तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 18 November 2017

विजेच्या धक्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : शहरालगत आसलेल्या व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये कार्यरत आसलेल्या कर्मचा-याला विजेचा धक्का लागुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटणा शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा च्या दरम्यान घडली.
येथील आदिवासी निवासी वसतिगृह आसलेल्या व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये कार्यरत आसलेले कैलास पवार आनंदनगर,लिंबा ता.पाथरी हे पाण्याची लावलेली मोटार बंद करन्यासाठी गेले आसता,त्यांना विजेचा जोरदार शाॅक लागला त्यांना पुढील उपचारासाठी परळी येथील रूग्णालयात नेन्यात आले होते.
विजेचा जोरदार शाॅक लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
परळी येथील रूग्णालयात शेवविच्छेदन करून त्यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळ आनंदनगर येथे अंत्यसंस्कार करन्यात आले.

हिवरखेडा येथील हनुमान मंदिरात आज पासून अखंड हरीनाम सप्ताह सुरू

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे
हिवरखेडा येथील हनुमान मंदिरात रविवार पासून दि 19/ पासून अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे सप्ताहात दररोज सकाळी काकडा.भजन ज्ञानेश्वरि पारायण सकाळी 11/ ते दुपारी 2 ला भागवत कथा रात्री कीर्तन व हरीजागर होणार आहे या सप्ताह नेतूतव व विनापूजन ग्यानबा राव महराज मकोडिकर यांच्या हस्ते होणार आहे भागवंताचे वाचन भिकाजी महाराज मौरगव्हनकर हें करणार आहेत सप्ताहात स्वामी शंकरानंदजी पूरी महाराज सुरेश महाराज बोरखेडिकर.प्रसाद महाराज ब्रमह वाडी उध्वव महाराज चीखलीकर.प्रल्हाद महाराज गिरी भांडे गाव ,माणिक महाराज देहगाव ,भिकाजी महाराज मोरगव्हंकर यांचे कीर्तन होणार आहेत रविवारी दि.26/  सकाळी नऊ ते आकरा ग्यानबाराव महराज मकोडिकर यांचे कल्याचे कीर्तन होणार आहे या पंच कोशीतील भाविक भक्तनी याचा लाभ घ्यावा

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वहिनी
साखरा प्रतीनिधी शिवशंकर निरगुडे

सोलापूर मध्ये तिघा बाईकस्वार विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यु .

_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

सोलापूर मध्ये एका अपघातात मोटार सायकलवर जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.तिघंही आर्किड अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. तिघं जण ग्रंथालयात रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते. मात्र रात्री चहा पिण्याची तलफ आल्यामुळे ते तिघं बाहेर पडले. चहा प्यायला गेलं असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा जवळ हा अपघात झाला. 21 वर्षीय संगमेश माळगे, 21 वर्षीय दीपक गुमडेल आणि आणि 22 वर्षीय अक्षय आसबे यांना प्राण गमवावे लागले.

आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते आपदग्रस्तांना धनादेशाचे वाटप

