तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 28 October 2017

वालूर येथील दोन दिवसाने पेट्रोल पंप बंद असल्याने अवैध पेट्रोल विक्री करणार्याचि चांदि


अनवर पठाण.
प्रतिनिधी वालूर.
वालूर येथे मागिल दोन दिवसापासून मे.सारिश पेट्रोल पंप वर मशिनमधे बिगाड झाल्याने पेट्रोल उपलबध असताना देखिल पेट्रोल वाटप बंद असल्याने येथे अवैध पेट्रोल विक्री  करणारे हे 100 रु.लिटरने पेट्रोल विक्री चालू आहे.यामूळे वाहन धारकाना अर्थिक भूर्दंड बसत असून पेट्रोल पंपावरील बिगाडलेली मशिन लवकरात लवकर दूरूस्त करण्याची मागनी होत आहे.

तेजन्यूज हेडलाईन्स वेब वाहिनी,
प्रतिनिधी,वालूर.
मो.नं.8888375846


राम मंदिर वादाबाबत शरद पवार यांचा गौप्यस्फोट.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

राम मंदिर वादाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1990-91 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिर बाबत एक समिती बनवली होती. या समितीनं वादावर तोडगा म्हणून मंदिर आणि मशिदी मध्ये जागेचं वाटप केलं होतं. असा गौप्यस्फोट पवारांनी केला. ते मुंबईत बोलत होते.‘चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिर बाबत एक समिती बनवली होती. त्यात मी आणि भैरवसिंग शेखावत होतो. माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी होती. तर शेखावत यांना बाबरी मस्जिद कृती समितीशी चर्चा करायला सांगितलं होतं. यामध्ये असा तोडगा निघाला होता की, पूर्ण जागेचं वाटप मंदिर आणि मशिदी मध्ये करायचं 65-66% जागा मंदिरासाठी आणि उरलेली मशिदीसाठी द्यायची. पण चंद्रशेखर यांचं सरकार पडलं आणि गोष्टी थांबल्या.’ असा गौप्यस्फोट शरद पवारांनी आज केला.जर चंद्रशेखर यांचं सरकार पडलं नसतं तर 1990-91 मध्येच राम मंदिर बाबत ठोस तोडगा निघून योग्य ती कार्यवाही देखील झाली असती. असं पवार यावेळी म्हणाले.

ना.बबनराव लोणीकर यांची आपत्तीग्रस्त शेतकऱ्यास मदत


परतूर
: सेलु तालुक्यातील चिकलठाणा (खु.) येथील शेतकरी जगन्नाथ थोंबाळ यांच्या मालकीची गाय नूकतीच वीज पडून मृत्यूमुखी पडली होती. व त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर हा दुःखद व अनपेक्षित प्रसंग ओढावला होता. याविषयी विशेष लक्ष देत महाराष्ट्र राज्याचे *पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी नैसर्गिक आपत्तीची प्रशासकीय नुकसान भरपाईची मदत रू.३०,०००/- (तीस हजार) रकमेचा धनादेश (ता.२६ ऑक्टो.) रोजी श्री. जगन्नाथ थोंबाळ यांना शासकीय विश्रामगृह सेलू येथे प्रदान केला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तहसीलदार स्वरूप कंकाळ, डाॅ. प्रफुल्ल पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद थोरात - पाटील, *कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णाचे सभापती बालाजी देसाई, बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवहरी खिस्ते, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव, तालुकाध्यक्ष संजय साडेगांवकर, गुलाबराव लाटे, सुरेशराव रोडगे, सचिन मगर, मंचक जोगदंड, गणेश घुमरे, अभिजीत रोडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री. गुलाबराव लाटे व श्री. अरविंद थोरात - पाटील यांनी आपत्तीग्रस्त शेतकरी.जगन्नाथ थोंबाळ यांना त्वरित मदत मिळावी यासाठी ना. बबनराव लोणीकर व अधिकारी स्तरावर पाठपुरावा केला होता.

