तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 4 November 2017

जनलोकपालसाठी अण्णा पुन्हा मैदानात,आंदोलनाची तारीख जाहीर.


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फेब्रुवारी महिन्यात जनलोकपाल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत 20 किंवा 25 फेब्रुवारीला आंदोलन करु, असं अण्णांनी जाहीर केलं आहे. राळेगणसिद्धी मध्ये याबद्दल माहिती देण्यात आली. रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा राजघाटवर आंदोलन होण्याची शक्यता आहे.

”मोदींपेक्षा फडणवीस चांगले”...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं असल्याचं अण्णांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी चुकीचं काम करत असून फडणवीस यांचं काम योग्य असल्याचं अण्णांनी सांगितलं. शिवाय फडणवीस चुकले, तर त्यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा द्यायलाही अण्णा विसरले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवलं. पंधरा लाखाचं अश्वासन देऊन जनतेची निराशा केल्याचा आरोप केला. त्याच बरोबर जनलोकपाल बील कमजोर केलं. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला. त्यामुळे दिल्लीतल्या आंदोलनाने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी पंतप्रधान मोदींना याअगोदर अनेकदा पत्र लिहिलं आहे. मात्र मोदींकडून पत्राला काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल बोलावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकरांच्या फेरीवाल्या संबंधी वक्तव्याचा समाचार घेतला. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली. फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. दक्षिणेतील कलाकार रस्त्यावर उतरुन स्वत:च्या प्रांतासाठी लढतात, तसंच नानानं महाराष्ट्रासाठी लढावं असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

मुंबईत आता सोसायटी बाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणं म्हणजे मुंबईत मोठं जिकरीचं काम. मात्र आता तुम्ही राहत असलेल्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटी समोर तुमची गाडी पार्क करू शकता.कारण सोसायट्यांसमोर वाहनं पार्क करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांना पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे. मुंबईतल्या फोर्ट, कुलाबा आणि कफ परेड मधल्या रहिवाशांनी इमारती समोर पार्किंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना अर्ज केले होते.अशा 29 अर्जांपैकी 25 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान सोसायटीबाहेर गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला महिन्याला अठराशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतोका, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोसायटी समोरील पे अँड पार्क योजना काय आहे?....

= प्रायोगिक तत्वावर ए वॉर्डमधील 29 पैकी 25 सोसायट्यांना परवानगी.

= सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पार्किंगची मुभा.

= एका कारसाठी जास्तीत जास्त 1800 रुपये शुल्क.

= सोसायटीचा सुरक्षारक्षक पार्किंगवर नजर ठेवणार.

= यातून येणारी रक्कम रस्ते दुरुस्तीसाठी वापरली जाईल

महाराष्ट्र सेनाची सिडको बस-स्टॅण्ड येथे शाखा नामफलकाचे उदघाटन -

      औरंगाबाद - महाराष्ट्र सेनाचे  पक्ष प्रमुख राजूभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्तीत सिडको बस-स्टॅण्ड येथे शाखा नामफलकाचे उदघाटन शहर अध्यक्ष अयुबभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष पंडितभाऊ राठोड होते.
        या वेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख रब्बानी भाई प्रमोदजी सिरसाठ संजय राजूरकर महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा प्रितिताई दुबे मराठवाडा उपाध्यक्ष मंगला पंदिकर शहर अध्यक्ष शेख मलिका जिल्हा प्रसिद्धि प्रमुख पंडितराव हिवाळे शहर उपाध्यक्ष राजकुमार अमोलिक शहर कार्याध्यक्ष राजु भिंगारदेव आंनद तायडे पश्चिम शहर अध्यक्ष अनुराग इंगोळे पूर्व शहर अध्यक्ष मुकेश मकासरे  विजय साबळे सलीमभाई नंदकुमार अंबोरे आशा संकपाल वर्षा वर्धे सरोज कांबळे मंगल आडे वैशाली सोलुंके अर्चना दुबे शोभाताई निलेश धस अनिल दिवेकर सतीष खिल्लारे शिलवान गायकवाड शेख साजेद आदी उपस्थित होते.
         वरील शाखा पूर्वशहर उपाध्यक्ष शिवाजी नितनवरे पूर्वशहर सचिव यांच्या नेतृत्वाखाली शाखा स्थापन करण्यात आली.
       खालील शाखा कार्यकरणी जाहिर करण्यात आली शाखा अध्यक्ष राहुल खरात उपाध्यक्ष राजु शंभरकर सचिव आनंद पाईकराव सहसचिव बाळु उबाळे कोषाध्यक्ष नितीन मोरे संघटक जगन पाईकराव सदस्य छबु राठोड किसन चव्हाण राजु पवार