सुभाष मुळे.....
-------------------
गेवराई, दि. 18 __ शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून आपदग्रस्त कुटूंबांना आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते २ लाख २५ हजार रुपयांची सानुग्रह अनुदानाची रक्कम शेख इसाक यांना देण्यात आली.
     बीड तालुक्यातील व गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कामखेडा येथे सुमारे वर्षभरापूर्वी पाण्यात बुडून एकाच कुटूंबातील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. प्राथमिक (उर्दु) शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्युमूळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. आ.अमरसिंह पंडित यांनी या दुःखद प्रसंगी शेख कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला होता. शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनूतन आपदग्रस्त कुटूंबांना मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले होते. मात्र शासन आणि प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेमुळे सानुग्रह अनुदान मिळण्यास मोठा विलंब झाला. आ. पंडित यांनी हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करून शासनास या कुटूंबियास आर्थिक मदत देण्यास भाग पाडले. दि. १६ नोव्हेंबर रोजी आ. अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते २ लाख २५ हजार रुपयांची सानुग्रह अनुदानाची रक्कम शेख इसाक यांना देण्यात आली. गेवराई विधानसभा मतदार संघातील मौजे कामखेडा, ता.बीड येथील शेख इसहाक यांचे तीन आपत्य शेख अफान, शेख सानिया आणि शेख जिशान यांचा दि. ९ ऑक्टोबर २०१६ रोजी गावाच्या नजीक असलेल्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यु झाला होता. प्राथमिक शाळेत शिकणार्‍या एकाच कुटूंबातील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे कामखेडा व परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सय्यद अहमद खान उर्दु प्राथमिक शाळेत शिकणार्‍या या विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आ. अमरसिंह पंडित यांनी स्वतःच्या यंत्रणे मार्फत सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून संबंधित कार्यालयात दाखल केली होती. आपदग्रस्त कुटूंबियांना शासन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी राज्याचे मंत्री व इतर अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
आघाडी शासनाच्या काळात राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना चालू होती त्यामुळे विमा कंपन्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच पुरविण्यात येत होते. मात्र युती सरकारने ही योजना बंद केली. नावालाच सानुग्रह अनुदान योजना सुरु केल्याचे भासवून अनुदानाची रक्कम मात्र द्यायची नाही असे धोरण या सरकारचे होते. आ.अमरसिंह पंडित यांनी या प्रकरणात विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला, मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या भेटी घेतल्या, या प्रकरणात पाठपुरावा करत असताना बीड जिल्ह्यातील अनेक आपदग्रस्तांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती त्यांना मिळाली, त्यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रकरणात निधी मिळावा यासाठी आ.पंडित यांनी प्रयत्न केले. सुमारे वर्षभरानंतर आ.अमरसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मौजे कामखेडा येथील शेख इसहाक यांच्या आपदग्रस्त कुटूंबियांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांप्रमाणे २ लाख २५ हजार रुपयांची सानुग्रह अनुदानाची रक्कम मंजुर झाली. दि. १६ नोव्हेंबर रोजी आ. अमरसिंह पंडित यांनी स्वतः कामखेडा येथे आपदग्रस्त कुटूंबियांची भेट घेवून योजनेतील अनुदानाच्या रक्कमेचा धनादेश संबंधितांकडे सुपूर्द केला. यावेळी आपदग्रस्त कुटूंबियांना भावना अनावर झाल्या होत्या. त्यांनी आ. अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.
    यावेळी मौजे कामखेडा येथील सरपंच शेख राजु पटेल, माजी पं.स.सदस्य गणेश आण्णा नेवडे, माळापूरी गटाचे राष्ट्रवादी नेते अशोक ढास, माजी सरपंच जीवन पवार, उपसरपंच सुनिल काळकुटे, सादेक पठाण, आयुब शेख, गणेश डोंगरे, शेख शेरू, सतिष मस्के, विठ्ठल लकडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

