तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 21 October 2017

नांगरे-पाटील, अक्षय कुमारची शहीदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

खरंतर पोलिस 24X7 व्यस्त असतात, दिवाळीच्या सणात तर चोख बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी त्यंच्या खांद्यावर असते. मात्र यातून वेळ काढून पोलिसांनी शहीदांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्यात आली. ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत त्या 103 शहीदांची यादी तयार करुन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली.ही गोष्ट बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला समजल्यावर त्यानेही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. शहीदांच्या कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा चेक आणि एक शुभेच्छा पत्र पाठवलं.जेव्हा हे पोलिस या शहीदांच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

अक्षय कुमारचं पत्र -

“आपल्या घरातील शूर शहीद वीराने देशासाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्चआहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सानिध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळललें दु:ख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती.

- अक्षय कुमार

चलनातील 2000, 500 रुपयांची नोट खरी आहे की खोटी, असं जाणून घ्या!


_________________________

नंंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

पंतप्रधान मोदींनी देशात 1000, 500 रुपयांच्या नोटांबंदी जाहीर केल्यानंतर चलनात नव्या नोटा आल्यात. यात 2000 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दरम्यान, 2000 रुपयाची नोट चलनात आल्यानंतर काही दिवसातच बनावट नोटा पकडण्यात आल्यात. त्यामुळे नक्कल करता येणार नाही, हा दावा फोल ठरला. आता तुमच्याकडे बनावट नोट असेल तर, ती कशी ओळखणार? नोटाबंदीनंतर चलनात 500 आणि 2000 च्या बनावट नोटा आल्या तर कशा ओळखायच्या याबाबत अनेक प्रश्न निर्माण विचारण्यात येत होते. कारण गेल्या काही दिवसात 500 आणि 2000 च्या नकली नोटा सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळे तुमच्या जवळ असलेली नोट खरी आहे की खोटी, हे आता तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून जाणून घेऊ शकता. रिझर्व्ह बँकने बनावट की खरी नोट ओळखण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु केलेय. यावर तुम्ही 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत नोटा ओळखता येऊ शकतात. 'पैसा बोलता है', असे या पोर्टलचे नाव आहे. यावर तुम्हाला प्रत्येक नोटेच्या सिक्युरिटी फीचर्स बाबत माहिती तात्काळ उपलब्ध होईल.

तुम्ही येथे भेट द्या!

बनावट नोट ओळखण्यासाठी paisaboltahai.rbi.org.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला  Know your banknotes हा पर्याय दिसेल. यावरक्लिक करा किंवा होम पेजवरच तुम्हाला चलनातील मुख्य नोटा दिसतील. तुम्हाला जर 2000 ची नोट खरी आहे का ओळखायची असेल तर होम पेजवरील 2000 च्या नोटेवर क्लिक करा. त्यानंतर रिझर्व्ह बँक तुम्हाला नोटांवर असलेल्या 12 ते 18 सिक्युरिटी फीचर्सची माहिती देईल. तुम्ही सहज ही माहिती लक्षात ठेऊ शकता. नोटा खऱ्या आहेत की खोट्या यांच्यातील फरक जाणून घेण्यासोबतच तुम्हाला या पोर्टलवर नोटांसंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं FAQ सेक्शन मध्ये पाहायला मिळतील.

सिनेअभिनेते अंकुश चौधरी कडुन आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 21 __ आण्णासाहेब विष्णुपंत घाडगे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियास सिनेअभिनेते अंकुश चौधरी यांनी वीस हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला.
         गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील 55 वर्षिय आण्णासाहेब विष्णुपंत घाडगे या शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळुन मागे आत्महत्या केली होती. या कुटुंबाला दिवाळी निमित्त काही मदत म्हणून पंचायत समिती सदस्या पुजा मोरे व गौरव पवार यांनी सुचक पाठपुरावा केला होता. दरम्यान सिने अभिनेते अंकुश चौधरी यांच्या वतिने 20,000 रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश देऊन माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान शेतकरी आण्णासाहेब विष्णुपंत घाडगे यांचा मुलगा गोवर्धन घाडगे, पत्नी सिताबाई घाडगे यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. येणाऱ्या काळातही शिक्षणासाठी गोवर्धन यांना मदत करण्याचे आश्वासनही दिले.
      यावेळी गेवराई पंचायत समिती सदस्या पुजा मोरे, गौरव पवार, शरद पवार, आभिजीत कुलकर्णी, गोपाल चव्हाण देवराज कोळे, अशोक मोरे तसेच गावातील पांडुरंग मुळे, बंडु शेंडगे, अशोक शेंडगे, आश्रुबा मैंद, हरिदास पवळ, नारायन धुमाळ, अशोक घाडगे, गोवर्धन घाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

