तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 23 September 2017

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रविवारी उत्पात आणि विषकुंभ नावाचे दोन अशुभ योग्य जुळून येत असले तरी 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. गुरु-चंद्राची जोडी या अशुभ योगांचा प्रभाव कमी करेल. या ग्रहांमुळे गजकेसरी नावाचा शुभ राजयोग जुळून येत आहे. यामुळे सुटीचा दिवस तुमच्यासाठी खास राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष - नवीन ओळखीतून फायदा होईल. उपवरांंचे विवाह ठरतील. नोकरीत वरीष्ठांचा मूड सांभाळावा लागेल. आज प्रिय व्यक्तिसह भटकंतीचे योग आहेत. शुभ रंग : आकाशी, अंक-९.

वृषभ - उद्योग व्यवसायात प्रगतीच्या दिशेने वटचाल होईल. तुमच्या कतृत्वाने तुमचे स्पर्धकही प्रभावित होतील. आज जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. शुभ रंग : क्रिम, अंक-८.

मिथुन - आज काही अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्या मनाला दिलासा देतील. मिटल्या तोंडी स्वार्थ साधून घ्या. कलाकार प्रगतीच्याच मार्गावर आहेत. शुभ रंग : तांबडा, अंक-१.

कर्क - दगदग झाली तरी स्वप्नपूर्तीचे समाधान मिळेल. सार्वजनिक जिवनात मान मिळेल. मातुल घराण्याकडून आज काहीतरी अनपेक्षित लाभ होणार आहेत. शुभ रंग : स्ट्राॅबेरी, अंक-५.

सिंह - नोकरीच्या शोधात असाल तर मुलाखतीसाठी बोलावणे येईल. कौटुंबिक सौख्यासाठी तडजोड गरजेची. सामाजिक कार्यात मानपान गुंडाळून ठेवा. शुभ रंग : मोतिया, अंक-७.

कन्या - कार्यक्षेत्रात वक्तृत्वाचा प्रभाव पडेल‌. तरुणांना व्यसने आकर्षीत करतील. संयमाची गरज. धनस्थानातील चंद्र आज काही कमी पडू देणार नाही. शुभ रंग : लाल, अंक-६.

तूळ - आज आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकाल. आप्तस्वकीयांचा विश्वास संपादन कराल. मात्र आनंदाच्या भरात कोणालाही वचने मात्र देऊ नका. शुभ रंग : तपकिरी, अंक-२.

वृश्चिक - आज सखोल अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी अनुकूल दिवस अाहे.लेखक कवीवर्य यांच्याही कल्पनाशक्तीस चालना मिळेल. कर्जाची परतफेड होईल. शुभ रंग : भगवा, अंक-१.

धनू - कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. उच्चशिक्षणार्थींची स्वप्ने साकार होतील. तुमचे व्यक्तिमत्व इतरांस आकर्षित करेल. शुभ रंग : जांभळा, अंक-७.

मकर - ध्येय पूर्णत्वाकडे जातील. आज व्यस्त दिवस असून विरोधकांना तुमच्या कार्यशक्तीचा प्रत्यय येईल. प्रशंसकांना दोन हात दूर ठेवणेच योग्य. शुभ रंग : पांढरा, अंक-३.

कुंभ - उद्योग व्यवसायातील स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे. विरोधक पाय खेचण्यासाठी तत्पर असले तरीही दैव आज तुमच्याच बाजूने आहे. डोन्ट वरी. शुभ रंग : मोरपंखी, अंक-८.

मीन - प्रकृतीबाबत जुन्या तक्रारी आता कमी हाेतील. घराबाहेर कुठेही आज आक्रमक भूमिका नको. ज्येष्ठांना आज सत्संगातून मानसिक स्वास्थ्य लाभेल. शुभ रंग : लेमन, अंक-४.