तळणेवाडी येथील शेतकऱ्यांच्या ऊसाला आग; लाखोंचे नुकसान

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 18 __ तालूक्यातील तळणेवाडी शिवारातील धोंडराई येथील शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी आलेल्या व तोडणी चालू असलेल्या उभ्या ऊसाच्या फडाला अचानक आग लागल्याची घटना शनिवार, दि. १८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
        या झालेल्या आगीचे कारण याच शेतामधून गेवराई तालुक्याच्या उमापुर येथील ३३ के. व्ही. सबस्टेशनला जाणारी लाईन ही सदरील शेतकऱ्यांच्या शेतामधून गेलेली आहे. शेतकऱ्याचा ऊस तोडणीचे काम चालू असतानाच हि घटना घडली दरम्यान इतर बारा एकरावर ऊस जळण्यापासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. सदर शेतकरी धोंडराई येथील रहिवासी असून त्यांच्या जमीनी तळणेवाडी शिवारात असल्याने सर्वे नं.  २३८ असून हि आग विजेच्या तारामधून शॉर्टसर्कीटने लागली असल्याचे बोलले जाते.
       या घटनेची माहिती परिसरात कळताच धोंडराई जिल्हा परिषद गटाचे सदस्य यांनी भेट घेऊन आग विझवण्यास मदत केली. विद्युत विजवितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी यांना बोलावून पाहणी करण्यात आली. धोंडराई येथील तलाठी जितेंद्र लेडांळ यांनी या घटनेची माहिती घेऊन घटनेचा पंचनामा करुन शेतकऱ्यांस नुकसान भरपाई करण्यासाठी पुढचे पाऊल उचलावे अशी मागणी करण्यात आली आहे.  यामध्ये प्रल्हाद मंडाजी कदम यांचे दोन एक्कर, विश्वंभर मंडाजी कदम यांचे दिड एक्कर, विलास सखाराम कदम यांचा एक एक्कर असा एकूण पाच एक्कर अधिक ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार.


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

कोकण रेल्वे मार्गावर आधी उत्तर महाराष्ट्र जोडण्यासाठी मनमाड (नाशिक) - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. 00128 मडगांव - कोल्हापूर अशी नवी विशेष गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी गुरुवारी धावेल. आठवड्यातून ही एकदाच गाडी धावणार आहे. या गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावर नवी विशेष गाडी सुरु झालेय. याआधी मनमाड - सावंतवाडी अशी विशेष गाडी आठवड्यातून शनिवारी या दिवशी धावणार आहे. मडगांव - छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी विशेष गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी मडगाववरुन 21 नोव्हेंबरला 2017 पासून संध्याकाळी 7.40 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोल्हापूरला 5.45 वाजता पोहोचेल. या गाडीला करमाळी, थिविंम, सावंतावाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वररोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज असे थांबे असणार आहेत. ही गाडी 15 डब्ब्यांची असून 12 स्लिपर असून यात पॅन्ट्रीकार असणार असून एसएलआरचे (पार्सल डब्बा) 2 डब्बे असणार आहे.

734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान


मुंबई, दि.18: राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
          
जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील.       नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबर 2017 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2017 असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी 3 पर्यंत असेल. 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
       
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.

पवार-ठाकरेंच्या सल्ल्यानेच सरसकट कर्जमाफी नाही: सुभाष देशमुख


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे, पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सक्षमीकरण कार्यशाळा सांगली मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते  बोलत होते. यावेळी त्यांनी ज्यांनी सहकार बुडवला त्यांनी आमच्यावर सहकार बुडत असल्याचा आरोप करु नये, अशी टीका विरोधकांवर केली.

लातूर मधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यु.


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

लातूर-निलंगा बस व एका ट्रकची चलबुर्गा पाटीजवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. याअपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. शनिवार (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की बसचा पूर्ण चुराडा झाला आहे. लातूर येथून दुपारच्या सुमारास निघालेली बस क्रमांक एम एच 20 डी 9611 ही दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ पोहोचली. दरम्यान लामजना येथून निघालेला ट्रक क्रमांक एम एच 13 एके 4831 आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला ,तर 16 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी औसा, लातूर येथी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे मच्छिन्द्र काळे यांनी दिली. अपघातात चालक साबणे, वाहक ज्ञानेश्वर बिराजदारही गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

फलक नसल्याने दुभाजकावर अपघाताचे प्रमाण वाढले.. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष..

