तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 16 September 2017

लव्हाला फाटा रेशन तस्करी प्रकरणी आता पर्यन्त 500 क्विंटल धान्य जप्त


लव्हाला फाटा-194 क्विंटल
सिल्लोड पोलीस-210 क्विंटल
जाफराबाद गोडाउन-95 क्विंटल

बुलडाणा- जिल्हा प्रतिनिधी

      14 सेप्टेंबर रोजी बुलडाणा एलसीबी व महसुल विभागाच्या पथकाने संयुक्त रित्य करवाई करुण चिखली-मेहकर मार्गावरील लव्हाला फाटयावर काळ्या बाजारात जाणारा रेशनचा अंदाजे 10 टन (194 क्विंटल) गहुने भरलेला ट्रक पकडला होता. सदर धान्य शासकीय वितरण प्रणालीचा असल्याची पृष्ठी झाल्या नंतर चिखली येथील राशन माफिया लक्ष्मण कुडके व इतर 3 लोकावर साखरखेरडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष गोष्ठ म्हणजे इकडे लव्हाला फाट्यावर ही करवाई सुरु असतांना याच चिखली येथील राशन माफिया कुडके चा एक ट्रक सिल्लोड पोलिसांनी त्याच दिवशी पकड़ला.या ट्रक मधे 21 टन शासकिय वितरण प्रणालीचा तांदूळ होता.अशा प्रकारे एकच वेळी तस्कर कुडकेचा दोन ठिकाणी काळ्या बाजारात जाणारा रेशनचा धान्य पकडला गेला.या नंतर बुलडाणा पोलीस व महसुल विभागाने कुडके च्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याचे सांजोळ गावा जवळ असलेल्या खाजगी गोडाउन वर छापा मारूण 10 टन रेशनचा तांदूळ जप्त केला.अशा प्रकारे एकाच रेशन माफिया कडून प्रशासनाने 50 टन म्हणजे जवळ पास 500 क्विंटल रेशनचा धान्य पकडला आहे.
      या प्रकरणी सिल्लोड पोलीस चौकशी कामी गुजरात पोहोचली व त्यानी तेथील राइस मिल मालकाला अटक करुण ते अधिकारी परतीच्या मार्गा वर आहे.खेद जनक बाब म्हणजे बुलडाणा पोलीस रेशन तस्करीच्या इतक्या कारवाया करीत असतांना आता प्रयन्त एकाही राइस मिल मालकाला अटक केली नाही,,याचे कारण अ - स्पष्ट आहे?????पकडलेला हा रेशन चा धान्य त्याने आनला कुठुन???याची चौकशी होने गरजेचे आहे.
या बाबीकड़े जिल्हाधिकारी श्री.चंद्रशेखर पुलकुंडवार व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.शशीकुमार मिना यांनी लक्ष द्यावे अशी  अपेक्षा जनते कडून व्यक्त होत आहे.

भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांच निधन.

_________________________

1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी अर्जन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. लष्करी रुग्णालयातच संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्जन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

कोण होते अर्जन सिंह...?

अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. अर्जन सिंह यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील लिआलपूर मध्ये झाला. कॉलेज मध्ये शिकताना वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांची निवड एम्पायर वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी झाली.15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन उडणाऱ्या भारतीय वायूदलाच्या शेकडो विमानांच्या अग्रभागी असलेल्या एअरक्राफ्टचं सारथ्य करण्याचा बहुमान त्यांना मिळाला.1 ऑगस्ट 1964 ते 15 जुलै 1969 या कालावधीत ते एअर स्टाफचे प्रमुख होते. 1965 मध्ये अर्जन सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1970 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली.1971 मध्ये अर्जन यांची स्वित्झर्लंड मध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी व्हॅटिकनचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं.

पालकांची जबाबदारी नाकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कपात.

