बाजारपेठ असुन आपण चीनी वस्तु खरेदी न करता एक प्रकारे देश सेवा करू शकतो. त्यामुळे आपल्या देशाच्या सैनीकाला सिमेवर लढण्यास त्याचे मनोधर्य वाढेल.
भारतीय बाजारपेठेत आलेल्या चीनी वस्तुची खरेदी करण्याचे आव्हाहन स्वदेशी सुरक्षा जागरण मंच मालेगावच्या वतिने करण्यात आले. आपण गेल्या काही दिवसा पासुन पाहतच आहोत चीनी सैनिक भारतीय सिमारेषेवर आक्रमण करत आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्या प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या अशा कृत्याला सडेतोड प्रति उत्तर आपले जवान त्यांना देत आहेत. आपले जवान तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत चोख उत्तर देत आहेत. पण जरी आपले जवान सिमेवर सुरक्षा करीत असले तरी आपण एक भारतीय नागरीक या नात्याने नुसती बघ्याची भुमीका न घेता आपणही आपल्या जवानाच्या खांद्याला खांदा लावून लढु शकतो. त्यासाठी आपल्याला जवानाप्रमाणे हातात बंदुक घेण्याची गरज नाही. फक्त आपल्या बाजारपेठेत येणार्या चिनी वस्तु आपण खरेदी करायच्या नाहीत व दुसर्याला न घेण्यास परावृत्त करायचे. या करीता रविवार ६ आगष्ट रोजी ठिक १० वाजता भव्य पायदळ रॅलीचे आयोजन केले आहे. सदर रॅली ही श्रीराम मंदीर, शिव चौक येथुन निघुन शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रम करीत शेवटी श्रीराम मंदीर, शिव चौक येथे रॅलीची सांगता होईल. तरी या पायदळ रॅली करीता मोठ्या प्रमाणात देशप्रेमी नागरीकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन  राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा जागरण अभियान मालेगाव च्या वतिने प्रसिध्दी प्रमुख नंदकीशोर वनस्कर यांनी रॅली संदर्भात माहिती दिली.

*स्वदेशी पायदळ रॅलीचा मार्ग*

श्री राम मंदिर शिव चौक येथे एकत्रीत होवून जोगदंड हाॅस्पिटल, अग्निहोत्री दुकान गल्ली, मेडिकल चौक, डाॅ भांगडिया हॉस्पिटल, जिनशक्ती हार्डवेअर पासुन  अग्रवाल  क्लाॅथ स्टोअर्स समोरुन परत श्री राम मंदिरजवळ पयदल रॅलीची सांगता करण्यात येणारआहे. 

महादेव हरणे
9922224889

भारतीय स्वातंत्रता संग्रामात मुस्लिम समाजाचे योगदान १७ शतकाच्या सुरुवातीस इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी भारतात व्यापारासाठी आले.

