तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 14 October 2017

सहावीतल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

कालपासून बेपत्ता असलेल्या यवतमाळ शहराच्या सुरजनगर भागात राहणाऱ्या 13 वर्षीय अभिषेक दीपक टेकाम या मुलाचा आज मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळ शहरातील सूरज नगर  परिसरातील सागवान जंगल परिसरात एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळला आहे.अभिषेकची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सहावी इयत्तेत शिकणारा अभिषेक टेकाम हा कालपासून घरुन बेपता होता. शिकवणीला गेला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या पालकांची चिंता वाढली.पालकांनी शिकवणी परिसरात मित्र, नातेवाईकांकडे विचारपूस केली आणि सर्वत्र शोधाशोध केली. मात्र अभिषेकचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर  त्याचे वडील दीपक टेकाम यांनी यवतमाळच्या वडगावरोड पोलिसात अपहरण बाबत तक्रार दाखल केली.आज दुपारी शहरातील सुरज नगरातील निर्जन असलेल्या सागवान जंगल परिसरात पोलिसांना एका लहान मुलांचामृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, तो मृतदेह अभिषेकचा असल्याचे निष्पन्न झाले.अभिषेक तिथे कसा आला, त्याची हत्या का व कोणी केली , हे प्रश्न अनुत्तरित आहेत. घटनास्थळी पोलिसांना व्यसनासाठी वापरले जाणारे थिनरसारख्या काही गोष्टी आढळून आल्या असून पोलिसांनी या सर्व दिशेने तपास सुरु केला आहे.

मुंबईतील चर्नी रोड स्टेशन जवळील पुलाचा काही भाग कोसळला!

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

चर्नीरोड स्टेशन जवळील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. यात दोन जण जखमी झाले आहेत.विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात याच पुलासाठी आंदोलन झालं होतं.चर्नीरोड स्टेशनजवळील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. हा पूल एका बाजूने झुकल्याचंही समजतं आहे. हा पूल धोकादायक अवस्थेतच होता. त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरु करण्यासाठी तोडकामही सुरु करण्यात आलं आहे. हे काम सुरु असतानाच या पुलाचा काही भाग कोसळला. रेल्वेच्या काही एचटी केबल्स गेल्यामुळे सात ते आठ दिवस काम थांबलेलं होतं.या पुलाबाबत वारंवार स्थानिकांनी तक्रारी दिल्या महापालिकेला सोमवारी पथनाट्याच्या माध्यमातून महापालिका अधिकाऱ्यांना ‘गेट वर्क सून’ आंदोलन केले होते.

पंतप्रधान मोदींकडून विद्यापीठांना दिवाळी गिफ्ट!

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाटणा विद्यापीठाच्या शतक महोत्सावात कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी जगातल्या टॉप 500 विद्यापीठांच्या यादीत देशातील कोणत्याही विद्यापीठाचं नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच हे चित्र बदलण्यासाठी देशातील निवडक 20 विद्यापीठांसाठी 10 हजार कोटी देण्याची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने त्रयस्थ संस्थेद्वारे निकष पडताळणी करुन, समोर आलेल्या देशातल्या टॉप 20 विद्यापीठांना सरकारी बंधनातून मुक्तता करेल. तसेच त्या विद्यापीठांना आगामी पाच वर्षात वर्ल्ड क्लास विद्यापीठ बनवण्यासाठी 10 हजाराचे आर्थिक सहाय्यही देईल. यात खासगी 10 आणि सरकारी 10 विद्यापीठांचा समावेश असेल.”पंतप्रधानांनी यावेळी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीचाही आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, “केंद्रीय विद्यापीठ हा भूतकाळ होता. मी त्याऐवजी भविष्याचा विचार करत आहे. आणि त्याचच निमंत्रण देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित आहे.”मोदी पुढे म्हणाले की, “आपल्या देशात शिक्षण क्षेत्राचा विकास कासव गतीनेहोत आहे. तसेच आपल्या शिक्षण पद्धतीतही अनेक मतभेद आहेत. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रातील विशेष करुन उच्च शिक्षणातील बदलांमध्ये आपलं सरकार कुचकामी ठरत आहेत.”शिक्षण विभागातील बदलां सदर्भात केंद्र सरकारच्या पुढाकरांबद्दल माहिती देताना मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच आयआयएम सारख्या संस्थांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करुन प्रोफेशनल पद्धतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. पाटणा विद्यापीठालाही अशाच प्रकारे स्वायत्त काम करण्यासाठी त्याबाबतचं निमंत्रण देण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. केंद्र सरकारने देशातील विद्यापीठांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे.”पंतप्रधान पुढे म्हणाले की, “ज्या भूमीवर नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला सारखी 1300 ते 1700 वर्षजुनी विद्यापीठे आहेत. आणि ही साऱ्याजगाला आकर्षित करत आहेत. तरीही जगातल्या टॉप 500 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आपल्यालाही ओळख पुसली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार एकूण 20 निवडक विद्यापीठांना वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देईल.”या विद्यापीठांच्या निवडी बद्दल सांगताना मोदी पुढं म्हणाले की, “या विद्यापीठांची निवड कोणत्याही राजकीय नेत्याच्या, किंवा पंतप्रधानांच्या इच्छेप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्राद्वारे होणार नाही. तर एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून विद्यापीठाच्या निकषाची पडताळणी करुनच, टॉप 10 सरकारी विद्यापीठ आणि टॉप 10 खासगी विद्यापीठांची निवड होईल.”पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “पटना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यापेक्षा, त्याची क्षमता मोठी आहे. पटना विद्यापीठाकडे ही सर्वात मोठी संधी आहे. या संधीचं पाटना विद्यापीठाने सोनं केलं पाहिजे. आणि याचंच निमंत्रण देण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे.”

