तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 2 September 2017

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन

सुभाष मुळे.....
-----------------
गेवराई, दि. 2 __ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने हादगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर येथील नाभिक समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना देण्यात आले.
       यावेळी सुनिल पोपळे, नानासाहेब पंडित, दशरथ पंडित, नागेश पंडित, माऊली पंडित, दिपक पंडित, गणेश पंडित, रोहित पंडित, हरि पंडित, सचिन पंडित, विजय पंडित, गणेश पंडित, अप्पासाहेब पंडित, राहुल पंडित, श्री. वखरे, श्री. कोकणे, युवराज राऊत, शुभम गडिकर, देवेंद्र राऊत यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक कर्मचारी महासंघ, नाभिक युवा सेना, नाभिक विद्यार्थी आघाडी, नाभिक महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

गेवराई तालुक्यातील तलवाडातील बुध्दीबळ स्पर्धेत आदेश शिंदे प्रथम

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 2 __ आदेश सुभाषराव शिंदे या वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्याने बुध्दीबळाच्या इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी च्या गटामध्ये गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
      साखळी सामने, सेमी फायनल व फायनल सामना या सर्वच सामान्यात आदेश शिंदे याने सफाईदार विजय मिळवला. सेमी फायनल मध्ये त्याची लढत इयत्ता १० च्या आभिषेक जाधव तर फायनल मध्ये त्याची लढत इयत्ता ९ वी च्या वादे ज्ञानेश्वर याच्याशी झाली. बुद्धीबळ स्पर्धेमध्ये तब्बल ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गणेशोत्सव निमित्त माईंड कोचिंग क्लास यांनी अशाच अनेक स्पर्धाचे आयोजन केले होते. ईतर स्पर्धा मधिल विजेते व आदेश शिंदे यांचे माईंड क्लास मधील शिक्षकवृंद श्री. पवार सर , श्री. कावळे सर, श्री. मुदळ सर व श्रीमती राऊत मॅडम यांनी आभिनंदन केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

परतूर :ग्राम पंचायत निवडणूकांचे बिगुल वाजले ;४१ ग्रामपंचायतींन मध्ये निवडणुका


आशिष धुमाळ
परतूर
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७  या दोन महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 1 सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यासोबतच आज दुपारी ४ वाजल्यापासून निवडणूक असलेल्या ग्राम पंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सदरील निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येणार असून औरंगाबाद महसूल विभागातील जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या टप्प्यात जालना जिल्ह्यातील 240 ग्राम पंचायतींचा समावेश असून परतूर तालुक्यातील  यामध्ये 41 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

यात आष्टी,श्रीष्टी, या मोठ्या गावासह लोणी/कनकवाडी,बाबुलतारा,गोळेगाव/लांडकदरा,टाकळी रंगोपंत,रोहिणा खु/एकरूखा,वाढोणा,एदलापुर,देवला,बामणी,चांगतपुरी,वाहेगाव श्रीष्टी,ढोकमाळ तांडा,येणोरा,दहिफळ भोंगाणे,पिंपुळा,मापेगाव खु,वरफळ,फुलवाडी/पळशी,आनंदवाडी,ब्रम्हवडगाव,वरफळवाडी, रायगव्हाण,खांडवी,खांडवीवाडी,दैठणा खु,आनंदगाव,रोहिणा बु,मापेगाव बु,पाडळी पारधी,चिंचोली,कोरेगाव/नागापुर,दैठणा बु,खडकी/कंडारी,सालगाव/रेवलगाव,उस्मानपुर,कावजवळा,शेवगा,श्रीष्टी तांडा,हास्तुर तांडा या गावांचा निवडणूकी मध्ये समावेश आहे . वरील ग्रामपंचायतींन साठी दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे.

 

पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची सूचना ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान  नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) मागविण्याचा आणि सादर करण्यासाठीचा कालावधी आहे. २५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पात्रांची छाननी करण्यात येईल तर २७ सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येतील. २७ सप्टेंबर रोजीच दुपारी ३ वाजता नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होईल तर मतमोजणी ९ ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.

