तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 7 October 2017

शिवाजीराव पंडित 'दादांचे' कार्य मार्गदर्शक ठरेल - जालिंदर पिसाळ

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 7 __ माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित हे चौफेर व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रासह सामाजिक, क्रीडा, कला, सहकार, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य भावी पिढ्यांना निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारे आहे. गेवराई तालुक्याच्या जडण घडणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य जालिंदर पिसाळ यांनी केले.
     माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शारदा विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या दंत चिकित्सा शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी जालिंदर पिसाळ हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बप्पासाहेब मोटे, ऋषिकेश बेदरे, आनंद सुतार, डॉ. मुदकोंडवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शारदा विद्यामंदिर, गेवराई येथे दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या माजी विद्यार्थीनी डॉ. ऋतिका मुदकोंडवार यांच्यासह वीस दंत चिकित्सक तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यालयातील सहाशे विद्यार्थी आणि शेकडो पालकांची दंत चिकित्सा यावेळी केली. शिबीराचे उद्घाटन भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य जालिंदर पिसाळ यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश बेदरे, माजी नगरसेवक नजीबभाई, गोरख शिंदे, आनंद सुतार, भवानी बँकेचे उपाध्यक्ष गौसभाई, डॉ.प्रशांत मुदकोंडवार, दत्ता दाभाडे, संदिप मडके, सुनिल सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी केले. गेवराई शहरातील नामांकित विद्यालय म्हणून ओळख असलेल्या शारदा विद्यामंदिर या शाळेच्या माजी विद्यार्थीनी डॉ.ऋतिका यांच्या पुढाकारातून दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्रसिध्द दंत चिकित्सक डॉ.अफरोज अंजुम यांनी दंत चिकित्सेबाबत उपस्थितांना विशेष माहिती दिली. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बप्पासाहेब मोटे, जालिंदर पिसाळ, आनंद सुतार यांनी मार्गदर्शन केले.
     यावेळी बोलताना मान्यवरांनी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी दादांनी खूप परिश्रम घेतले. जयभवानी कारखाना, शिक्षणसंस्था, सुतगिरणी यांची स्थापना केली. दादांच्या राजकीय इच्छा शक्तीमुळे जायकवाडी धरणाचा उजवा कालवा तालुक्याच्या गावागावात पोहचला. त्यामुळे सिंचनाची मोठी व्यवस्था होवू शकली. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणासह इतर सुविधा मिळवून देण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे तालुक्याचा विकास होवू शकला असेही त्यांनी सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक व महिला पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

डोणगांव येथे विज पडुन १ ठार ३ जखमी

     समाधान गायकवाड मेहकर प्रतिनिधी      

७/ऑक्टोबंर                               डोणगांव ता.मेहकर येथे दिनांक ०७/१०/२०१७ रोज शनिवारी ला ४ वाजताचे दरम्यान प्रंचड विजेचा कडकडाट होऊन डोणगांव शिवारात शेतामध्ये काम करीत असलेले मयत गोविंद पांडुरंग जाधव वय ३८ वर्षे यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा मृत्यु झाला.इतर शेतामध्ये काम करीत असलेले गणेश शंकरराव पळसकर वय ५० वर्ष ,वैभव गणेश पळसकर वय १६ वर्षे,तसेच संतोष मुरकुटे हे  तिघेही  जखमी झालेले असुन त्याच्यावर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल मेहकर येथे उपचार सुरु आहे.

गेवराई तालुका : ७५ ग्रा. पं. च्या निवडणुकीत 84.93 टक्के मतदान

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. ७ __ तालुक्यातील ७५ ग्राम पंचायतच्या निवडणुकीसाठी एकुण 84.93 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सरपंच पदाच्या ७५ जागेसाठी २५३ उमेदवारांचे तर ६९७ ग्राम पंचायत सदस्य पदासाठी १ हजार ५५१ उमेदवारांचे भवितव्य दि. ७ शनिवार रोजी मतदान पेटीत बंद झाले आहे  या निवडकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नसून दि. ९ सोमवार रोजी शहरातील आर. बी. अट्टल महाविद्यालय येथे सकाळी दहा वाजता निकाल घोषित केला जाणार असून सर्व  उमेदवारांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे.
   गेवराई तालुक्यात सैदापूर, काजळा व भाट आंतरवालीच्या ३ सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध झाली आहे. ७५ ग्राम पंचायतच्या निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकेसाठी एकुण १ लाख २५ हजार ३४३ मतदार होते. दरम्यान शनिवार रोजी 84.93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कधी काळी आ. अमरसिंह पंडित, माजी आ.बदामराव पंडित यांच्यात दुरंगी होणारी निवडणूक यावेळी आ.लक्ष्मण पवार यांच्या राजकीय आगमनाने अनेक ठिकाणी तिरंगी झाली आहे. प्रथमच सरपंच पदासाठी जनतेतून निवड होणार असल्याने जनतेत उत्सुकता होती.
     या निवडणुकीसाठी २४३ ,मतदान केंद्र तर १ लाख २५ हजार ३४३ मतदार होते. १२ हजार कर्मचारी मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी होते तर ३०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले यात २५ क्षेत्रीय अधिकारी होते. दरम्यान या निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात शांततेत मतदान पार पडले असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. आता दि. ९ सोमवार रोजी सकाळी दहा वाजता गेवराई येथील आर. बी. अट्टल महाविद्यालय येथे निकाल घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान सरपंच आणि सदस्यांचे भवितव्य निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