एल. आर .के. इंग्लिश स्कुल, सोनपेठ येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल कै. राजाभाऊ कदम विद्यालयात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष हशिप्रमं च्या उपाध्यक्षा ज्योती कदम तर प्रमुख पाहूणे प्रा. विठ्ठल जायभाये हे होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ कलाम यांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. ज्योती कदम, प्रमुख पाहुणे प्रा. विठ्ठल जयभाये, व मुख्याध्यापक श्री. दत्ता नरहारे यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तीपत्रक तयार करण्यासाठी विनोद पारेकर यांनी विशेष परिश्रम घेतले असून , कार्यक्रमाचे सूत्र संचालन दयानंद स्वामी यांनी केले व श्री नाइकोडे सरांनी आपले मनोगत व्यक्त करत वाचनाच्या आवडीसाठी विद्यार्थ्यांना ऑडीओ क्लिप ऐकवून वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.एल. आर. तसेच विद्यार्थी शिक्षकांनी घेतला प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले तसेच वाचनाचे महत्त्वही सांगितले. अध्यक्षिय सौ. ज्योती कदम मॅडम , प्राध्यापक श्री विठ्ठल जायभाये, मुख्याध्यापक श्री नरहारे व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी परिपाठच्या वेळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करण्याचा व  बचत केलेल्या पैशातून नवीन पुस्तके विकत घेऊन वाचन करण्याचा व एकतरी झाड लावून जन्मदिवस साजरा करण्याचा संकल्प घेतला. या निमित्त कृष्णा आरबाड, सोनाली बागवले, भोसले मॅडम आदींनी मराठी, इंग्लिश, व हिन्दी या विषयाचे वाचन केले . तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

गौरी लंकेश हत्या प्रकरणी तीन आरोपींचं स्केच पोलिसांनी केले जारी.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तीन आरोपींचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. एसआयटीकडून अडीचशे संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींचं स्केच जारी करण्याता आल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्ररणी पोलिसांनी आता पर्यंत 200 ते 250 जणांची चौकशी केल्याची माहिती एसआयचीनं दिली आहे.तसेच या हत्येप्रकरणी आता पर्यंतच्या तपासात सनातन किंवादुसऱ्या कोणत्याही संस्थेचा उल्लेख नसल्याचे एसआयटीनं स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या व्हिडीओच्या सहाय्याने ही रेखाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. गौरी लंकेश यांच्या मृत्यूपूर्वी सात दिवस तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत यासाठी घेण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान गौरी यांची हत्या करण्यातआली होती.

