तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 19 August 2017

केकत पांगरी येथे संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 20 ( प्रतिनिधी ) तालुक्यातील केकत पांगरी येथे नाभिक समाज वतीने श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
       नाभिक विद्यार्थी आघाडी गेवराईचे शहरध्यक्ष विक्रम राऊत, कृष्णा राऊत, विष्णु राऊत, रामेश्वर राऊत, दत्ता राऊत, केशव राऊत लक्ष्मण राऊत, आदेश राऊत व समाज बांधव उपस्थित होता.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

परतूर रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अभियान; शाळा,काॅलेजचा सहभाग रेल्वे विषयी अमुल्य मार्गदर्शन


परतूर 
प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला साद देत दक्षिण मध्य रेल्वेच्या परतूर रेल्वे स्थानकावर स्वातंञ दिनाचे औचित्य साधत स्वच्छता पंधरवाडा साजरा करणार असल्याचे स्टेशन मास्टर शंकरलाल मिना यांनी सांगितले.

बुधवार रोजी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ,लाॅयन्स क्लब परतूर,ब्राईट स्टार इंलिश स्कुल,व लाल बहादुर शास्ञी महाविद्यायातील विद्यार्थीत्या सह विविध सामाजिक संघटनांचे पदधिकारी ,आजी ,माजी,

लोकप्रतिनिधी,शिक्षक व रेल्वे संघटनांचे पदधिकारी,कर्मचारी,व अधिकारी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड परिमंडळाचे वरिष्ठ यांञिक अभियंता मुर्ती यांच्या हस्ते स्वच्छता अभियांनाचा शुभारंभ झाला.यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,लाॅयन्स कल्ब चे अध्यक्ष मनोहर खालापुरे,नगरसेवक राजेश भुजबळ,बाबुराव हिवाळे,राजेश खंडेलवाल, स्टेशन मास्टर शंकरलाल मिना,बाबुलाल मिना,यांची उपस्थिती होती.

यावेळी स्टेशनच्या दोन्ही प्लाॅट फाॅम ,स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅन्ड ,मंदीर परिसर स्वच्छ करून  साफ सफाई करण्यात आली.या स्वच्छता अभियानात पहिल्या दोन दिवसात शहरातील शाळा,काॅलेजच्या 200-300 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

स्वच्छता हा प्रगतीमधील  एक महत्वाचा घटक असुन तो प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छता राखत सामाजिक स्वच्छता देखील राखली पाहिजे.यामुळे देशाची व आपल्या प्रगतीत हातभार लागेल.सार्वजनिक परिसराची स्वच्छता राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.ते आपण न चुकता पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन वरिष्ठ अभियंता श्री.मुर्ती यांनी या प्रसंगी व्यक्त केले. शेवटी रेल्वेच्या कार्या विषयी माहिती देऊन भारतीय रेल्वेत कसे सहभागी होता येईल याच्यावर सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.

वैयक्तिक घराप्रमाणे नागरिकांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा.
शंकरलाल मिना
स्टेशन मास्टर .परतूर

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के .


_________________________

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री 10.20 ते 10.30 वा. दरम्यान धक्के जाणवले. 4.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. सांगलीतील चांदोली धरण क्षेत्राच्या परिसरात भूकंपाचा केंद्र असल्याची माहिती मिळते आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवाय, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणं सुरक्षित आहेत.

शिवसेना प्रमुखांच्या मुलाखतींचा संग्रह असेलेल्या 'एकवचनी' चे प्रकाशन.

_________________________

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या मुलाखतींचा द्विखंडीय संग्रह ‘एकवचनी’चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.या पुस्तकामध्ये सामानाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक घेतलेल्या मुलाखतींचे संकलन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या 100 मुलाखतींचे वाचन या पुस्तकातून होणार आहे. 'एकवचनी' नावाच्या या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते. यावेळी जेटलींनी बाळासाहेबांच्या संवाद कौशल्याची तुलना गांधींजींशी केली. लोकमान्य टिळकांनी जसा लोकसंग्रह केला तसाच बाळासाहेबांनी केल्याचे उद्धव ठाकरेंनी  यावेळी म्हटले आहे.

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चुकूनही करु नका.


_________________________

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही सांगणार आहोत. रात्री झोपताना अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करणं टाळावं अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. अनेकदा लहानशा गोष्टीही आपलं मोठं नुकसान करु शकतात. ज्योतिष शास्त्रातही याचसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. असे म्हटले जाते की, ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम होऊ शकतात. तसेच आपण सुख, शांती आणि प्रसन्नता गमावतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या रात्री झोपण्यापूर्वी नाही केल्या पाहीजेत अन्यथा आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात.