जन्मभूमी फाऊंडेशनचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी

पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने निवासी, अनिवासी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि शेतकरी यांचा स्नेहमिलन मेळावा येथिल पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जन्मभूमी फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य रामदास ढगे हे होते तर प्रमुख उपस्थितीत कोहीनुर कन्स्ट्रक्शनचे गुशरखान मामा ,डॉ राम शिंदे, नितिन चिलवंत, अजय थोरे, विनोद मगर, नंदू नाईक आबासाहेब आमले अभियंते अनिल शेळके, वसंत महीपाल, अर्जून झुटे खय्युम लाला , ठाणे येथे आरटीओ म्हणून कार्यरत असलेले गणेश विघ्ने, आणि पुणे येथे कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेल्या अनुसया विघ्ने ही बहीन भावाची जोडी यांची उपस्थिती होती.या वेळी जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने गेली वर्षभर राबवलेल्या कार्यक्रमांची माहीती उपस्थित अनिवासी मान्यवरांना अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी प्रास्ताविकातून दिली. तर पुढील राबवण्यात येणा-या उपक्रमा विषयीची माहिती या वेळी दिली त्याच बरोबर शेतकरी हित जोपासण्या साठी प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून कामकरत जन्मभूमी फाऊंडेशन कडून शेतकरी प्रशिक्षणा साठी काम करत राहाण्याचा निर्धार व्यक्त करून या साठी सर्वांनी मदत करण्याचे आवहन केले. या वेळे विघ्ने बंधू भगिनींनी आई इंदूमती विघ्ने यांनी जन्मभूमी फाऊंडेशनला दिलेला पाचहजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिलाया वेळी सर्व अनिवासी मान्यवर प्रमुख पाहून्यांनी मनोगतातून मदत करण्याचे जाहीर केले या वेळी नव्यानेच एमडी झालेले डॉ राम शिंदे यांचा जन्मभूमी फाऊंडेशन च्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र संचलन गजानन घुंबरे यांनी केले तर आभार जन्मभूमी फाऊंडेशन चे सचिव किरण घुंबरे यांनी मानले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी सदस्य शरदराव उगले, प्रा गोपाल होगे, विकास वाहेळ, धनंजय आडसकर, भागवत वाघमारे जे डी जाधव, नितिन इंगळे, सुरेश इंगळे, सुभाष वाघमारे लक्षमण उगले यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.

जन्मभूमी फाऊंडेशनचा स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी

पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने निवासी, अनिवासी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि शेतकरी यांचा स्नेहमिलन मेळावा येथिल पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जन्मभूमी फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य रामदास ढगे हे होते तर प्रमुख उपस्थितीत कोहीनुर कन्स्ट्रक्शनचे गुशरखान मामा ,डॉ राम शिंदे, नितिन चिलवंत, अजय थोरे, विनोद मगर, नंदू नाईक आबासाहेब आमले अभियंते अनिल शेळके, वसंत महीपाल, अर्जून झुटे खय्युम लाला , ठाणे येथे आरटीओ म्हणून कार्यरत असलेले गणेश विघ्ने, आणि पुणे येथे कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेल्या अनुसया विघ्ने ही बहीन भावाची जोडी यांची उपस्थिती होती.या वेळी जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतिने गेली वर्षभर राबवलेल्या कार्यक्रमांची माहीती उपस्थित अनिवासी मान्यवरांना अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी प्रास्ताविकातून दिली. तर पुढील राबवण्यात येणा-या उपक्रमा विषयीची माहिती या वेळी दिली त्याच बरोबर शेतकरी हित जोपासण्या साठी प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून कामकरत जन्मभूमी फाऊंडेशन कडून शेतकरी प्रशिक्षणा साठी काम करत राहाण्याचा निर्धार व्यक्त करून या साठी सर्वांनी मदत करण्याचे आवहन केले. या वेळे विघ्ने बंधू भगिनींनी आई इंदूमती विघ्ने यांनी जन्मभूमी फाऊंडेशनला दिलेला पाचहजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिलाया वेळी सर्व अनिवासी मान्यवर प्रमुख पाहून्यांनी मनोगतातून मदत करण्याचे जाहीर केले या वेळी नव्यानेच एमडी झालेले डॉ राम शिंदे यांचा जन्मभूमी फाऊंडेशन च्या वतिने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्र संचलन गजानन घुंबरे यांनी केले तर आभार जन्मभूमी फाऊंडेशन चे सचिव किरण घुंबरे यांनी मानले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी सदस्य शरदराव उगले, प्रा गोपाल होगे, विकास वाहेळ, धनंजय आडसकर, भागवत वाघमारे जे डी जाधव, नितिन इंगळे, सुरेश इंगळे, सुभाष वाघमारे लक्षमण उगले यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर,तात्काळ कामावर रुजू व्हा : हायकोर्ट