_________________________

जे सरकारी कर्मचारी आई-वडिलांची जबाबदारी नाकारतील त्यांच्या पगारात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतलाआहे. या ऐतिहासिक निर्णया संदर्भातला महत्त्वाचा कायदा आसाम विधानसभेनं मंजूर केला.प्रणाम म्हणजेत परमनन्ट रिस्पॉन्सिबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटीबिलिटी अँड मॉनिटरिंग असं याकायद्याचं नाव आहे. विशेष म्हणजे मुलांचा कापण्यात आलेला पगार आई-वडिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. बेजबाबदार मुलाविरोधात तक्रार करण्याचा अधिकार या कायद्यानं वृद्धमाता-पित्यांना दिला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मुलांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडू नये यासाठी आसाम सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या निर्णयाचं सर्व स्तरातून समर्थन होत आहे. आसाम सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. देशभरातील सर्व राज्यांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करुन पालकांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून 10 टक्के रक्कम कापावी आणि ती पालकांना देण्याबाबतचा कायदा करावा असं, आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

जवाहर विद्यालयातील मुलींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे


              
जिंतूर
जवाहर विद्यालय जिंतूर येथे परभणी पोलीस यांच्या नियोजना नुसार पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शना खाली  आज महाराष्ट्र पोलिस अधिकारी संगीता वाघमारे मॅडम यांनी मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले तसेच त्यांनी मुलींशी संवाद साधला याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री के डी वटाणे सर मु अ सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते भाजपाच्या संपर्कात

काँग्रेसच्या युवा ब्रिगेडचे नेते आणि हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी घेतली नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नागपूर :-काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते भाजपाच्या संपर्कात असून दररोज याबाबतचा राजकीय धुराळा उडत आहे़ शनिवारी (१६ सप्टेंबर) काँग्रेसच्या युवा ब्रिगेडचे नेते आणि हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली़ सुमारे अर्धा तास उभय नेत्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली असून यामुळे काँग्रेस वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे़..

खासदार सातव हे शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गडकरींच्या महाल येथील निवासस्थानी पोहोचले. तर गडकरी हे दीड वाजताच्या सुमारास आपल्या निवासस्थानी आले़ गडकरी एका कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे अर्धा तास सातव यांना वाट पहावी लागली़ गडकरी आल्यानंतर सुमारे अर्धा तास बंदव्दार चर्चा झाली़ या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली़ राजीव सातव हे काँग्रेसच्या युवा आघाडीतील प्रमुख चेहरा आहे़ विशेष म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या ते जवळचे आहेत़ दरम्यान, या भेटीबाबत नितीन गडकरी यांना विचारले असता त्यांनीही ही भेट राजकीय नव्हती़ मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सावत आले होते, असे स्पष्ट केले..

काँग्रेस बंडखोरांचीही घेतली भेट

नागपुरातील काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, नितीन राऊत यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे़ मुत्तेमवार गटाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांचे पाठबळ आहे़ त्यामुळे चतुर्वेदी, राऊत यांचे बंड हे थेट अशोक चव्हाण यांच्याच विरोधात आहे़ नागपुरातील या तिघा नेत्यांसह विदर्भातील काँग्रेसचे अनेक नेते अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असून त्यांना हटविण्याची मागणी केली जात आहे़ राहूल गांधी यांच्याकडेही त्यांनी ही मागणी केली असून विदर्भात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे़ त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सातव यांनी सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद यांची भेट घेतली़ सुमारे तासभर त्यांच्यात चर्चा झाली़ यावेळी नाराजांची आपली भूमिका मांडली़ दरम्यान, काँग्रेसमधील नाराज गटातर्फे विदर्भात आयोजित एका कार्यक्रमासाठी राहूल गांधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे़ त्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते़..

शेतकºयांची व्यथा मांडली :- सातव

या भेटीबाबत विचारले असता खा़ सावत यांनी विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी गडकरी यांची भेट घेण्यात आल्याचे सांगितले़ हिंगोली मतदार संघातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ मधील प्रलंबित मुद्या संदर्भात ही भेट घेण्यात आली़ कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बायपासचा सर्वे या अगोदर नागपूर ते तुळजापूर या महामागार्साठी झाला. तेथील शेतकºयांची जमीन संपादीत करण्यात आली़ आता समृद्धी महामागार्साठी पुन्हा दुसºया बाजूने बायपास करण्यासाठी शेती संपादन करीत आहे़ याला शेतकºयांनी विरोध केला आहे़ ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी ही भेट घेण्यात आली़ दोन्ही बायपास एकत्र करावे, अशी शेतकºयांची मागणी आहे़ स्थानिक पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी हे देखील यावेळी उपस्थित होते़..

उमापूरची अमृता नदी पुनर्जिवीत शेकडो एक्कर जमिन बागायती !