भारतीय स्वातंत्रता संग्रामात मुस्लिम समाजाचे योगदान
१७ शतकाच्या सुरुवातीस इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी भारतात व्यापारासाठी आले. ३१ डिसेंबर १६०० मध्ये महाराणी एलिजाबेथने इस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचे चार्टर प्रदान केले. १६१३ मध्ये सर टोमास रो ने मुघल शासकांना भेटवस्तू देऊन व्यापाराची परवानगी प्राप्त केली. आपल्या व्यापारी मालाच्या सुरक्षेसाठी व्यापारी आपल्यासोबत सुरक्षा बल बाळगत. आधुनिक शस्त्रास्त्रांनी लैस हे सुरक्षा बल देशातील संस्थानिकांना आपल्याकडे आकर्षित करू लागले. संस्थानिक परस्परातील युद्धासाठी हे सुरक्षादल भाडोत्री म्हणून वापरू लागले. मोबदल्यात इंग्रजांना जागीर देऊ लागले. यामुळे इंग्रज सुरक्षा बळ एका सैन्य बळात परावर्तीत झाले आणि इंग्रजांच्या जागीरी वाढू लागल्या. अशाप्रकारे क्रमाक्रमाने इंग्रज व्यापारी देशाचे नवीन शासक बनले.१७५७ च्या प्लासीच्या युद्धात नवाब सिराजूददौला याने इंग्रजांशी सर्वप्रथम संघर्ष केला. परंतु त्यांचे दुर्दैव की त्याच्या सेनापती मीर जाफर, दुर्लभ राय आणि सेठ अमीनचंद यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला. १७६४ मध्ये पुन्हा एकदा मीर कासीम, सिराजूददौला आणि शाहआलम यांनी एकत्रितपणे इंग्रजांशी संघर्ष केला; परंतु या वेळेसही त्यांना पुनश्च पराभूत व्हावे लागले. १७७६ मध्ये मजनू शाह, मुसा शाह,सिराज आली, नूर मोहम्मद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ८० हजारांचे सैन्य उभे करून जनरल मैकेंजी, कमांडर केद्रथ आणि लेफ्टनंट रोबर्टसन यांच्या सैन्याचा दारूण पराभव केला. परंतु यानंतर इंग्रजांनी विविध संस्थानिकांची मदत घेऊन शक्तिशाली संस्थान चिरडून टाकले. ज्यामुळे इंग्रजी सत्तेच्या मार्गातील सारे अडथळे दूर करून इंग्रज अपराजित शक्ती म्हणून उदयास आले.मौलाना शरीअतुल्लाह खान यांनी बंगालमध्ये इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पेटवून टाकले. या आंदोलनात दादूमिया आणि कमांडर मुहम्मद मीर मिसाल अली उर्फ टीटू मियांने बंगालमध्ये अक्षरश रन पेटविले. आजही बंगालमध्ये त्यांच्या शौर्यगाथा मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने सांगितल्या जातात. बंगालच्या लढाईमध्ये मुस्लिमांचे योगदानइतके प्रचंड आहे की ती लढाई एका अर्थाने इंग्रजांसाठी केवळ ‘मुस्लिमांची लढाई’ ठरली. इंग्रजांनी बंगालमध्ये आपले सैन्यबळ वाढवून मुस्लिमांना चिरडून काढण्याचे ठरविले आणि सारी शक्ती बंगालमध्ये ओतली. केवळ बंगालमध्ये जवळपास ७० हजार मुस्लिमांची निर्घृण हत्या करण्यातआली. हा भारतातील पहिला इंग्रजविरोधी संघर्ष!