तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 12 August 2017

जीवघेणा 'ब्लू व्हेल' पसरतोय ग्रामिण महाराष्ट्रातही...? जामनेरला मुलाची आत्महत्या

.

_________________________

जामनेर = रशिया मध्ये जन्म झालेला अॅन्ड्रऑईड मोबाईल व्हिडिओगेम 'ब्लू व्हेल' या खुनी खेळाने धोक्याची पातळी गाठली आहे. विधानसभेत चर्चा होऊनही अद्याप त्यावर पूर्णत: बंदी आणण्यात सरकारला यश आले नाही. आता हा गेम ग्रामिण महाराष्ट्रात पाय पसरू लागल्याचे दिसते आहे. जामनेर तालुक्यात पंधरावर्षीय मुलाने जीव दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दिल्लीनंतर मुंबईच्या अंधेरीतील चौदा वर्षीय मुलाने उंच इमारतीवरून उडी घेतल्याची घटना ताजीच असताना, येथे पंधरावर्षीय मुलाने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणीमात्र पोलिस ठाण्यात कुठलीच नोंद नसून, प्रशासन अद्याप अनभिज्ञ आहे. बदनामीच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. जामनेर तालुक्यातील सवतखेडा गावातील मूळ रहिवासी व वाघारी येथे नववीचे शिक्षण घेत असलेल्या पंधरा वर्षीय कपिलने (काल्पनिक नाव) गळफास घेतल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कुटुंबीयांनी गावातील डॉक्टरांना बोलावून तपासणी केली. त्याला गळफास घेऊन बराच वेळ झाल्याचे डॉक्टरांनी तोंडी सांगीतले. अल्पवयीन मुलाने आत्महत्या का केली असावी? असे प्रश्न उपस्थित होऊन पोलिसांच्या चौकशीला नाहक सामोरे जावे लागेल, याची अल्पशिक्षित कुटुंबीयांत भीती होती. कपिलच्या अंत्यसंस्कारा नंतर त्याचा मोबाईल नातेवाइक तरुणाने पाहिल्यावर त्यात 'ब्लू व्हेल' हा खेळ आढळून आल्याने तरुणाला धक्काच बसला. मुंबईच्या घटनेनंतर गेल्या काही दिवंसापासून दूरचित्रवाणी वाहिन्यांसह वृत्तपत्रांत सुरू असलेल्या चर्चा, बातम्या आणि थेट विधानसभेत चर्चा होत असल्याने गाव-खेड्यातही 'ब्लू व्हेल' गेमची दहशत अगोदरच पोहोचली होती. ज्यांना- ज्यांना कपिलच्या मृत्यूचे कारण कळले, त्यांच्या भुवया उंचावल्या. चर्चेतून घटनेचा उलगडा झाला अन्‌ प्रकरण समोर आले. पोलिस प्रशासन अनभिज्ञ नववीतील कपिलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समजताच जामनेर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, सवतखेडा (ता. जामनेर) येथून एकाही अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची साधी नोंदही पोलिस दप्तरी नव्हती. ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात अशा कुठल्याच बालकावर शवविच्छेदन करण्यात आल्याचे आढळून आले नाही. कारण, कुटुंबीयांनी नको चिरफाड अन्‌ पोलिसांची चौकशी या भीतीने परस्पर कपिलवर अंत्यसंस्कार करून मोकळे झाले आहेत. कुटुंबानंतर तालुक्यात दहशत गावातील नववीचा विद्यार्थी 'ब्लू व्हेल' गेमच्या जाळ्यात अडकून आत्महत्या केल्याची चर्चा सवतखेडा, वाघारीसह तालुक्यात सकाळ पासून सुरूआहे. कुणीतरी अफवा पसरवली असावी, असे वाटत असताना गावातून आणि संबंधित मुलाच्या कुटुंबातून माहिती घेतल्या नंतर त्यांनी त्याच्या मोबाईल गेमचा विषय नाव न छापण्याच्या अटीवर मान्य केला. तो 'ब्लू व्हेल' नावाचा गेम खेळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शांतता रँलीत सहभागी व्हा - जमिअत उलमा - ए - हिंद