सुभाष मुळे....
-------------------
गेवराई, दि 16 __ तालुक्यातील उमापूर येथून जाणाऱ्या अमृता नदिवरिल खोलिकरण व रुंदिकरण करून आमदार अमरसिंह पंडित यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. उमापूर येथिल अमृता नदिवरिल बंधारा सध्या पाण्याने तुंडूब भरला आहे. या परिसरातील शेतकरी वर्ग आ. अमरसिंह पंडित यांचे कौतुक करत आहे.
     आमदार अमरसिंह पंडित यांनी उमापूर येथून जाणाऱ्या अमृता नदिवर खोलीकरण व रुंदीकरण करून उमापूर परिसरातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे. कित्येक वर्षापासून अमृता नदी परिसरातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्यासाठी मोठी अडचण येत होती. जवळून नदी गेली, याचा फायदा शेतकऱ्यांना होत नव्हता. शेती करण्यासाठी शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडला होता. याच गोष्टीचा विचार करून गेवराईचे अभ्यासु व्यक्तिमत्व असणारे व शेतकऱ्यांच्या अन्यायाला वेळोवेळी वाचा फोडणारे आमदार अमरसिंह पंडित यांनी खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ डिसेंबर २०१५ यावर्षी उमापूर येथून जाणाऱ्या अमृता नदिचे खोलिकरण रुंदिकरण करून या नदिवर मोठे बंधारे बांधून नदिला पुनर्जिवित करून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी होत असणारी अडचण आ.पंडित यांनी कायमची दुर केली आहे. या अगोदर अमृता नदिला यड्या बाभळी व बेशरम नावाच्या झाडाने विळखा घातला होता. मारोतीची वाडी, चकलांबा, पौळाचीवाडी, खळेगाव येथून वाहून येणारे पाणी आले. सदरील पाणी बोरिपिपळगाव, भोजगाव, धोंडराईला वाहून जात होते. त्यामुळे उमापूर मारोतीची वाडी येथील शेतकऱ्यांना या अमृता नदिच्या पाण्याचा कुठलाच फायदा होत नव्हता. या सर्व गोष्टीचा विचार करून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजसिंह पंडित यांनी १२ डिंसेबर २०१५ रोजी माजी कृषिमंञी खा.शरदचद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने उमापूर येथिल अमृता नदिवर आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करून अमृता नदिला पुनर्वजिवित केले आहे.
       नदीवर बंधारे बांधल्यामुळे सध्या अमृता नदी पाण्याने तुडूब भरून वाहत आहे. या नदी शेजारील परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी बोअर पाण्याने भरले असल्यामुळे शेतकऱ्यांची जमिन ओलिताखाली येवून नदिवरिल पाण्याचे पर्कुलेशन होत असल्यामुळे शेकडो ऐकर जमीन ओलीताखाली येत असल्याने शेतकरी आमदार अमरसिंह पडित व माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे धन्यवाद व्यक्त करत आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

अवैध धंदे जोरात व राजरोसपणे सुरू

परभणी / प्रतिनिधी
जिल्हयासह शहरातील सर्वच ठिकाणी अवैध जोरात व राजरोसपणे सुरू आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलीस प्रशासन मात्र यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाहीत.
मानवत तालुक्यात
मराठा समाजाच्या वतीने अवैध धंद्याच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते त्यावरून आजघडीला मानवत शहरातील अवैध व्यावसाय सध्यातरी बंद ़असल्याचे दिसून येत आहे. परंतू जिल्हयातील उर्वरीत तालुक्यात मात्र आजही राजरोसपणे पोलीसांच्या नाकावर टिचून अवैध धंदे चालवले जात आहे. परभणी, जिंतूर तालुक्­यांमध्ये काही जणांमार्फत अवैध मटका, जुगार, अवैध झटपट लॉटरी,
गुटखा व्यवसाय जोरात चालू असून या व्यवसायाला स्थानिक पोलिस प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मटकेबहाद्दर, इतर दलाल गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार, लॉटरी, गुटखा चालवून तरुणांना आकर्षित करीत आहेत. यावर पोलिसांकडून केवळ कारवाईचा देखावा करण्यात येत आहे. असे सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नाही. परभणी बस स्थानकासमोर वैश्या व्यवसाय सुरु आहेत.परभणी शहरात काळी कमानसमोर, जुना मोंढा परिसर, धार रोड, खंडोबा बाजार, खानापूर फाटा, औद्योगिक परिसर, दर्गा रोड, जिंतूर नाका, पाथरी रोड यासारख्या गर्दीच्या ठिकाणी,मोठ्या प्रमाणात मटका व जुगार अड्डा चालवला जात आहे. शहरात मराठवाडा शाळेच्या बाजुस, सरफराज नगर,एम.आय.डी.सी.परिसर, टाकळी आदी ठिकाणी जुगार अड्डे चालवले जात आहे. परभणी तालुक्­यामध्ये पोखर्णी फाटा, झिरो फाटा, त्रिधारा, झरी, पेडगाव, पिंगळीसारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये, जिंतूर शहरामध्ये शिवाजी बाजार चौक, नगर परिषद व सार्वजनिक वाचनालय परिसर, पशू रुग्णालय परिसर, येलदरी कॉर्नर, जिल्हा परिषद मैदान, शासकीय रुग्णालय परिसर, आडगाव फाटा, आडगाव, भोगाव, चारठाणा, बोरी या गावांमध्ये अवैध व्यवसाय राजरोसपणे चालवले जाते. परंतू पोलासांच्या वतीने थातूर मातूर कार्यवाही करून स्वत:ची पाठ थोपवण्याचे काम केले जात आहे

