तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 26 August 2017

लोकलढ्यासाठी कलेचं विद्यापीठ उभारण्याची गरज - संभाजी भगत


    तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
बीड :  येथील ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या कार्यालयात लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवर्तनाच्या लोकलढ्यासाठी कलेचं विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचे नमुद केले.
      परिवर्तनवादी हे वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागलेले आहेत त्यांनी आता आपापले खोपे बाजुला सारून किमान समान कार्यक्रमावर एकत्रित काम करण्याची गरज आहे. प्रत्येक पक्ष संघटनेमधील कट्टरता बाजुला सारण्याची गरज आहे. कट्टरवाद्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर त्यांना सोडून खऱ्या अर्थाने परिवर्तन करु ईच्छिनाऱ्यानी आता समोर  येण्याची आवश्यकता आहे. आणी परिवर्तनाच्या लढ्यासाठी कलेची जोड असल्याशिवाय परिवर्तन वांझोटे असेल म्हणूनच परिवर्तनाच्या लोकलढ्यासाठी कलेचं विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले.
        यावेळी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन चर्चासत्रास सुरुवात झाली.विचारमंच्यावरील कॉ. नामदेव चव्हाण व कॉ. राम बाहेती यांनी संभाजी भगत यांचे स्वागत केले. प्रास्ताविक पंकज चव्हाण यांनी केले. यावेळी बीड शहरातील वकील, प्राध्यापक, विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

राविकाँच्या शहराध्यक्ष पदी अमोल भाले यांची निवड

पाथरी/प्रतिनिधी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या शहराध्यक्ष पदी अमोल भाले यांची निवड तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे यांनी केली आहे शनीवारी जिल्हाअध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या हस्ते भाले यांना निवडीचे पत्र दिले.
या वेळी राविकाँ तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील, नगराध्यक्ष नितेश भोरे, सुनिल कांबळे, आकाश कांबळे, संदिप वानखेडे, मिरेश काळे, अनिल कांबळे, देविदास तांबे, गुलाब भोरे, परमेश्वर कांबळे, संदिप लांडगे, अनिकेत भाले पाटील दिपक वाळके पाटील यांची उपस्थिती होती. या निवडी बद्दल जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, राजेश ढगे, कृऊबास सभापती अनिलराव नखाते, न प गट नेते जुनेद खान दुर्रांनी, राकाँ तालुका अध्यक्ष एकनाथराव शिंदे, शहराध्यक्ष सुनिल उन्हाळे,माजी जि प सदस्य चक्रधरराव उगले, सुभाषराव कोल्हे, पं स उपसभापती रमेश तांगडे सदाशिव थोरात, रायुकाँ तालुका अध्यक्ष सतिष वाकडे, शहराध्यक्ष खालेद शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

विविध मांगण्यासाठी आज परभणी रेल्वे स्टेशनवर आंदोलन


परभणी :  प्रतिनिधी
    मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने रविवार २७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा.   रेल्वे स्टेशन समोर मराठवाडा विभागातील सर्व रेल्वेच्या प्रलंबीत मागण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने तीव्र व भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती  एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.
    दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या  नवीन वेळापत्रकानुसार १ आॅक्टोबर पासून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासून  नांदेड विभागात नवीन गाड्यांची सुविधा नाही. कोणत्याही गाड्यांचा विस्तार नाही.गाड्यांचे वेग वाढविण्याऐवजी सर्व जलद गाड्यांचे वेग विनाकारण मंदावण्यात आले सर्वाचे वेग वाढविण्यात यावे.    प्रमुख मागण्या विभागातील सर्व जनप्रिय जलद गाड्यांना प्लॉटफार्म १ व र घेण्यात यावे. दोहरीकरणांनंतर रेल्वे गाड्यांचे वेग वाढवावेत. दोहरी करणाºया कामाची चौकशी करण्यात यावी. परळीकडे जाण्यासाठी दुपारी २ वा. १ नवीन गाडी सोडण्यात यावी.  परभणी रेल्वे स्थानकात पोलीस स्टेशन स्थापीत करण्यात यावे. परभणी रेल्वे स्टेशनला तात्काळ एक्सलेटरची ची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यासाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल.