१) रात्री झोपण्यापूर्वी डोक्याजवळ पाणी ठेऊनका. असे केल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते.

२) रात्री झोपताना डोक्याजवळ पर्स, पाकीट ठेऊनका, यामुळे घर खर्च वाढतो.

३) सोनं-चांदीही डोक्याजवळ ठेवून झोपल्यास सौभाग्य जास्त काळ टिकत नाही.

४) लोखंडाच्या चावी शिवाय इतर धातुंच्या चाव्या तुमच्याजवळ ठेवून झोपू नका.

५) झोपताना चप्पल, शूज आपल्याजवळ ठेवून झोपल्यास वाईट स्वप्न पडतात.

६) नेलकटर, ब्लेड किंवा कैची सारख्या वस्तू झोपताना जवळ बाळगल्यास शारीरिक शक्ती कमी होते.

७) तुळशीजवळ दिवा दररोज लावावा. मात्र, सायंकाळच्या सुमारास तुळशीत पाणी टाकू नये आणि त्यासोबतच पाणंही तोडू नका.

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

'गाव करेल ते राव काय करेल' या उक्तीची प्रचिती सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच नऊ किलोमीटर अंतरावर वसलेल्या लालठाणे गावात आली असून मंगळवारी ( ता.15) झालेल्या ग्राम सभेत गावाने दारू बंदीचा निर्णय घेतला आहे.

येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा कालचा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला.

छत्तीसगड मधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

2018 ची निवडणूक शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढणार - अमित शाह.

ना बंदूक, ना युद्ध....चीनची आर्थिक कोंडी करुन भारत करणार चीनचा पराभव.

नागपूर = भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे हृदयविकाराने निधन.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची चळवळ उभी केली - उद्धव ठाकरे.

शिवसेनेचं अस्तित्व आधी सर्वांनी डावललं - उद्धव ठाकरे.


उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 30 हून अधिक प्रवासी जखमी.

जुन्नर बार असोसिएशनचे माजी खजिनदार व विद्यमान सदस्य अॅड.ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचा डेंग्यूमुळे मृत्यू.

पिंपरी चिंचवड = शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, रहाटनी येथील घटना.

सिंधुदुर्ग = गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 10 ठिकाणी मिनी कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक गेडाम यांची माहिती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या फेर परीक्षेचा ऑनलाइन निकाल 21 ऑगस्टला होणार जाहीर.

नंदुरबार मध्ये आठ वर्षीय चिमुरडीला बसने चिरडलं, अंकलेश्वर - ब-हाणपूर हायवेवरील घटना, संतप्त जमावाने टायर पेटवत रोखून धरला हायवे.

राजस्थान मधील चित्तोडगड येथे दोघांना पोलिसांकडून अटक, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील व्यवसायिकाचा समावेश, 8 लाखांच्या जुन्या नोटा केल्या जप्त.

गोंदिया = शारीरिक संबंध करताना पाहणा-या मुलाला विष पाजून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना.

कोल्हापूर = विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरण, आरोपी शिक्षक विजय मानगुडेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

मुंबई = माझगाव परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांना एमडीची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला अटक, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त गोरखपूर जिल्ह्याला दिली भेट.

जदयू मध्ये कुठलीही फाटाफूट नाही, विधानसभेतील 71, विधानपरिषदेतील 30 आमदार आणि सर्व पदाधिकारी नितीश कुमारांसोबत - जदयू नेते केसी त्यागी यांची पाटण्यामध्ये माहिती.

डोंबिवली = भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना मानपाडा पोलिसांनी अटक व सुटका . खोणी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सरपंचाला धमकावल्याच्या प्रकरणामुळे केली होती अटक.

कृषी कर्जमाफी योजनेत शेतक-यांकडून लाच मागणा-या महसूल विभागाच्या पाच कर्मचा-यांना उत्तरप्रदेश सरकारने केले निलंबित.

लुधियाना सिटी सेंटर घोटाळा प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासह इतर आरोपींना क्लिन चीट.

सोलापूर = बेपत्ता इसमांचा खून, सहा जणांवर गुन्हा दाखल, धर्मगावातील घटना़.

नाशिक = घरपट्टी आणि पाणी पट्टी वाढविल्याने नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळविण्याचा प्रयत्न.

मध्य प्रदेश = कटनी येथून 2 लाख 48 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटांसह, छपाई मशीन हस्तगत, तीन जण अटकेत.

कोल्हापूर = राजारामपूरी पोलीस ठाण्यातील पोलीस काॅन्स्टेबल किरण गवळी लाच घेताना अटक.