झुंजारनेता च्या गेवराई तालुक्यातील गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

सुभाष मुळे....
-------------------
गेवराई, दि. 2 __ तालुक्याच्या बहुसंख्य कुटूंबातील महिलांनी झुंजारनेताच्या गौरी सजावट स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. यामध्ये गेवराई तालुक्यातून सौ. आशा मालानी प्रथम, सौ. वर्षा शेळके द्वितीय तर सौ. गंगाबाई रुकर तृतीय पुरस्कार मिळवला आहे. अतिशय सुरेख, सुंदर व उत्साहात या स्पर्धा घेण्यात आल्या. दरम्यान स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद मोठा होता.
       झुंजारनेता च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मोतिरत्न फेस्टिवल अंतर्गत गेवराई तालुका गौरी सजावट स्पर्धेत गेवराई तालुक्याच्या आदर्श कुटूंबातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला. संबंधित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी परिक्षक मंडळीचे 'अतिथी देवो भवं' च्या स्वरुपात मनापासून स्वागत केले. यातील प्रत्येकांच्या घरी गौरीचे आगमन झाल्याने आनंददायी वातावरण राहीले. या आदर्शदायी कुटुंबातील महिलांनी गौरींचे मनापासून पूजन केले. गौरीचा श्रंगार, मखर, सजावट या सर्व गोष्टी आनंदाने बनवला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे आयोजक सौ. आशा अजित वरपे, सौ. प्रेरणा विजय वरपे व कु. पुजा रत्नाकर वरपे यांनी अभिनंदन केले आहे. आयोजित करण्यात आलेल्या या गौराईचे परिक्षण येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीपराव शिंदे, पत्रकार सुभाष मुळे, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधूकर तौर, ग्रामीण पत्रकार संघाध्यक्ष सुभाष शिंदे, व्यापारी असोसिएशनचे सन्मानिय सदस्य तथा अचूक उत्तर पुरस्काराचे मानकरी बालाप्रसाद सोनी, स्वाभिमानीचे संदिप मडके, बजरंग ग्रुपचे सन्माननिय सदस्य राधेश्याम खंडेलवाल आदिंनी सविस्तर परिक्षण केले. गेवराई तालुक्यातील एकूण 34 गौराईचे यावेळी परिक्षकांनी परिक्षण केले. झालेल्या परिक्षणात गेवराई येथील जायकवाडी वसाहत लगत राहणारे सौ. आशा जगन्नाथजी मालानी, सौ. वर्षा शिवप्रसाद मालानी व सौ. प्रिया नितीनकुमार मालानी यांनी निवासस्थानी गौरीच्या मुर्तिस उत्कृष्ट सजावट करुन लाल रंगाचे फेटे बांधले होते. शहरातील नाविन्यपुर्ण डिजिटल सिटीचा बोलका देखावा नजरेत भरला होता. भारत देशाचा रेखाटलेला नकाशा व भारतमाता पाहताच राष्ट्रप्रेम जागृत करणारे ठरले. परिणामी यांनी मिळविलेला तालुका स्तरावरील प्रथम पुरस्कार मानाचा तुरा खोवणारा ठरला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील सौ. वर्षा सत्यवान शेळके यांनी आपल्या गेवराई शहरातील राहत्या घरी आरास, मखर, सजावट पाहता लक्षवेधक होती. त्यांना या कार्यासाठी सुभद्रा गोविंदराव शेळके यांचे मार्गदर्शन व सौ. सुवर्णा विश्वास शेळके तसेच शैलेश, सर्वेश या चिमुकल्यांचे देखिल साह्य झाले. हातानं बनवलेला देखावा मोठ्या श्रमातून कले-कलेने तयार करण्यात आला होता. कृष्णमुर्ती, मंदिर, पर्यटन स्थळ, ज्यामध्ये रस्ता, पाणी, वृक्षारोपण मनाला भावणारा