शिस्तप्रिय आयुक्ताच्या काळातच दोनदा उद्धघाटन

परभणी : प्रतिनिधी
जिल्हयातील प्रशासकीय सेवेत  आपल्या शिस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या शहर महानगर पालीकेचे आयुक्त राहुल रेखावार यांच्या काळातच शिवाजी पुतळा ते अपना कॉर्नर या रस्त्याचे दोन वेळा उदघाटन झाले. बºयाच काळापासून हा रस्ता खोदून ठेवला असून मनपा प्रशासन मात्र परभणी फेस्टीव्हलच्या नाच गाण्यातच दंग आहे. त्यामुळे मुदतीत काम पुर्ण होईल का  या बाबत शंका उपस्थित होत आहे.
शहरातील शिवाजी पुतळा ते शाही मस्जिद या रस्त्याचे काम सुरु होवून बराच कालावधी उलटला तरी काम संथगतीने होत असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची मुदत १३ सप्टेंबर पर्यत आहे रस्त्याचे काम मुदतीत न झाल्यास सदरील गुत्तेदारास २० हजार प्रतिदिन दंड लावण्यात येणार असून सदरील काम सुरु असतांना या परिसरात कसलाही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदारावर राहील असा इशारा आयुक्त यांनी यापुर्वीच दिला होता. १३ सप्टेंबर पर्यंत रस्ता पुर्ण न झाल्यास मनपा कार्यवाही करेल का ? सदरील कामाचा अवधी ६ महिन्याचा असून या काळात काम पुर्ण करावयाचे आहे.
सदरील रस्त्याची रुंदी ३० मिटर असून डाव्या बाजुला नागरीकांना चालणयासाठी फुटपाथ व पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था त्यामध्ये करण्यात आली आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या छ.शिवाजी महाराज ते अपना कॉंर्नर या रस्त्याची मागील चार वर्षापासून दूरावस्था झाल्याचे चित्र अनेक वर्षापासून पहावयास मिळत आहे. या रस्त्यासाठी अनेक वर्षापासून  नागरीकांची मागणी होत होती परंतू त्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत होते.या रस्त्याच्या कामाला सन २०१४-१५ मध्ये दलित्तोतर विकास योजना अंतर्गत शिवाजी पुतळा ते शाही मस्जिद  पर्यंत सी.सी. रोड ज्याची लांबी ३२० मी. आहे. १ कोटी ९८ लक्ष या कामासाठी निधीही मंजुर करण्यात आला होता. सी.डी.वर्कचे बांधकाम करण्यासाठी या रस्त्याचे भूमिपुजन तत्कालीन महापौर संगीता वडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी भगवान वाघमारे,प्रताप देशमुख, आयु्क्त रेखावार यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले होते. याच कामाचे पुन्हा कॉग्रेसच्या कार्यकाळात माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते आता हां रस्ता तात्काळ बनविण्यात येईल अशी आशा शहरातील नागरीकांच्या मनात होती मनपावर सत्ता कॉग्रेसची व उदघाटन कॉग्रेसच्या कार्यकाळात झाले परंतू नागरीकांची घोर निराशा झाल्याचे दिसून येत आहे. सदरील काम हे अत्यंत संथ गतीन होत आहे. त्यामुळे येथे छोटे मोठे अपघात होतांना दिसत आहे.  सदरील काम हे विश्वशांती  कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुरु केलेले काम अद्यापही रखडले होते. कामाच्या सुरुवातीला मुहुर्त लागत नव्हता  परंतू अनेक वर्षापासून हा रस्ता नागरीकासाठी डोकेदुखी बनला होता. या रस्त्यावरून ये जा करणाºयांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता रस्ता दुरुस्तीमुळे नागरीकात समाधान व्यक्त होत आहे.