पालम तालुक्यातील रस्त्याठी मुख्यमंत्र्यांकडुन तत्वता मान्यता गणेशराव रोकडे यांच्या प्रयत्नांना यश

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील बर्याच वर्षा पासुन रस्त्याची अंत्यंत  अवस्था वाईट झाली असुन रस्त्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. पावसाळयात मोठ मोठे खडे पडत आसल्याने त्या खडयात पाणी साचत आसल्याने वाहनाला येजा करणे खुप कठीण जाले आहे. ही आवस्था पाहुन तातडी ने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी मुंबई कडे धाव घेऊन रस्त्याच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदन सादर करताच  मुख्यमंञ्याकडुन सदरील कामास तत्वता मान्यता दिल्यामुळे लकरच कामास सुरूवात होणार आहे.
      तालुक्यातील  गावातील रस्ते अत्यंत खराब झाले असुन काही गांवाना मजबुत रस्ते नसल्यामुळे तालुक्याचा संपर्क तुटल्यासारखा झाला आहे. तालुक्यातील गणेशवाडी ते आजमबाद, सरफराजपुर जोड रस्ता, बंदरवाडी जोडरस्ता, कांदलगाव जोडरस्ता, रेवातांडा, नाव्हलगाव, घोडा, कापसी, खोरस, तेलजापुर रस्ता पोखर्णी देवी जोडरस्ता, खंडी, चाटोरी, वनभुजवाडी रस्ता कोळवाडी ते सेलु, कोनेरवाडी आदी रस्ताचां कामांना मुख्यमंत्र्यांकडुन तत्वता मान्यता देण्यात आली. असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधुन रस्ताचे कामे होणार आहेत. त्यामुळे लवकरच तालुकातील रस्ताचे कामे मार्गी लागणार असल्याची महीती भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी संदस्य गणेशराव रोकडे यांनी पञकार परीषेदेत मध्ये बोलताना दिली. यावेळी नगरध्यक्ष बालासाहेब रोकडे,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजीराव टोले, पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब किरडे, अल्पसंख्यांक जिल्हाउपाध्यक्ष डॉ.शेख बडेसाब, वकील सेलचे अध्यक्ष अँड टी.एम.पौळ, माधवराव गिणगिणे, डाॅ.रामराव उंदरे, नरहरी घोरपडे, शिवाजी दिवटे, गणेश घोरपडे, बाबासाहेब एंगडे, भाजपा शहरध्यक्ष दत्तराव घोरपडे, संरपच मोतीराम खंडागळे, चंद्रकांत गायकवाड अदिं भाजपा कार्यक्रर्ते उपस्थित होते.

कै. रमेश वरपुडकर कब्बडी स्पर्धेत प्रथम


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत कै. रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने 19 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.
सोनपेठ तालुक्यातील जिजामाता पब्लिक स्कुलमध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत एकुण 16 संघानी सहभाग नोंदवला होता. त्यात वरपुडकर महाविद्यालयाच्या संघात रंजवे प्रणोती मारोती (कप्तान), किरवले दिक्षा, लोंढे पल्लवी, उबाळे वैष्णवी, शेटे गिता, हाके पल्लवी, काकडे पायल, किरवले श्वेता, मस्के अर्चना, बर्वे कल्पना यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल हशिप्रचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, प्राचार्या शेख शकिला, प्रा. गोविंद वाकणकर, प्रा.डॉ.संतोष रणखांब, प्रा.सतिष वाघमारे, प्रा. संतोष वडकर, प्रा. महालिंग मेहत्रे, संतुक परळकर, संतुक कुलकर्णी, दत्ता सोनटक्के, चंद्रपाल पटके आदी उपस्थित होते.

बेलगुडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुरस्कार प्रदान

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 23 __ तालुक्यातील बेलगुडवाडी जि.प.प्रा. शाळेला 'सलाम मुंबई फाउंडेशन आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र' यांच्या वतीने तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार देण्यात आला.
     याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही लोकसहभागातून डिजिटल करण्यात आली असून आयएसओ मानांकनासाठी ही सज्ज आहे. येथील शिक्षकांच्या संकल्पनेतून सतत विविध आगळे वेगळे उपक्रम राबवुन आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. यामुळे नेहमी चर्चेत असणारी ही शाळा आहे, त्यातच व्यसन मुक्तीच्या जोरावर दि.19 सप्टेंबर रोजी स्काऊट गाइड भवन बीड येथे आयोजित कार्यक्रमात 'सलाम  मुंबई फाउंडेशन आणि  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण  विभाग महाराष्ट्र 'यांच्या वतीने या शाळेला तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार श्रीमती भावना राजनोर  (प्रा. शिक्षणाधिकारी बीड ), व अभिमन्यू केरूळे साहेब (उपायुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय बीड ), नाना धवसे (सलाम मुंबई फाउंडेशन) यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देेेऊन मुख्याध्यापक चादर सर यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
     बेलगुडवाडी या शाळेत गेवराईचे जेष्ठ विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच वेगवेळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणा विषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपण, दप्तराविना शाळा, वाढदिवस व व्यसन मुक्तीच्या संस्काराची जोड़ असते. असे उपक्रम घेऊन या शाळेसाठी सतत मेहनत घेणारे मुख्याध्यापक चादर सर, उपक्रमशिल शिक्षक प्रशांत मस्के व सूर्यवंशी सर यांनी व्यसनाला आळा बसावा व यांची भीती मुलांच्या मनात बसावी म्हणून शाळेमध्ये ठिकठिकाणी धुम्रपान निषेध, व्यसनमुक्त शाळा असे फलक लावलेली आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांने आपले पालक अथवा कोणाच्या सांगण्यावरून तंबाखू, गुटखा असे पदार्थ आणून देऊ नये, यात सुरवातीला पालकांना न आवडलेल्या या निर्णयाची आता मात्र अभिमानाने दखल घेत आपल्या पाल्याला तंबाखूजन्य पदार्थ आणण्यासाठी त्यांच्याकडूनच मनाई करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठांकडून वेळोवेळी विशेष मार्गदर्शन व प्रयत्न केले जातात. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक समिती व गावकरी शाळेला वेळोवेळी सहकार्य करत असल्याने या शाळेची खूप मोठी सुधारणा झालेली आहे. या सर्व यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक चादर सर, सहशिक्षक प्रशांत मस्के सर व सूर्यवंशी सर यांचे ग्रामस्थ शिक्षक व सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्यात महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणार जिल्हयातील सर्व गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा                                 -  गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर

        जालना,दि.23 – महाराष्ट्र ही थोर विचारवंताची भुमी असून जालना जिल्हयाप्रमाणेच राज्यात ही शांतता नांदत आहे. परंतु जिल्हयातील व्यावसायीक व व्यापारी नितीन कटारीया व गोविंद गगराणी यांच्या हत्ये नंतर काही प्रमाणात शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी व शांततेचे वातावरण टिकुन राहण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहिली पाहिजे जेणे करुन गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने सक्त कार्यवाही करावी.  राज्यात महत्वाच्या ठिकाणी लवकरच सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा, असे निर्देश राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेबाबत तसेच केलेल्या कार्यवाही संबंधि आयोजित जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा व व्यापारी संघटना यांच्या बैठकीत राज्यमंत्री दिपक केसरकर बोलत होते.

            या बैठकीस राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  अनिरुध्द खोतकर, जि.प.चे.माजी अध्यक्ष भास्कर आंबेकर, आमदार राजेश टोपे, नारायण कुचे, आ.संतोष दानवे,  जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी तसेच भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, उद्योजक किशोर अग्रवाल, डॉ.अजमेरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            राज्यमंत्री श्री.  केसरकर म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे. सद्या शहरात भुरटया चोरांचे प्रमाण वाढलेले असून महिलांची छेडछाड होणार नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकरीता विशेष लक्ष देवून पोलीस यंत्रनेने गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे.   विविध समारंभ व सणावारांच्या वेळेस  पोलीस यंत्रणेवर मोठया प्रमाणावर ताण पडतो. त्यासाठी शासन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकरीता विविध सोयीसुविधा पुरवित असते. त्यांना हक्काची (मालकीची) घरे असावी म्हणून शासन दराने घरे उपलब्ध करुन देणार असल्याचेही  राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

            यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने गुन्हयाच्या तांत्रीक बाबीची सखोल  पडताळणी करुन कठोर शिक्षा होण्यासाठी गुन्हेगाराला तडीपार करण्याच्या   सूचना देवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहीली पाहिजे. यासाठी पोलीसांनी मनात विश्वास ठेवून बेधडकपणे कार्यवाही करावी. गुन्हेगारांना पाठीशी न घालता कुठल्याही गुन्हेगारांवर कार्यवाही होतांना लोकप्रतिनीधी आड येणार नाही याची दक्षता घेवून शासन आपल्या पाठीशी असल्याचे  राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हयातील कायदा सुव्यवस्थेबाबत आमदार राजेश टोपे यांनी ही आपले मत मांडले.    