आज निर्भीड पत्रकार  संघ बीड च्या  वतीने ,दुर्लक्षित झोपडपट्टी  गोरगरीबांना दिवाळी फराळचे वाटप 

बीड प्रतिनिधी

बीड शहरातील तेलगाव रोड च्या नाक्यावरील अतिशय दुर्लक्षित पालात राहणाऱ्या मसणजोगी,जोगी,जोशी, बिगारी सह इतर जमातीच्या लोकांना पलावर जाऊन महिला एकता पत्रकार संघ,संचलित निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने फराळ आणि टॉवेल वाटप करण्यात आले यावेळी या गरीब लोकांचा आनंद द्विगुणीत झाला.

                  त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी संवस्थापक अध्यक्ष रुचिता मलबारी,प्रदेश अध्यक्ष अनिल घोरड, मराठवडा अध्यक्ष शेख तालीब,माया तिरमले, अंकुश चव्हाण,  जिलाह अध्यक्ष शेख तय्यब, बाजीराव ढाकणे,शेख अमीर,शिवाजी पिंगळे,रघुनाथ थोरात आदी उपस्थित होते. तर एकूण 100 हुन अधिक कुटुंबाला फराळाचे पॅकेट आणि टॉवेल देण्यात आल्या वनचितांच्या घरी ही दिवाळी निर्भीड पत्रकार संघाने बीड जिल्ह्यात प्रथमच साजरी केली आहे.या पूर्वीही पत्रकार संघाच्या वतीने असे सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत व पुढेही राबवले जातील अशी माहिती संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल घोरड यांनी दिली आहे.

नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

मालाड मधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आता मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.“एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.”, असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.यावेळी आमदार नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखं वाटतंय आणि त्यांना मराठी माणसांची मतंही हवी असतात.”

गुजरातमधील सामान्य रुग्णालयात 24 तासांत 9 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ.


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

गुजरात मधील अहमदाबादेतील सामान्य रुग्णालयात गेल्या 24 तासांत 9 लहानग्यांचा मृत्यू झाल्यानं गुजरात मध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सर्व मुलांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालय प्रशासनानं लहानग्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.पाच लहानग्यांना बाहेरच्या रुग्णालयातून अहमदाबादेतल्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तर इतर चार मुलं येथेच जन्मली होती. मुलं शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त होती. तसेच त्यांना भयंकर आजारानं पछाडलं होतं, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरून गुजरातमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं एकतर या घटनेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं मान्य करावं, अन्यथा मुलांच्या आई कुपोषित होत्या का ते सांगावं, असं ट्विट करत काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी गुजरात सरकारला लक्ष्य केलं आहे. चिमुकल्यांची प्रकृती जास्ती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या वतीनं त्या बाळांना वाचवण्यासाठी सर्व उपाय योजण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचं विरोध प्रदर्शन करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाला होता. पोलिसांनी संबंधित परिचारिकेलाअटक केली होती. तर चौथ्या बाळाला सेप्टिसेमिया झाल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या मृत्यूचे प्रकरण पीडीएमसीने मिटविले होते. तथापि, या बाळाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. वैद्यकीय अधीक्षक वसंत लवणकर यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल दिला. ‘सेप्टिसेमिया’ने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पीडीएमसी प्रशासनाने काढल्यामुळे चौथ्या बाळाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. इतर तीन बाळांचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शन मुळे झाल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. चौथ्या बाळाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता शवविच्छेदन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.

मुदत संपली; आरक्षणानुसार दिलेल्या बढत्या संपुष्टात!

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने 2004 पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत. बढत्यांसाठीचा राज्य सरकारने 25 मे 2004 रोजी काढलेला जीआर हायकोर्टाने 4 आॅगस्ट 2017 रोजी घटनाबाह्य ठरवला व त्याबाबत 12 आठवड्यांत कारवाई करावी, असा आदेश दिला. याविरुद्ध राज्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निकालास 12 आठवडे स्थगिती दिली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा 28 मार्च 2008 चा अंतरिम आदेश लागू राहील, असे स्पष्ट केले.त्यानुसार, राज्याने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार असली तरी 12 आठवड्यांची मुदत 27 आॅक्टोबरलाच संपल्याने अंतरिम आदेशानुसार सुरू राहिलेले बढत्यांमधील आरक्षणसंपुष्टात आले. उच्च न्यायालयाने 9 मार्च 2007 च्या अंतरिम आदेशात भटके विमुक्त व विशेष मागासवर्गीयांच्या 13 टक्के बढतीत आरक्षण ठेवण्यास अनुमती दिली होती आणि एससी, एसटीच्या बढत्यांना स्थगिती कायम ठेवली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सर्व मागास प्रवर्गांच्या बढत्या आरक्षणानुसार देण्यास 28 मार्च 2008 च्या अंतरिम आदेशानुसार संमती दिली. ती उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढेपर्यंतच होती. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशानुसार राज्यात बढत्यांमधील आरक्षण कायम होते. या नव्या बढत्यांचे भवितव्यही आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल.