बामणीत अवैध धंदे विक्री जोरात


वझर बु.  : जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या ्अंतरावर धमधम येथे राजरोसपणे दारु विक्री केली जात आहे. या दारुविक्रीकडे बामणी पोलीस ठाण्याच्या वतीने कानाडोळा केल्या जाते . ये़थील सपोनी पांचाळ हे या अवैध दारुविक्रेत्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अधीक बळ मिळत आहे. या प्रकाराला पोलीसांची मुक संमती असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने बोलले जात आहे. येथील दारु विक्रेता हा तर शाळेच्या बाजुला हांडीरोडवर खुलेआम दारविक्री करीत आहे.यामुळे परिसरात वाहतूक वाढली आहे महिलांना याचा त्रास वाढलाआहे.ही अवैध दारुविक्री त्वरीत थाबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेवराईच्या महिला महाविद्यालयाला मैदानी स्पर्धेत 'तीन' स्वर्ण पदकं

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 16 __ जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयाला आर. बी. अट्टल महाविद्यायात संपन्न झालेल्या मैदानी  स्पर्धेत तीन स्वर्ण पदके मिळाली आहेत.
    बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा गट शिक्षण अधिकारी व आर.बी. अट्टल महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतर शालेय तालुका स्तर मैदानी स्पर्धेत महिला महाविद्यालयाच्या कु. सपना सातपुते 200 मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर  कु. गीता गायकवाड, कु. लक्ष्मी शिंदे, सिमा जाधव, कु.सपना सातपुते यांनी 100 बाय 400 मिटर रिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावुन महाविद्यायाच्या मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पदक प्राप्त विद्यार्थिंनींचा सत्कार जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित, सचिव जयसिंह पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन परळीकर, तालुका क्रीडा स्पर्धा प्रमुख प्रा.राजेंद्र बरकसे, प्रा. जी.जी. कदम व क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांनी शुभेच्छा देउन सत्कार केला.
      कु. सपना सातपुते,  कु. गीता गायकवाड, कु. लक्ष्मी शिंदे, सिमा जाधव, यांना क्रीडा विभागप्रमुख प्रा. डाॅ. प्रविण शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली असल्याने सर्व प्राध्यापकांनी त्यांचे कौतुक केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯


प्रा.अजय भोसले  सेट परिक्षा उत्तीर्ण


परभणी :  शहरातील वसमत येथील कृष्णा गार्डन परिसरातील रहिवाशी प्रा.अजय अशोकराव भोसले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी एप्रिल २०१७ मध्ये आयोजीत केलेली सेट परिक्षा वाणिज्य विषया उत्तीर्ण झाले. त्यांन ीया परिक्षेत ३०० पैकी २३६ गुण संपादीत केले. त्यांना पुणे येथील प्रा. गजानन रेवले, प्रा.रेवले यांचे मार्गदर्शन लाभले.  त्यांच्या या यशाबद्दल माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, छाया निरस, रोहीणी कदम, मिनाक्षी भोसले, जयश्री भोसले, नेहा भोसले, श्रेयश कदम, प्रा.जीवन भोसले,आंदीनी अभिनंदन केले.