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकी अगोदर गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांनी नितीन कटारीया यांच्या मोदीखाना येथील  निवासस्थानी  जावून त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून सात्वन केले. शासन आपल्या पाठीशी असून  आरोपींना योग्य ती जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिल्या जाईल, असे राज्यमंत्री श्री केसरकर यांनी कटारीया यांच्या कुटूंबियांना सांगितले.

        .   *शहरात कायदा* व *सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व्यावसायीक नितीन कटारीया व गोविंद गगराणी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा देण्यासाठी  पोलीस  प्रशासनाने तपास कामात हलगर्जीपणा* *केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याबदल पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी समर्थन केले*  .        *महाराष्ट्रात सर्वात मोठी कार्यवाही*.....
*पालकमंत्री बबनराव लोणीकर*

            *यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की,  जालना शहराप्रमाणेच जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत 70 सी.सी.टीव्ही* कॅमेरे बसविण्यात आले असून या पुढे संपूर्ण जिल्हाभर  मोक्याच्या ठिकाणी सी.सी. टिव्ही कॅमेरे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून खरेदी करुन बसविण्यात येणार असल्याचे सांगून शहरात नितीन *कटारीया यांनी आपल्या जीवाला धोका असल्याबाबत तालुका पोलीस ठाण्याला वेळोवेळी कळवून पोलीस संरक्षणाची मागणी केली होती मात्र यात पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन यांनी कसूर केल्याने* त्यांना त्वरीत निलंबीत करुन सदरबाजाराचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांची इतरत्र बदली करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षकांना देवून त्यांनी कार्यवाही केली आहे. तसेच *तालुका जालना पोलीसांनी गुन्हा दाखल न केल्याने कटारिया यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे धाव घेतली होती त्यांनीही या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची* विभागीय चौकशी लावण्यात आली  आहे.  संबंधित प्रकरणाचा तपास  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे सोपविण्यात आला *असून राज्यात ही सर्वात मोठी कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी दिली*

            तसेच शहरात शांतता आबाधित राहण्यासाठी प्रत्येकाला सुरक्षा देणे ही आमची नैतिक जबाबदारी असून अवैधरित्या प्लॉटींग व्यवसाय करणारे, वाळु माफिया, मटका चालवणाऱ्या मुळ मालकांवर तसेच  अवैध दारु विक्रेत्यावर कडक कार्यवाही करुन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी  जिल्हा प्रशासन व पोलीसांनी कडक कार्यवाही करावी यासाठी गरज भासल्यास गुन्हेगारावर राष्ट्रीय सुरक्षा (मोक्का) लावून गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या  सूचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी दिल्या.

            या बैठकीस शहरातील व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

***-***

आम्ही शास्त्रज्ञ घडवले तर पाकनं दहशतवादी : सुषमा स्वराज


_________________________

दहशतवादाला खतपाणी घालणारा, देश म्हणून जगात कोणता देश असेल, तर तो पाकिस्तान आहे. मागील 70 वर्षांमध्ये भारताने विकास साधला. मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना,जिहादी आणि दहशतवादी तयार केलेत. असंम्हणत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतीलमंचावरून खडेबोल सुनावलेत. आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात सुषमा स्वराज पाकिस्तानवर 6 मिनिटे बोलल्या. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वराज यांचं स्वागत केलं.सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकाराबद्दल शिकवू नये. कारण पाकिस्नानने स्वत: क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानने स्वत: आत्मचिंतन केलं पाहिजे. एकीकडे भारताचा सर्व जगाकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती म्हणून गौरवलं जातं. तर दुसरीकडे पाकिस्तानची ओळख दहशतवाद्यांचा कारखाना म्हणून होते. त्या पुढे म्हणाल्या की, भारताने आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या संस्था उभारल्या. पाकिस्तानाने एलईटी, जेईएम, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि हक्कानी सारख्या दहशतवादी संघटनांच्या गटांना नेहमी पोसलं आहे.विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी चीनलाही चांगलंच फटकारलं आहे. अजहर मसूदच्या मुद्द्यावरुन बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, दहशतवाद हा मानवी अस्तित्वासाठी सर्वात मोठाधोका आहे. त्यामुळे त्याला कोणीही योग्य ठरवू शकत नाही.