ठरला. तिसरे पारितोषिक येथील किराणाचे प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र रुकर यांच्या गेवराई येथील मेन रोड च्या असलेल्या निवासस्थानी गौराईला मिळाले. समोरील सजावट, हॅन्डवर्किंग गणेशमुर्ती, झुला व इतर साहित्य बोलके ठरले. विशेष बाब म्हणजे नोटबंदी व यामाध्यमातून शेतकऱ्यांची झालेली वाताहतीचा देखावा लक्षवेधक ठरला. श्रीमती चंद्रभागाबाई रुकर, सौ. गंगाबाई राजेंद्र रुकर, सौ. वर्षा विठ्ठल रुकर, सौ. करुणा यशवंत रुकर, सौ. रुपाली रविंद्र रुकर यांनी केलेली गौरी आराधना मनाला भावणारी व दिशादायी म्हणावी लागेल.
      या स्पर्धेत सहभागी झालेल्या व सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील प्रत्येक कार्यात सहभाग दर्शविणारे जगन्नाथ गोविंदआप्पा मिटकर यांच्या गेवराई शहरातील बसवेश्वर काॅलनीतील निवासस्थानी सौ. शकुंतला जगन्नाथ आप्पा मिटकर यांच्या कुशल मार्गदर्शनातून गौरीचे असलेले वखर आणि सौ. रेणुका गणेश मिटकर यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली दिपमाळा, रांगोळी व हॅन्डवर्किंग साहित्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. गणेश मिटकर यांच्या उत्साही अग्रक्रमामुळे मखर, लाईटिंग आकारली. रांगोळीचा साज उत्तम ठरला. गणपतीची मुर्ती ही देखील रांगोळीने देखनीरित्या साकारली गेली. गेवराई येथील चिंतेश्वर नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष आत्माराम मोटे यांच्या संतोषनगर येथील निवासस्थानी गौराई समोरील अस्सल तुळसिंद्र लाईटच्या झगमगाटाने प्रकाशदायी होते. सौ. आशा आत्माराम मोटे यांचे परिश्रम मोलाचे वाटले. तलवाडा याठिकाणी सौ. शांताबाई खंडु राऊत, रेणुका दुर्गादास राऊत, वर्षा विजय राऊत यांनी समतोल ठेवून एकोप्याने गौरीची आरास, मखर व सजावट केली होती. या कुटुंबातील खंडुराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गौरीची आराधना झाली. कुटुंबातील चि. सुमित, अमित, सक्षम व कु. परिणिती यांनीही उत्सवात आनंददायी वातावरण निर्माण केले. गेवराई शहरातील रेणुकादेवी मंदिर जवळ राहणारे दिंगंबरआप्पा रघुनाथआप्पा कापसे यांच्या निवासस्थानी सौ. पुष्पाबाई दिंगंबरआप्पा कापसे यांच्या कुशल मार्गदर्शनातून सौ. शुभांगी वैभव कापसे, सौ. आश्विनी योगेश कापसे यांनी गौरीची मखर, आरास व सजावट उत्कृष्ट राहीलेली आहे. येथील सावतानगर येथील युवराज शिवाजीराव कळसकर यांच्या कल्पनेतून सौ. अनिता युवराज कळसकर यांनी विठुमाऊलीचा सजल देखाव्याचे सादरीकरण केले. जैन मंदिर जवळील सौ. लिलाबाई बन्सीधरराव भुतडा, सौ. ममता शामसुंदर भुतडा, सौ. कविता ओमप्रकाश भुतडा, सौ. ज्योती राजकुमार भुतडा आणि कु. आदिती ओमप्रकाश भुतडा यांनी एकोप्याने, सहविचार घेऊन कुटुंबातील एकता बाबत प्रदर्शनाच्या माध्यमातून देखाव्याचे उत्कृष्ट रेखाटन केले. झुंजारनेता च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मोतिरत्न फेस्टिवल अंतर्गत गेवराई तालुका गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी घेतलेला सहभाग उत्साही होता.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

