तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 11 November 2017

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात


--------------------------
       पिलीव/सुजित सातपुते
वैभव तानाजी गीते राज्य सचिव नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले साहेबांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीन अल्पभूधारक व्यक्तींना शासनाच्या ताब्यातील शेती महामंडळाच्या,वनविभागाच्या,तसेच गायरान जमिनी *कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत* *देण्यात याव्यात.सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाने  एकरी दहा लाख रुपये दराने किंवा सध्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे जमिनी विकत घेऊन अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना खरेदी करून द्याव्यात* .यामध्ये सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या (atrocity)खून ,बलात्कार,जाळपोळ,सामुदायिक हल्ला,इत्यादी प्रकारणातील पीडित व्यक्तिंना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.सध्याच्या शासननिर्णयातील जाचक अटी रद्द करून नवीन शासननिर्णय काढावा त्यामुळे सदर योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल व *अनुसूचित जाती जमाती च्या प्रगतीसाठी असणारा निधी उपयोगात आणता येईल व निधी इतरत्र वळवण्याचा प्रश्नच येणार नाही* .त्यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.असे निवेदनात म्हटले आहे.

POK पाकिस्तानचा भाग, काश्मीर प्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करा -फारुख अब्दुल्ला

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीर मध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित व्हावीयासाठी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दिनेश्वर शर्मा यांची निवड केली आहे. त्यांच्या बद्दल तुमचे मत काय ? या प्रश्न फारुख अब्दुल्ला म्हणाले कि, मी यावर जास्त बोलू शकत नाही. त्यांनी काही जणांबरोबर चर्चा केली आहे पण फक्त चर्चेने तोडगा निघणार नाही. काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तान मध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे. फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्तविधान करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा अशा प्रकारची विधानं केली आहेत.

सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल .....

दोन वर्षांपूर्वी फारुख अब्दुल्ला म्हणाले होते कि, पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीरघेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्या प्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे. लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.

आता थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएम मधून पैसे

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

कार्ड ऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएम मधून पैसे काढले जाणार आहेत. हीबायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीने नवनवीन फंडे वापरून बँक खात्यांमधील रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी एटीएमचे पिन विचारले जायचे. आता तर काहीही न विचारताही पैसे काढले जात आहेत. खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने आता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव आखला आहे. प्रत्येक नागरिकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनने सेवेवर हजर असल्याची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करावी लागते. हीच थम्ब सिस्टीम आता एटीएमसाठी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. एटीएम मध्ये कार्डऐवजी थम्ब इम्प्रेशनने खातेदारांना पैसेकाढता येणार आहे. या प्रणालीमुळे एटीएम कार्ड वा पासवर्डची गरज राहणार नसली तरी प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असल्याने कुणालाही कुणाचेही पैसे सहज काढता येणार नाहीत. ही पद्धती कार्यान्वित करण्याचे मुंबई येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कारार्पेरेट सेंटरकडे प्रस्तावित असून, लवकरच ती लागू झालेली असेल, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केले जात आहेत. यासाठी आगामी काळात एटीएम मध्ये थम्ब इम्प्रेशन सिस्टीम लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित आहे.अश्विन चौधरी,मुख्य प्रबंधक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय.

बोर्डिकर विद्यालयात मौलाना अबुल कलाम जयंती


प्रदिप कोकडवार
जिंतूर
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जंयती व शिक्षण दिन हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्या.श्री. खिस्ते शिवाजी तर प्रमुख पाहुने म्हणुन जेष्ट शिक्षणविस्ताराधिकारी श्री. गजानन वाघमारे साहेब व दै.देशोन्नतीचे पत्रकार शहजादभाई पठाण हे ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. वाव्हळ विनोदकुमार तर आभार प्रदर्शन श्री. सावंत राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठि श्री. बुधवंत महेश , श्री. भोंडवे शिवाजी, श्री. मोधे नामदेव , श्रीमती ईक्कर , सौ. माने, नवले व सौ शलाका कोकडवार यांनी परिश्रम घेतले.

तडेगाव येथिल विद्यालयाला संस्था अध्यक्षांनी लावले कुलुप.., ऐन परिक्षाकाळात दोन दिवसापासुन विद्यार्थांचे नुकसान. दखल न घेतल्यास करणार अमरण उपोषण

    प्रतिनिधी : - भोकरदन

    भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयाला गेल्या दोन दिवसापुर्वी संस्थेच्या अध्याक्षा यांनी शाळेवर जावुन शिक्षकांना व कर्मचार्यांना शिवीगाळ करून शाळेला कलुप लावल्याची तक्रार शाळेचे शिक्षक व कर्मचार्यांनी भोकरदन पोलिस स्टेशनला दिली आहे.
 
