तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 9 September 2017

भोकरदन येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न !

भोकरदन :  येथील शिवाजी विद्यालय भोकरदन येथे  जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 9 सप्टेंबर शनिवार रोजी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा खा . रावसाहेब दानवे यांच्या पत्नी सौ . निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तहसीलदार श्रीमती योगीता कोल्हे ह्या होत्या. तर पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अरुण चौलवार , केंद्र प्रमुख आर.एच .सोनवणे , जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे , पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार , व्ही. पी . वाघ, के . एस . जंजाळ , तालुका क्रीडा संयोजक प्रा. ओ . जी. नवगिरे , क्रीडा शिक्षक किरण साळवे, नितीन बोर्डे, ऋषिकेश पगारे, व्ही . सी , चव्हाण , प्रदीप बोर्डे, तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . 
कबड्डी खेळासाठी 14 वष्रे मुले 28 संघ, 14 वर्षीय मुली साठी 20 संघ , 17 वष्रे मुले 38 संघ तर 19 वर्षांच्या मुला मुली साठी 31 संघानी नाव नोंदणी केली आहे , असे तालुका क्रीडा संयोजक प्रा.ए . जी. नवगिरे यांनी सांगितले .         शिवाजी विद्यालय भोकरदन येथील 17 वर्षीय मुली कबड्डीत आले . तर लोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 14 वयोगटातील मुली  सघांत शिवाजी विद्यालय विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  लोनगाव येथील मुलीनी प्रथम क्रमांक पटकाविला . तर 14 वर्षीय मुले संघात न्यु हायस्कूल भोकरदन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला . तसेच 17  वर्षीय मुले व मुली यांचे उर्वरित सामने  सुरळीत चालू आहेत, कार्यक्रमाचे सुञसंचालन महेंद्र लोखंडे, यांनी केले तर  तालुका क्रीडा संयोजक प्रा.ए . जी. नवगिरे यांनी  केले

मोरेश्वर महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त साक्षरता दिंडी.

भोकरदन(दि.08),येथील राष्ट्रीय सेवा योजना मोरेश्वर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त साक्षरता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. साक्षरता दिंडी महाविद्यालयातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवान डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

साक्षरता दिंडी मोरेश्वर महाविद्यालयातून सुरु झाली. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरता दिंडीचे बॅनर घेतलेले होते. रॅलीत दोन दोन विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या रांगा बनविल्या होत्या. काही विद्यार्थीनींच्या व काही विद्यार्थ्यांच्या हातात साक्षरतेचा संदेश देणारे फलक झळकत होते.“शुद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा.’’ हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार घेऊन मुले चालू लागली. “उठा शुद्रांनो,अतिशुद्रांनो जागे होऊन उठा बंधुंनो शिकण्यासाठी उठा.” विद्येविणा मती गेली,मतीविणा गती गेली…या म.फुलें यांच्या विचारांबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा, संघर्ष करा…या विचारांचे फलक विद्यार्थ्यांच्या या दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.

साक्षरता दिंडी महाविद्यालयातून भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानासमोरुन पंचायत समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन, ग्रामीण रुग्णालय, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोरुन बसस्टॅड समोरील चौरस्त्यावरील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून पुन्हा महाविद्यालयात दिंडीची सांगता झाली. दोन दोन च्या रांगेत शिक्षणाचे फलक उंचावत स्लोगनच्या घोषणा देत विद्यार्थी मोठ्या संख्येने चालले होते. सोबत महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका होत्या.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोवर्धन मुळक, डॉ.रघुनाथ सपकाळ, प्रा.कवित्रा वळवी, प्रा. भरत पिंपळे,डॉ.सुरेखा जैस्वाल,प्रा.सत्यकुमार राठी, डॉ.संजय बिरंगणे,डॉ.भगवान सोनवणे, डॉ.विठ्ठल गायकवाड,प्रा.डी.बी.तायडे, प्रा. नवलसिंग तोडावत यांच्यासह प्राध्यापक दिंडीत हजर होते. तुकाराम भांबिरे,मंगेश यशवंते यांच्यासह असंख्य स्वयंसेवक  हजर होते. दिंडीची सांगता शेवटी महाविद्यालयात झाली. मुलांना रिफ्रेशमेंट रुपात नाश्ता देण्यात आला. चहापानानंतर कार्यक्रम संपन्न झाला. 

 

  नाभिक युवा संघटनेच्या शहर अध्यक्ष पदी रवि बिडवे तर उपाध्यक्ष पदी रामेश्वर सुरडकर...

