तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 2 December 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________
नंदु नाईक, मुंबई

= भारत - श्रीलंका कसोटी सामना - विराट कोहली (156*) व मुरली विजयच्या (155) यांच्या शतकांच्या जोरावर भारताच्या पहिल्या दिवशी 4 बाद 371 धावा.

= 'देशाबाहेर ख्रिश्चन आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू सांगणारे राहुल गांधी ' -  योगी आदित्यनाथ

=  नागपुर मधील उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारा हंगामी कर्मचारी निलंबित.

= तामिळनाडू - केरळ राज्यांनंतर आता ओखी चक्रीवादळ वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर येण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा.

= उत्तर कोरियाने  डांस - फटाके फोडुन केली क्षेपणास्त्राची चाचणी.

= मोहाली - घरातून अपहरण करुन तरुणीवर सामूहिक बलात्कार, मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं

= मुंबईत विश्वसुंदरी मानुषी छिल्लरची जंगी मिरवणूक जंगी मिरवणुक काढण्यात आली.

= प्रवीण महाजनांचा मृत्यू नैसर्गिक नाही, मलाहीजीवे मारण्याची धमकी - सारंगी महाजन

= काँग्रेसच्या तरुण नेत्यांना राजनाथसिंहचा प्रश्न , जर जीएसटी गब्बर सिंह टॅक्स आहे तर मग संसदेत पाठिंबा कशाला दिला ?

= प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.

= पद्मावती चित्रपट महिलेवर आधारित असल्यानेआम्ही बंदी घातली आहे, गुजरात मध्ये आम्ही महिलांचा आदर करतो - मुख्यमंत्री विजय रुपानी.

= अबू आझमी व मनसेची जशी सेटिंग होती तशीच आता संजय निरुपम-राज ठाकरे यांनी केलेली सेटिंग आहे - बच्चू कडु

= वाट्सअप ग्रुपवर पुढे मैसेज पाठवण्याचा अधिकार एडमिनला राहणार.

= कोल्हापुरातील बागल चौकात पत्नीची वारंवार छेड काढण्याच्या कारणावरून चाकूने भोसकून केला एकाचा खून, समीर बाबासो मुजावर असे खून झालेल्या तरुणाचे नाव.

= कोल्हापूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सासरे अण्णा ठाकूर (वय 90) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या आगामी दौ-या अगोदर प्रशासनाची रंगित तालीम.

राजेश वालकर

पूर्णा रेल्वे स्थानकावर  त्रिकालज्ञ रभा यांचा पाहणी दौरा..
रेल्वेच्या पूर्णेतील उपविभागीय कार्यालयाची काही चौकशी..

