तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 25 November 2017

सेनगांव येथील आप्पास्वामी मंदीरात अखंड हरीनाम, श्रीमद् भागवत कथेचे आयोजन


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- शहरातील ग्रामदैवत श्री आप्पास्वामी महाराज मंदीरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आज दि.२६ नोव्हेंबर रविवार ते दि.०३ डिसेंबर रविवार पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. ह्या सोहळ्याचे आयोजनाचे हे २४ वे वर्ष आहे.
या सातदिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असुन यामध्ये अनेक नामंकीत गुणवंत मंडळीचा समावेश आहे. सातदिवस चालणारे दैनंदिन कार्यक्रम सकाळी ०४ ते ०६ काकडा भजन, ०६ ते ०९ ज्ञानेश्वरी पारायण, ०९ ते ०१ गाथा पारायण, दुपारी ०२ ते ०५ भागवत कथा,  सायंकाळी ०६ ते ०७ हरीपाठ, रात्री ०९ ते ११ हरीकीर्तन नंतर हरीजागर होईल. अखंड हरीनाम सप्ताहामध्ये श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते श्री ह.भ.प.भिकाजी महाराज मोरगव्हाणकर यांच्या सुमधूर वाणीतुन संगित कथा होणार असुन सात दिवस चालणा-या हरीकीर्तनात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार श्री ह.भ.प.मोहन महाराज शिवुरकर यांचे किर्तन दि.२६ नोव्हेंबर रविवार रोजी रात्री ०९ ते ११, श्री.ह.भ.प.अँड.नारायण महाराज सोनखेडकर यांचे किर्तन दि.२७ नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री ०९ ते ११, तरुण किर्तनकार श्री ह.भ.प.पंकज महाराज सेनगांवकर यांचे किर्तन दि.२८ नोव्हेंबर मंगळवारी रात्री ०९ ते ११, श्री ह.भ.प.शंकर महाराज डोईफोडे वडगावकर यांचे किर्तन दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री ०९ ते ११, श्री ह.भ.प.ज्ञानोबा माऊली दुधगावकर यांचे किर्तन दि.३० नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री ०९ ते ११, श्री ह.भ.प.रखमाजी महाराज देवगावकर यांचे किर्तन दि.०१ डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री ०९ ते ११, श्री ह.भ.प.अशोक महाराज तळणीकर यांचे किर्तन दि.०२ डिसेंबर शनिवार रोजी रात्री ०९ ते ११ होणार आहे. दि.०३ डिंसेबर रविवार रोजी सकाळी १० ते १२ श्री ह.भ.प.पदमाकर महाराज देशमुख अमरावती यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी या सातदिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथेचे लाभ सेनगांव परीसरातील भाविकांनी भक्तांनी घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नियोजक श्री गणेश माऊली सेनगांवकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण:- श्री.आप्पास्वामी महाराज मंदिर सेनगांव ता.सेनगांव जि.हिंगोली

मोहजाबंदी वनपरिक्षेत्राला भेट-शैक्षणिक उपक्रम

रिसोड प्रतिनिधी
महेंद्रकुमार महाजन
२५/नोव्हेंबर

मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे.निसर्गाला जखमी करुन मानवाला कसे काय जगता येईल?निसर्गावर प्रेम करा.त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहकार्य करा.अन्यथा पृथ्वीवर माणूसच उरणार नाही.आज हे फक्त पुस्तकात किंवा वृत्तपञातच वाचायला मिळते
                           पण आज निसर्गाचे रक्षण मानवाच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे.विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्व पटवुन देण्यासाठी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील वर्ग ११वी व १२ वी कला शाखेतील विद्यार्थ्याचे २५ नोव्हेंबर रोजी मोहजाबंदी वनपरिक्षेत्राला एक दिवशीय भेटीचे आयोजन करण्यात आले.
                   यावेळी वन क्षेत्रास जातानां प्राचार्य डि.एन.अघडते सर,पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर उपस्थित होते.तयारीसाठी श्री.कैलास शर्मा व श्री.गजानन पुरी व मुळे मामा यांनी मदत केली.
         मोहजाबंदी वनपरिक्षेत्र भेटीचे आयोजन प्रा.शरदचंद्र टेमधरे,प्रा.समाधान गायकवाड,प्रा.रमेश टाक व कला शाखेचे विद्यार्थी यांनी केले.जवळपास १०ते१२ कि.मी.चा पायी प्रवास करुन निसर्गाची विविध माहीती जाणुन घेतली.निसर्गरम्य वातावरणात असलेले पंचक्रोशीतील आराध्य दैवत परमपुज्य बाळु मामा यांचे दर्शन घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतला.भोजनानंतर कु.जया गिरी,कु.रुपाली थोरात व प्रा.समाधान गायकवाड यांनी गित गायन करुन मनोरजंन केले.त्यानंतर प्रा.टेमधरे,प्रा.गायकवाड व प्रा.टाक यांनी निसर्गाविषयी माहीती देऊन निसर्ग वाचविण्यासाठी सामुहीक शपथ घेण्यात आली.
          निसर्गरम्य आनंदमय वातावरणात निसर्गरम्य वातावरणातुन विद्यार्थ्याची बाहेर येण्याची इच्छा नसतानां सुध्दा परतीचा प्रवास सुखरुप झाला.शैक्षणिक क्षेत्रामधील प्रत्यक्ष भेटीचा उपक्रम अनेकदा दुर्लक्षित होतानां दिसत असतानां श्री.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप   येथील शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी  9960292121

ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मांडणार - आ.अमरसिंह पंडित

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. २५ __ ग्राम पंचायत कर्मचारी हे ग्रामीण भागातील जनतेला प्रामाणिकपणे सेवा पुरवितात मात्र मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनामुळे कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना मिळणार्‍या श्रेणीप्रमाणे वेतन व इतर लाभ मिळण्याच्या मागणीसह ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रश्‍न विधान परिषदेत मांडू असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी दिले.
  राज्यातील २७ हजार ग्राम पंचायती मध्ये सुमारे ६० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचार्‍यांच्या धर्तीवर हे कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला सामाजिक सुविधा प्रामाणिकपणे पुरवितात. कर वसुली, पाणी पुरवठा, नाले सफाई व इतर कामे त्यांना करावी लागतात. शासनाच्या विविध योजना ग्रामीण जनते पर्यंत पोहोचविण्याचे काम याच कर्मचार्‍यांना करावे लागते. यापूर्वी आघाडी शासनाने या कर्मचार्‍यांना किमान वेतन लागू करून शासकीय सेवेत कायम केले होते, परंतु या शासन निर्णयात काही त्रुटी राहिल्याने या कर्मचार्‍यांना कामगार संबोधून कंपनी मध्ये काम करणार्‍या व मालकास उत्पादन करून देणार्‍या कामगारांना दिल्या जाणार्‍या वागणुकी प्रमाणे, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांनाही शासनाकडून वागणुक मिळत आहे. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांची शनिवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी भेट घेवून संघटनेच्या मागण्यांचे निवेदन दिले. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचे प्रश्‍न विधान परिषदेत मांडून कर्मचार्‍यांच्या मागण्यांना न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
       याप्रसंगी ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव रमेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख यासिन, गेवराई तालुकाध्यक्ष नारायण जाधव, पाटोदा तालुकाध्यक्ष कैलास मोरे, शिरुर तालुक्याचे सचिव मधुकर भंडारे यांच्यासह तुकाराम शिंदे, जालिंदर इथापे, अशोक बांदल, रंजित सापटे, आर.टी.शिंदे, बबन वालेकर, नंदु गुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे प्रश्‍न समाजवून घेवून प्रधान सचिव दिपक म्हैसकर यांच्या समितीने शासनाला दिलेल्या अहवालानुसार कर्मचार्‍यांना वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन व उपदान लागू करण्याकरीता पाठपुरावा करून ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचा प्रश्‍न विधान परिषदेत मांडण्याचे आश्‍वासन दिल्याने संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष नारायण जाधव यांनी आ. पंडित यांचे आभार व्यक्त केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