आ.राहूल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाभिषेक


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
शनिवार : सोनपेठ येथिल युवासेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे या करिता तिर्थक्षेत्र नैकोटा येथे महाअभिषेक  करण्यात आला.
परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक करण्यात आला. हा कार्यक्रम  युवासेनेेचे शहरप्रमुख आनंदभाऊ गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली व उखळी शाखा प्रमुख संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांना सुख, शांती, समृध्दी, व मनोकामना पूर्ण होवो व उदंड आयुष्य लाभो करता नैकोटा येथील, दत्तमंदिर येथे महाभिषेक करण्यात आला प्रसंगी राहूल जाधव ऊखळीकर, बागूल शेख नैकोटा व करमचे मिञ सूनिल गूरव व अन्य शिवसैनिक,राजेश हजारे, शाखा प्रमुख भैया रेवले ,बालाजी पुकाने युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गढी येथील कला महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. १४ __ जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजीनगर गढी येथील कला व विज्ञान महाविद्यालयास नॅक समितीने भेट दिली.
        दि. 13 व 14 आॅक्टोबर असे दोन दिवस या समितीने महाविद्यालयाची तपासणी केली. या नॅक पिअर टीमचे अध्यक्ष प्रोफेसर मोहम्मद इक्बाल अली ( कुलगुरू, सतवाहना विद्यापीठ,
तेलंगना ) समन्वयक डॉ. के.टी. वर्की कोईंबतूर, केरळ तर सदस्य म्हणून बिहारचे डॉ. डी.एन. मिश्रा यांची उपस्थिती होती. या समितीस सामोरे जात असतांना संस्थेच्या वतीने अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांनी मोलाची भुमिका निभावली.
     यावेळी प्राचार्य डॉ. कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थींनी योगदान दिले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

औषध प्रशान करीत शेतकऱ्यांची आत्महात्या नापिकीला कंटाळून उचले पाऊल

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील नापिकी सह.कर्ज बाजारी मुळे होण्याऱ्या शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महात्याचे प्रमाण कमी होण्याचे नाव न घेता हे संत्र सुरू आहे. आशीच काहीशी घटना तालुक्यातील पुयणी येथे एका युवकांनी औषध प्रशासन करीत आपले जिवन संपविल्याची घटना दिनांक 13 आँक्टोबर रोजी घडली आहे. तालुक्यातील पुयणी येथे माधव शंकरराव गिणगिणे यांच्या शेतातील सत्ताच्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतातील कापुस या पिकावर फवारणीसाठी घरी आणलेले किटकनाशक माधव शंकरराव गिणगिणे वय 25 यांनी सकाळी 9.30 च्या सुमारास आपल्या राहत्या घरी प्रशासन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मुत्यु झाल्याची दुःखात घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

ह्रदयविकाराच्या झटक्याने टाक यांचे निधन

अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील पुयणी येथील ग्रामपंचायत सेवक म्हणून कार्यरत असलेले मुरलीधर भगवान टाक वय 65 वर्ष यांना ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली, एक मुलगा, एक भाऊ आसा परिवार आहे. या घटने मुळे गावात हाळहाळ व्यक्त होत आहे.

दिपावली काळात भारनियमन बंद करा-मनविसे


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील भारनियमनाच्या विरोधात विविध संघटनांनी निवेदन दिले असून ऐन दिवाळीच्या व परिक्षांच्या तोंडावर हे भारनियमन होत असल्याने नागरिकांमध्ये तिव्र नाराजी आहे. हे भार नियमन रद्द करण्याची मागणी मनविसे तालुका शाखा सोनपेठ यांच्यावतीने मुन्ना बिराजदार व कार्यकर्त्यांनी केले आहे.
दिव्याचे ( लाईटचे ) अनन्यसाधारण महत्व असलेल्या दिपावलीची धामधुम सध्या सुरू आहे. याकाळात महावितरणच्या वतीने भारनियमन घेऊ नये यासंबंधिचे एक निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाविरण सोनपेठ यांना देण्यात आले. निवेदना द्वारे  सर्वच बालके, प्रौढ व स्त्रीयांसह व्यापारी वर्गासाठी दिपावलीचा काळ किती महत्वाचा आहे याकडे लक्ष वेधत या सर्वांच्या आनंदावर महावितरण भारनियमन करून विरझन टाकत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
यामुळे दिपावली काळात सोनपेठ व परीसरात भारनियमन न करण्याची मागणी मनविसे वतीने केली असुन सदरील बाबीकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार, मनसे तालुकाध्यक्ष नंदकुमार रोडे, शहराध्यक्ष संदिप कांबळे, रामा देशपांडे, प्रकाश सरांडे, गजानन देशपांडे, चंद्रकांत कौले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तरुणांनो, मी तुमच्या पाठीशी आहे : शरद पवार

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा प्रश्न फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी दिले.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात सरकारविरोधी लिखाणाच्या आक्षेपावरुन ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. त्या तरुणांनी आज मुंबईत शरद पवारांची  भेट घेऊन चर्चा केली.पक्षीय दृष्टिकोनातून नाही पणअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहु . यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात जी व्यक्ती सध्या ओएसडी म्हणून कार्यरत आहे, ती व्यक्ती अशा प्रकारांना कारणीभूत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात काय चालतं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.“सोशल मीडियावर लिहिणारे 70 च्या आसपास तरुण महाराष्ट्रभरातून येऊन आज मलाभेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसतनाहीत. पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार व सेक्युलरिझम या गोष्टींबाबत त्यांची भूमिका आग्रही आहे. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर आपली मतं ते व्यक्त करतात. परंतु या तरुणांना धमकावण्याचा प्रकार त्यांच्या भागांमध्ये स्थानिक पोलिसांकडून होत आहेत. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू. या तरुणांच्या विरोधात नोटिसा व खटले भरले जात आहेत. त्यासंबंधी कायदेशीर सल्लागारां मार्फत सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत.