विश्वकर्मा प्रगटन दिनाचे आयोजन

परभणी :  येथील विश्वकर्माय विकासमंडळा महाराष्ट्रच्या वतीने  विश्वकर्मा प्रगटदीन व मराठवाडा मुक्ती संग्रामदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन विकास महंामंडळ, बलुतेददार महासंघ , श्रीवस बालक मंदीर, महिला मंडळाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा प्रगटदीन साजरा करण्यात येत आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचीत्य साधून स्वच्छा अभियान, वृक्षारोपण विविध सामाजिक कायक्रमाचे आयोजन केले आहे.असंघटीत कामगारांचे शासनदरबारी प्रलंबीत असणारे व ओबीसीच्या ज्वलंत प्रश्नावरचर्चा करण्यात येईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सुभाष पांचाळ यांनी कळविले.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

विरोधी पक्षात असताना माझ्यावर आरोप झाले नाहीत; पण मंत्री झाल्यावर आरोप झाले : एकनाथ खडसे

धोकादायक आणि दुरुस्ती पलिकडे गेलेल्या मनोरा आमदार निवासाचं नूतनीकरण थांबवलं. कंत्राटदारांच्या बिलांसाठी दुरुस्तीचं काम केलं होतं सुरु..

आशिष शेलार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा सोंगाडे म्हणून उल्लेख. आशिष शेलारांची घणाघाती टीका.

तीन तलाक पीडित महिलांसाठी लढत असलेल्या केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी.

कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पुरवठा पूर्ववत होणार.


सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकणी बरखास्त करण्या मागे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा अर्थ लावण्यात येऊ नये - गणेश पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, विकास सावंत यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती.

पुणे = 2017 चे रेल्वेचे नवे वेळापत्रक 15 ऑक्टोबर पासून पासून अमलात येणार. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती.

सिंधुदुर्ग = इंदिरा आवास योजनेची 125 घरकुले अपूर्ण, योजना बंद होऊन दोन वर्षे उलटली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभेत धक्कादायक माहिती उघड.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा.


दुर्गा पुजेला कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. मुहर्रम दरम्यान मुर्ती विसर्जन होणार नाही. सणांच्या नावाखाली राजकारण केलं जाऊ नये - ममता बॅनर्जी.

भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंह यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे.

जालना = नगरसेविकेच्या पतीने कर्मचा-याला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ अंबड न.प.कर्मचा-यांचे लेखणी बंद आंदोलन.

नागपूर = काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. गडकरींच्या निवासस्थानी झाली भेट.


नंदुरबार = डी.पी.साठी शेतकरींकडून पैसे मागणारे लाईन मन निलंबित, एका अभियंत्याची वेतनवाढ रोखली. उर्जा मंत्र्यांची ग्राहक मेळाव्यात कारवाई.

सोलापूर मनपाचे स्थायी समिती सभापती निलंबित.


दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज जे पी ड्यूमिनी याचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. मात्र कमी ओव्हर्सचे सामने खेळणार असल्याची माहिती.


परभणी = जिंतूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.ए. घोडके निलंबित. रॉकेलच्या किरकोळ परवानाधारक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यांची कारवाई.


परभणी = विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.

यवतमाळ = शंभर ग्रामपंचायतींची ऑक्टोबर मध्ये निवडणूक. आर्णी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची 7 ऑक्टोबर, 12 तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींची 26 ऑक्टोबरला होणार निवडणूक. निवडणुकीत 100 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार.

यवतमाळ = वाघाच्या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू, पांडुरंग कोवे (वय 22) मृत शेतक-याचे नाव, राळेगाव तालुक्याच्या सखी (कृष्णापूर) शेतशिवारात घटना.


पुणे = महाराष्ट्र साहित्य परिषदेचं बालकुमार साहित्य संमेलन होणार लोणावळ्यात. ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवटच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी.

नाशिक = आयटीआयच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शून्य गुण, परीक्षा मंडळाचा अजब कारभार.

अहमदनगर = हिंगणी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या कोपरगाव शहरातील साई लांडे व सार्थक सोनवणे या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू.

हायड्रोजन बॉम्बनंतर उत्तर कोरियाचा आता आण्विक कार्यक्रमावर भर.

दक्षिण आफ्रिकेचा जेपी डयुमिनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त.

सोलापूर = अशोक चौक परिसरात राहणाऱ्या मुरलीधर श्रीनिवास शेगुर या 21 वर्षीय युवकाची आत्महत्या. शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या. ब्लु व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांना संशय.