सेनगांव येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची भव्य मिरवणुक व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- आदीवासी समुदायाचे आदरस्थान असलेले क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंत्ती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन प्रथमच सेनगांव शहरात दि.२६ नोव्हेंबर रविवार रोजी करण्यात आले आहे.
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंत्ती असुन प्रथमच आदीवासी समाजबांधवाकडुन सेनगांव शहरात जयंत्तीनिमित्त भव्यदिव्य मिरवणुक व आदीवासी समाज बांधवांना मार्गदर्श आयोजीत केले असुन हि मिरवणुक सेनगाव शहरातील साई पेट्रोल पंपापासुन सुरूवात होऊन ती सेनगाव टि पाँईन्ट,पोलीस स्टेशन,आप्पास्वामी प्रवेशव्दार, आजेगांव पाँईन्ट,तहसिल कार्यालय रोड परत साई पेट्रोल पंपा जवळ येणार असुन येथे आदीवासी समाजबांधवाना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन कळमनुरी विधानसभेचे आमदार डाँ.संतोषजी टारफे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद चे प्रा.चंद्रकांत कोकाटे हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य डाँ.सतिष पाचपुते,यवतमाळ जि.प.च्या माजी अध्यक्षा डाँ.आरतीताई फुफाटे, आदीवासी कर्मचारी हिंगोली जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कुरुडे, भगवानराव कोकाटे, शंकर शेळके हे राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्य देवराव जाधव, विठ्ठल घोगरे, माजी जि.प.सदस्य भगवान पोटफाडे, पं.स.सदस्य दशरथ साबळे, ज्ञानबाराव धोतरे, संतोष पोटफाडे, ऊत्तमराव साबळे, माजी पं.स.सदस्या निलाबाई येळणे, बबन डुकरे, सेनगांव च्या नगरसेविका चांगुनाबाई गायकवाड, नागोराव खंदारे, डाँ.कृष्णा पिंपरे, मारोती बेले हे उपस्थित राहणार आहेत. तरी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंत्तीनिमित्त भव्यदिव्य मिरवणुकीस व मार्गदर्श सोहळ्याला सर्व समाजबांधवानी हजारोच्या संख्येत उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक तथा आदीवासी कर्मचारी संघटना सेनगांव शहर व आदीवासी युवक कल्याण संघ तालुका सेनगांव च्या वतीने करण्यात आले आहे.

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
तेजन्युज हेडलाईन्स सेनगांव तालुका प्रतीनीधी
मो.नं.व्हाँट्स अप- 9604948599

डासाळा येथील निराधार महिलेच्या घरकुलाचे अखेर भुमिपुजन 


शिवसेनेचे जि.प.गटनेते खराबे पाटील यांच्या प्रयत्नाला यश. 

 सेलु: प्रतिनिधि , 

 तालुक्यातील डासाळा येथील निराधार व अपंग  महिला भागीरथीबाई धुमाळ याना काही तांत्रिक अडचणी मुळे मंजूर झालेल्या घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने त्या घरकुला पासून वंचित होत्या . सदरील प्रकरणा मध्ये जी. प. सदस्य तथा शिवसेना गटनेते राम खराबे पटील यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेली   तांत्रिक अडचण दूर करून शनिवारी दि २५ नोव्हेंबर  रोजी सदरील माहिलेच्या घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले या वेळी प. स. सदस्य गोपाळ कदम  ग्रामसेवक पाचलेगावकार , अभियंता रमेश गिरी ,दता कदम, राहुल कदम , एकनाथ गजमल, बाबूलाल शेख , ग्रामपंचयात सदस्य रशीदभाई व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

   जमाते -ए-इस्लामी हिंद भोकरदन  याच्या वतीने सोयगांव देवी वाचनालय ला दिव्य कुरान व इस्लामी साहित्य भेट

 प्रतिनिधी : भोकरदन

   सोयगाव देवी गावातील युवकांनी लोकवर्गनितुन वाचणालयाला सुरवात केल्या व दैनिक दिव्य मराठी अंकात या वाचणालयाविषयी बातमी वाचुन भोकरदनचे येथिल  जमात ए इस्लामी शाखेच्या वतीने २५ पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

 जमात ए इस्लामीचे शहराध्यक्ष सय्यद अश्फाक व भोकरदनचे नगर सेवक अब्दुल कदीर (बापु),विलास पवार, यांच्या  हस्ते विविध धार्मीक व वैज्ञानीक तत्थ असलेल्या पुस्तकांचा संच वाचणालयास देण्यात आला. यामुळे मुस्लीम धर्मातील तत्वे व कुराणाची ओळख वाचकांना होण्यास मदत होनार असुन यापुढेही अशीच मदत करणार असल्याचे पदाधिका-यांनी सांगीतले. वाचणालयाच्या व गावकर्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी माजी सरपंच दादाराव राऊत,ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर पडोळ,तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम राऊत,गट समन्मवयक एस.बी.नेव्हार,आमोल सहाने,नारायण सहाने सह ग्रामस्थ व युवक मोठ्या प्रमानात उपस्थित होते.