पूर्णा  : नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांनी  शनिवार दि.२ डिसेंबर रोजी रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांच्या आगामी दौ-याच्या पार्श्र्वभूमीवर  पाहणी केली या दौ-यात पूर्णा उप विभागातील रेल्वेच्या सर्व कार्यालयासह , स्वच्छता,सुरक्षा, रेल्वे परिसरातील मोकळ्या जागेवरील अतिक्रमणाची बारकाईने पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षेसह प्रवाशांना अडचण ठरत असलेल्या का आढावा घेतला
   द.म.रेल्वेचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव हे डिसेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्णा उपविभागीय कार्यालयाची पाहणी करण्यासाठी येणार असून,त्यांना मराठवाड्यातील रेल्वे स्थानकावर कुठल्याही प्रकारची उणीव भासू नये या करिता विभागीय व्यवस्थापकाचा पदभार स्विकारल्या नंतर ते प्रथमच पूर्णा रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी रेल्वे विभागाच्या सर्व अधीका-यांसह पूर्णेत शनिवार दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दाखल झाले यावेळी त्यांनी प्रथम पूर्णेच्या वादग्रस्त राहीलेल्या क्र्यु बुकिंग लाॅबीची विशेष पहाणी केली. त्यानंतर त्यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षेसह प्रवाशांना अडचण ठरत असलेल्या "काऊ कॅचर" ची पाहणी करून या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.
तसेच रेल्वे परिसरातील घाणीचे साम्राज्य व रेल्वे टिकीट खीडकी व रिझर्व्हेशन बाबत मार्गदर्शन करणा-या सोई सुविधेची बारकाईने पाहणी केली.
  तसेच रेल्वे रंनिगरुम, रेल्वेचे रुग्णालय, पंपिंग हाऊस, डिझेल फिलींग टॅकची ही कटाक्षाने पाहणी केली.
    रेल्वेच्या राखीव जागेचा सर्वांगीण उपयोग.
पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेची मोकळी जागा असून या जागेचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही --त्रिकालज्ञ गया यांनी दिली.
    रेल्वेच्या जागेवर असलेल्या खेळाडूंसाठी विविध स्पर्धा घेण्यासाठी उपयोग केला जात असून या मैदानावर मात्र सुविधांचा अभाव दिसून येत असून येथे नव्याने परिसरात सुलभ ,शौचालय,स्नानगृह,बैढकी शेड उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले त्या नंतर रेल्वेच्या रूग्णालयात जाऊन पहाणी व तपासणी केली यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी रुग्ण सेवीका यांच्याशी चर्चा करून सोईसुविधांचा आढावा घेतला.तर बाजुला असलेल्या चालक, गार्ड यांच्या विश्रामगृहास भेट देऊन पाहणी केली तेथिल भोजन व्यवस्था याची बारकाईने पाहणी करून अधीका-यांना सुचना केल्या.
तर शेतकऱ्यांच्या  मालांसाठी विशेष रेल्वे.
येथिल रेल्वे स्थानक हे निजामकालीन स्थानक असून पूर्वी मिटरगेजच्या काळात येथून शेतक-यांच्या शेतमालाची वाहतूक रेल्वेने थेट महानगरात पोहचवण्यासाठी केली जात होती.त्यासाठी आगामी काळातही रेल्वेच्या शेतक-यांनी रेल्वेच्या मालवाहतुकीसाठी पुढाकार घेऊन दैनंदिन माल पुरवल्यास येथून रेल्वेची योग्य तिथे सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
आगामी महाव्यवस्थापकांच्या दौ-याची पुर्व तयारी..
    मुदखेड परभणी दरम्यान दुहेरी करणाचे काम सध्या जोरात सुरू असून पूर्णा नदीवरील व चुडावा,गोविंद पूर जवळील पुलाची कामे सुरू असून ही या कामांची पाहणी रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव हे करणार असल्याने आज पूर्णा रेल्वे स्थानक व दुहेरी करणाच्या कामाची पाणी करण्यासाठी आलेले नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांचा हा महत्त्वाचा माणल्या जातो.यावेळी पुर्णेचे खेळाडूंचे शिष्टमंडळ अब्दुल अन्सार यांच्या सह भेट देऊन तक्रारी मांडल्या.तसेच रेल्वे संघर्ष समितीचे सुधाकर खराटे,ओंकार सिंग ठाकूर, विशाल चितलांगे,  यांनी ही भेट घेऊन येथिल  रेल्वेच्या प्रश्नावर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ संचालकपदा साठी उमेदवारी अर्ज भरला

महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे नेते व शेतकऱ्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारे व ग्रामीण क्षेत्राशी नाळ जुळलेले अभ्यासू नेतृत्व खा. संजयभाऊ धोत्रे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज  भागधारक व हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत आज निवडणूक अधिकारी विनय वर्मा यांचे कडे दाखल केला.
शेतकऱ्यांसाठी सतत संघर्षशील व त्यांच्या समस्या समाधानसाठी कार्यरत खा. संजयभाऊ धोत्रे  यांनी विदर्भ मतदार संघातून तीन वेळा मतदारांचा विश्वास जिंकला होता. पुन्हा चौथ्यांदा भागधारकांच्या व हितचिंतकाच्या आशीर्वादाने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आज  त्यांनी भाजपाचे जेष्ठ आ. गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. रणजीत सपकाळ, आ. रणधीर सावरकर, कृषी उत्पन्न बाजार श्रावण इंगळे ,समितीचे सभापती शिरीष धोत्रे, संचालक रमेश चांडक, चंदू पाटील,  विठ्ठल चतरकर, देवेंद्र देवर, अशोक काकड  महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, बाळ ताले, रावसाहेब कांबे, प्रकाश काकड, गणेश कांडरकर, राजेश रावणकर, राजू नाग्मते, अनिल गावंडे, जी.प.शिक्षण सभापती, पुंडलिकराव अरबट,गोवर्धन काकड, दीपक मसने, श्रीधर पाटील,  प्रकाश श्रीमाळी, मनोहरराव राहणे, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, गिरीश जोशी, सागर शेगोकार, अजय शर्मा, विजय इंगळे, प्रकाश पाटील हागे, डॉ. लाखदिवे, अनिल मत्तलवार, रतन गिरी, हरीश अमानकर, बबलू देशमुख, दिलीप पटोकर, मंचितराव पोहरे, श्रीकृष मोरखाडे, जयंत मासने, अनिल मुरुमकर, प्रकाश रेड्डी, विलास शेळके, प्रेमानंद श्रीरामे, संतोष वाकोडे,वसंत बाछुका, बबलू पळसपगार, तानाजी पवार, मोहन बळी,बळीराम अन्नसत्रे, चंद्रकांत अंधारे, प्रवीण वाईकर, पंकज देशमुख, राजू पाटील, जगदीश पाटील, संतोष घुगे, राजेश राउत, गजानन शिंदे, पुंडलिकराव आखरे, शंकर महल्ले, किशोर ताथोड, कमलाकर गावंडे भगवंतराव गवळी संदीप उगले प्रशांत अवचार, वैकुंठ ढोरे, सुरेश नेव्हल, विश्वासराव मारके, भिकाजी धोत्रे, निलेश ठेवा, गजानन निमकाळे, दीपक देवकाते, प्रवीण जगताप, सतीश ढगे, बिट्टू पाटील पाचडे, ओमप्रकाश मंत्री,  संजय इंगळे,  अभय पांडे, अतुल विखे, हर्षवर्धन देशमुख, विलास चपटे, शंकरराव गेबड, रामदास पाटील लांडे, बापूसाहेब कोरपे, भीमराव काळे, पंडितराव देशमुख, खेडकर मामा, भीमराव खेडकर,  रामेश्वर भांगे, राजू टोहरे, दिलीप सांगळे, हिम्मत देशमुख, माधव मानकर, पुंडलिक निमकांडे, प्रदीप नंदापुरे, संतोष काटे, प्रशांत काटे, विक्रांत काटे, प्रवीण हगवणे, नरेंद्र ठोकळ, ज्ञानेश्वर पोटे, गणेश अंधारे, रवी खेडकर,  भुजंगराव गावंडे, नारायणराव भटकर, वसंतराव गावंडे प्रशांत पोहरे आदी भागधारक व भाजपा कार्यकर्ते  मोठ्या संख्याने  उपस्थित होते.

महेंद्रकुमार महाजन रिसोड प्रतिनिधी 9960292121

यशोगाथा आपंग दिन विषेशप्राथमिक पदवीधर शिक्षक राजेंद्र कुंदे या अपंग शिक्षकाची यशोगाथा