    प्रतिनिधी : भोकरदन

    नाभिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निलेश तळे ,डाॅ.नितिन गिराम यांच्या उपस्थितीत भोकरदन येथे बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी महाराष्ट्र नाभिक युवा संघटनेच्या शहर अध्यक्ष पदी रवि बिडवे यांची तर उपाध्यक्ष पदी रामेश्वर सुरडकर यांची सर्वानमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी कार्यकारणीत राजु जाधव,संदिप बिडवे,गणेश बोरडे,यांची कार्यकारणीसाठी निवड झाली असुन ,नाभिक समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राजु,संतोष सुरडकर,संजय सुरडकर,युवा नाभिक तालुका अध्यक्ष आकाश संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

अन्यथा नाभिक समाज भाजपाला मत देणार नाही. - कल्याण दळे


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठः येथे नाभिक समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माझ्या समाजाच्या भगीनीवर नगर जिल्ह्यात हातगाव कांबी येथे बलात्कार झाला, परंतु एकही शासनाचा प्रतिनिधी तेथे भेट देण्यासाठी गेला नाही हे सरकार आम्हाला असे दुर्लक्षीत ठेवत असेल तर नाभिक समाज भाजपा सरकारला 2019 च्या निवडणूकीत मत देणार नाही. तसेच की हातगाव कांबी येथील नराधमाला फाशीची झाली पाहीजे. असे मत महाराष्ट्र राज्यनाभिक मंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी या समाज मेळाव्यात केले आहे. 
यावेळी मंचावर पांडूरंगजी भवर , सुरेद्र कावरे, युवराज शिंदे, कविराज कचरे, बालासाहेब दळवे, संपत सवने आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुञसंचालन अशोक सुरवसे यांनी तर आभार ज्ञानेश्वर दळवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानोबा वाघमारे, कारभारी दळवे, बालाजी सुरवसे , रमेश दळवे, बालाजी मस्के, बापू सुरवसे, विष्णू मस्के, नरहरी सुरवसे आदीनी केले.          

तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी प्रमुख म्हणून तालुका क्रिडा अधिकारी सुमित लांडे, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, प्राचार्य शेख शकिला क्रिडा संचालक प्रा. गोविंद वाकणकर होते.
  येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय  येथे तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख उपस्थितीत सुमित लांडे तालुका क्रीडा संयोजक, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते प्राचार्या शेख शकीला प्रा. गोविंद वाकणकर, विरेश कडगे, रविकुमार स्वामी, सुरेश गायकवाड, विठ्ठल राठोड, मोहन राठोड, हे उपस्थित होते.
यावेळी प्रा. महालिंग मेहत्रे,  प्रा.आरती बोबडे, प्रा.विठ्ठल मुलगीर, प्रा.जगदीश भोसले, प्रा.जिवन भोसले, प्रा.सुरेश मोरे, प्रा.संतोष वडकर, प्रा.सतिश वाघमारे, प्रा.पंडीत राठोड, प्रा.अंगद गायकवाड यांनी  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

परभणी दि. 08 : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण). छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-ऑनलाईन फॉर्म भरणे. जलयुक्त शिवार अभियान, दि. 01 जूलै रोजी झालेला वृक्ष लागवड कार्यक्रम. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी. दुपारी 1.00 वा. बि.रघुनाथ सभागृह परभणी येथे आगमन व छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. स्थळ बि.रघुनाथ सभागृह एस.पी. ऑफीस समोर परभणी. सोयीनुसार भक्ती निवास जालनाकडे प्रयान.    

ऑनलाईन जात प्रमाणपत्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप

 

परभणी : शासनाने पारदर्शक, कार्यक्षम व समयोचीत लोकसेवा देण्यासाठीच्या नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन पात्र व्यक्तींना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत महसुल व अन्य विभागाने त्यांचे अधिनस्त विविध सेवा अधिसुचीत केल्या आहेत. त्यानुषंगाने परभणी जिल्हयात सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र 01 ऑगस्ट 2017 या महसूल दिनापासुन परभणी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे निर्गमीत करावे असे जिल्हा प्रशासनाने सर्व उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केलेले होते. त्यानुषंगाने परभणी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलिअर प्रमाणपत्र नागरीकांना ऑनलाईन वितरीत करण्यात येत आहेत. परभणी उपविभागातील पहिले ऑनलाईन जात प्रमाणपत्र कु.अश्विनी बालाजी दैठणकर यांना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर व उपविभागीय अधिकारी डॉ.सुचीता शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्री पी.एल. जुकटे, श्री कपील पेंडलवार, श्री निलेश माकोडे, श्री विजयकुमार भिसे, श्री सचिन शेटे, श्री अंगद सावंत उपस्थित होते. त्याअनुषंगाने सर्व नागरीकांनी महाऑनलाईनच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी परभणी यांनी केले आहे.     