सण उत्सवाकाळात सात जण हद्दपार


परभणी :  प्रतिनिधी
जिल्हयात आगामी काळात सन उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप झळके व अप्पर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरून परभणी जिल्हयातील सात जणांना हद्दपार करण्यात आले.
 जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून योग्य पावले उचलण्यासाठी जिल्ह््यातील हद्दपारीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते.त्याला मंजुरी मिळाली त्यात दशरथ जगन पवार, प्रितम अमृतराव देशमुख, संतोष केवलसींग ठाकू र,अनिल रमेश मुळे, राहुल प्रभाकर खटींग, सोनुसिंग पुनमसिंग टाक, दिपक उर्फ बाळूभट्टी अशोक लोखंडे याना नऊ महिन्याकरीता  जिल्ह््यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सावता परिषदेच्या वतीने परिचय मेळावा व विवाह सोहळा


परभणी :  प्रतिनिधी
येथील सावता परिषद ही माळी समाजाची संघटना असून ती  समाजाच्या हितासाठी सदैव कार्य करणारी संघटना आहे. दरवर्षी सावता परिषदेच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा व विवाह सोहळयाचे आयोजन २१ नोव्हेबर २०१७ रोजी श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहें.
 हा मेळावा विभागीय स्तरावर होत असून त्याचे सहावे वर्ष आहे.त्यामुळे समाजातीलग वधू-वरांच्या नोंदणी सुरु करण्यात आली आहे. नोंदणी करण्यासाठी सावता परिषदेच्या पदाधिकाºयाकडे नोंद करण्यात यावी. हा वधू-वर परिचय मेळावा यश्वीतेसाठी रुस्तुमराव वंजे, संजय साडेगावकर, साहेबराव जाधव, ज्ञानेश्वर चिंचणे, प्रल्हादराव चिंचणे, कुुंडलीक सोगे, मुंजाभाऊ गायकवाड, विश्वनाथ थोरे, अनंतराव गोरे, हंरिहर वंजे, नाना राऊत, रामेश्वर जावळे, आप्पाराव पुं्ड, मुंजाजी गोरे, मंचकराव पुंड, आशीष हरकळ, दत्तराव काळे , प्रभाकर इंगळे आदी परिश्रम घेत आहेत.
नाल्याचे रुपांतर होणार व्यपारी संकुलात: डॉ.प्रफुल्ल पाटील

परभणी जिल्ह्यात बहुतांश भागातील कृषी क्षेत्राची स्थिती चिंताजनक

परभणी : प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाअभावी पिके वाळुन गेली. आणि त्यानंतर दोन दिवसाच्या पावसामुळे कापुस उन्मळुन पडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातचा मुग गेला आहे. आणि दुसरीकडे कापसाचे पीक उन्मळुन पडत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती चिंताजनक बनली असुन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढत आहेत.
परभणी जिह्यामध्ये मृग नक्षत्रात पाऊस झाल्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पावसावर पिके देखील जोमदार आली होती. परंतु त्या नंतर दोन महिने पाऊस गायब झाला. याचा फटका मुग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, तुर, कापुस या पिकांना बसला. मुग, उडीद आणि सोयाबीन हे पिके पाण्या अभावी वाळुन गेली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच बरोबर गेल्या दोन तीन दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे कापुस पीक उन्मळुन पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवली. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करीत ठिबकच्या सह्याने पिकांना पाणी दिले. दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच मोठा पाऊस बरसल्याने या पावसामुळे ओढेनाले यांना महापुर आला. शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले. ज्या ठिकाणी मुग काढणीसाठी आलेला होता त्या मुगास आता मोड फुटले आहेत. हा मुग शेतकऱ्यांच्या हातचा गेला आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर लागवड केलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तीन ते चार फुट वाढलेल्या कापसाचे पीक उन्मळुन पडल्याचे चित्र दिसुन येत आहे. पीके आडवी पडत असल्याचया तक्रारी शेतकऱ्यातुन करण्यात येत आहेत. प्रशासनाने या पिकांची पाहणी करुन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना त्वरीत आर्थीक मदत द्यावी अशी मागणी ऐरणीवर येत आहे. पावसाअभावी आणि पावसानंतर परभणी जिह्यात बहुतांश भागातील कृषी क्षेत्राची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे जिह्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
 विद्यापीठ विकसित मोबाईल ॲप्सचा शेतक-यांमध्ये वापर वाढत आहे.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मराठवाडयातील अनेक शेतकरी आज पुढे येत असुन विविध कृषि तंत्रज्ञानावर आधारीत विद्यापीठ विकसित मोबाईल ॲप्सचा शेतकरी मोठया प्रमाणात वापर करित आहेत. मर्यादित मनुष्यबळामुळे प्रत्येक शेतक-यांपर्यंत विद्यापीठ शास्त्रज्ञ पोहचने शक्य नाही, विद्यापीठ विकसित मोबाईल ॲप्सच्या माध्यमातुन विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे शक्य होत आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले.