मोबाईल पेक्षा जास्त पुस्तकाशी मैत्री करा - रानबा गायकवाड


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथिल ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने डाँ.ए.पि.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्त आयोजित तृतिय वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हनुण संपादक तथा नाटककार रानबा गायकवाड,विशेष अतिथी म्हणून बार्टिचे दि.फ.लोंढे,कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण,प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक माणीकअप्पा निलंगे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.अंजलीताई सोनाळे व ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर हे होते.
या कार्यक्रमात प्रथम ग्रंथ पुजन व प्रतिमा पुजन करण्यात आले, स्वागत गित कु.पुजा झाड व कु.पुजा गावडे यांनी सादर केले. सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतिने शाल,पुष्प व ग्रामगिता ग्रंथ देउन करन्यात आला,प्रास्तविक ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी केले, मनोगत सहशिक्षक गादेकर, मुख्याध्यापक डी.के.पवार यांनी व्यक्त केले,दि.फ.लोंढे मार्गदर्शनात वाचनावर भर द्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास वाचन करुन अभ्यास करत असत त्यामुळे जागतीक स्तरावरील विद्वान बनले. वाचनाने पिढी घडते, बिघडत नाही असे सांगुन एक प्रेरणादाई कवितेचे सादरीकरण केले. प्रमुख मार्गदर्शक रानबा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी सोशिअल मिडियाचा वापर योग्य करुन शक्य तेवढे मोबाईल पेक्षा जास्त पुस्तकाशी मैत्री करावी, असा मोलाचा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप शौकत पठाण यांनी केला,
या प्रसंगी ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयासह अनेक जिल्हा परिषद शाळेस व संस्थेस ग्रंथदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  प्रा.डाँ.मुकुंदराज पाटिल यांचा त्यांनी आपला वाढदिवस शालेय साहित्य गरजवंत विध्यार्थ्यांना देऊन साजरा केला, त्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन व आभार महालिंग मेहत्रे यांनी केले. यावेळी सहशिक्षक स्वामी ,श्रीहरी धुमाळ ,मदन साठे,सहशिक्षिका गोरे, देशपांडे ,शेख, नाईक, अंकुश रसाळ, विकास वाघमारे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतीची निवड

कार्तिक पाटील

पाथरी:- येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त असलेल्या उप सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात ठेवण्यात आला आहे.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कोल्हे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्या नंतर तो बहूमताने पारीत झाला होता .तेव्हा पासून हे पद रिक्त आहे. या विषयी११ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवडूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सह.संस्था परभणी यांनी पत्र काढून सेलू येथील सहायक निबंधक सहकारी संस्था यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून १७ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात ठेवण्या आली आहे.या निवडी साठी उपसभापती पदा साठी दुपारी १ ते १.३० वाजे पर्यंत पिठासन अधिकारी यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.१.३० ते २.०० वाजे पर्यंत प्राप्त अर्जाची छाननी होणार आहे.तर अर्ज मागे घेण्या करीता २ते २.३० हा कालावधी असनार आहे. यानंतर आवशकता असल्यास २.३० ते ३ या वेळेत मतदान होऊन लगेच मतमोजनी होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे पुर्ण वर्चस्व असून या पंचवार्षीक मध्ये तिस-यांदा ते कोणाला मिळते हे पाहाणे औत्सूक्याचे असनार आहे. आठरा पैकी तेरा संचालक हे सत्ताधारी राकाँ कडे आहेत.

Friday, 13 October 2017

काश्मीरच्या पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा मध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. वसीम शाह आणि निसार अशी या दहशतवाद्यांची नावं असल्याचं कळतंय.सैन्याला हे दोघे दहशतवादी लिटर परिसरात लपल्याचं कळालं होतं. त्यानंतर सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कंठस्नान घालण्यात आलेले दोघेही दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. टॉप 12 वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये वसीमचा समावेश होता. सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेनं गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दोन्ही दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. यावर्षी आतापर्यंत 171 दहशतवादी सैन्याकडून मारले गेले आहेत.