   तक्रारीत पुढे म्हटले आहे कि,९ नोव्हेंबर रोजी शालेय परिक्षा चालु असतांनी स्वयंघोषीत संस्था अध्यक्षा श्रीमती पुष्पा शंकर दांडगे व त्यांच्या सोबत आलेले गुंड प्रवृत्तीचे इसम देवराव देवकते यांनी शाळेत येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय तडेगाव या शाळेला कुलुप लावुन घेतले व सर्व शिक्षकांना धमकी दिली की,जर कोणी शाळेचे कुलुप उघडले तर त्यास जीवे मारण्यात येईल व शाळेच्या आवारात उभे असलेले वाहने जाळुन टाकण्यात येईल अशी धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे.
 
    सदरिल संस्था साविञीबाई फुले  शिक्षक प्रसारक मंडळ बरंजळा लोखंडे हि विवादीत असुन,दोन्ही गटाकडुन दबाव तंञाचा वापर करून सस्थेतील शिक्षक व कर्मचार्यांना पैसे मागुन शारीरिक व मानसिक व आर्थिक छळ चालवला आहे असुन,कुटींबीयाची मानसिकता खराब होत आहे.याची शिक्षक विभागाने या प्रकाराची गांर्भीयाने दखल ४ दिवसाच्या आत घ्यावी नसता,१५ नोव्हेंबर पासुन सर्व शिक्षक,कर्मचारी कुटींबायासहीत जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसु असे ही तक्रारीत म्हटले आहे.या तक्रार अर्जावर मुख्याध्यापक व्ही.बी.जाधव,तसेच ए.एस.बनकर,एस.एस.उबरहंडे,जी.एस.जाधव,आर.यु.मगरे,के.बी.लोखंडे,एस.यु.पाबळे,ए.बी.जाधव अदिंच्या साक्षर्या आहेत.

   
     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯

तालुकाध्यक्षपदी नामदेव पांडुळे यांची निवडसोनपेठ / प्रतिनिधी:
सोनपेठ येथे अल्पभूधारक भूमिहीन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सिड्स,पेस्टीसाइड्स & फर्टिलायझर कंपनीत काम करनाऱ्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मौजे नरवाडी येथील रहिवाशी नामदेव पांडुळे यांची सर्वानुमते अल्पभूधारक भूमिहीन सेल च्या सोनपेठ तालुकाध्यक्षपदी निवड करून सत्कार करण्यात आला
या बैठकी साठी प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान जाधव जिल्हा संघटक ,माणिक बिटे जिल्हा उपाध्यक्ष परभणी,अशोकराव चकोर प्रतिष्ठीत व्यापारी व नितीन पौळ संपर्क प्रमुख आदीची उपस्थिती होती
तिरुपती कदम,परमेश्वर पांडुळे,भगवान राठोड,विक्रम काकडे,नवनाथ राठोड,विजय शिराळ,लव्हु थोरवे,माने,कृष्णा माने व भागवत हारकळ आदी कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती सपकाळ तर आभार विनोद पवार यानी केले

प्रदूषणामुळे दिल्लीत अखेर वाहनांसाठी ऑड-ईव्हन फॉर्म्युला लागु.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू होणार आहे. सोमवार पासून ही योजना लागू होणार असून पुढचे 5 दिवस कायम राहणारआहे. कार, बस, दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना ही योजना लागू असेल, शिवाय रुग्णवाहिकां सारख्या तातडीच्या सेवा वगळता कुणालाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही. राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणानं काही अटींसह केजरीवाल सरकारला याची परवानगी दिली आहे.दिल्लीत ज्या गाडीचा शेवटचा नंबर 2 , 4 किंवा 6 अशा सम संख्येचा असेल, अशीच वाहनं ठराविक दिवशी दिल्लीत धावू शकतात. त्याच प्रमाणे विषम संख्येचा नंबर असणाऱ्या गाड्यांनाही असाच नियम लागू असेल. यामुळे गाड्यांची संख्या कमी होऊन प्रदूषणाला आळा बसेल, असा विचार केजरीवाल सरकारचा आहे.  दिल्लीकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रदूषणाला तोंड देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाआहे.

एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर नजीक एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही. खालापूरच्या फूड मॉल नजीक मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर कारचा अपघात झाला आहे. दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.दरम्यान, या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता ही कार बाजूला काढल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे.

सुनेशी पटत नसल्यानं मुलानं आईला स्मशानात ठेवलं.