पाटील मल्टीसर्ह्विसेसचे उद् घाटन थाटात पार

महेंन्द्र महाजन जैन रिसोड प्रतिनिधी
9960292121

4/नोव्हेंबर
मागील 12 वर्षापासुन अविरत सेवा देणारे पाटील मल्टी सर्ह्विसेसचा उद्धाटनाचा कार्यक्रम आज दि.4 नोव्हेंबर नविन वास्तुमध्ये सपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ.श्री.राजेंद्रजी पाटणी साहेब भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष वाशिम यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी डाॅ.रणजित पाटील गृह राज्यमंत्री,मा.खा.श्री.संजयभाऊ धोत्रे, मा.आ.श्री.विजयराज जाधव,मा.आ.श्री.अमितभाऊ झनक,मा.श्री.भगवानराव क्षिरसागर,मा.श्री.राजु पाटील राजे,मा.श्री.पंजाबराव झनक,मा.सौ.छायाबाई पाटील,मा.श्री.जितेंद्र गवळी,मा.श्री.विष्णुपंत भुतेकर म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन श्री.नामदेवराव हुबांड यांनी केले.कार्यक्रमाला महेंद्रकुमार महाजन अनिल पाटील रिजवान खान रुपेश पाटील डाॅ दिपक ढोके रमेश पाटील भारतभाऊ कोकाटे 
मान्यवर उपस्थित.

मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस पलटली, 27 जण जखमी.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 27 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून वेगात येणाऱ्या ट्रकचा अंदाजन आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून पंधरा फूट खोल जाऊन झाली पलटी झाली. सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून बांद्याला ही बस जात होती.  खारेपाटण जवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.

भारत 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयाची अर्थव्यवस्था होईल : वर्ल्ड बँक

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

जीएसटी आणि नोटाबंदीवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्याची एक संधी सोडली नसली तरी जागतिक बँकेने सरकारच्या या निर्णयांचं स्वागत केलं आहे. भारत पुढील 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्थाहोईल, असा दावा जागतिक बँकेने केला आहे. म्हणजेच भारतातील गरीबी कमी होणार असल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे. जीएसटी आणि इतर आर्थिक बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलं. भारतात प्रती व्यक्ती कमाई वाढून चार पट होणं ही असामान्य गोष्ट आहे, असं जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी म्हटलं आहे. उद्योगांमध्ये अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारताने या यादीत 30 स्थानांनी झेप घेत टॉप 100 मध्ये प्रवेश मिळवला. जागतिक बँकेने ही रँकिंग नुकतीच जारी केली आहे. त्यानंतर जागतिक बँकेच्या सीईओंनी भारतातील आर्थिक निर्णयांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उचललेल्या पावलांचं क्रिस्टालीना यांनी कौतुक केलं. जीएसटीने एकीकृत बाजार व्यवस्थेच्या माध्यमातून जलद विकासाची संधी उपलब्ध केली आहे. याचा परिणाम थेट परदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय) दिसत आहे. एफडीआय 2013-14 मध्ये 36 अब्ज डॉलर होता, जो आता 60 अब्ज डॉलर झाला आहे, असंही त्या म्हणाल्या. गरीबी हटवणं हा विषय आता इतिहासजमा होणार आहे. यासाठी 2026 चं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र मोदींनी 2022 चं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारची आता पर्यंतची कामगिरी पाहता हे शक्य आहे, असंही जॉर्जिवा म्हणाल्या.

सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाने तुमचीही इंजिनिअरिंग डिग्री अपात्र ठरु शकते!