माजी आमदार राजीव राजळे यांचं निधन.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. राजळे हे 2004 ते 2009 या कालावधीत कॉंग्रेसचे आमदार होते.राजळे यांनी आर्किटेक्ट पदवी घेतली होती. उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती होती. विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होत. राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक होते. तर भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती होते. माजी आमदार आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे ते मावस भाऊ होते. राजळे यांनी2014 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. राजळे यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. टेक्नोसॅव्ही म्हणूनही त्यांची ओळख होती. राजळेंचा जनसंपर्क दांडगा होता. पाथर्डी तालुक्यातील सत्ता केंद्रांवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. राजळेंच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.राजळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज म्हणजे रविवारी दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालकांचा एकदिवसीय संप.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी यामुळे युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने 13 तारखेला 1 दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये 54 हजार डिलर सहभागी होणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी देशातील 54 हजार पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी-विक्री बंद राहिल.रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचं नुकसान होत आहे. तसंच सरकार पेट्रोल डीलर्सच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येत्या काही दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबर पासून बेमुदत संप करणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.

डीलर्सच्या मागण्या काय...?

= 4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार.

= मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज.

= कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन.

= रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान.

= राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्तआणि समान होतील.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीचे प्रकरण चिघळले....! महाविद्यालयाकडून वरिष्ठ लिपीक जबाबदार असल्याचे प्रसिद्धी पत्रक तर वरिष्ठ लिपीकाची तक्रारदार विद्यार्थ्यांविरोधात फिर्याद


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल कै. राजीव गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क न भरल्या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात 14 विद्यार्थ्यांनीच परिक्षा शुल्क भरले असून काही विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्राच्या परिक्षा एकदाच देण्यासाठी विनंती केली, त्यामुळे हिवाळी 14 व हिवाळी 16 या वर्षातही असे झाले होते. परंतू यात महाविद्यालयाच्या संस्थेचा कसलाही दोष नसल्याचे पवार यांनी कळवले आहे. परिक्षेचा सर्व अधिभार हा वरिष्ठ लिपिकावर असल्याचे व हा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या हालगर्जीपणामुळे घडल्याचे पत्रात नमुद केले आहे. तर वरिष्ठ लिपिकांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तोडफोड करून कागदपत्रे गहाळ केल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात दिली आहे.
सोनपेठ येथे राजिव गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा फिस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेत शिष्यवृत्तीच्या रकमे बाबत व परिक्षा शुल्क न भरल्याबद्दल तक्रार दिली होती. या नंतर याबद्दल प्रसिद्धी पत्रक देऊन महाविद्यालयाने यास वरिष्ठ लिपिक जबाबदार असून संस्थाचालकांचा यात कसलाही दोष नसल्याचे कळवले, तसेच वरिष्ठ लिपिकांनी विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रकरण चिघळले असून या सर्व प्रकाराबद्दल संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याची व विद्यार्थ्यांवर दडपण आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.

भारत विजयी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टि ट्वेन्टी सामन्यात भारताने डकवर्थ नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखुन दणदणीत पराभव केला.

ऑस्ट्रेलिया - 118/8 (18.4)

भारत - 49/1 (5.3)

राजधानी दिल्लीत रंगतोय छत्रपती शिवराय महोत्सव!