द बा घुमरे पब्लिक स्कूल च्या मुलांनी बनवले मातीपासून गणपती


तेज न्युज हेडलाईन बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्य कुशल नेतृत्वाखाली द बा  घुंबरे या पब्लिक स्कूल ने एक  ठसा उमठवला आहे तो असा की शैक्षणिक क्षेत्र आणि कला क्रिडा शिवाय आज पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवून आगळा वेगळा उपक्रम गेवराई च्या द बा घुमरे पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी  केला आहे. मातीचे गणपती बनवून समजा पुढे एक नवा आदर्श निर्माण करत हा उपक्रम प्रदूषण रोखण्यासाठी एक दिशा दाखवणारा ठरत आहे. द बा घुमरे पब्लिक  स्कूल ने एक समाजा समोर आदर्श ठेऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि विघटित कार्य रोखण्याचा पायंडा या वर्षी सुरू केला आहे. यासाठी एकोफ्रिडली गणेश मुर्त्या बनवून एक नवीन  उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाला साथ देत आज या शाळेच्या प्रत्येक  विध्यार्थी हा पर्यावरण पूरक  गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना घरा घरात करत आहे या मुळे  पालक सुद्धा आपल्या पाल्याच्या हस्थे कलाकुसर आणि निर्माण केलेल्या मुरथीची स्थापना घरी  आनंदी वातावरणात करताना दिसत आहेत.या मुळे गेवराई च्या घुमरे पब्लिक स्कूल ने समजा पुढे आदर्श ठेऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न  करून नवीन चळवळ उभी केली आहे शाळेतील मुलांना गणेश मूर्ती बनवण्या साठी संचालक दीपक घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सतीश घुमरे यांनी मुलांना प्रेरित करून मुलांना प्रेरणा दिली एकंदरीत द बा घुमरे पब्लिक स्कूल च्या गणेश मूर्तीची गेवराई शहरात चार्च्या होत आहे .आणि या शाळेच्या विध्यार्थ्यांना जे शाळेतून कला कसूर या विषयी ज्ञान दिले जाते या बद्दल पालक समाधान व्यक्त करत आहेत

राष्ट्रवादीचे नेते भागचंद बागरेचासह प्रेयसीला खून प्रकरणात अटक अनैतिक संबंधातून डोक्यात दगड घालुन केला खून


उस्मानाबाद , दि 26

अनैतिक संबंधातून एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते भागचंद बागरेचा व त्यांची प्रेयसी मंदाकिनी बनसोडे हिला याना पोलिसांनी अटक केली आहे . नाशिक पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीने या खुनाचा उलघडा करीत आरोपीना अटक केली .