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

अभियांत्रिकीचं दूरस्थ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. त्यामुळे गेल्या 16 वर्षात म्हणजे 2001 पासून आतापर्यंत दूरस्थ शिक्षण पद्धतीने डिग्री घेतलेल्यांना फटका बसला आहे. अशा डिग्रीवर नोकरी मिळालेल्यांवर संकट कोसळू शकतं. नियामक प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी विना देशातील सर्व अभिमत विद्यापीठांनी 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठी अभियांत्रिकीचे दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम सुरू करू नयेत, असे निर्बंध सुप्रीम कोर्टाने घातले आहेत. शिवाय अभिमत विद्यापीठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. देशातील चार विद्यापीठांमधून देण्यात आलेल्या दूरस्थ पदव्यांच्या पात्रते विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला. नियामक प्राधिकरणाची परवानगी नसतानाही या चार विद्यापीठांनी दूरस्थ पदवी दिली होती. दरम्यान या पदव्या देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेशही कोर्टाने दिले. राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील ही चार अभिमत विद्यापीठं आहेत.

विद्यार्थ्यांवर परिणाम काय होणार?....

2001 पासून अशा विद्यापीठांमधून घेतलेल्या पदव्या अपात्र ठरवण्यात येतील. त्यामुळे नोकऱ्यांवरही गंडांतर येऊ शकतं. दरम्यान 2001-2005 या काळात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन पास होण्याची दोन वेळा संधी देणार आहे. या परीक्षेत पास न झाल्यास डिग्री अपात्र ठरवण्यात येईल.

शेतातिल राहत्या कोठ्याला लागलेल्या आगीत २ लाखाचे नुकसान दोघे किरकोळ जख्मी

महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी

रिसोड : रिसोड करडा मार्गावर एका शेतात राहत्या कोठ्यात उंदीराने दीवा पाडल्याने लागलेल्या आगित शेतिउपयोगी वस्तू व घर उपयोगि वस्तु जळून खाक होउन २ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दी.३ च्या रात्रि ९ च्या सुमारास घडली.या घटनेत दोघे किरकोळ जख्मी झाले.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि रिसोड करडा मार्गावर बिबखेड शिवारात फैय्याजोद्दीन अब्दुल लतीफ यांचे शेत आहे.शेतात राहण्याकरिता व शेती साहीत्य ठेवण्या साठी सिमेंट पोल,कुड व पत्राचा चा एक कोठा आहे.रात्री त्यांची  आई शिरीबेगम अब्दुल लतीफ यांनी दिवा लावला होता.रात्रि ९ सुमारास उंदीराने तो दिवा पाडला व आगिने एकदम भडका घेतला.आगिने एकदम रौद्र रुप धारण केले.शेतात जवळच फैय्याजोद्दीन यांचे चुलत भाउ शेख परवेज हे होते त्यानी शिरिबेगम यांना तातडीने कोठ्याबारेर काढले,यात दोघांना किरकोळ जख्मा झाल्या.

आगीत कोठ्यात असलेल्या घरगुती साहित्य पलंग,लाकडी अलमारी,स्टील व एल्युमिनियम चे भांडे,कपडे,गादी कंबल, सोन्याचे ४५ हजार किमतीचे दागिने व शेतिचे सामान फवारणी पेट्रोल पंप,केबल वायर, २ मोटर पंप,स्टाटर,मेनकापड,ताडपत्री,सोयाबीन१०पोते,स्प्रिंगक्लर तोट्या,व इतर साहित्य खाक झाले.आगिचि माहीती मिळताच तहसीलदार आर यु सुरडकर व नगर परिषद मुख्याधीकारी सुधाकर पानझाडे यांनी अग्निशमन दलास पाठवीले.मात्र गाडी पोहचण्यापुर्वी सर्व साहीत्य जळून खाक झाले होते.

रात्रिच पटवारी विक्रम भिंडारकर यानी घटना स्थळाचा पंचनामा करून तहसील कार्यालयास अहवाल पाठविला आहे.