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाची ओळख करुन देणारा एक अनोखा महोत्सव राजधानी दिल्लीत उद्यापासून (रविवार) सुरु होत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवरायांच्या जीवनातले प्रेरणादायी प्रसंग चित्राद्वारे उभे करण्यात आले आहेत.एकूण 120 हून अधिक भव्य तैलचित्रं या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 8 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात दिल्लीकरांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे. छत्रपती शिवराय महोत्सवाच्या निमित्तानं इंदिरा गांधी राष्ट्रीय कलाकेंद्राचं अवघं वातावरण शिवमय झालं आहे.केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेला भव्य पुतळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी जो पुतळा निवडण्यात आलाआहे, त्याच पुतळ्याची ही हुबेहूब प्रतिकृती आहे.श्रीकांत आणि गौतम चौगुले या पितापुत्रांनी साकारलेली तैलचित्रं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. चित्रांसोबतच महाराष्ट्राच्या विविध लोककलाही इथे सादर केल्या जाणार आहेत. शिवाय मराठी खाद्य संस्कृतीचा अनुभवही दिल्लीकरांना घेता येणार आहे. आमची दिल्ली प्रतिष्ठाननं या अनोख्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे.

लोणी बु. ग्रा पं साठी सर्वाधिक ९०.७०% तर सर्वात कमी मुदगल ग्रा पं साठी ८०.२९% मतदान

कार्तिक पाटील

पाथरी:- तालुक्यातील दुस-या टप्यातील ७ ग्रामपंचायतीं साठी शनीवार ७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडली त्यात सर्वाधिक मतदान लोणी बु. ग्रामपंचायती साठी झाले असून येथील मतदानाची टक्केवारी ९०% वर गेली तर सर्वात कमी मतदान मुदगल ग्रामपंचायती साठी झाले असल्याची माहिती तहसील प्रशासना कडून प्राप्त झाली आहे.
शनीवारी ता.७ ऑगष्ट रोजी दुस-या टप्यातील सात ग्रामपंचायती साठी चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रीया पार पडली. या सात गावात एकून ९९५४ मतदार असून त्यात ५१३१ पुरूष तर ४८२३ स्री मतदारांचा सामावेश असून या पैकी तब्बल ८७०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात ४५६९ पुरूष तर ४१३२ स्री मतदारांचा सामावेश असून मतदानाची ही टक्केवारी ८७.४१ एवढी आहे. त्यात खेडूळा येथील १३४३ मतदारां पैकी ११६४ मतदारांनी मतदान केले येथील मतदानाची टक्केवारी ही ८६.६७% एवढी असून ढालेगाव ७१३ मतदाता असून या पैकी ६२३ मतदारांनी मतदान केले येथील मतदानाची टक्केवारी ८७.३८% एवढी आहे . लोणी बु. येथे २१९३ मतदार असून या पैकी तब्बल १९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथील टक्केवारी ही सर्वाधिक ९०.७०% एवढी आहे. तर मुदगल ग्रामपंचायत साठी एकून १५९३ मतदार असून त्या पैकी १२७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ही टक्केवारी ८०.२९% एवढी आहे. गोपेगाव येथे १०४३ एवढे मतदार असून त्या पैकी ही ९२८ मतदात्यांनी मतदानाचा अधिकार बजावला ही टक्केवारी ८८.९७% एवढी आहे. जवळाझुटा ११७३ मतदार असून त्या पैकी १०२७ मतदारांनी मतदान केले ही टक्केवारी ८७.५५ % एवढी असून वडी येथे १८९६ मतदार असून त्या पैकी १६९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथील टक्केवारी ८९.१९ एवढी आहे. या वेळी मतदानाचा वाढलेला टक्का हा नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो ते सोमवारी ९ ऑगष्ट रोजी लागणा-या निकाला वरून समजणार आहे. प्रस्थापित ही निवडणूक जिंकतात की जनतेने नवख्यांना स्विकारले ते पाहाणे रंजक ठरणार असून सरपंच निवडण्याची संधी सदस्यां एैवजी थेट मतदारांना मिळाल्याने सरपंच कोण हे सोमवारी सकाळी तासाभरात पाहाता येणार आहे.

‘त्यांच्या संगानं मुख्यमंत्री बदनाम होत आहेत’, उद्धव ठाकरेंची टीका.


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या राजकीय वाटचालीच्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्तानं ‘समग्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी यावरुन मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका  केली आहे.आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. सुनील तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं योग्य आहे. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.विरोधक असताना सुनील तटकरेंवर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या फडणवीस यांनी आता त्यांच्याच कार्यक्रमाला हजेरी लावणं चुकीचं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...?

पत्रकार : तुम्ही विरोधी पक्षात असताना 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला होता. त्यासंबंधी सुनील तटकरेंची चौकशी सुरु आहे. पण आता त्यांच्याच पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हे तुम्हाला योग्य वाटतं का...?