सोनपेठ / प्रतिनिधी
येथे जमिअत उलमा - ए - हिंद च्या वतीने शांतता व राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सोनपेठ शहरात शांतता रँलीचे आयोजन करण्यात आले असून या रँलीस सर्व नागरीकांनी उपस्थित रहावे असे अवाहन पत्रकार परिषदेत केले.
सध्याच्या काळात भारतीय राष्ट्रीय एकात्मता एका वेगळ्या टप्प्यामधून जात असून त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता कायम ठेवण्याच्या व शांततेसाठी रँलीचे आयोजन करण्यात आले आहे.या साठी निघणाऱ्या रँलीची सुरूवात दि. 13 ऑगस्ट 2017 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता टिपु सुलतान चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात येणार अाहे. त्यामधून देशभक्तीपर व शांततेचा संदेश दिला जाणार आहे. असे पत्रकारांना सांगितले.
या पत्रकार परिषदेस हाफेज अब्दूल खदिर, हाफेज ऊसामासाब, हाफेज मुजक्कीर, हाफेज मुस्तफा, खुर्शीद भाई अन्सारी, कलीम खूरेशी, मो. हाशम (बाबा), मुस्तफा राज, जावेद अन्सारी, फेरोज अन्सारी, अतिक अन्सारी व सर्व जमिअत उलमा - ए - हिंद चे सोनपेठ शहरातील सदस्य उपस्थित होते.

माहूर मध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जितू चोले
माहूर/प्रतिनिधी

आदिवासी तालुका समाज संघटनेच्या वतीने माहुरमधे आदिवासी जागतीक दिन उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी बिरसामुंडा चौकात माहुर तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर,नगरसेविका मिना कोवे व सपोनि शिवप्रकाश  मुळे यांनी बिरसामुंडा फलकास पूजन केले.यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसाणि,उपनगरध्यक्ष राजकुमार भोपी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे,भाजपा तालुका अध्यक्ष देवकुमार पाटील,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,नगरसेवक दीपक  कांबळे,नगरसेवक ईलियास बावाणी,प्रा.जोगदंड,विकास कपाटे,उपस्थित होते.आदिवासी समाजबांधवांकडून पारंपारिक वेशभूषेत शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून 'झाडे लावा झाडे जगवा' चा संदेश देण्यात आला.यावेळी संजय पेंदोर,आमोल मडावी,विनोद खुपसे,अनिल तोडसाम,डाॅ.संतोष दांडेगावकर,देविदास सिडाम,विकास टेकाम,मोरेश्वर वाटोळकर,संजय शेडमाके,गजानन खुपसे,शामराव कुमरे,रूपेश कोवे,अजय पेंदोर,आनंदराव कुडमते,अविनाश डुकरे,नामदेव कातले,आनंदराव दुमारे,गुलाब गोधनकर,कालिदास शिंदे,पत्रकार वसंत कपाटे,नंदकुमार जोशी,विजय आमले,गजानन भारती,पत्रकार जितू जाधव,जितू चोले,राजु दराडे आदी उपस्थित होते.संजय पेंदोर यांनी आभार मानले.