 शेतकरी पलिहेच आस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेला आहे.त्यात काल रात्रि घडलेल्या घटनेने शेतक-यावर दुषकाळात तेरावा महीना झाला.शासनाने शेतकर्यास  तातडीने मदद करावी अशि मांगनी जनतेतून होत आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी
9960292121

सेलुत अज्ञाताने जाळली कार बुलेट जाळण्याचा प्रयत्न फसला  अज्ञात व्यक्ती साईबाबा बॅंकेच्या सी सी टीव्हीत कैद 


सेलु:प्रतिनिधी 

शहरातील स्टशेन रोड परीसरातील मदीना मज्जीद समोरील उभी आसलेली नॅनो कार अज्ञात व्यक्ती ने जाळली आसल्याची घटना शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री नंतर घडली तसेच याच दरम्यान स्टशेन रस्तावरील साईबाबा बॅंकेच्या ताब्यात गेटच्या आत असलेली बुलेट मोटार सायकल जाळण्याचा देखील प्रयत्न झाला होता.मोटार सायकल आग लावताना सदरील अज्ञात तरून साईबाबा बॅंकेच्या सीसी टीव्ही कॅमर्यात कैद झाला आहे.सेलु शहरातील शनिवार बाजार परीसरातील किरकोळ विक्रीत्याची भाजीपाल्याच्या दुकानाना अज्ञात व्यक्ती कडून आग लावण्याच्या अनेक घटना वारंवार घडत असताना शुक्रवारी मध्यरात्री नंतर तथा शनिवारी पहाटे 2.45 वाजता रेल्वे स्टेशन परीसरालगत एक कार व मोटर सायकल जाळण्याचा प्रकार उघड झाला आहे.शहरातील आठवडी बाजार परीसरातील रहिवासी शेख अकबर शेख मुलतान यांची नॅनो कार (एम एच 26 व्ही 5537)ही शुक्रवारी रात्री 10.30 वाजता रेल्वे स्टेशन परीसरातील मदीना मज्जीद समोर पार्किंग केली होती शनिवारी सकाळी या कारचा सांगडाच दीसु लागला शुक्रवारी मध्यरात्री नंतर अज्ञात इसमाने कार पेटवली व ती पुर्ण पने जळाली होती येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईबाबा बॅंकेच्या आवरा मध्ये कूलूपात असलेली बुलेट मोटर सायकल (एम एच 22एके 7092) हीला देखील अज्ञात व्यक्ती ने आग लावण्याचा प्रयत्न फसला बूलेट मोटरसायकलच्या मागील चाकाला अज्ञात व्यक्ती ने पेटवले होते त्यामुळे बुलेटचे मागील टायर व ट्युब जळाले ही आग फैलवण्यापुर्वची साईबाबा बॅंकेच्या समोरून जाण्यार्या नागरीकांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व पाण्याच्या साह्याने आग विझवली म्हणून बूलेट मोटरसायकल सह बॅंकेच्या मोठे नुकसान टळले सदरील अज्ञात व्यक्ती तरून आसल्याचे साईबाबा बॅंकेच्या सीसी टीव्हीत कैद झाले आहेत सीसी टीव्ही च्या फुटेज वरून ह्या दोन्ही ही घटना शुक्रवारी रात्री तथा मध्यरात्री नंतर शनिवारी पहाटे 2.30ते 3.00 दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे.आठवडी बाजारातील किरकोळ विक्रीतेच्या दुकानाना आज्ञात व्यक्ती कडून आग लावणे तसेच नाशीक ओरंगाबाद च्या घटने प्रमाने शहारातील उभ्या वाहनाना रात्रीच्या वेळी आग लावण्याची घटना घडल्या मुळे शहरातील नागरीकात भितीचे वातावरणात पसरले आहे.शहरातील दुकानाना आग लावण्याच्या घटनाना सेलु पोलीसांना छडा लावता आला नाही सीसी टीव्ही फुटेज वरून गाड्या जाळण्यार्या अज्ञाताचा सेलु पोलीस तपास पुर्ण करून आगमी काळत आशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेतील का आशी चर्चा घटनास्थळावरील नागरीक करत होते.