अल्पसंख्यांक शाळा व मदरशांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावेत

परभणी
राज्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना त्याचप्रमाणे राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना मंत्रीमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णयान्वये सदर योजनेअंतर्गत पात्र शाळा व मदरसा यांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

            योजना सन 2017-18 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. योजने अंतर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळा व मदरसा यांच्याकडून प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत दिनांक 11 ऑक्टोबर 2013 व 07 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळा व मदरशाची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. शाळा व मदरशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतीम दिनांक 18 सप्टेंबर 2017 असुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाणनी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतीमरित्या पात्र प्रस्ताव शासना 18 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी आवाहन

 

परभणी
: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाअंतर्गत नेहरु युवा केंद्र, परभणी यांच्यातर्फे दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या संलग्नीत युवा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. दिनांक 01 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नेहरु युवा केंद्र, परभणी कार्यालयातर्फे आरोग्य शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबीरे, सांस्कृतीक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन सामाजीक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नीत युवा मंडळांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये 25,000/- धनादेश व प्रशस्ती पत्र कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. परभणी जिल्हयातील संलग्नित युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा पुरवा, लेखा परिक्षण, ग्राम पंचायत कार्यालयाकडून शिफारशीसह सर्व मंडळांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. पुर्ण भरलेले अर्ज नेहरु युवा केंद्र डॉ.वाकुरे हॉस्पीटल, व्यंकटेश नगर, कारेगांव रोड, परभणी या ठिकाणी दिनांक 25 सप्टेंबर 2017 पर्यंत जमा करावेत. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त युवा मंडळांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र, परभणी यांनी केले आहे. 

00000

गावठी हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

 

परभणी  : निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक परभणी/हिंगोली (परभणी) या कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने परभणी जिल्हयात ड्राय डे घोषित केल्यामुळे, पाथरी तालुक्यातील मसला शिवार, मसला तांडा शिवार व कानसुर शिवार ता.पाथरी जि.परभणी येथे गोदावरी नदीकाठी या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु निर्मिती केली जात आहे, अशी गुप्त खबर मिळाल्यावरुन सदर ठिकाणी छापा घालून निर्मिती केंद्रे नष्ट केली.

            सदर छाप्यामध्ये एकुण 1290 ली. गुळपाणी मिश्रीत कच्चे उग्र वासाचे रसायन प्रत्येकी 200 लिटर क्षमतेचे 06 लोखंडी ड्रम व 02 प्लास्टीक ड्रम, 06 पत्र्याचे डबे, 04 प्लास्टीक कॅन, एक जर्मनची थाळी, एक जर्मन पातेले असे गावठी हातभटी दारु निर्मिती करण्यास लागणारे साहित्य मिळून आले. त्यांची अंदाजे किंमत रु.34800/- आहे.

            सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री पवार व अधीक्षक परभणी श्री पटारे यांचे निर्देशानुसार निरीक्षक श्री सत्यवान गवस, सर्वश्री जवान राहुल बोईनवाड, सागर मोगले, भीमेश्वर पुपलवाड, यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा पुढील तपास श्री गवस निरीक्षक हे करंत आहेत.

            या पुढेही अवैध मद्य विक्री, वाहतुक, बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी दारु निर्मिती, पर राज्यातील अवैध मद्य यावर अशीच मोठया प्रमाणात कारवाई केली जाईल. 

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

सदाभाऊ खोतांचा संघटनात्मक वाढीसाठी राज्य दौरा सुरु, पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरु, कोल्हापूरात घेतली महादेवराव महाडीकांशी बंद खोलीत चर्चा.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या आरक्षणात फेरबदलाची अधिसूचना.

सेना गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार, मोर्चे बांधणी सुरु.

लालबागच्या राजाच्या दरबारात फसवा फसवी; भक्तांनी अर्पण केल्या जुन्या नोटा.

माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला.


जम्मू-काश्मीर शोपियन मध्ये सुरक्षा पथकांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.


पंढरपूर = माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे दोन मुलांची हत्या करुन त्यांचे मृतदेह पुरले, पोलिसांनी चौकशीसाठी आई-वडीलांना घेतले ताब्यात.


मिहान मध्ये वैद्यकीय उपकरण तयार करणाऱ्यांसाठी जागा देणार - नितीन गडकरी.सर्व जिल्हा रुग्णालयांना पेडियाट्रिक व्हेंटिलेटर पुरविणार - दीपक सावंत, आरोग्यमंत्री.