   प्रतिनिधि : भोकरदन

  भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवर असलेले दुभाजकावर एक सोडून तीन चार वेळेस या दुभाजकावर ट्रक व वेगवेगळे वाहन राञीच्यावेळी दुभाजकाचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहे. तरी नगर पालिका अधिकारी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. व वेगवेगळ्या वृत्तपत्रानी या संबंधित वेळोवेळी या विभागला जागे करण्याचा काम केला तरी संबंधित विभाग याकडे लक्ष दयाला तयार नाही.असाच अपघात  शनिवारी सकाळी ४ वाजता घडला मुंबई हुन नागपुरकडे जाणारा ट्रेक महा.०४ डी डी ७१६७ हा सिल्लोड रोडवरील दुभाजकावर चढ़ला हा अपघात इतका भयंगकर होता की ट्रकचा पुढचा टायर रोडच्या बाजूला जाऊन पडला . सुदैवाने  कोणतीच जीवित हानि झाली नाही,  ट्रक ड्रायव्हर शेख अनीस यास विचारणा केली असता,त्याने सांगितल की जीवित हानि झालेली नाही.व अपघाताबद्दल विचरले असता त्याने सांगितल की रात्रीच्यावेळी दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे व दुभाजकवर रेडियम,सुचना फलक वगैरे असे कहिच दुभाजकावर नसल्याने हा अपघात झाला तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दुभाजकावर रेडियम  दुभाजक दर्शवणारे फलक लावावे अशी नागरिकांची मागणी आहे.

     लुक्यातील प्रेरक मोठ्या संख्येने हजर होते.

     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯

भोकरदन येथिल भर वस्थीतुन दोन मोटार साईकल चोरी...पोलिसांचे दुर्लक्ष

   प्रतिनिधी : भोकरदन

    भोकरदन शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले असुन ,दोन दिवसात दिवसाढवळ्या दोन हिरो होंडा कंपनीच्या मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत.

    अधिक माहिती अशी भोकरदन येथिल भाग्यनगर भागातील शिक्षक निवृत्ती येवले यांनी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी चोरट्यांनी संधीचा फायदा घेत एम.एच.२१ , एच १४०३ ही हिरो होंडा कंपनीची गाडी चोरून नेली,
  तसेच याच काॅलनीतील रहिवाशी सतिष कोलते यांची हिरो होंडा कंपनीची एम.एच.२१ एच ३९०३ हि गाडी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी चोरून नेल्याने नागरीकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन ,पोलिस यंञनेवर नागरीकांची तिव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.

      
     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════

न्यायमुर्तींच्या स्कॉटिंग वाहनाला गेवराईकडे येताना ट्रकचा अपघात

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. 18 __ औरंगाबाद ते सोलापूर क्र. 211 या महामार्गावरील डोणगाव पाटीजवळ पोलीस स्कॉटिंगची गाडी व ट्रकची समोरा समोर धडक होऊन तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
          याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद उच्च न्यायालयचे न्यायमुर्ती घुगे हे औरंगाबादहुन बीड जिल्ह्य़ातील गेवराईकडे येत असतांना डोणगाव फाट्याजवळ न्यायमूर्ती घुगे यांच्या गाडीच्या पुढे जालना पोलीस स्कॉटिंग ची टाटा सुमो गाडी क्र. एम. एच. २१ एल. ०४२२ गाडी जात असताना समोरुन येणारा ट्रक क्र. टी. एन. ४८ पी. ६३९९ यांची समोरा समोर जोराची धडक होऊन अपघात झाला.  या अपघातात चालक गंगाधर देविदास गोल्डे (वय ३१), अनिल देवराव घेवंदे (वय ४५),भीमराव रामसिंग जाधव (वय ५५) हे तिघे जखमी झाले असून या जखमींना पाचोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

Friday, 17 November 2017

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वालूर शहर अध्यक्षपदि अबेद रफिक कूरेशी यांची निवड


अनवर पठान,
प्रतिनिधी,वालूर.

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वालूर शहर अध्यक्षपदि वालुर अबेद रफिक कूरशी यांचि नुकतीच नियुक्ती करण्यात अलि आहे.
  या बाबत त्यांना MMYP संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष स.अहमद अन्सारी यांनी त्यांना सेलू तालूकाध्यक्ष अनवर पठान यांच्या शिफारसिने नूकतीच नियुक्ती करण्यात अाली आहे.
   या नियुक्ती पत्रामधे MMYP   संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.अजहरुदिन शेख.यांच्या आदेशानुसार की संघटनेचे ध्येय धोरणे ग्रामिण भागात संघटनात्मक काम वाढवुन संघटना बळकट करण्याचे काम करावे सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या निवडी बद्दल शे.कलिम. सर्फराज पठान. अनवर पठान. बाबा टेलर. नासेर पठान. ईदरीस कूरेशी.
अादिंनी अभिनंदन केले.