राणे यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे .

_________________________

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. काल चिपळूण, राजापूर आणि लांजामधील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या समर्थनार्थ आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर आज रत्नागिरी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यातही काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यानी गेल्या दोन दिवसांत राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये चिपळूण, राजापूर, आणि लांजा या तालुक्यातील पदाधिकार यांचा समावेशहोता. त्यानंतर आज रत्नागिरी तालुक्यातील राणे समर्थकांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले. पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकार्यानी तशी घोषणा केली. आता आमचा पक्ष हा राणे साहेबच असून ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे या कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जम्मू मधल्या भारतीय चौक्या, खेडयांवर पाकिस्तानचा तुफान गोळीबार; BSF च्या दोन जवानांसह सातजण जखमी.

_________________________

सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने शनिवारी रात्री जम्मूच्या सांबा आणि पूँछ सेक्टर मध्ये भारतीय चौक्या आणि खेडयांना लक्ष्य केले. पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. यात बीसएफएच्या दोन जवानांसह पाच नागरीक असे एकूण सात जण जखमी झाले. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे सीमेवर राहणा-या शेकडो गावक-यांना अन्यत्र सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे.अर्णिया, आरएसपूरा, आणि रामगड सेक्टर मधल्या गावांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मोर्टार डागले. त्यांनी 20 पेक्षा जास्त गावांना लक्ष्य केले. गोळीबारात आरएसपूरा सेक्टरच्या सातोवाली गावातील तीन नागरीक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सांबाच्या रामगड सेक्टर मध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पाकिस्तान म्हणजे ‘टेररिस्तान’ दहशतवादाचा उपयोग एक साधन म्हणून करणे थांबवा, असा इशारा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. त्याच बरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रातील परमनंट सेक्रेटरी श्रीमती इनाम गंभीर पाकिस्तानचा उल्लेख थेट टेररिस्तान असाच केला. पाकिस्तान म्हणजे दहशतवादाची भूमी आहे. दहशतवाद्यांना ते आपले नंदनवन वा स्वर्गच वाटते. त्या ठिकाणी दहशतवादाची निर्मिती होते आणि जागतिक स्तरावर त्याची निर्यात होते, अशी जहाल टीकाही इनाम गंभीर यांनी केली.सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला. काही देशांच्या मदतीने चालणार्या अतिरेकी संघटनांवर त्यांनी प्रहार केला. देशाचे धोरण म्हणून दहशतवादाचा उपयोग करणे बंद करा, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे तसेचया संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद थांबवावी, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्याचीगरज त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचे पोषण करणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचाच अंत करण्याची गरज असल्याचे स्वराज म्हणाल्या.

पत्रकारांवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

प्रदिप कोकडवार
जिंतूर
परभणी येथील पत्रकार संजय नाईक यांच्यावर सेलू येथील संजय रोडगे यांनी सूडबुद्धीने खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला असल्याने तो गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी 23 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध केला आहे..

शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाजारीकरण करून पालकांना लुटण्याचा गोरख धंदा सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे अशाच एका सेलू येथील डॉ संजय रोडगे या संस्था चालकाने शिक्षणाचे बाजारीकरण करत असल्याने लोकशाहीचा मार्गाने हा बाजार वृत्त मालिकेचा माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रामाणिक पर्यंत केला होता मात्र राजकीय वजन वापरून त्यांनी  प्रकरण दाबण्यासाठी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची गळचेपी करण्याचा पर्यंत केला आहे म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करून पत्रकारांवरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा व पत्रकारांना न्याय देण्याची मागणी तहसीलदार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे तालुक्यातील पत्रकारांनी केले आहे या निवेदनावर एम ए मजीद,विजय चोरडिया,निहाल अहेमद,शेख शकील,शेख वाजीद,बालाजी शिंदे,गुनिरत्न वाकोडे, शहेजाद खान,प्रदीप कोकडवार, राहुल वाहूळे, अकबर सिद्दिकी,मंचक देशमुख,मौलाना शिराज,विनोद पाचपिल्ले, शेख अलिम आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.