जि.प.ऊपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा संपन्न


फुलचंद भगत
मंगरुळपीर-अल्पसंख्याक बहूक्षेत्रीय विकास योजना 2016/17 अर्तगत प्रसुती गृह व वार्डाचे बांधकाम भूमीपूजन सोहळा अंदाजे किंमत 75 लक्ष रूपये  जिल्हा परिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा ठाकरे याच्या शुभ हस्ते  प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगाव येथे आयोजित केला होता. त्या प्रसंगी बोलताना महिलाच्या प्रसूती सूलभ रित्या व्हावी प्रशस्त वार्ड़ व ईतर सोई सुविधा मिळाव्यात म्हणून ईमारतीचे बांधकाम मंजूर करून घेतले संपूर्ण आसेगाव परिसरातील महिला भगीनीच्या येणा-या रूग्णांची संख्या मध्ये वाढ होईल, त्यांना वाशिम किंवा अकोला येथे जाण्याचा आर्थिक भार पडणार नाही. त्यामूळे परिसरातील जनतेच्या सुविधा  साठी करण्यात आले.
या प्रसंगी पुंडलिकराव ठाकरे,(अध्यक्ष ख.वि.सं.) आर.के राठोड (रा.काॅ.ता अध्यक्ष), साजिद खान (माजी पं.स सदस्य), अनंत काळे (जिल्हाध्यक्ष रा.यू काॅ वाशिम),संतोष भगत (पं.स.सदस्य), सौ.वनिता चव्हाण (प.स सदस्या), सौ.श्रध्दा शेळके सौ.अनूसया डहाणे( प.स सदस्या) ,मनवर खान ,अकबर पटेल (सरपंच), डाॅ.भगवान भेंडेकर(सरपंच शिवणी) , इरफान शेख ,बबन भोयर ,उत्तम नाईक (संरपच), सुर्यभान चौधरी, भास्कर ईळे( सरपंच कुंभी), गोपाल संगेकर, फिरोज शहा, विजय जाधव, प्रदिप खोटे, सुभाष कावरे ,गजानन शिनगारे , श्रीकृष्ण इंगोले ,सत्तार शहा , डॉ.सानप साहेब, सुरेश पाटिल,  दुरतकर साहेब, मालाणी साहेब, डाॅ सूर्वे साहेब, डॉ प्रशांत वाघमारे, याच्या प्रमूख उपस्थीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमचे आयोजन ग्रा.प आसेगाव व प्रा.आ. केन्द्र आसेगाव आयोजित केला होता.

फुलचंद भगत,मंगरुळपीर
9763007835

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

ना गोळीची भीती..., ना स्फोटाची फिकीर; आता दहशतवाद्यांशी लढणार लष्कराचे 'रोबोट्स'.

जामनेर = रशिया मध्ये जन्म झालेला अॅन्ड्रऑईड मोबाईल व्हिडिओ गेम 'ब्लू व्हेल' या खुनी खेळाने धोक्याची पातळी गाठली आहे. विधानसभेत चर्चा होऊनही अद्याप त्यावर पूर्णत:बंदी आणण्यात सरकारला यश आले नाही. आता हा गेम ग्रामिण महाराष्ट्रात पाय पसरू लागल्याचे दिसते आहे. जामनेर तालुक्यात पंधरावर्षीय मुलाने जीव दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.


भांडुप मध्ये फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की हा सिलेंडर 300 मीटर अंतरावर जाऊन पडला.

बोरिवली पश्चिम इथल्या मातोश्री काशीबेन ब्रजलाल इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाने सध्याच्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याने अल्पावधीतच शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतलाय.

पिंपरी-चिंचवड मध्येआज चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी हाकली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पिंपरी-चिंचवड मध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यानंतर गेल्या सात वर्षात झाली नाही एवढी बेरोजगारी वाढली- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

औरंगाबाद = भरधाव येणा-या लष्कराच्या ट्रकने दाम्पत्याला उडवले, महिलेचा मृत्यू. छावणी टोल नाक्याजवळील घटना.

पिंपरीत रिंगरोड बाधितांचं मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास रस्ता अडवण्याचा प्रयत्न.

रावसाहेब दानवेंकडून तब्बल अडीच लाख रुपयांचे वीजबिल थकीत, 83 महिन्यांचं वीजबिल दानवेंनी थकवल्याचे वृत्त. मात्र महावितरणकडून कोणतीही कारवाई नाही.

एनडीए मधून बाहेर पडण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार - खासदार राजू शेट्टी.