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे. संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावं, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. उच्चस्तरीय समितीने 15 नोव्हेंबर पर्यंत प्राथमिक अहवाल सादर करावं, असा आदेशही मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तर अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 21 डिसेंबरची मुदत कोर्टाकडून देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. चार दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आगारात थांबून आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

अखेर संप मिटला एसटी 4दिवसानंतर रस्त्यावर मुंबई -  सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत

पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठ रवून संप मागे घेण्याचे दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चार दिवसांच्या खंडानंतर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आज सकाळपासून रस्त्यावर धावू लागतील. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. मध्य रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.  एसटी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असून, त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. एसटीचा संप जनतेशी निगडित असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी अद्याप समिती का नेमली नाही? असा सवाल न्या. संदीप शिंदे यांनी यावेळी सरकारला केला. त्यावर सरकारने तत्काळ चार सदस्यीय समिती नेमण्याची तयारी दर्शवली. मात्र यास कामगार संघटना तयार नव्हत्या. सरकारने अंतरिम वेतनवाढ द्यावी. तसे आश्वासन सरकारने दिल्यास संप मागे घेऊ, अशी भूमिका संघटनेने उच्च न्यायालयात घेतली. मात्र सरकारने त्यांची अट मान्य करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयानं उच्चस्तरीय कमिटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कमिटीने 15 नोव्हेंबरपर्यंत एसटी कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेण्याचंही न्यायालयानं सूचवले आहे. जनतेशी निगडित असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी अद्याप समिती का नेमली नाही? असा सवाल न्या. संदीप शिंदे यांनी यावेळी सरकारला केला. त्यावर सरकारने तत्काळ चार सदस्यीय समिती नेमण्याची तयारी दर्शवली. मात्र यास कामगार संघटना तयार नव्हत्या. सरकारने अंतरिम वेतनवाढ द्यावी. तसे आश्वासन सरकारने दिल्यास संप मागे घेऊ, अशी भूमिका संघटनेने उच्च न्यायालयात घेतली. मात्र सरकारने त्यांची अट मान्य करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयानं उच्चस्तरीय कमिटी नेमण्याचे आदेश दिले आहेत.   एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. एसटी संपाबाबत राज्य सरकार झोपेतच असल्याचे न्यायालयानं सुनावले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दलच्या उच्चस्तरीय समितीचं काय झाले? असा सवाल न्यायालयानं विचारला. एसटी संपाचा आज चौथा दिवस आहे. या संपावर ठोस पावलं उचलली का ? अशी विचारणाही न्यायालयाने केली होती. एसटीचा संप सुरू असताना सरकारने लोकांसाठी काय पर्यायी व्यवस्था सुरू केली का ? असा सवालही कोर्टाने उपस्थित केला. सरकार काहीच करत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय,अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते.सातवा वेतन आयोग लागू करण्यासह वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला होता. मात्र सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा वारंवार निष्फळ ठरल्याने संप चार दिवस लांबला. अखेर उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला होता. तसेच संप हाताळण्यात अपयशी ठरल्याने राज्य सरकारलाही फटकारले. 

तेजन्यूज हेडलाईन्स वेब वाहिनी
अनवर पठान.प्रतिनिधी,वालूर.
मो.नं.8888375846

सेनगांवात दुषीत पाणी व भेसळयुक्त पदार्थामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे दुर्लक्ष

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:-शहरासह तालुक्यात विविध हाँटेल स्विट मार्ट किराणा दुकान आदीसह नागरीकांच्या व्यवस्थेसाठी असणा-या बहुसंख्य हाँटेल व स्विटमार्टवर पाण्याची टाकी बरेच दिवस धुतल्या जात नाही.टाकीच्या परीसरातील नळाच्या शेजारील भागात शेवाळे निर्माण होतात काही टाकीमध्ये पाणी साचुन चाटु ही होण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत.उघड्यावरील शिजवलेल्या अन्न पदार्थावर बाहेरची धुळ व माशा बसत असल्याने यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होत आहे.तसेच बहुसंख्य किराणा दुकानदार नफा मिळवाण्याच्या नादात भेसळयुक्त मालाचा वापर करीत असल्याचे ही काही नागरीकातुन बोलल्या जात आहे.बोगस दुध कंपनीची व्हिडीओ सोशल मिडीया वर दाखविला जात असल्याने विविध बोगस मालविक्रेते ही सक्रीय झाल्याने अशा बोगस विक्रेत्यावर वेळीच आळा घालुन सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्यासाठी उपाययोजन करणे गरजेचे झाले आहे.उघड्यावरील मांसविक्रीमुळे ही अनेक रोग संभावण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे.बहुसंख्य हाँटेल चालक व दुकानदार बालमजुरांना शिक्षण सोडुन त्यांच्याकडुन कामे करून घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.सेनगांव तालुक्यात अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे नेहमीच दुर्लक्ष दिसुन येत असल्याने या भागातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी या बाबीकडे वेळीच लक्ष देऊन सुध्द पाणी व उत्कृष्ट अन्न नागरीकांना उपलब्ध होईल याविषयाची गांर्भियाने दखल घेणे गरजेचे झाले आहे.सेनगांव तालुक्याच्या ठिकाणी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे कार्यालय ही स्थापन करणे काळाची गरज आहे.सेनगांव शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री जोमाने वाढली असुन याकडे ही या विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