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील बालाजी बनसोडे हे फेब्रुवारी २०१७ पासून गावातून बेपत्ता होते त्याचे बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून बालाजी यांचा नाशिक येथे खून झाला असल्याचे उघड झाले आहे . नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एक अज्ञात इसमाची हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते मात्र मयताच्या डोक्यात दगड घातल्याने चेहरा विद्रुप झाला होता त्यामुळे ओळख पटणे अशक्य झाले होते मात्र पोलिसांनी खून झालेल्या भागातील मोबाईल क्रमांकाचा तपास करून या खुनाचे रहस्य उघडले . 

बालाजी हा मंगरूळ व परिसरात करणी , भानामती करणारा भोंदूबाबा म्हणून प्रसिदध होता . तो त्याची पत्नी मंदाकिनी सह गावात राहत होता मात्र पिंपळगाव डोळा येथील नरबळी प्रकरणानंतर तो बेपत्ता झाला होता . गावातील गावपुढारी भागचंद बागरेचा यांनी बालाजीला तुझे नरबळी प्रकरणात नाव येईल असे सांगत तू नाशिकला जा , मी इथे पाहून घेतो असे सल्ला दिला त्यानंतर बालाजी नाशिकला गेला व तेथूनच तो बेपत्ता झाला . दरम्यानच्या काळात भागचंद व मंदाकिनी यांच्यात प्रेमलीला सुरू होती याची कुणकुण लागल्याने बालाजी याने भागचंद याना फोन करून नाशिकला बोलावले तेव्हा भागचंद हे बालाजी याची पत्नी मंदाकिनी हिला सोबत गाडीत घेऊन गेले . त्यानंतर सिन्नर येथे मंदाकिनी व भागचंद हिच्या अनैतिक संबंधांवरून बालाजीसोबत वाद घातला यातूनच  भागचंद व मंदाकिनी यांनी बालाजी याच्या डोक्यात दगड घालून खून केला व हे दोघे मंगरूळ या गावी परत आले व काही घडले नाही असे वागत होते . विशेष म्हणजे बालाजी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी कुठेही पोलिसात नोंदविली नाही त्यामुळे तपास करणे अवघड जात होते मात्र पोलिसांनी तब्बल 6 महिने कसून तपास केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली .

एका फोन ने केला खुनाचा उलघडा ...

बालाजीच्या खून प्रकरणात भागचंद यांनी नाशिक येथून स्वतःच्या मोबाईल वरून एक फोन केला होता त्यावरून हा खून उघडकीस आला . नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी हा नंबरवरून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण पोलीस स्टेशन गाठले व बेपत्ता लोकांची माहिती घेतली मात्र बालाजी ची नोंद नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते मात्र उस्मानाबाद पोलिसांनी गावात चौकशी केल्यावर बालाजी बेपत्ता असल्याचं उघड झाले . मंदाकिनी व भागचंद याचे अनैतिक संबंधाची गावभर चर्चा होती त्यामुळे पोलसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलघडा झाला .  

राजकीय वर्तुळात खळबळ

भागचंद हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सक्रिय नेते असून ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू कारभारी होते . कळंब तालुक्यासह ते जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय होते . जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते त्यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

प्रेमात अडसर असल्याने काढला काटा

मंदाकिनीचे वय 26 वर्ष तर भागचंद हे 50 वर्षाचे होते याचे प्रेम इतके टोकाला गेले की त्यानी 32 वर्षीय बालाजीचा खून करून काटा काढला . सुरुवातीला त्यांनी बालाजीला भीती घालून नाशिक येथे हाकलले व नंतर तो अडसर ठरत असल्याने त्याचा खून केला