दादर मध्ये मनसे कडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड.


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

मालाड मध्ये मनसे आणि फेरीवाल्या मध्ये झालेल्या मारहाणीचं लोण आता दादर पर्यंत पसरलंआहे. कारण मालाड मध्ये मनसे पदाधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर दादर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना लक्ष्य केलं आहे.मनसेनं फेरीवाल्यां विरोधात सुरु केलेल्या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपमांनी उडी घेतल्यानंतर आता हे प्रकरण चांगलच चिघळलं आहे. संजय निरुपमा यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मुंबईच्या मालाड मध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि यातमनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दरम्यान या घटने आधी मालाड मध्ये झालेल्या सभेत संजय निरूपम फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्यासाठी उसकावलं. त्यानंतर ही घटना घडली आहे.

रेणूका शुगर्सच्या मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न

कार्तिक पाटील

पाथरी:-दुष्काळातील खंडा नंतर या वर्षी पुन्हा पाथरीचा रेणूका शुगर्स गाळपा साठी सज्ज झाला असून २५ ऑक्टोबर  रोजी बॉयलरल अग्नी प्रदिपना नंतर शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी शेतकी विभागातले कामगार श्री व सौ श्रीरंग आर. हारकळ या दाम्पत्याच्या हस्ते मोळी पुजन करून रेणूका शुगर्सच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे.
दोन वर्ष सलग कोरडा दुष्काळ झाल्याने उस लागवड झाली नव्हती २०१४-१५ नंतर हा कारखाना उसाची उपलब्धता नसल्याने हा साखर कारखाना बंद राहीला होता गत वर्षी पाऊसमान चांगले  झाल्याने कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने या वर्षी दोन लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी या साखर कारखाण्यात शेतकी विभागात कार्यरत असलेले श्रीरंग आर . हारकळ आणि सौ हारकळ या दाम्पत्याच्या हस्ते मोळी पुजन करून हंगामाला सुरूवात करण्यात आली. या वेळी साखर कारखान्याचे व्यवस्थापक शिवराज तेली, जगदिप थोरात, बालाजी पाटील, राजेंद्र देशपांडे, संतोष शिंदे, कोपरटकर, श्री बनकर, हे विविध विभागांचे अधिकारी आणि साखर कारखाण्यातील कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.लवकरच गाळपाला सुरळीत सुरवात होईल अशी माहिती या कारखान्याचे एच आर राजेंद्र देशपांडे यांनी दिली.