रस्त्याच्या मागणीसाठी जामगाव पंचक्रोशीतील त्रस्त नागरिक एकवटले


    गंगापूर / प्रतिनिधी

    गंगापुर तालुक्यातील कारखाना फाटा ते नेवरगांव , गंगापुर ते नवाबपुर मार्गे बगडी रोड , गंगापुर ते रघुनाथनगर उर्वरीत तीन किलोमीटर तसेच गंगापुर - रघुनाथनगर रोड पासुन नवाबपुरहुन वाहेगांव रोड या अतिशय खराब झालेल्या  रोडच्या डांबरीकरणाचे काम जलद गतीने होण्यासाठी शुक्रवारी रात्री जवळपास पाचशे त्रस्त नागरीक स्वयंस्पुर्तीने बगडी येथे  एकत्र येऊन असा निर्णय घेण्यात आला की , वरील रस्त्याचे डांबरीकरण होण्या संदर्भातील मागणीचे निवेदन सोमवार  दि. 23 आँक्टोंबर रोजी  तहसिलदार  यांच्या मार्फत बाधकांम विभाग व सरकारकडे  देण्यात येणार  आहे . यावेळी अगरकानडगाव , ममदापुर , बगडी , नवाबपुरवाडी , जामगांव आदी ग्रामपंचायतींचे संरपच , उपसंरपच  ग्रामसभेच्या ठरावाची प्रत एकत्रीत देऊन मागणी करणार आहेत. 
     यावेळी मोठ्या संख्येने त्रस्त नागरीकांनी एकत्र येण्याचे आवाहन  संयोजन समितीने केले आहे.

ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई -

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांचीडेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात येत आहे.मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे. एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली. मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेट मधल्या रेल्वे कार्यालयात आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं होतं.

हिवरखेडा येथे श्री योगेश निरगुडे (I.A.S.)अधिकारी यांच्या हस्ते दोन डिजीटल वर्ग खोल्याचे उद् घाटन करण्यात आले


साखरा.प्रतिनिधी.शिवशंकर निरगुडे

आज दिनांक 20/10/2017 रोजी जि. प. प्रा. शा. हिवरखेडा केंद्र साखरा ता. सेनगाव  जिल्हा हिंगोली येथे दोन डिजिटल वर्ग खोल्याचे उदघाटन मा. कलेक्टर श्री. योगेश निरगुडे साहेब, मा. श्री. कैलास निरगुडे (S.T.I ) उपशिक्षणाधिकरी  मा. श्री. डी.के. इंगोले साहेब , गटशिक्षणाधिकरी पं.स.सेनगाव मा. श्री. एस.एस.जगताप साहेब, गटशिक्षणाधिकरी पं.स. हिंगोली मा.श्री. नांदे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री.एन. एन. भिसे साहेब, केंद्रप्रमुख  मा.श्री. जी. एन.पायघन सर, केंद्रीय मुख्याध्यापक मा. श्री. आर.एच.भिंगे सर, यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे  अध्यक्ष स्थान श्री योगेश निरगुडे यानी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी भूषवले.कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन श्री. उध्दव हराळ यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख पायघन सर यांनी केले. मा.श्री इंगोले साहेब यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व डिजिटल स्कूल चे महत्व विषद केले. तसेच कार्यक्रमात गावातील इतर उच्च पदावर विराजमान व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मा. इंगोले साहेब व मान्यवर मंडळी कडून जि.प.प्रा.शा हिवरखेडा शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमांचे सम्पूर्ण नियोजन व दूसरी वर्ग खोली डिजिटल करण्याचे श्रेय मा. श्री. खुडे गंगाराम हरीभाऊ कोषागार कार्यालय कळमनुरी, ऊध्दव हराळ, विलास हराळ, भारत निरगुडे,  राजू देसाई, सावता मगर, गंगारामजी  गायकवाड, शिवशंकर निरगुडे व शाळेतील सर्व शि क्षक उपस्थितित  होते  व सर्व  गावकरी .

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वहिनी
साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे मो. न.व्हट्सप.नं 8007689280