सरकार समस्या असू शकत नाहीत, जर सरकार स्वतःसमस्या असतील तर सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश

गोरखपूर = मुलांच्या मृत्यूंची जबाबदारी घेत मी राजीनामा दिला, बीआरडी कॉलेजच्या निलंबित प्राचार्यांची प्रतिक्रिया.

पुणे = साउंड आणि लाईट व्यावसायिकांचा संप अखेर मागे.

नागपूर = श्रीकृष्ण शोभयात्रेच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद चीनच्या वस्तूंचा विरोध करणार, स्वदेशीवर आधारित शोभायात्रा राहणार.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाला आय एस ओ मानांकन, असे मानांकन मिळणारे जिल्ह्यातील पहिलेच पोलीस स्थानक.

उत्तर प्रदेश सरकारने बीआरडी मेडीकल कॉलेजच्या मुख्याध्यापकांना केले निलंबित,या रुग्णालयात 63 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे.

राज्यसभेतील जदयूच्या नेतेपदावरुन शरद यादव यांना हटवलं.

पालकमंत्र्यांना झेंडावंदन पासून रोखणार, कर्जमाफी करा मगच ध्वजारोहण करा - अजित नवले.

मोपलवारची चौकशी समृद्धी महामार्ग प्रकरणी नाही, तर 15 वर्षात केलेल्या गैरकारभारा विषयी आहे, मोपलवारच्या माझ्याकडे 35 क्लिप आहेत - अनिल गोटे

राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे, आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत - उद्धव ठाकरे.

तिस-या कसोटीत शिखर धवनचे दमदार शतक. दिवसअखेर भारताच्या 329/6 धावा .

ठाणे = पोटच्या मुलीस वेश्यागमनास लावणाऱ्या उल्हासनगर येथील 40 वर्षीय महिलेस अटक.

लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मिरजेत घडली.

15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही : सुकाणू समिती

_________________________

शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही. 14 ऑगस्टला राज्यभर चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला.मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.कर्जमाफी करा आणि मगच ध्वजारोहण करा,असं सुकाणू समितीने सांगितलं. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

स्वातंत्र्यदिनी गेवराई शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 12 __ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
       स्वातंत्र्यदिनी गेवराई येथे भरगच्च कार्यक्रम होणार असून यामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित गेवराई येथील चिंतेश्वर प्राथमिक विद्यालयात मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी साडेसात वाजता स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात येत आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुषमा मोरगावकर यांनी केले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित र. भ. अट्टल महाविद्यालयात सकाळी 7:50 वाजता स्थानिक नियामक मंडळाचे निमंत्रित सदस्य दत्तात्रय पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे. गेवराई शहरातील माळी गल्ली येथील पवार इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रिॅनिक्स चा शुभारंभ सकाळी साडेदहा वाजता होत आहे. यानिमित्त सर्वांनी तिर्थप्रसादास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रोप्रायटर शिवाजीराव पवार, विलास पवार, गणेश पवार यांनी केले आहे. आमदार अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत गेवराई शहरातील मोंढा भागात माऊली महिला अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे भव्य उदघाटन करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी अकरा वाजता सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन दिपमाला अरुण चाळक व संचालक महिला मंडळाने केले आहे. येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या गेवराई शाखेच्या सातव्या वर्धापन सोहळा निमित्ताने तिर्थप्रसाद व पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी केले आहे.
        भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई या शहरात आणखीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯