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

मृत्यूनंतर माणसाला स्मशानात नेलं जातं, पण अहमदनगर मध्ये एका वृद्ध मातेवर जिवंतपणी स्मशानात राहण्याची वेळ आली आहे. बायकोशी पटत नाही म्हणून लक्ष्मीबाई आहुजा या मातेला त्यांच्या मुलानं चक्क स्मशानात ठेवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमी मध्ये लक्ष्मीबाई दिवस कंठीत आहेत. ज्या मुलाला आयुष्यभर हाताच्या फोडाप्रमाणं जपलं, त्याच मुलानं या मातेला जिवंतपणी स्मशान दाखवलं. मात्र, तरीही या मातेचं काळीज मुलासाठी तळमळतं आहे. ‘मुलगा वाईट नाही. पण सुनेशी पटत नाही, त्याचा नाईलाज होतो, म्हणून त्यानं इथं ठेवलं आहे.’ असं म्हणत ही माता आपल्या मुलाला आजही पाठिशी घालते. मुलगा रोज डबाही आणून देतो. आता फक्तघरी कधी नेतो, याचीच ही माऊली वाट पाहत आहे. दरम्यान, एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर ‘माऊली’ नावाच्या सामाजिक संस्थेनं या स्मशानातल्या माऊलीच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. मात्र, आजच्या धावत्या युगात आई-वडिलांचं स्थान कमी होत चाललं आहेका, माणुसकी संपत चालली आहे का? असा प्रश्न या घटनेमुळं उपस्थित झला आहे.

Friday, 10 November 2017

गेवराईचा 'जयभवानी' कारखाना भाव देणार - आ. अमरसिंह पंडित

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. ११ __ कोणताही पक्ष, गट, तट असे राजकारण न करता ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू माणून यावर्षी कारखाना सहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत जयभवानी ऊसाला भाव देईल असे प्रतिपादन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. अमरसिंह पंडित यांनी केले.
        जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.श्री शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी चेअरमन जयसिंह पंडित, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, ज्येष्ठ संचालक पाटीलबा मस्के, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. ऊसाची मोळी विधिवत गव्हाण पुजन करून मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात पहिले ट्रक मालक नारायण जाधव, संजय राठोड, बद्रीनाथ गरड तसेच मिनी ट्रॅक्टरचे बाबासाहेब पवार, विलास राठोड, नरवडे रामा यांचा रोख रक्कम देवून आ. पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्ता टेकाळे यांनी यावेळी केले. नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज यांनी आशिर्वादपर मनोगत व्यक्त करून कारखान्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ. अमरसिंह पंडित आपल्या भाषणात म्हणाले की, जयभवानी कारखाना सुरु होवू नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले, मात्र हा कारखाना कसा सुरु होत नाही म्हणून आमच्या कामगारांनी परिक्षण घेतले. आमची नियत साफ आहे, जयभवानीला बदनाम करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे पाप राजकीय विरोधकांनी केले. जयभवानीचा बॉयलर गढीमध्ये पेटला आणि धुर मात्र परळीमध्ये निघाला, राजकीय सुडातून दाखल गुन्ह्यांमुळे जयभवानी आणि पंडित कुटूंबाची बदनामी राज्यभर करण्यात आली, मात्र कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांनी आमच्यावर विश्‍वास व्यक्त करून या कारखान्याच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. आलेल्या संकटावर मात करत तेवढ्याच जिद्दीने कारखाना आज सुरु करत आहोत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि सभासदांच्या विश्‍वासाला कोठेही तडा जाईल असे काम भविष्यात करणार नसल्याची ग्वाही देत जयभवानीची साखर सर्वांना गोड लागो असाही खोचक टोला देखील आ. अमरसिंह पंडित यांनी यावेळी त्यांच्या राजकीय विरोधकांना लगावला. पुढे बोलताना आ.अमरसिंह पंडित म्हणाले की, सध्या जयभवानीच्या कार्यक्षेत्रात ९ लाख मेट्रीक टन ऊस उभा आहे. जयभवानी सुरु करणे हे आमचे कर्तव्य होते. कारखाना सुरु केल्यामुळे आज शेतकर्‍यांच्या ऊसासाठी बाहेरच्या गाड्या कार्यक्षेत्रात फिरत आहेत. जयभवानी बंद असता तर मात्र कोणीही याकडे डूंकून पाहिले नसते. जयभवानीचा गाळप हंगाम कसा बंद करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सत्ताधारी नेतृत्वाने सात वेगवेगळ्या टीम तयार करून अभ्यास सुरु केला आहे, आमची बँक खाती तपासली जात आहेत, मात्र आई भवानीचे आशिर्वाद, शेतकर्‍यांचा विश्‍वास आणि कामगार कर्मचार्‍यांची साथ आपल्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्यामुळे आपण कोणालाही घाबरत नसल्याचे सांगून जयभवानीचा गाळप हंगाम यशस्वी करून इतर कारखान्याच्या तुलनेत जयभवानी शेतकर्‍यांच्या ऊसाला भाव देणार असल्याचे त्यांनी शेवटी ठामपणे सांगितले.
        यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, रमेशलाल जाजू, शेषेराव बोबडे, पांडूरंग गाडे, साहेबराव पांढरे, विठ्ठलराव शेळके, कुमारराव ढाकणे, मदनराव घाडगे, अर्जूनराव खेडकर, शेख मन्सुर शेख मुनीर, अप्पासाहेब गव्हाणे, भास्करराव खरात, राजेंद्र वारंगे, प्रकाश जगताप, विठ्ठलराव गोर्डे, तुळशीदास औटी, शिवाजी कापसे, संदीपान दातखीळ, श्रीहरी लेंडाळ यांच्यासह सरपंच प्रतापसिंह पंडित, उदयसिंह पंडित, चंद्रकांत पंडित, मोहम्मद गौस, अ‍ॅड. एच.एस.पाटील, जालिंदर पिसाळ, भारतराव पंडित, बबनराव मुळे, पांडूरंग कोळेकर, ऋषिकेश बेदरे, दत्ता पिसाळ, आनंद सुतार, अप्पासाहेब खरात, सुभाष मस्के, परमेश्‍वर खरात, मुजीब पठाण, संतोष जरांगे, डॉ. आसाराम मराठे, बळीराम खरात, संभाजी पवळ, मनोहर पिसाळ, अकरम सौदागर, झुंबर निकम, शिवाजीराव गाडे, बंडू कोळपे, डॉ. विजयकुमार घाडगे, बाबुराव काकडे, अ‍ॅड. पी.बी.येवले, अ‍ॅड.स्वप्नील येवले, रोहिदास चव्हाण, विकास सानप, तय्यबभाई, शाम मुळे, डॉ.प्रशांत मुदकोंडवार, संदीप मडके, वैजिनाथ मासाळ यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे सभासद, शेतकरी, वाहन मालक, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले. दरम्यान उपस्थितांचे आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एल. क्षीरसागर यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा बसल्या जागीच.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