श्री संत सावता सार्वजनिक गणेश मंडळाच्या शिबिरात 43 जणांचे रक्तदान


आशिष धुमाळ
परतूर
तालुक्यातील हातडी येथील श्री संत सावता सार्वजनिक गणेश मंडळाचे चौथे वर्ष दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंडळाने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये किर्तन,स्वच्छता आभियान,व्यसनमुक्ती अभियान,सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छतेवर आधारित नाटीका असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.सामाजिक बांधिलकी जाणिव ठेवत मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केले याशिबिराला गावकर्‍यांनी प्रचंड प्रतिसाद देत 35 पुरूष व 8 महिला असे एकुण 43  रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी दक्षता समिती अध्यक्ष रमेश आढाव,सरपंच ओमप्रकाश बोरकर,उपसरपंच दत्ताराव फटींग,कमलाकर झरेकर,शि.स.अ.गंगाधर बोरकर,संतोष बोरकर,प्रशांत झरेकर,कैलास बोरकर,लक्ष्मण वाटेकर यांच्या सह असंख्य गावकरी उपस्थित होते.गणेश मंडळाचे अध्यक्ष रख्माजी बोरकर व मंडळाच्या सर्व सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले.

लोक कल्याणासाठी उद्योग करणारा आमदार मिळाला - पंकजाताई मुंडे

सुभाष मुळे...
--------------------
गेवराई, दि. 2 __ राजकारणी लोकांनी स्वतःच्या कल्याणासाठी "उद्योग" केले व पैसा कमावला परंतू लोक कल्याणासाठी उद्योग करणारा आमदार लक्ष्मण पवार यांच्या रूपाने मिळाला त्यामुळे सामान्य माणसाला व शेतकर्‍यांच्या मालाला या खाजगी बाजार समिती मध्ये न्याय मिळेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
      शनिवार दि. 2 रोजी पाडळसिंगी येथील कै.माधवराव पवार खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजाताई मुंडे या बोलत होत्या. युवानेते  शिवराज पवार, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाशराव सुरवसे, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, विनोद सोमाणी, राजकुमार भुतडा, संदीप ननवरे, जेडी शहा यांची उपस्थिती होती. पुढे पंकजाताई म्हणाल्या की, सरकार व आपले आमदार खुप चांगले काम करत आहेत असे सांगून सरकार शेतकऱ्यांचे आहे म्हणूनच तीन वर्षात क्रांतिकारक निर्णय घेवून जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्याचे धोरण क्रांतीकारक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार पवार यांनी करून बाजार समितीच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की प्रस्थापित राजकारणी लोकांनी सामान्य माणूस वेठीला धरला म्हणून त्यांचा विकास करता आला नाही. शेतकर्‍यांना सर्व गोष्टी पासून वंचित रहावे लागले. गेवराईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आठ कोटी रुपये वर्षा काठी येतो, त्या पैशाचा हिशोब विचारला तर या लोकांकडे उत्तर आहे का.. ? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, यापुढे शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही हा विश्वास देतो. अमरसिंह पंडित यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छळले. परंतू ही बाजार समिती शेतकरी लोकांना न्याय देण्याची गरज पूर्ण करील असे वचन देतो. आम्ही तुमच्या वाट्याचे पैसे खाणार नाही. राज्य सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी मी प्रमाणिकपणे काम करत आहे. तुम्ही पाठीशी रहा, तुमच्यासाठी लढत राहील असेही आवाहन आमदार पवार यांनी केले. आमदार आर. टी. देशमुख म्हणाले की, पंडीत मुक्ती काळाची गरज होती. या पुढेही या लोकांना थारा देऊ नका. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे सांगून ते म्हणाले की, आमदार पवार यांच्या सारखा प्रमाणिक काम करणाऱ्या नेत्यामागे रहा असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.
      यावेळी राजाभाऊ आर्दड, अरूण मस्के, माजी उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, संजय इंगळे, सुशिल जवंजाळ, जानमोहमद बागवान, दादासाहेब घोडके, राजेंद्र भंडारी, मोटे, बळीराम ननवरे, बालाभाऊ लोया, कर विभागचे सागर, रामेश्वर पंडीत आदींसह व्यापारी, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार नगरीचे उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