दुसरा संघर्ष दक्षिणेकडे झाला. कर्नाटकाचे महान सेनानी पराक्रमी हैदरआली यांचे सुपुत्र मुहम्मद टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. परंतु अंतर्गत विश्वासघातामुळेटिपू सुलतानला पराभावाचा सामना करावा लागला. यानंतर मात्र जवळपास एक शतक १८५७ पर्यंत कोणताही मोठा प्रतिकार इंग्रजी सत्तेला सहन करावा लागला नाही. १८५७ च्या क्रांतीचे सूत्रधार अजीमुल्लाह खान यांनी एका सशक्त क्रांतीची योजना आखली. अजीमुल्लाह खान नानासाहेब पेशवा यांचे प्रधानमंत्री होते. नानासाहेब पेशवा यांनी अजीमुल्लाह खान यांना आपला वकील बनवून लंडन पाठविले होते. तेथे राहून त्यांनी इंग्रजी शासनाचे शक्तीस्थळे मर्मस्थळे यांचा बारकाईने अभ्यास केला. भारताला परतल्यावर त्यांनी एक गुप्त योजना आखली. योजनेची माहिती साधू, फकीर यांच्याकरवी कमळाच्या फुलात देशभरात प्रसारित केली. ही योजना होती भारतभरातील संस्थानातूनएकत्रितपणे एकाच दिवशी इंग्रजी शासनाची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी सशस्त्र बंड करायचे. यासाठी दिवस निवडला गेला होता ३१ मार्च रविवार. जेव्हा सारे इंग्रज आपल्या पवित्र दिनानिमित्त निशस्त्र असतील. परंतु मंगल पांडेने निर्धारित वेळेआधीच बंडाची घोषणा केल्याने क्रांती तर भडकली परंतु त्याच्यात ती तीव्रता नव्हती ज्याची अपेक्षा केली गेली होती. कारणसर्वकाही निर्धारित वेळेच्या आधीच अचानक, आकस्मिकपणे घडले होते.भारतीय स्वतंत्र संग्रामात मुस्लिमांचे योगदान केवळ यावरून समजले जाऊ शकते की कॉंग्रेसची स्थापन १८८६ ला झाल्यापासून १९४७ पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याची जबाबदारी मुस्लीम समाजावर सात वेळेस टाकण्यात आली. पहिले अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी, रहमत उल सियानी, हसन इमाम, हकीम अजमल खान, मौलाना मोहम्मद अली, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि शेवटचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद. परंतु दुर्दैवाची बाब आहे की स्वातंत्र्योत्तर काळात मौलाना शौकत अली, मोहम्मद अली जौहर, सर आगा खान, फिरोज शाह, मौलाना हसरत मोहनी, मौलाना जाफर अली, डॉ. अन्सारी, मुशीर अहमद किडवाई, सय्यद अमीर अली, डॉ. मुहम्मद अशरफ, डॉ. जाकीर हुसैन, रफीउद्दीन किडवाई, मौलाना हाफीजूर्रहमान यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींचे नेतृत्व देशात असतानादेखील मागील ७० वर्षात कॉंग्रेसने एकदाही एकही मुस्लीम अध्यक्ष दिला नाही.क्रांतिकारी भगतसिंग यांचे नाव जेव्हा घेतले जाते तेव्हा अश्फाकउल्लाह खान यांचा तसा उल्लेख केला जात नाही जसा भगतसिंग आणि चंद्रशेखर यांचा केला जातो. काय कारणअसावे? त्यांचे मुस्लीम असणे याच्यापलीकडे दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. जालियानवाला बाग हत्याकांडामध्येजनरल डायरने गोळीबार करून मारलेल्यांपैकी अर्धेअधिक मुस्लीम होते. तसेच त्या सभेचे अध्यक्ष अजमतउल्लाह खान होते. काबूलमध्ये पहिली स्वतंत्र सरकार बनविणारे राजा महेंद्र प्रताप यांचे प्रधानमंत्री आणि या स्वत्तंत्र सरकार योजनेचे सूत्रधारबरकतउल्लाह खान भोपाली होते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेला अर्थसहाय्य पुरविणारे रंगूनचे प्रसिद्ध सेठ अबू बक्र आणि त्यांचे सहकारी अब्दुल करीम सेठ होते. आझाद हिंद सेनेचे जनरलपद शाहनवाझकडे होते तर नेताजीचे अंगरक्षक अब्दुल रहीम अब्दुल करीम होते. नेताजींच्या आझाद हिंद सेनेत अर्धाअधिक भरणा मुस्लिमांचा होता.फक्त वाचू नका, शेअर करा. प्रत्येक मराठी भाषिकापर्यंत पोहोचलीच पाहिजे ही लेखमाला.