वाशिम = रिसोड मार्गावर पॉलिटेक्निक कॉलेज जवळ आईची चारवर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मनोरजवळ अपघात. कंटनेर कारचा भीषण अपघात. तिघांचा मृत्यू. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात.

आर. के. पब्लिक स्कुल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 19 __ येथील आर. के. पब्लिक स्कुलमध्ये भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
     याप्रसंगी पार्थ प्रतिष्ठान संस्थेचे सचिव आर. के. चाळक सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा योगिता चाळक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चाळक प्राचार्य प्रा. गणेश चाळक पालक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
    ध्वजारोहन नंतर प्रशालेतील चिमुकल्यांनी स्वतंत्रादिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्रीमती मनीषा मिस व श्रीमती प्रिया मिस यांनी स्वतंत्र्य दिनाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप आर. के. चाळक सर यांनी केला. शेवटी आभार श्रीमती भारती मिस यांनी मानले व संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रत्नमाला मिस यांनी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे घसरले, 30 हून अधिक प्रवासी जखमी.


_________________________

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 6 डबे रुळावरुन घसरले आहेत. ही एक्स्प्रेस हरिद्वारच्या दिशेनं जात होती. शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हरिद्वारहून पुरीकडे जाणारी कलिंग उत्कल एक्स्प्रेसचा भीषण असा अपघात झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जण मृत पावल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान स्थानिक रहिवासी दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेची छायाचित्रं पाहून हा अपघात खूपच भीषण असल्याचे दिसत आहे. अपघाता दरम्यान एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर चढले आहेत. तर रुळालगत असलेल्या एका घरातही एक्स्प्रेसचा डबा घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुजफ्फरनगर आणि मिरतहून मदत आणि बचाव पथक घटना स्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. ही ट्रेन शनिवारी रात्री 9 वाजे दरम्यान हरिद्वार येथे दाखल होणार होती.

सेनगांव येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे सात दिवसीय उपचार शिबिराचे आयाेजन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे दि.२० ऑगस्ट रविवार ते २६ ऑगस्ट शनिवार या सात दिवशीय भव्य उपचार शिबिराचे आयाेजन केले असुन उदघाटक म्हणुन सेनगांव तहसिलच्या तहसिलदार वैशाली पाटील राहणार आहेत.
एक्युप्रेशर नैसर्गीक चिकीत्सा पध्दत आहे आपल्या हातात आणि पायात एक्युप्रेशर पाँईंट असतात ज्यांना दाबल्यास शरीरातील राेग,आजार हळुहळु नैसर्गीक पध्दतीने विना औषध बरे हाेऊ लागतात त्याने रक्ताभिसारण आणि राेगप्रतिकारक शक्ती वाढते या शिबिरामध्ये भारतीय एक्युप्रेशर अँन्ड हेल्थ केअर संस्था हनुमानगढ (राज्यस्थान) येथील सुप्रसिध्द डाँ.सुरेंद्रसिंह यांच्याकडुन ईलाज व याेग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिबिराचे वैशिष्ट्ये ब्लड प्रेशर, कंबर दुखणे,थायराईड,साईरिका,हाडाचा त्रास,लकवा,पाेटातील विकार,शुगर,मानेचे विकार,झाेप न येणे,गँस,काेनताही जुना आजारावर या सात दिवसीय शिबिरात उपचार केले जातील. हे शिबिर भारत मेडीकल यांच्या नविन जागेत असेल व सकाळी ०८-३० ते १२-३० व दुपारी ०४ ते ०७-३० पर्यंत असेल. तरी या शिबिरात बहुसंख्येने उपस्थित राहुण गरजु रुग्णांनी उपचाराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिर सेनगांव च्या विश्वस्ताकडुन करण्यात आले आहे.

कर्नाटकात कर्जमाफी नंतरही शेतकरी आत्महत्या, एका महिन्यात 90 शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा.