१० रोजी शिवशंभो प्रतिष्ठाणच्या शिवशंभोरत्न पुरस्काराचे वितरण

सुभाष मुळे...
-------------------
अहमदनगर, दि. 2 __ रविवार, दि.१० सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी अकरा वाजता शिवशंभोरत्न पुरस्काराचे वितरण अहमदनगर येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात एका शानदार सोहळ्यात होणार असल्याची माहिती शिवशंभो प्रतिष्ठाणचे स्वागताध्यक्ष व पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सदस्य  ज्ञा.रा.तथा बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी आण्णा कराळे यांनी दिली.
      अहमदनगर येथील श्री. शिवशंभो प्रतिष्ठाण व आष्टी तालुका मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून देण्यात येणार्‍या राज्यस्तरिय शिवशंभोरत्न पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून आ. संग्राम भैय्या जगताप, आ भीमराव धोंडे, बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सविताताई गोल्हार, देविदास धस, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावर्षी श्री शिवशंभो प्रतिष्ठाणाने स्व. मैनाबाई रामकृष्ण पवार आदर्शमाता पुरस्कार - श्रीमती हज्जन रशिदा अब्दुल रज्जाक इनामदार,  शिवशंभो कृषीरत्न पुरस्कार-  बाबासाहेब  पिसोरे,  शिवशंभो शिक्षकरत्न पुरस्कार - प्रा. अविनाश बेडेकर सर, प्रा. संगिता प्रमोद भापसे, रत्नाकर चव्हाण, मच्छिंद्र लोखंडे, महेश नवनाथ शिंदे, एकनाथ पालवे, नारायण शेंडे, शिवशंभो समाजरत्न पुरस्कार - प्रा.डॉ.शाम तुकाराम सांगळे, श्रीमती उषा भाऊसाहेब जगदाळे, सौ. अंजली केवळ, श्री.संदिप सुरवसे, श्री.राजेंद्र धोंडिराम पवार , शिवशंभो पत्ररत्न पुरस्कार - सुधीर आनंदराव लंके (लोकमत), रघुनाथ कर्डिले (पुण्यनगरी), ज्ञानेश दुधाडे (सार्वमत), भिमराव गुरव (झुंजार नेता), श्री.इक्बाल शेख (एन.टीव्ही. नगर) ,  श्री शिवशंभो साहित्यरत्न पुरस्कार- श्री. सुनिल वनाजी राऊत (पुस्तक-ढोपरवाडीचा इरसाल जावई बुवा), इंद्रकुमार पांडुरंग झांजे (तहानझळा काव्यसंग्रह),  श्री शिवशंभो कलारत्न पुरस्कार - अविनाश कराळे (नाट्य कलाकार), कु. काजल  शिरोळे  व कु. कोमल  शिरोळे, राहता  श्री शिवशंभो उपक्रमशिल आदर्श शाळा पुरस्कार - जि.प.प्रा.शाळा टाकळी ढोकेश्‍वर ता. पारनेर यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
          या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवशंभो प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी आण्णा कराळे आणि  कांतीलाल गर्जे, विनायक तळेकर, डॉ.बाळासाहेब पवार, शिवाजी खुडे, विश्‍वजीत कराळे पाटील, उत्तमराव शिंदे, भास्कर पालवे, मेजर कुशल घुले ,विनोद मुळीक, सत्यजीत कराळे पा. महादेव  आमले, दिलीप गारुडकर, बापुसाहेब फसले, मिलींद चवंडके,  सुर्यकांत नेटके, बाबासाहेब मुळीक आदीनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