श्री संत भगवान बाबा जयंती निमित्य जिंतूर मध्ये मोटारसायकल रैली

प्रतिनिधि
      जिंतूर श्री संत भगवान बाबा जयंती निमित्य शाहरातून  मोटारसायकल रैली काढण्यात आली रैली साइग्राउंड पासून आण्णाभाऊ साठे चौक, छत्रपति शिवाजी चौक,मेन रोड,वरूड वेस् ते भगवांनबाबा चौकाचे अनावरण व सर्व हुतात्म्याना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. चौकाचे अनावरण झेंडा वंदन करुण शेवडी येथील श्री संत भगवान बाबा गडावर समारोप करण्यात आला.रैलीत वंजारी समाज बाधवानी 1 हजार जवळपास मोटारसायकली चा सहभाग घेतला या रैली चे आयोजन भगवान् बाबा युवक संघटनेचे अध्यक्ष लक्षमण बुधवंत आयोजक व पदाधिकारि रवि घुगे, योगेश घुगे, यांच्या सह शेकडो समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते

भोकरदन तालुक्यात अवैद्य धंद्यांना उत ,प्रतेक फाट्यावरील हाॅटेलवर टपरीवर मिळते देशीची चपटी व घुटका    पोलिसांचे दुर्लक्ष...कारवाई मोठी कारवाई होणाचे गरजेचे....


   प्रतिनिधी : सोयगाव देवी

भोकरदन शहरातील अनेक परीसरात अवैध दारू, जुगार,गुटखा या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.
हे अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट अशी भुमिका घेत आहे. अवैध धंदे स्थानिक राजकीय नावांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सुरु असुन भर रस्त्यावर अवैद्य धंदे मांडले आहे, एवढे असतांनाही नवीन आलेले  पोलिस निरिक्षक चौधरी यांचा प्रभाव शहरात फिका पडला असल्याचे दिसत आहे.
    भोकरदन शहरात व तालुक्यातील ग्रामिण भागात राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करून गेल्या पाच महिण्यापासुन अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. शहरातील ठेल्यांवर,टपरीवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू,गुटखा राजरोसपणे विकणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री तसेच  खुलेआम वाळु माफिया रेतीची वाहतुक करत असुन स्थानिक पोलिसांनी व महसुल विभागाने याकडे विशेष पथक नेमुन कारवाई केली तर या अवैद्य धंद्यांना चाप बसेल . पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक हे  अवैध धंदे करणारे बोलत आहे.तालुक्यात चालु असलेले हे अवैद्य रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील गुटखा, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही हा प्रश्न नागरीकांना कायमच सतावत आहे. या रस्त्यालगत अनेक दारुडे पडलेले आढळतात. मात्र काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक शहरवासीयांकडुन पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
   चार दिवसापुर्वीच तालुक्यातील बरंजळा फाट्यावरील असलेल्या एका धाब्यावर केवळ ५ रूपयाच्या वादातुन एकाचे कुराडीने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रर्यंत केला व मोटार सायकल फोडली होती.तसेच हे तळीराम दारू पेऊन रस्त्यावरून वाटसरू महिलांना छेडछाड करतात ,व अनेक ठिकाणी अश्लिस शिव्या दिल्या जातात.हा प्रकार अशाच चालु राहिला तर महिलांना बाहेर निघणे कठीण होणार असुन मुलीही शाळेत जाण्यासाठी घाबरत आहे.पण येवढी मोठी घटना होऊनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने अवैद्य धद्यावाल्यांनी डोके वर काडले आहेत.व बिनदास्त पणे अवैद्य धद्यांची दुकाने थाटली आहे.शासनाने दारू बंदी केली पण आता तळीरामांना फाट्यावर गावात व काही ठिकाणी तर घरपोच दारू मिळत असल्याने दारू पिणार्यांच्या संख्खेत वाढ झाली असुन अनेकांचे घर उघड्यावर येत आहे. अशातच दोन महिण्यापुर्वी भोकरदन पोलिस स्टेशनला मुंबई येथुन आलेले चौधरी यांनी नविन  पदभार सांभाळला. त्यांचा मुंबईचा कारभार पाहता शहरातीला सुरूवातीला अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता त्यांचा प्रभाव भोकरदन शहरात फिका पडल्याचे दिसत आहे.      शहराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.  शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले लागेबांधे मोडीत काढून अवैध धंदेवाल्यांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन शहर अवैध धंद्यापासुन मुक्त करून पोलीसांवर कारवाई करणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

   या ठिकाणी मिळते दारूची चपटी व गुटखा..