आगारात किंवा स्थानकात गाडीची वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांचे हालचित्र पुढील काळात बंद होणार आहे. कारण प्रवाशांना आता गाडीचा ठावठिकाणाच बसल्याजागी समजणार आहे. त्यासाठी एसटीच्या सर्व गाडय़ांमध्ये ‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा’ (व्हीटीएस) बसविण्यात येणार असून एखादी गाडी नेमकी कुठ पर्यंत पोहोचली याचा माग काढता येणे शक्य होईल. गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची अस्वस्थता कमी करण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्यस्थिती समजण्यास मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाकडून गेल्या वर्षभरापासून ‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणे’वर काम केले जात आहे. यंत्रणा बसवताना किंवा ती बसवल्यानंतर येणाऱ्या अडचणी, प्रवाशांना त्याचा कितपत फायदा होईल या सगळ्याची माहिती महामंडळाकडून घेतली जात होती. अखेर तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढले जातील. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे एसटीच्या गाडय़ांचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 18 हजार बस आहेत. यामध्ये साध्या, निम आराम, वातानुकूलित बसचा समावेश आहेत.
एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात वेळेवर पोहोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवरही होतो. त्यामुळे धावत असलेल्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यास मदत होईल. या यंत्रणेमुळे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाई देखील चालक व वाहकांवर करता येईल. या सेवेचा फायदा प्रवाशांनाही मिळणार आहे. स्थानक व आगारात इलेक्ट्रोनिक बोर्डही बसवण्यात येतील. त्यामुळे एखाद्या धावत असलेल्या बसचा त्यावर प्रवाशांना ठावठिकाणाही त्यावर समजेल. एसटी महामंडळाचे मोबाईल तिकीट आरक्षण अॅपही असून त्यातही बदल करुन (व्हीटीएस)सुविधा देण्यात येणार आहे.

अपघात झाल्यास ठावठिकाणा समजणार...

एखाद्या बसला अपघात झाला तर त्यावेळीही व्हीटीएस यंत्रणेची एसटीला मदत होईल. या बसचा ठावठिकाणा समजल्यानंतर तात्काळ मदतकार्य पोहोचवता येईल. तसेच या बसची वाटपाहणाऱ्या अन्य स्थानक किंवा आगारांतील प्रवाशांनाही त्याची माहिती देवून अन्य पर्याय दिला जाईल.
‘व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणे’ला महामंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी लवकरच आदेश काढले जातील. यंत्रणेमुळे बसची स्थिती समजण्यास प्रवाशांना मदत होईल. तसेच एसटीच्या मोबाईल अॅप मध्येही यासाठी बदल केले जातील.– रणजित सिंह देओल (एसटी महामंडळ, व्यवस्थापकीय संचालक)