अनवर दिलावर पठान
तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी .प्रतिनिधि.वालुर.
मो.नं.8888375846

धर्मांतरासाठी पतीचा दबाव, मुंबईकर मॉडेलचा आरोप.


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

मुंबईत एका मॉडेलनं आपल्या पती विरोधात गंभीर आरोप केला आहे. पतीधर्म परिवर्तनासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप मॉडेल रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात बांद्रा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रश्मी शहबाजकर यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी आसिफ शहबाजकरशी झाला होता. त्यावेळी त्यानं पत्नीला लग्नानंतरही तू हिंदूच राहशील, धर्म परिवर्तनासाठी कुठलाही दबाव टाकण्यात येणार नाही, असं सांगितलं. लग्नानंतरच्या काही वर्षांमध्ये मात्र आसिफनं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि नकार दिल्यानंतर बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित मॉडेल रश्मीनं केला आहे. मुंबईतील बांद्रा परिसरातल्या न्यू गार्डन व्ह्यू बिल्डींग मध्ये रश्मी शहबाजकर राहतात. तिथूनही हाकलून लावण्याची धमकी पतीने दिल्याचा आरोपत्यांनी केला आहे. जेव्हा रश्मींनी धर्मांतर केलं नाही, तेव्हा आसिफने दुसरं लग्न केलंआणि त्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडलं, असा दावा रश्मी यांनी केला आहे. दुसऱ्या पत्नीने धर्मांतर करत मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती आहे. पोलिसांनी कलम 354, 509, 324, 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिस हे ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण तर नाही ना, याचा शोध घेत आहेत.

श्रीलंकेच्या भेदक मा-यापुढे भारताचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला.

_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

श्रीलंकेच्या भेदक मा-यापुढे पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला. चेतेश्वर पूजाराच्या (52) अर्धशतकाचा अपवाद वगळता अन्य आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. वृद्धीमान सहा (24), रविंद्र जाडेजा (22) आणि मोहम्मद शामी (24) यांनी थोडाबहुत प्रतिकार केल्याने भारताला 172 पर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून लकमलने सर्वाधिक चार, गामाजे, शानाका आणि परेराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.  पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-श्रीलंका पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे दोन दिवस वाया गेल्यानंतर आज शनिवारी तिस-या दिवशीही भारतीय फलंदाजांना  संघर्ष करावा लागला. कालच्या पाच बाद 74 वरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर भारताला तीन धक्के बसले. काल 47 धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पूजारा अर्धशतक झळकवल्या नंतर बाद झाला. गामाजेने (52) धावांवर त्याला बोल्ड केले. विकेटकीपर वृद्धीमान सहाला (29) धावांवर पेरराने मॅथ्यूज करवी झेलबाद केले. रविंद्र जाडेजाला (22) धावांवर परेराने पायचीत पकडले. भारता तर्फे सहा आणि जाडेजाने सातव्या विकेटसाठी सर्वाधिक 48 धावांची भागीदारी केली. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असल्याने भारतीय फलंदाजांचा संघर्ष सुरु आहे. भारताकडून फक्त चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजां विरुद्ध  संघर्ष केला. पहिल्या दिवशी 11.5 तर दुस-या दिवशी 21 षटकांचाच खेळ झाला. पहिल्या दिवशी सुरंगा लकमलने भेदक मारा केल्यानंतर शुक्रवारी वेगवान गोलंदाज दासून शनाकाने सकाळच्या सत्रात 23 धावांत दोन गडी बाद केले. अजिंक्य रहाणे(4)आणि रविचंद्रन अश्विन(4)हे त्याचे बळी ठरले.