रिसोड बजाज फयनान्स येथे सुरक्षित रोजगारांची फसवनुक रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

रिसोड प्रतिनिधी 
महेंद्रकुमार महाजन

निजापुर येथील रहवासी विष्णु रतन पुरी यांची रिसोड येथील बजाज फायनान्स कर्यरत असलेले एरिया सेल्स एक्झे अधिकारी इरफान उस्मान शाहा यांनी आधार कार्ड द्या मी तुम्हाला संडासची स्किम देतो असे तालुक्यातील दिडशे ते दोनशे लोकांची फसवनुक करुण रिसोड बजाज फायनान्स लाखो रुपये चा घोटाळा केला आहे . आशी तक्रार विष्णु रतन पुरी यांनी रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आली आहे. या तक्रारी मध्ये असे म्हटले आहे कि मी निजामपुर येथील रहवासी असुन हिंगोली येथे खाजगी कंपनी मध्ये काम करतो मी बजाज फायनान्स रिसोड कंपनी मार्फत काही वस्तु केल्या होत्या परंतु  7 ते 8  महिण्यापासुन एकही
वस्तु मी बजाज फायनान्स रिसोड मार्फत खरेदी केलेले नाही. परंतु माझ्या नावावर कंपनीचे नवीन दोन खाते दाखवून या वर वाटर फ्युरीफाय लोन किमंत 
18999/व दुसरे खाते यावर पॅनोसोनिक एल. ई. डी. लोन 24900 एवढे असलेले दोन खाते स्वप्निल इलेक्ट्रॉनिक केनवड लखन खराटे या डिलरकडुन उचलले वस्तु माझ्या नावावर आहेत त्यांच पैसे भरत नसल्यामुळे मला फोन वरुण कळविण्या आले त्या नंतर मी इरफान शहा याला फोन वरुण या बाबत विचारणा केली असता हा प्रकार लक्षात आला 

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी गजानन सदार यांना बजाज फायनान्स कडुन कर्ज मिळवुन देतो अशी अमीश दाखवून त्याच्या नावाने फ्रिज वाॅशिंग मशिन खोटे बिल दाखवून फसवनुक केली होती 

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड प्रतिनिधी  9960292121

Friday, 24 November 2017

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाभर " हल्लाबोल " मोर्चे -आ दुर्रानी

प्रतिनिधी
परभणी - खोटे आमिषे दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या भाजपा - शिवसेनेच्या ढोंगी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस दि 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर " हल्लाबोल " मोर्चे काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुरानी यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्या बैठकीत दिली, या बैठकीला आ विजय भांबळे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष , प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती ,         कर्जमाफी योजनेचा उडालेला बोजवारा, हमीभाव योजनेअभावी  शेतीमालाची सुरू असलेली लूट, बोगस बी टी बियाण्यामुळे उध्वस्त झालेला शेतकरी, कृषिपंपाच्या वीज तोडणी प्रकरणी सुरू असलेली दडपशाही, पीककर्ज प्रकरणी बँकांचा नकार, प्रलंबित पीकविमा व शेतकऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रश्नी भाजपा - शिवसेनेचे शासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यएच्या प्रकारात दिवसोनदीवस मोठी वाढ होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, हा असंतोष व्यक्त करण्यासाठी दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी " हल्लाबोल " मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,       ... सोमवार दि 27 नोव्हेंबर रोजी सोनपेठ व मानवत तर मंगळवार दि 28 नोव्हेंबर रोजी पाथरी, पालम व गंगाखेड तसेच बुधवार दि 29 नोव्हेंबर रोजी पूर्णा व परभणी तालुक्यातील तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चे काढण्यात येणार आहेत, तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोर्चाच्या यशस्वीते साठी प्रयत्न करीत असल्याचे आ दुरानी यांनी सांगितले . यावेळी राष्ट्रवादी चे स्वराजसिंग परिहार, बाळासाहेब जामकर, शांतिस्वरूप जाधव, जलालुधिन काझी, बापूराव घटोळ शाहजी राव देसाई, यांच्यासह अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थित होती

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बोरकर तर उपसभापती पदी सौ.पाचरणे बिनविरोध


रिसोड प्रतिनिधी
महेंद्रकुमार महाजन 

रिसोड कृषी उत्पनं बाजार समितीच्या सभापती पदी लोकनेते अनंतरावजी देशमुख यांचे कट्टर समर्थक भगवानराव बोरकर यांची तर  उपसभापती पदी माजी  आमदार विजयराव जाधव यांचे कट्टर समर्थक राहुल पचारणे यांच्या मातोश्री  सौ.पुष्पाताई पाचरने यांची बिनविरोध निवड झाली.गजानन पचारणे यांनी राजीनामा दिल्यामुळे सभापती कोण होणार हा चर्चेचा विषय झाला होता.निवडीचा आनंदोत्सव   मा.भाऊसाहेब यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या परिसरात करण्यात आला. नवनिर्वाचिताचा सत्कार करताना माजी खासदार अनंतराव देशमुख व माजी आमदार विजयराव जाधव व युवा नेते अँड.नकुलदादा देशमुख,डॉ अरुण देशमुख,विनोद जोगदंड,जी प सदस्य सुभाष बोरकर,माजी पं स सभापती सुभाष खरात,बाळासाहेब खरात, गजानन पचारणे,राहुल पचारणे सह आघाडीतील नेते, पदाधिकारी सर्व संचालक व अँड.नकुलदादा देशमुख मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