आता नविन साखर कारखाने नको - शरद पवार, मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट मधे एका कार्यक्रमात वक्तव्य.

सोलापूर = माढा तालुक्यातील रांझणी येथे बेकायदेशीररित्या चालणार्या गर्भलिंग तपासणीचे पर्दापाश, डॉक्टरासह पाच जण अटकेत़.


सोलापूर = पंढरपूरातील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जम्मु काश्मीरच्या तिघांना मिळाला प्रवेश, पंतप्रधान विशेष शिष्यवृत्तीचा मिळणार लाभ़.

श्रीनगर = अनंतनाग मधील बस स्टँडवर गोळीबार. दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केला गोळीबार. हल्ल्यात एक पोलीस शहीद तर दोन गंभीर जखमी.

पुणे = चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ मेघा खोले तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये, सोवळं मोडल्याची स्वयंपाकी बाई विरोधात केली होती तक्रार.

कोल्हापूर ऊस बिल हप्ता न मिळाल्याने पंचगंगा साखर कारखान्याच्या विभागास शेतकरी संघटनेने टाळे ठोकले ,रेणुकेच्या अधिकाऱ्यांना कार्यालया बाहेर काढले.

कल्याण = प्राध्यापक पतीकडून पत्नीची हत्या. लोकग्राम परिसरातील धक्कादायक घटना. हत्येचं कारण अस्पष्ट. पतीचा स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न.

नवरात्रीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना 11 सप्टेंबरला राज्यील सर्व जिल्ह्यात मोर्चा काढणार.


हिंगोली = कनेरगाव नाका येथे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून 40 किलो गांजा पकडला.

परळी शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर धरण भरले, परळीकरांना पाणी टंचाई नाही भासणार.

परभणी = कुंभारी, कार्ला, दिग्रस, झरी, मालेगाव या परिसरात दुधना नदीला पूर, पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान.

सोपोर चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव रियाझ अहमद असून, तो हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणात राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची नाशिक जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट.

गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएस-भाजपाचा संबंध आहे असे आपण म्हटलेले नाही पण वैचारीक मतभेद नक्कीच होते - मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते.

पंढरपुरातील दगडी पुलावरुन पाणी वाहत आहे. पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिरे पाण्यात.

रत्नागिरी = चिपळूण मध्ये हुसेन दलवाई यांच्याकडून बैठकीचं आयोजन, बैठकीला नारायण राणे समर्थकांना निमंत्रण नाही.

बीड = खासगी गोदामातील स्वस्त धान्य दुकानाचा काळ्या बाजारात जाणारा 3 ट्रक गहूव तांदूळ पुरवठा विभागाने केला जप्त. अंमळनेर येथील घटना.

विनायक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.... शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

लोणी खुर्द ता. वैजापूर येथील विनायक विद्यालय व केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 5 सप्टेंबर रोजी डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. परंतु या वर्षी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने सार्वजनिक सुट्टी होती. यामुळे डॉ. राधा कृष्णन सर्वपल्ली यांची जयंती तथा शिक्षक जयंती दि. 9 सप्टेंबर रोजी  उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक आर एन राजपूत सर तसेच शाळेचे उपमुख्य ध्यापक के बी जाधव सर यांच्याबमार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कल्याणी हिरे तर केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मोहम्मद तैमूर सय्यद हे होते,
तर शिक्षक म्हणून मनीषा जाधव, आरती जाधव,अनुजा तांबे, कावेरी तांबे, अंनजुम सय्यद, सानिया सय्यद, भूषण मगर, संदीप तांबे, या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडली,
यावेळी डॉ. सर्वपल्ली यांच्या जीवन चारित्र्यावर साक्षी कुंभकरन या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करत प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी हिरे म्हणाली की समाज घडवण्यासाठी शिक्षकाचा मोलाचा वाटा आहे.

या कार्यक्रमानिमित्त बी व्ही आर कॉम्प्युटर यांच्यातर्फे सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.  भगवान जाधव यांनी के. बी. जाधव, गणेश जाधव, नाईक सर, बी.पी. जाधव, एस. यु. जाधव, निकम सर, शिनगारे सर, ठोंबरे सर, या सर्वांचे सन्मानपत्र देऊन गावरवण्यात आले,

प्राथमिक शाळेच्या वतीने सर्व मुलांनी शिक्षक दिनानिमित्त पंडित चौरे, गणेश सोनवणे, राऊत सर, चौथे , पांडे, सांबरे,यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.