अपहरण कर्त्यास पोलिस कोठडी


परभणी :  प्रतिनिधी
क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेवुन देण्याचे आमीष दाखवत १२ वर्षीय मुलाचे परभणी शहरातुन अपहरण करण्यात आले. परभणी पोलिसांनी सापळा रचुन अवघ्या २४ तासात दोन आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले. अशी माहिती पत्रपरिषदेत दिली.
   या आरोपीस पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
परभणी शहरातील गोरक्षण परिसरात राहणारा अभिषेक अन्सीराम दावलबाजे वय १२ हा २५ आॅक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास क्रिकेट खेळण्यासठी सायकल घेवुन घराबाहेर पडला तो आलाच नाही. अभिषेकची आई वर्षा अन्सीराम दावलबाजे हिने दिलेल्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेक हा इदगाह मैदानावर मित्रा सोबत क्रिकेट खेळत असे. क्रिके ट खेळतांना अपहरण कर्त्या दोघांनी फोर मारला की १० रुपये आणि सिक्स मारला की २० रुपये असे आमीष दाखवले. या मुलास विश्वासात घेत बॅटचे आमीष दाखवुन अपहरण केले. गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी या गुह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मुलाची सुखरुप सुटका कशी करता येईल यासाठी पथक तयार केले. पोलिस निरिक्षक संजय हिबारे व नानलपेठचे रामराव गाडेकर यांनी टीम तयार करुन सपोनि सुनिल पुंगळे, अनिल सनगळे, कापुरे, टाकरस यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना केले. २० लाख रुपये घेवुन येत असल्याची बतावणी करत आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणातील जिलानी खाजा शिकलकर वय२४ व कलीम सहानु शिकलकर वय २२ या दोघास सिने स्टाईलने गजाआड केले. मुलाला पाहुन आईवडीलांनी सुटकेचा श्वास सोडला.

भोकरदन तालुका क्रीडा संकुलाचे निधी असून सुद्धा रखडळे.


   प्रतिनिधी : सोयगाव देवी

   भोकरदन क्रीडा संकूल चे काम गेल्या विस वर्षापासून क्रीडा अधिकारी तसेच अध्यक्ष तथा तहसिलदार यांच्या दूर्लक्षा मूळे क्रीडा संकुलाची स्वतहाची जागा तसेच कार्यालय असूण सुद्दा क्रीडा स्पर्धा इतरत्र घेण्यात येत आहे भोकरदन क्रीडा संकुलाचे बॅक खात्यावर 10 ऑक्टो ला क्रीडा विभाग पुणे येथून संकूल दूरस्ती तसेच मानधन तत्वावरिल नियुक्त क्रीडा मार्गदर्शक यांचे वेतन,क्रीडा साहित्य .स्टेशनरी साहीत्या साठी 41 लक्ष रुपये क्रीडा संकूल भोकरदन या खात्यावर वर्ग झालेले आहे तरि सुद्धा अशा परिस्थित केवळ क्रीडा विभाग तसेच अध्यक्ष यांच्या दूलक्षा मूळे क्रीडा संकुलचे काम पूर्ण पने गेल्या विस वर्षापासूण बंद पड़ळ्या मूळे तालुकातील खेळाडू चा विकास खूटंला आहे खेळाडू कडून या विषयी नाराजी आह.े केवळ मानधन तत्वावरिल कर्मचार्यांच्या भरवशावर क्रीडा कार्यालय जिंवत आहे विशेष म्हणजे कर्मचारी मानधन प्राप्त असून त्यांना तिन वर्षापासून क्रीडा अधिकारी पद रिक्त असल्यामुळे मानधन मिळाले नाही क्रीडा अधिकारी पद गेल्या सात वर्षापासूण रिक्त , एक कोटी बॅक खात्यावर जमा , अध्यक्ष तथा तहसिलदार यांचे या विषयावर दूर्लक्ष ,मानधन तत्वा वरिल  कर्मचारी मानधना पासूण वंचित हे सर्व कारने क्रीडा संकूल रखडण्याचे मूळ कारणे आहे भोकरदन क्रीडा संकूल कामाला मूहूर्त कधी असा सवाल उदयोमूख खेळाडू करित आहे

छत्तीसगड येथील राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत अपूर्व कुलकर्णीची निवड