गावकऱ्याने स्वखर्चातून बनवला स्मशानभुमिचा रस्ता


सोनपेठ : तालुक्यातील नरवाडी येथे ग्रामपंचायत पासून स्मशानभुमीपर्यंतचा रस्ता अंदाजे पाचशे मिटर असून हा रस्ता चिखलमय झाल्याने अंत्यविधीसाठी अत्यंत अडचण होत होती. त्यामुळे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणेश हेंडगे व ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव जोगदंड यांनी स्वखर्चातून हा रस्ता दुरूस्त केला आहे.
नरवाडी येथे गावातून स्मशानभुमिकडे जाणारा रस्ता पावसामुळे खराब होऊन चिखल साचला होता. अशा वेळी अंत्यविधीसाठी जाण्यास अत्यंत अडचण होत आहे. अशा परिस्थितीत गावकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणेश हेंडगे व गोंविद जोगदंड यांनी स्वतःच्या खर्चाने हा रस्ता दुरूस्त केला आहे यामुळे गावकऱ्यांमधून त्यांचे कौतूक होत आहे.
यावेळी हा रस्ता दुरुस्तीसाठी मदत करण्याकरीता गावातील अनेक युवक पुढे आले. त्यात गणेश बंडे, गणेश मस्के, बाबा वाघमारे, विष्णू आबूज, कल्याण पांडूळे, सुधाकर जोगदंड, मुंजाभाऊ जोगदंड, मारोतराव बोचरे, रामकिसन पांडूळे, शिवाजी बोचरे, शेषेराव धुमाळ आदींनी परिश्रम घेतले व हा रस्ता दुरुस्त केला आहे.

सरकारची धोरणे शेतकऱ्यांना भिकेला लावणारे - शंकर अण्णा धोंडगे


सोनपेठ : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी - शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत आयोजीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक शंकरअण्णा धोंडगे, अध्यक्ष मा. आ. व्यकंटराव कदम, प्रमुख पाहूणे मा. जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, प्रा. सुरेंद्र रोडगे, लक्ष्मीकांतराव देशमुख दशरथ सुर्यवंशी होते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किसान मंच स्थापन केला असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे व त्यांच्या हक्कासाठी 9 ऑगष्ट पासून सेवाग्राम ते 2 ऑगष्ट नाशिक येथे समारोप करण्यात येणाऱ्या शेतकरी - शेतमजूर सुरक्षा अभियान दौऱ्यानिमित्त सोनपेठ येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शंकर अण्णा धोंडगे यांनी सरकारमधील गडकरींसारखे मंत्री जर शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून राहू नये असे म्हणत असतील तर शेतकऱ्यांनी कोणावर अवलंबून रहावे, मी घाबरणारा माणूस नसलो तरी आज छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कॉर्पोरेट फार्मिंगच्या अंजेड्यामुळे व सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय टिकेल का नाही ? याची भिती वाटत आहे. सरकार शेकऱ्यांचे मुद्दामहून ऐकत नाही, ते शेतकऱ्यांना भिकेला लावणारी धोरणे आखत आहे, त्यामुळे लढ्यासाठी तयार रहा असे मार्गदर्शन केले.
या बैठकीत प्रास्ताविक प्रा. सुरेंद्र रोडगे यांनी केले, मा. जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, मा. जि.प. सदस्य लक्ष्मीकांतराव देशमुख, मा. जि.प. सभापती दशरथ सुर्यवंशी  यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीसाठी हशिप्रचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, विठ्ठलराव सुर्यवंशी, उत्तमराव शिंदे, अँड. श्रीकांत भोसले (विटेकर) अँड. संजय यादव, बंडू कुसुमकर, सुहास काळे, डॉ. श्रीनिवास गुळभिले, मारोती रंजवे, अमृत स्वामी, गोपाळ भोसले, शिवाजी भोसले, मारोती सपकाळ, प्रभाकरराव सिरसाठ, भास्करराव बचाटे व गणेश जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.