उद्धव ठाकरे :  ‘हे पुस्तक मला माहित नाही. कारण ते माझ्या पर्यंत आलेलं नाही. पारदर्शक असेल असं वाटतं. म्हणजे वर पासून खाल पर्यंत डायरेक्ट टेबलच दिसेल. पुस्तक दिसेल की नाही मला कल्पना नाही. पण आपण त्यांच्यावर काही शिंपडलं म्हणजे ते पवित्र होतात असा जर कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. त्यांच्या संगानं आपण बदनाम होतो आहोत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही आरोप कशासाठी केले होते? असं करा उद्याच्या भाषणात असं सांगा की, आम्ही केलेले आरोप खोटे होते. आम्हाला माफ करा.

’दरम्यान, सुनील तटकरे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा 9 ऑक्टोबरला मुंबईत होणार असून याला अनेक बडे नेते हजेरी लावणार आहेत. मात्र, आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांना अटक.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

मंत्रालया समोर अचानक आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अटक करण्यात आलीय.महागाई आणि पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय. जन-सामान्यांच्या रोषासाठी आंदोलन करताना सुप्रिया सुळेंना अटक करण्यात आलीय. मंत्रालयासमोर अचानक आंदोलन पुकारल्याने पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना अटक केली आहे.

लोकसभेला दानवेंच्या विरोधात शिवसेना राज्यमंत्री खोतकरांना उतरवणार? सरकारनामा ब्युरो


शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

शिवसेनेतर्फे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. प्राथमिक पाहणीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

पुणे : शिवसेनेतर्फे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. प्राथमिक पाहणीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीच्या आणि मताच्या अंकगणितात रावसाहेब दानवे अतिशय पारंगत आहेत. 'बूथ मॅनेजमेंट'मध्ये त्यांचा हातखंडा आहे. राजकीय डावपेचात पारंगत असलेले रावसाहेब निवडणुकीच्या काळात
'दाखवतात एक, बोलतात दुसरे आणि करतात तिसरेच' असे त्यांचे विरोधक म्हणतात. आपल्या डावपेचांचा आणि आपण नेमकी कोणती चाल खेळणार याचा अंदाज रावसाहेब विरोधकांना अखेरपर्यंत येऊ देत नाहीत त्यामुळे विरोधकांनी रावसाहेबांचे नाव 'चकवा' असेही ठेवले आहे. अशा उद्योगी रावसाहेबांना कोण 'चॅलेंज' देऊ शकतो यावर शिवसेनेत बरेच विचारमंथन झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांचे नाव पुढे येत आहे.

भाजपने लोकसभेला स्वबळावर लढायचे जवळपास निश्‍चित केले असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवसेनेतर्फे मराठवाड्यात जालना, लातूर, बीड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात कोणाला उतरावयाचे याची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा मतदारसंघ म्हणून शिवसेनेला हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्यासारखा तगडा मोहरा शिवसेनेच्या विचाराधीन आहे. अर्जुन खोतकर हे 1990, 1995, 2004 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

राज्याच्या लोह उद्योगाची राजधानी म्हणून जालना परिसराची ओळख नावारुपाला येत आहे. जालन्याचे आमदार म्हणून त्यांचे उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी जवळून संबंध आलेले आहेत. आम आदमी पक्षाच्या प्रवक्‍त्या प्रिती शर्मा मेनन यांनी जालना उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटपावरून खोतकरांविरुद्ध आरोपांचा धुरळा उठवला होता. अर्जुन खोतकर यांच्या कन्येचा अॅम्बी व्हॅलीत मोठ्या थाटामाटात पार पडलेला साखरपुड्याचा सोहळा बऱ्यापैकी गाजला होता. अर्जुन खोतकर यांचे जालना जिल्ह्यात काम आहे. दुष्काळाच्या वेळी त्यांनी हाती घेतलेले जलसंधारणाचे उपक्रम गाजले होते.

जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पैठणमध्ये त्यांचे सासर आहे. पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि खोतकर यांची मैत्री जुनी आहे. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना देखील खोतकरांना लोकसभेच्या रिंगणात पाहण्याची मनोमन इच्छा आहे. खोतकर लोकसभेकडे वळले तर गोरंट्याल यांच्यासाठी जालना विधानसभा मतदारसंघ थोडा सोपा होईल अशी गणिते जुळविली जात आहेत. मात्र अर्जुन खोतकर हे स्वतः लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे समजते. खोतकरांना राज्यातच मंत्री म्हणून राहायची इच्छा आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे कशी व्यूहरचना केली जाते हे भविष्यात कळेलच.