नोकरी लावण्याच्या बहाण्याने बेरोजगारास दीड लाखांचा गंडा


अनिल घोरड तेज न्युज हेडलाईन प्रतिनिधी
बीड : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयात नोकरी लावण्याच्या बहाण्याने बीड येथील युवकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी दिल्ली येथील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दोन वर्षापूर्वी एका वृत्तपत्रातून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात किसान कॉल सेंटरमध्ये २७७ मुला-मुलींची आवश्यकता असल्यासंबंधीची एक जाहिरात प्रकाशित झाली होती. हि जाहिरात वाचून बीडच्या पंचशील नगर भागात राहणाऱ्या रत्नघोष महादेव वाघमारे या तरुणाने जाहिरातीत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता त्याच्याकडून मॅसेजद्वारे त्याची सर्व माहिती घेण्यात आली. त्यानंतर ऑन-कॉल मुलाखत घेत असल्याचा दिखावा करून सदरील तरुणाची निवड या नोकरीसाठी झाल्याचे त्याला सांगण्यात आले. यासाठी नोंदणी शुल्क म्हणून त्याच्याकडून ११०० रुपये दिल्ली येथील खात्यात जमा करण्यास सांगून त्याला भारत सरकार कृषी एवं सहकारिता विभाग रोजगार भरती कार्यालय महिपालपुर ११०३७ (नवी दिल्ली) यांचे नियुक्ती पत्र, सोबत इन्शुरन्सचे कागदपत्र आणि गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया त्रिमुर्तीसह असलेली राजमुद्रा बाँड पेपरवर छापलेले नियुक्तीपत्र आदी दस्तावेज स्पीड पोस्टाने पाठविण्यात आले. त्यानंतर लॅपटाॅप, मोबाईल, दिल्लीहून तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था आदी विविध कारणे सांगून १ लाख ६० हजार २०० रुपये उकळण्यात आले. त्यानंतर या लोकांकडून रत्नघोष वाघमारे यास दिल्ली येथील पंजाब नॅशनला बँकेच्या खात्याचा दीड लाखांचा धनादेश देण्यात आला. परंतु, खात्यावर रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. त्यानंतर रत्नघोष वाघमारे यास संशय आल्याने त्याने बँकेत चौकशी केल्यानंतर सदरील खात्यात काहीच रक्कम नसल्याचे समजले. यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रत्नघोष वाघमारे पोलीस ठाणे गाठत त्याच्याशी संपर्क करून वेळोवेळी रक्कम लाटणाऱ्या दिल्ली येथील ९ जणांविरोधात फसवणुक केल्याची तक्रार दिली. रत्नघोष वाघमारे याच्या तक्रारीवरून नवी दिल्ली येथील राहुलजी, रविंद्रजी, श्रुती (रूबी) शर्मा, संजय, राजेस, सुर्यकांत त्रिपाठी, त्रिपाठी, अमितकुमार गुप्ता आणि तरूण शर्मा यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतुरात दर तिन महिण्याला पडतात सा बां रस्त्याला खड्डे

प्रदिप कोकडवार
जिंतूर
शासनाचे लाखो रुपयांचे निकृष्ठ काम करून जिंतूर सा बांधकाम खात्यातून लग्गेबाजी न रक्कम उचलून आपले उखळ पांढरे करून घेऊन जिंतूर च्या रहदारीच्या मुख्य रसर्त्यावर वर्ष पण पूर्ण न झालेल्या रसत्यावर दर तिन महिन्याला खड्डे पडत आहेत परिणामी पादचारी वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागत आहे
या बाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की सार्वजनिक बांधकाम खात्यात जिंतूर उपविभागात अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम केलेले अभियंता किशोर सोनार यांच्या भावा च्या गुत्तेदार एजन्सी ने हे काम नुकतेच पूर्ण केले होते काम पूर्ण होताच तिन महिन्यात अनेक खड्डे पडले व ते त्यांनी बिल अडकल्या मुळे बुजवले पण परंतु आता परत उलट्या नदीवरील पुलावर आणि त्यांच्या पुढे पुन्हा खड्डे पडलेत या मुळे आता परत प्रवासी त्रस्त आहेत तर पादचारी खड्ड्यात पडू नये म्हणून कसरत करत आहेत
या सर्व परिस्थिती ला कोण जबाबदार असा प्रश्न आता निर्माण होत आहे