_________________________

कर्नाटकात दुष्काळाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या अजूनही सुरुच आहेत. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्ज माफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल पासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्याकेली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनीआत्महत्या केली असल्याचं रिपोर्ट मध्ये नमूद आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पावलं उचलली जात असल्याची घोषणा केली असली तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. 15 ऑगस्ट रोजी रमेश नावाच्या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली होती. दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. रमेशच्या नावे एक एकर जमीन होती. सुरुवातीच्या तपासा दरम्यान डोक्यावर दोन लाखाचं कर्ज असल्याने रमेशने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. कृषी विभाग आणि स्थानिक अधिकारी रमेशच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिन्याच्या अखेर पर्यंत नेमकी माहिती हाती लागेल. जुलै महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्ये मधील 50 टक्के आत्महत्या कावेरी जवळील परिसरात झाल्या आहेत. मंड्या, म्हैसूर, हासन आणि कोडागू येथे 48 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 30 जून पर्यंत मंड्या येथे एकूण आठ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 31 जुलै पर्यंत हा आकडा 29 वर पोहोचला. याचप्रमाणे म्हैसूर येथे मृतांचा आकडा 11 वरुन 25 वर पोहोचला आहे. हासन येथे जून महिन्यात सात शेतक-यांनी आत्महत्या केली. जुलै अखेर पर्यंत आत्महत्येचा आकडा 19 झाला होता. बागलकोट आणि बेळगावात जून महिन्यात सहा-सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. जो आकडा नंतर अनुक्रमे 12 आणि 22 झाला.

नाशिकमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू.

_________________________

नाशिक मधल्या टाकळीरोड जवळ झालेल्या भीषण अपघातात पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यु झाला. रमेश साळी असं मृत पीएसआयचं नाव आहे. शनिवारी दुपारी दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात साळी यांचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं. हवालदार म्हणुन कारकिर्दीला सुरुवात केलेल्या साळी यांनी नाशिक शहर, कळवण येथे सेवा केली होती. सध्यासिन्नर पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक म्हणून ते कार्यरत होते. मात्र 19 जुलैपासून ते वैद्यकीय कारणांस्तव रजेवर होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.अपघातानंतर बघ्यांपैकी काहींनी प्रसंगावधान राखत झाडाची फांदी आणून साळी यांच्या मृतदेहावर टाकली. रस्त्याच्या मधोमध छिन्नविछिन्न अवस्थेतला साळी यांचा मृतदेह पडलेलाअसल्यानं नारायण बापू नगर ते टाकळीरोड काहीकाळ वाहतूकीसाठी बंद करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला.दरम्यान, काहीशा निर्जन रस्त्यावर झालेल्या या घटनेनं हा अपघात की घातपात याबद्दल संशय व्यक्त केला गेला आहे. हा दोन दुचाकींचा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

फक्त एक मेसेज आणि जिओ फीचर फोनची नोंदणी.

_________________________

जिओचा फीचर फोन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. अनेक स्टोअरमध्ये प्री-बुकींगसाठी नोंदणी सुद्धा करण्यात आलं आहे. पण तुम्ही या फीचर फोनचं बुकींग घरबसल्याही करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे. तुमचा जिओफोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये जाऊन टाइप करा JP< तुमचा परिसराचा पिनकोड < तुमच्या जवळच्या जिओ स्टोरचं कोड टाकून हा मेसेज 702 11 702 11 नंबरवर सेंड करा. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला रिलायन्स जिओ कडून thank you असा मेसेज येईल. 24 ऑगस्टला जेव्हा या फोनची अधिकृत प्री-बुकींग नोंदणी सुरु होईल तेव्हा कंपनी प्री-बुकींगसाठी मेसेज केलेल्या आपल्या ग्राहकांना यासाठी फोन करेल. त्यानंतर हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी त्यांच्या जवळच्या जिओ स्टोरचा कोड देईल. तिथं त्यांना जिओचा फीचर फोन उपलब्ध होईल. जिओ फोनच्या बुकींगसाठी तुम्हाला फक्त आधार कार्डची झेरॉक्स कॉपी द्यावी लागणार आहे. आधार नंबरवरच तुम्हाला जिओ फोन बुक करता येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिओ फोन ग्राहकांचा हाती येईल अशी आशा व्यक्त करण्यात आहे.

भारतीय इतिहासामध्ये दडलेली काही रहस्य.