जनतेने टाकलेला विश्‍वास सार्थकी लावावा - आमदार अमरसिंह पंडित

सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. ४ __ काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास निश्‍चित यश मिळते. ग्राम पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने मतदानरुपी आशिर्वाद देवून मोठ्या विश्‍वासाने काम करण्याची संधी दिली आहे, नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी तो विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कामाला लागावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केले.
      गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार, दि.४ रोजी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील ३० तर तालुक्या बाहेरील परंतु मतदार संघातील १९ सरपंच आणि सुमारे ४५३ ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. व्यासपीठावर आ.अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी सभापती पाटीलबा मस्के, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, शरद चव्हाण, उपाध्यक्ष मोहम्मद गौस, शाम मुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या सत्कार समारंभात आ. अमरसिंह पंडित बोलताना म्हणाले की, जयभवानी कारखान्याचे आणि शेतकर्‍यांचे विश्‍वासाचे नाते होते, मधल्या काही काळात हे नाते दुरावले होते. पुन्हा एकदा हा विश्‍वास निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण आयुष्यभर संस्था उभा करण्यासाठी आणि त्या टिकविण्यासाठी राजकारण केले, कधीही विरोधकांसारखे संस्था उध्वस्त करण्याचे राजकारण केले नाही. आज विरोधक अत्यंत खालच्या थराचे राजकारण करत जयभवानी कारखाना बंद पाडण्याचा कट रचत आहेत. जयभवानीची साखर निर्माण होण्याच्या अगोदर ती जप्त करण्याची मागणी विरोधक करत आहेत. सुडाच्या राजकारणात जयभवानीला इजा होवू देणार नाही. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असून सरकार मधील लोकांना शेती विषयीचे कोणतेही देणे घेणे नाही. तालुक्यात शेतकर्‍यांवर अनेक प्रकारे अन्याय होत असताना सत्ताधारी सेना-भाजपा आजी माजी आमदार मात्र राजकारण करण्यात गुंतलेले आहेत. उमापूर सारख्या ठिकाणचे हजारो शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत. त्यांच्या विषयी सत्ताधारी बोलत नाहीत. सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठी सुरु असल्याची टिकाही त्यांनी आपल्या भाषणात केली.
          यावेळी बोलताना माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले की, पंचायत समितीमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय ग्राम पंचायत निवडणुकीसाठी खुप महागात पडला. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने हा निर्णय करावा लागला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत जरी आपली सत्ता नसली तरी येथील कोणतेही काम अडणार नाही. विकासाच्या कामासाठी आपण सदैव तत्पर राहिले पाहिजे. गावच्या विकासासाठी नियोजनबध्द काम करून ग्रामस्थांच्या संपर्कात राहण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. कार्यकर्त्यांच्या पाठिशी आपण खंबीर उभा असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले तर कार्यक्रमात माजी जि.प.सदस्य जालिंदर पिसाळ, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, टाकरवनचे सुनिल तौर, नवनिर्वाचित सरपंचाचे प्रतिनिधी प्रमोद गरड यांनी मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमास माजी सभापती भरतराव खरात, कुमारराव ढाकणे, पांडूरंग कोळेकर, पं.स. सदस्य जयसिंग जाधव, ऋषिकेश बेदरे, समाधान मस्के, आनंद सुतार, बाबासाहेब आठवले, अरुण चाळक, राजेंद्र वारंगे, दत्ता पिसाळ, कैलास नलावडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================
जयभवानीचा गाळप हंगाम
११ नोव्हेंबरला सुरु होणार
=================
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. ११ नोव्हेंबर रोजी सुरु होणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित यांनी यावेळी आपल्या भाषणात केली. उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.
        तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस उभा आहे, कोणीही घाबरून जावून घाई करू नका, यावर्षी आपण सात लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कारखाना गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी आहे, विरोधकांनी कितीही अडथळे आणले, सत्तेचा गैरवापर केला तरीही जयभवानी यंदाचा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे ठाम मत आ. अमरसिंह पंडित यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले.
-----------------------------
ईटकुर - शिंपेगाव येथील
ग्रा.पं.सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश
============
या कार्य्रकमात ईटकुर-शिंपेगाव ग्रा.पं.चे सरपंच बाबुराव कोठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. त्यांनी ग्राम पंचायतीची निवडणुक शिवसेनेकडून लढविली होती. आ.अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांनी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