अनवर दिलावर पठान
तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी प्रतिनिधी वालूर
मो.नं.8888375846

विजेंदरचा विजयी पंच, चीनच्या मायमायतियालीवर शानदार विजय.

_________________________

भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला आहे. या लढतीच्या निमित्तानं मुंबईच्या क्रीडा रसिकांना शनिवारी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारत विरुद्ध चीन असा मुकाबला पाहायला मिळाला.मुंबईच्या एनएससीआय मध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. ही लढत व्यावसायिक बॉक्सिंग मधल्या दोन प्रतिष्ठेच्या किताबांसाठी खेळवण्यात आली होती. बॅटलग्राऊंड एशिया असं शीर्षक या लढतीला देण्यात आलं होतं. या लढतीचा विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत. विजेंदर सिंगची व्यावसायिक बॉक्सिंग मधली ही नववी लढत होती त्यानं या आधीच्या आठही लढती जिंकल्या होत्या. चीनच्या झुल्पिकारनं आजवरच्या नऊ पैकी सहा लढतींमध्ये नॉक आऊट विजय साजरा केला होता.

फिफा वर्ल्डकपनंतर मैदान तोडा, सिडकोचा अजब फतवा.

_________________________

येत्या ऑक्टोबर महिन्यात17 वर्षाखालील होणाऱ्या फिफा वर्ल्डकपचे  5 सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. पण वर्ल्डकपचे सामने संपल्यानंतर मैदान तोडण्यात यावं असा अजब फतवा सिडकोने काढला आहे. फुटबॉल सामन्यांच्या सरावासाठी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशननं 4 कोटी रुपये खर्च करून मैदान तयार केलं आहे. यासाठी स्पोटर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी प्रत्येकी 4 हजार रुपये काढून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर तात्काळ मैदान तोडण्याची नोटीस सिडकोने क्लबला बाजावली आहे. फिफा वर्ल्डकप नंतर या मैदानात इतर खेळाडूंना खेळता येईल. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी नवी मुंबईतील खेळाडूंचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सिडकोचे अधिकारी करत आहेत. तसेच सिडकोचे अधिकारी फिफाच्या एनओसीच्या नावाखाली आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही करत असल्याचा आरोप स्पोर्ट्स क्लबने केला आहे.

भारताने लष्कर हटविले नाही तर दोन आठवड्यात चीन हल्ला करेल : चीन मीडिया


_________________________

डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीनया दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.

त्या’ दुकानदारांचा परवाना होणार रद्द.

_________________________

रस्त्यावर बाकडे टाकून साहित्य विकणारे फेरीवालेही मुंबईच्या कचर्यात भर घालत असतात. यापैकी अधिकृत फेरिवाल्यांना स्वतंत्र कचराकुंडी ठेवण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली आहे. तरीही अनेक फेरीवाले या नियमाला केराची टोपी दाखवून मुंबईची कचराकुंडी करीत आहेत. त्यामुळे कचराकुंडीची व्यवस्था न करणार्या फेरीवाल्यांचा परवानाच यापुढे रद्द करण्याचा निर्णय आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे. महापालिका मुख्यालयात घेण्यात आलेल्या मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी असे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. मुंबईवरील कचर्याचा भार कमी करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला आहे. बेकायदा फेरीवाल्यांबरोबरच अधिकृत फेरीवालेही यामुळे पालिकेच्या डोकेदुखीचे कारण ठरले आहेत. यापैकी बेकायदा फेरीवाल्यांवर नियमित कारवाई होत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, अधिकृत फेरीवाले अद्यापही या नियमांकडे कानाडोळा करीत आहेत.मासिक आढावा बैठकीत या प्रश्नाकडे अधिकार्यांनी लक्ष वेधले. दुकानदार, अधिकृत फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती अधिकार्यांनी केली. त्यानुसार, कचराकुंडीची व्यवस्था न करणार्या अधिकृत फेरीवाल्यावर कठोर कारवाईचे संकेत करून त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. गॅस पुरवठादार कंपनीवर कारवाई रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवून विकणाºया अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र, कारवाई नंतरही काही दिवसांनी फेरीवाले पुन्हा त्या रस्त्यांवर परतत आहेत. त्यामुळे ही कारवाई तीव्र करण्यास आयुक्तांनी शनिवारी अधिकार्यांना बजावले, परंतु या विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करून व त्यांच्याकडील गॅस सिलिंडर जप्त करूनदेखील, पुढच्या कारवाई दरम्यान पुन्हा गॅस सिलिंडर आढळून येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन, अनधिकृत विक्रेत्यांकडे आढळून आलेल्या गॅस सिलिंडरच्या पुरवठादारावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईतील अस्वच्छ भाग 6 महिन्यात चकाचक करतो: हणमंत गायकवाड.