      भोकरदन शहरात ,व भोकरदन जालना रोडवरील प्रत्येक धाब्यावर दारूची चपटी व गुटखा घुले आम विकला जातो.तसेच सिल्लोड रोड,जाफराबाद रोड ते सिपोरा बाजार या रोडवर सर्व कंपण्यांची दारू उपलब्ध असल्याचे दारू पिणार्या तळीरामातुन सांगितले जात आहे.

   अशी आहे रेट :

     देशी भिंगरी ७० ते ८० रूपये ओशी २००,बीपी २००,बिअर २००,या कंपण्यांची दारू सर्वाधिक विकली जात असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यात चाहा हाॅटेलवर मिळते सर्व प्रकारच्या दारू.राञी ८ च्या नंतर या दारू माफियांनी घरपोच डिलेवरी मिळते.व सकाळी ६ वाजेपासुनच या धंद्याला सुरवात होत असुन दारू माफियांची संध्या चांदीचे दिवस आले असुन राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात शहरात दारू विकली जात आहे. 

    प्रतिक्रिया : भोकरदन तालुक्यातील ग्रामिण भागातील नदीतुन वाळु माफिया चोरट्या मार्गाने वाळु वाहतुक करत होते,तहसिलने ही चोरटी वाळु वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार केले असुन त्यांच्यावर कारवाईचे सञ हाती घेतले आहे.

  योगिता कोल्हे : तहसिलदार भोकरदन

!!इको-फ्रेन्डली राख्यातुन पर्यावरण जनजागृती!!

समाधान गायकवाड मेहकर प्रतिनिधी
8 जुलै

      अवैध वृक्षतोड व वाढते प्रदुषण ह्यामुळे दिवसेदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे.येणारे संकट टाळण्यासाठी रक्षा बंधनचे औचित्य साधुन राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी इको फ्रेन्डली राख्यातुन पर्यावरण जनजागृतीचा आगळा वेगळा उपक्रम शाळेत राबवला.
राखीमध्ये सर्वञ प्लॅस्टिकचा वापर होतो तो टाळण्यासाठी विद्यार्थ्यानी हस्तकलेतुन केळीच्या पानाचा,टाकावु लग्नपञिका,डाळीबांच्या कळ्या,गुलाबाचे फुल इ.पासुन राख्या तयार करुन हस्तकलेच्या राखीतच खरा आनंद आहे.हस्तकौशल्यातुन बनवलेल्या राख्या ह्या बाजारात मिळणाऱ्या राख्यापेक्षा उत्तम आहेत.इको-फ्रेन्डली राख्यातुन पर्यावरण जनजागृतीचा आगळा वेगळा उपक्रम शाळेत राबविण्यात आला या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अजिंक्य बार्डेकर,शाळेतील शिक्षक विजय फंगाळ,गणेश निकस,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

गेवराई पोलीस ठाण्यात पुस्तक प्रकाशन सोहळा

सुभाष मुळे...
--------------
गेवराई, दि. 12 __ पोलीस स्टेशन गेवराई येथे जेष्ठ नागरिक पुस्तक वितरण व प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सर्व उपस्थित लोकांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
      सदर पुस्तकात जेष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व मदत या विषयी माहिती दिली आहे. यावेळी आय एस ओ प्रमुख प्रशांत जोशी, पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस नाईक नारायण खटाणे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, दैनिक रिपोर्टरचे तालुका प्रतिनिधी भागवत जाधव, पत्रकार सुभाष सुतार, शिवाजीराव ढाकणे माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा, जेष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष शेख जमादार, उपाध्यक्ष अरविंद जाधव, महादेव जोजारे, सचिव याकुब अन्सारी यांसह गेवराई हद्दीतील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