महेंद्रकुमार महाजन रिसोड प्रतिनिधी
9960292121

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द !! दरम्यान एक महिन्यासाठी स्टे

जालना/प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सुनावणी झाली. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.

दरम्यान, यावर एक महिन्याचा स्टे दिला असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

जिंतुरात झाली व्यापारी कार्यशाळा


प्रदिप कोकडवार
जिंतूर
व्यापार्यानी सुरक्षित राहण्यासाठी सतत बदल करत राहिले पाहिजे
--पोलीस निरीक्षक
प्रवीण मोरे यांनी पोलीस ठाण्यात आयोजित व्यापारी बैठक कार्यशाळेत बोलताना  विचार मांडले
जिंतूर शहरातील व्यापार्यांच कार्यशाळा च आयोजन आज पोलीस ठाणे जिंतूर येथे पोलीस प्रशासन कडून करण्यात आल होते
शहरातील सर्व क्षेत्रातील व्यापारी या वेळी हजर होते
व्यापार हा धर्म असून यातून योग्य मार्गांन उत्पन्न मिळून कुटुंब चरितार्थ चालवणे हे व्यापार्याच कर्तव्य आहे
सुरक्षे सह स्वरक्षणा साठी प्रवीण मोरे यांनी अनमोल असं मार्गदर्शन केल
कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी व्यापारी बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले
अनेक व्यापारी यांनी आपले अडचणी मनोगत व्यक्त केले

या वेळी जिल्ह्या व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल
जिंतूर ता व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड माजी न प अध्यक्ष सखाराम चिद्रवार एड मनोज सारडा या वेळी उपस्थित होते आभार शकील अहेमद यांनी मानले

रंगभरण स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी,वालूर.
सेलू - नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेलू शहराचे प्रथम नगराध्यक्ष  श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 24 .11. 2017 रोजी भव्‍य रंगभरण स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नू वि  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायणजी लोया यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर संस्थेचे सचिव डि के देशपांडे, सहसचिव जयप्रकाशजी  बिहानी, कार्यकारणी सदस्य किशोर जी मालानी  प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी , ना.तु. कुलकर्णी, मुख्याध्यापक के.व्ही.वाघमारे,शोभा चाटे, नरेंद्र पाटील ,अनिल रत्नपारखी यांची उपस्थिती होती .ही स्पर्धा गेल्या दहा वर्षापासून श्रीरामजी  भांगडीया यांचे कार्य नवीन पिढीस माहीत व्हावे यादृष्टीने हि स्पर्धा आयोजित केली जाते .या वर्षी या स्पर्धेस सेलू शहरातील 800 च्यावर स्पर्धकांनी सहभाग नाेंदवला होता.तसेच सर्व स्पर्धकांना प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी खाऊचे वाटप केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी अशोक गाजरे स्पर्धा संयोजक आर.डि कटारे.डि, एफ के. गावित,
रो.सो.मोगल ,सौ यु.बि.लड्डा,सु.ल.जोशी के.डी.पल्लेवाड,मुळी सर,रोडगे सर, माळवे सर ,डि डि सोन्नेकर , नाईक सर, सौ.सुभेदार,सौ,आरती कदम, सौ.सूर्यवंशी ,काळे आर एस,महामुनी डि पि,पानझाडे बी आर, गिरी आर बी, चीनके एस, पंडित एआर ,खाटीकमारे सर, कदम एल एम, भुमरे एस बी, गोरे एम डि,एस वाय मुळी, एस एस  पाटील ,नाईक किशोर,, जोशी आर ए,पठाण जावेद खॉं,अमन पाशा सय्यद, पाटणकर, केशव  डहाळे, दिलासा विलास आवचार, पटले ,घायाळ,, धुमाळ आदीनी परिश्रम घेतले .  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डि कटारे यांनी केले, सूत्रसंचालन अनंतकुमार विश्वंभर यांनी तर आभार एफ के गावित यांनी मानले.