_________________________

कुठल्याही प्रांताचा इतिहास, तेथील संस्कृतीशी आपली ओळख करून देत असतो. पण याच इतिहासा मध्ये काही घटना अश्या असतात की त्यांच्या मागील रहस्य नक्की आहे तरी काय ह्या प्रश्नांची उकल होणे कठीण होऊन बसते. आपल्या भारतीय इतिहासा मध्ये देखील काही गूढे अशी आहेत, की इतकी शतके उलटून गेल्यानंतरही त्यांच्या मागील रहस्ये अजूननही उलगडलेली नाहीत. इंडस व्हॅली संस्कृती : इंडस व्हॅली संस्कृती हे भारतीय इतिहासा मधील प्राचीन रहस्य आहे. इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृतींच्या पेक्षा इंडस व्हॅली चा विस्तार मोठा. या संस्कृतीबाबत वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. ह्या संस्कृतीचे निर्माणकर्ते आणि त्यांची गूढ अशी ४००० वर्षे जुनी चित्रलिपी, अजूनही इतिहासकारांना पूर्णपणे समजले नाहीत. अजून एक अजब गोष्ट अशी की या संस्कृतीशी निगडीत सर्व ठिकाणांचा, जवळपास एकाच वेळी विनाश झाला, तो नेमका कसा हे ही रहस्य अजून उलगडलेले नाही.छत्तीसगड मधील बस्तर प्रांताजवळील गुहांमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना काही भित्तीचित्रे सापडली आहेत. या चित्रांमध्ये मानवी आकाराचे, पण नाक – डोळे नसलेले जीव आणि उडत्या तबकड्या ( ufo ) दर्शविण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट अशी की आसपासच्या गावांमध्ये आकाशातून परग्रहावरील लोक येत असल्याच्या कथा चवीने सांगितल्या जातात. त्यामुळे ह्या भित्तीचित्रांचा आणि परग्रहावरील लोकांचासंबंध तो काय, या प्रश्नांचे उत्तर आजही सापडलेले नाही. बिहार येथील राजगिर या शहराजवळ सोन भांडार नावाची गुहा आहे. मगधचा राजा बिम्बिसार याच्या खजिन्याकडे जाण्यासाठी या गुहेतून वाट तयार केली गेली असल्याचे सांगितले जाते. त्यामागची गोष्ट अशी, की राजा बिम्बिसाराला धन जमविण्याची फार हौस होती. आपल्या कारकिर्दीत त्याने मोठा खजिना जमविला होता. जेव्हा त्याचा मुलगा अजातशत्रू याने बिम्बिसाराला कैदेत टाकले तेव्हा आपला खजिना त्याच्या हाती लागू नये म्हणून बिम्बिसाराने या गुहेत लपविला. या खजिन्यापर्यंत कसे पोहोचायचे हे सांगणारी काही चित्रे त्या गुहेतच आहेत असे म्हटले जाते. ब्रिटिशांनी देखील खजिन्याच्या शोधाखातर या गुहे मध्ये तोफा डागून तिथल्या भिंती पडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

हैदराबादचे सातवे आणि अखेरचे, असफ जाह वंशाचे निजाम, मीर ओस्मान आली खान यांच्या संग्रही अनेक मौल्यवान हिरे होते. त्यांचा खजिनाही प्रचंड मोठा होता असे म्हणतात. १९३७ साली ‘ टाईम्स ‘ या मासिकाने, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मीर ओस्मान आली खान यांचा उल्लेख केला होता. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांची खासगी दौलत आणि आणि त्यांच्या संग्रही असलेल्या मौल्यवान रत्नांपैके अनेक रत्ने गायब झाली. त्यांचा शोध आजता गायत लागू शकलेला नाही. असे सांगितले जाते की मीर ओस्मान अलींची धनदौलत आणि अनेक मौल्यवान रत्नांचा खजिना हैदराबाद येथील किंग कोठी पॅलेस या निजामांच्या निवासस्थान असलेल्या वाड्याच्या तळघरा मध्ये दडविलेला आहे.

राजस्थानातील जैसलमेर शहरापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असलेले कुलधरा हे गाव एके दिवशी, कैक वर्षांपूर्वी अचानक निर्मनुष्य होऊन गेले. या घटने मागेही निरनिराळ्या आख्यायिका आहेत. पालीवाल ब्राह्मण रहात असलेले कुलधरा हे गाव एके काळी अतिशय संपन्न होते. पण त्या काळी सलीम शहा नावाच्या अतिशय क्रूर सरदाराची नजर गावाच्या सरपंचाच्या मुलीवर पडली आणि तिच्याशीच आपण लग्न करणार असा हट्ट त्याने धरला. जर ग्रामस्थांनी हे लग्न लाऊन दिले नाही तर मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करू अशी धमकीही सलीम शहा ने ग्रामस्थांना दिली. त्याच्या या धमकीने घाबरून जाऊन ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलाविली आणि त्या रात्री कुलधरा मधील जवळजवळ ८० परिवारांमधील लोक गाव सोडून निघून गेले. पणजाण्यापूर्वी त्या गावामध्ये परत कोणीही सुखाने नांदू शकणार नाही असा शाप त्यांनी दिला. तेव्हापासून आजवर कुलधरा हे गाव अगदीनिर्मनुष्य आहे. त्या गावातील सर्व लोक कुठे गेले आणि त्यांचे पुढे काय झाले हे रहस्य आज ही उकललेले नाही.