_________________________

“मुंबईच्या स्वच्छतेच्या कंत्राटासाठी आम्ही कधीही अर्ज केलानाही. आम्हाला द्या, आम्ही सहा महिन्यात तो भाग चकाचक करुन दाखवतो”,असं आव्हान साताऱ्याच्या उद्योजकाने दिलं. भारत विकास ग्रुपचे प्रमुख हणमंत गायकवाड यांनीहा विश्वास व्यक्त केला.

हणमंत गायकवाड यांचंही लहानपण तुमच्या-आमच्या प्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातच गेलं. साताऱ्यातील रहिमतपूर इथं जन्मलेले हणमंत गायकवाड हे शाळेत हुशार होते. त्यांनी इलेक्ट्रानिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.यादरम्यान त्यांनी आंबे विकण्यापासून ते शेतातील सडं वेचण्यापर्यंत अनेक कामं केली. मात्र तो संघर्ष वाटला नाही, ती मजा होती असं ते सांगतात.इलेक्ट्रानिक इंजिनिअर झाल्यानंतर ते पुण्यातील टेल्को कंपनीत रुजू झाले. त्यावेळी टाटांची एक कार बाजारात आली, मात्र तिला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, तीचं उत्पादन थांबवलं. त्यावेळी हणमंत गायकवाड यांना त्या कारच्या साहित्य स्क्रॅप करण्यास सांगितलं. मात्र त्याकाळी सुमारे 8 कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली. त्यावेळच्या वरिष्ठांनी गायकवाडांना बोलावून, तुला काय हवं सांग, असं विचारलं. मात्र त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे माझ्या ओळखीतील, साताऱ्यातील काही मुलांना नोकरी देण्याची विनंती केली. यादरम्यान त्यांनी ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यावेळी टाटा प्रशासनाने त्यांच्याच दुसऱ्या कंपनीसाठी ‘हाऊसकिपिंग’साठी मुलं पुरवण्यास सांगितलं. इथूनच हणमंत गायकवाडांमधील उद्योजक जन्माला आला.हणमंत गायकावांडांनी सुरुवातीला ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेमार्फत 8 मुलं हाऊस किपिंगसाठी कंपनीला पुरवली.  त्यानंतर मागणी वाढत गेली आणि ‘भारत विकास ग्रुप’चा व्याप विस्तारात गेला. 8 मुलांपासून सुरु झालेल्या या संस्थेने विस्तार घेतल्यानंतर, हणमंत गायकवाड यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि हाऊस किपिंगचाच उद्योग उभा करण्याचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला बंगळुरुतील एका कंपनीचं कंत्राट घेतलं. तिथे उत्तम काम केल्यानंतर कंपनीला काम मिळत गेली.  सध्या ‘भारत विकास ग्रुप’ अर्थात BVG ही कंपनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, सुप्रीम कोर्ट, तिरुपती, अक्षरधाम, शिर्डी संस्थान अशा देशभरातील बहुतेक महत्त्वाच्या संस्थासाठी हाऊस किपिंगची सेवा पुरवतात. एकट्या दिल्लीत भारत विकास ग्रुपचे तब्बल 9 हजार कर्मचारी आहेत. त्यावरुन त्यांच्या कंपनीचा व्याप लक्षात येऊ शकतो.

हाऊस किपिंग शिवाय BVG ने विविध क्षेत्रात व्यवसाय वाढवला. यामध्ये आरोग्य आणि कृषी क्षेत्राचा विशेष उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात अॅम्ब्युलन्स पुरवण्याचं काम हणमंत गायकवाड यांच्याच ग्रुपकडे आहे. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अॅम्ब्युलन्स पोहोचवली जाते. राज्यभरात अॅम्ब्युलन्सचं जाळं तंत्रज्ञानाने जोडून, गरजूंना लाभ पोहोचवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सध्या मुंबईत सुरु झालेल्या बाईक अॅम्ब्युलन्सची जबाबदारी हणमंत गायकवाड यांच्याच संस्थेकडे आहे. दुसरीकडे लंडन आणि अमेरिकेच्या रस्त्यावरही लवकरच ‘भारत विकास ग्रुप’ च्या अॅम्ब्युलन्स धावताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या देशांसोबत त्यांची करारप्रक्रिया सुरु असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.