सेलू  (                  .            )  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद नंदूरबार आणि  महाराष्ट्र राज्य योगासन संघटनेच्या माध्यमातून राज्य स्तरीय शालेय योगासन स्पर्धा नंदुरबार येथे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत 14 वर्षेवयोगटातील मुले या गटात नूतन विद्यालय सेलूचा आठव्या वर्गातील अपूर्व यशवंत कुलकर्णीची निवड झाली आहे. औरंगाबाद विभागाच्या संघात प्रथम क्रमांकावर असलेल्या अपूर्वने राज्य स्तरीय शालेय योगासन स्पर्धेत 193 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावून राज्य योगासन संघात स्थान निश्चित केले.
दि. 31 ऑक्टो ते 04 नोव्हें या कालावधीत आयोजित राष्ट्रीय योगासन पुर्व प्रशिक्षण शिबीर वर्धा येथे जिल्हा क्रीडा संकुलातील योगा हाँल मध्ये संपन्न होणार आहे. राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धा दुर्ग, छत्तीसगड येथे दि. 07 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.  अपूर्व ने गत वर्षी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले.या उज्ज्वल यशाबद्दल  अभिनंदन संस्थाध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष अॅड. व्ही. एस. खारकर चिटणीस डी .के. देशपांडे सहचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाश बिहाणी  मुख्याध्यापक के. व्ही. वाघमारे उपमुख्याध्यापक ए. बी. कुलकर्णी, पर्यवेक्षक अशोक गाजरे , मा. मा. सुर्वे  एन. जी. बंगाळे व नूतन परिवारातील सर्वानी त्याचे कौतुक करून यांनी अभिनंदन केले. तर त्यास मार्गदर्शन देविदास सोन्नेकर, गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रशांत नाईक नागेश कान्हेकर ,सौरभ देशपांडे ,स्वाती देशपांडे यानी केले.

बोरी चारठाणा बामणी पोलीस ठाणा हद्दीत पण मटका जुगाराचे थैमान


प्रदिप कोकडवार
जिंतूर
जिंतूर शहरात मटका व्यवसाईकांनी थैमान घातल्या मूळे विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या आदेशाने काल जिंतुरात धडक कारवाई करून सुरेश लाला या मटकाकींग ला अटक केले खरे पण माहिती घेतली असता जिंतूर पोलीस हद्दीतील आडगाव येलदरी आदी भागात लाला चे एजंट आजही खुले आम मटका धंदा करीत असून बोरी चारठाणा बामणी अम्बरवाडी कवडा आदी सर्व मोठ्या गावात बिनबोभाट कल्याण मटका जुगार राजरोस पणे चालू आहे
जिंतूर शहरातील कारवाई न तालुक्यातील बोरी चारठाणा बामनित विशेष काही परिणाम झाला नाही या हद्दीत पण धडक कार्यवाही करून मटके बहाद्दर च्या मुसक्या आवळण्याची गरज आहे या अवैध व्यवसाया मूळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून महिला सोबत घरातील भांडणाचे प्रमाण वाढत आहे

अन्याविरूध्द लढण्यासाठी गेवराईतील शिक्षक संघटना एकत्र


सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. 28 __ ग्रामविकास विभागाने काढलेल्या जिल्हा बदली प्रक्रियेने शिक्षक मेटाकुटिला असतानाच 23 आॅक्टोबर रोजी शालेय शिक्षण विभागाने वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटीवर शिक्षकांतून जोरदार टिका होवू लागली आहे. तसेच 2005 नंतरच्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नसल्यामुळे शिक्षकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे 30 आॅक्टोबरला जिल्हा समन्वय समितीचा विराट मोर्चा निघणार आहे.
   शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून यामुळे शिक्षण क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. वेतन श्रेणीसाठी घालण्यात आलेल्या अटीच्या मुद्दयावर शिक्षकांमध्ये नाराजीची सुर उमटू लागला आहे. प्रगतशाळा शाळासिध्दी मध्ये 'अ' दर्जा आणि इयत्ता नववी व दहावी चा निकाल 80 % आधिक अशा अटी वेतन श्रेणीत घालण्यात आल्या आहेत. शाळा 'अ' दर्जाची नसल्यास किंवा निकाल 80% कमी लागल्यास संबधित शिक्षक पात्र ठरणार नाही असे निर्णय नमूद करण्यात आले आहे. जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी शिक्षकांना रात्र-दिवस ऑनलाईन काम करावे लागते तसेच अनेक कामे शिक्षकांना ऑनलाईन करावी लागतात. यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे.
      या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 30 आॅक्टोबरच्या मोर्च्यात शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख रा. शि. परिषद अध्यक्ष अमोल आतकरे, प्रा. शि. संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप नरूटे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष बाबा दहिफळे, प्रा. शि समितीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, शिक्षक भारतीचे आध्यक्ष कैलास पट्टे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र दहिफळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन तिबोले आदिंनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