हणमंत गायकवाड यांचं काम केवळ हाऊस किपिंग आणि आरोग्य सेवे पुरतंच मर्यादित नाही. त्यांच्या संस्थेने शेती क्षेत्रातही मोठी क्रांती करण्याच्या दिशेने पावलं टाकली आहेत. नवनवे तंत्रज्ञानाचा शेतीला आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल, याबाबत त्यांची संस्था संशोधन करुन प्रत्यक्ष कार्य करत आहे. त्यांनी प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट्ट करुन दाखवलं आहे. इतकंच नाही तर जशी शेती इस्रायल मध्ये केली जाते, त्यापेक्षा उत्तम परिस्थिती आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण निश्चितच शेतीतून दुप्पट उत्पन्न घेऊ शकतो, असा विश्वास त्यांना आहे. त्यासाठी त्यांच्या संस्थेने बियाणांपासून ते पोषक पण रासायनिक नसलेली कृषी औषधांची निर्मिती केली आहे.

लालबागचा राजा मंडळाला हवं होतं पावणेसहा कोटींचं कर्ज.

_________________________

मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख. दरवर्षी सरासरी 15 ते 16 कोटी रुपयांची देणगी गोळा होणा-या या मंडळाला हवं होतं 5 कोटी 80 लाखांचे कर्ज. तेही ओसी नसलेल्या इमारतीतील प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी. परंतु मंडळाचा हा डाव धर्मादाय आयुक्त कार्यालयानं हाणून पाडलाय. लालबागचा राजा. लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. राजा जिथं विराजमान होतो, तिथंच लागून असलेल्या विजया रेसिडेन्सी मधील दुस-या मजल्यावरील सुमारे 1800 चौरस फूट जागा खरेदी करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतला. 7 कोटी 31 लाख रुपये एकूण किंमत असलेली ही जागा खरेदी करण्यासाठी मंडळानं बँक ऑफ महाराष्ट्रकडून 5 कोटी 80 लाख रुपयांचे कर्जकाढण्याचे ठरवले. चार वर्षात दीड कोटींप्रमाणे कर्ज फेडण्याचीही हमी देण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्जही करण्यात आला. परंतु धक्कादायक म्हणजे मंडळ ज्या इमारतीमधील जागा खरेदी करत होती त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचे समोर आले. त्यामुळं नोव्हेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्तांनी मंडळाला कर्ज घेण्याची परवानगी नाकारली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडं देणगीच्या रुपानं दरवर्षी सरासरी 15 कोटी रुपये जमा होत असताना मंडळावर कर्ज काढण्याची गरज का पडली आणि जागा खरेदीसाठी ओसी नसलेली इमारत का निवडण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मानद सचिव सुधीर साळवी यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मंडळानं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु याची परवानगी न मिळाल्यानं जागा खरेदीच केली नाही. त्यामुळं जे घडलंच नाही, त्यावर बोलू शकत नसल्याचा खुलासा केलाय. तर मंडळानं धर्मादाय आयुक्त कार्यालयाला 2016 मध्ये दिलेल्या माहितीनुसार मंडळाकडं 6 कोटी रुपयांची मुदत ठेव, 99 ग्रँम सोने, 108 ग्रँम चांदीचा मुकुट बाकी आहे. तर काही चांदीच्या विटा शिल्लक आहेत. सर्वाधिक श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या लालबागचा राजा मंडळास कर्ज काढण्याची वेळ का येते हा खरा प्रश्न आहे.