शाताराम मगर प्रतिनिधी वैजापुर लोणी खुर्द

राजेंद्र केशवराव कुंदे यांचा जन्म 14/06/1977ला वैजापूर तालुक्यातील बाभुळतेल या छोट्याश्या गावात शेतकरी कुटुंबात झाला गोंडस अस बाळ जन्माला आला म्हणून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते परंतु तीन वर्ष्यानंतर सादर गोंडस बाळास पोलीओची लस न दिल्यामुळे कायमचे अपंगत्व आलेले. वडील केशवराव आई सुभिद्राबाई दुःखी झाले औरंगाबाद,मालेगाव,पुणतांबा कोणी जिथे सांगेन तेथे दवाखान्यात घेऊन जाई परंतु उपयोग झाला नाही शेवटी कायमचे अपंगत्व आलेले बाळ जरी अपंग होते तरी आई वडिलांचे प्रेम काही कमी नव्हते .आई वडिलांनी शाळा  शिकवण्याचा निर्धार केला.पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण बाभुळतेल या गावात पूर्ण केले.आठवी पासून पुढील शिक्षण वैजापूर येथे पूर्ण केले बारावीनंतर डी एड ला नंबर लागला व डी एड ए' श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्राथमिक शिक्षक म्हणून बाभुळतेल या गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोकरी मिळाली आई वडिलांना खूप आनंद झाला.ज्या मुलाची त्यांना चिंता होती ते त्यांचं अपंग लेकरू आज स्वतःच्या पायावर उभे राहिले होते.आई वडिलांना सार्थ अभिमान वाटत होता.पुढे नोकरी करून पदव्युत्तर शिक्षण विनायकराव पाटील महाविद्यालयात पूर्ण केले 2015-17ला यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ नाशिक अंतर्गत गव्हर्नमेंट बी. एड कॉलेज औरंगाबाद येथे बी,एड साठी नंबर लागला सदर बी एड करणे वाटते तितके सोपे नव्हते परंतु हिम्मत असेल तर कोणतीच गोष्ट अवघड नसते .बी एड डिस्टिनवंशन मध्ये पास झाले.आज एक विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात यावर त्यांच्या जीवनावर त्यांचे गुरु धोंडिरामसिंग राजपूत यांचा आदर्श आहे असे ते मानतात.आजही ते शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून विध्यार्थी हित जोपासतात. शालेय व् सामाजिक जीवन जगत असताना अनेक कार्यक्रमांमध्ये अत्युत्कृष्ट सुत्रसंचलन करण्यात त्यांचा नावलौकिक आहे.
अपंग बांधवांनी हार न मानता परिश्रम करून चांगले जीवन जगण्याचा सल्ला ते देतात आपण कोणाला बोज न बनता मेहनत करून चांगले जीवन जगावे असे त्यांना वाटते.आपण करत असलेले कार्य इमानदारीने व चिकाटीने केले तर यश निशीचीतच मिळते असे त्यांना वाटते. शिक्षक म्हणून शिस्त,क्षमता व कर्त्तव्याचे ते नेहमी पालन करतात परमेश्वराने विध्यार्थ्यांना चांगले घडवण्याची दिलेली हि संधी आहे असे ते मानतात.
एक आदर्श शिक्षक म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे.माझ्या विध्यार्थ्यांना चांगले भविष्य असावे यासाठी बालमानांवर चांगले संस्कार बिंबावण्याचे कार्य अहोरात्र करतात.शाळेत विविध उपक्रम  प्रदूषण  मुक्त दिवाळी साजरी करणे,पर्यावरण पूरक गणपती बसवणे,वार्षीक स्नेहसंमेलन घेणे,वक्तृत्व स्पर्धा,क्रीडास्पर्धा घेणे,ज्ञानरचनावादी शक्षणिक साहित्य बनऊन अध्यापन करणे विद्यार्थीप्रिय शिक्षक बाबण्याचा त्यांचा मानस आहे
यामध्ये त्यांची पत्नी-सोनाली,मुलगा-वरद,मुलगी-ख़ुशी असा छोटा व सुखी परिवार पत्नीची मोलाची साथ जीवनात मिळते आहे मूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळतेल शाळेत शिक्षण घेत आहेत

प्रतिक्रिया
अपंग असताना देखील दररोज 3+3=6किलोमीटर कॉलेजला पायी जात होतो.परंतु हार मानली नाही.यावरून एक लक्षात आले प्रयत्न अंती परमेश्वर,देरे हारी पालंगावरी अस म्हणत राहिलो तर आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकलो नसतो.जीवनात खडतर प्रवास करून यशस्वी होणे काही औरच असते

राजेंद्र केशवराव कुंदे शिक्षक बाभुळतेल ता.वैजापुर

इद ए मिलाद उत्साहात

रिसोड : शहरात जश्ने  ईद ए मिलाद मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आली .दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दी.२ डिसेंबर रोजी सकाळी १० वा शहरातील मुस्लिम बांधव चांदनी चौकात जमा झाले.यामध्ये पठान पुरा,मोमिनपूरा,अमरदास नगर,महात्मा फूले नगर,गुल बावडी मोहल्ला,गैबी पूरा,गौसपूरा,आजाद नगर,मुल्ला गल्ली,दिवानबाडा मोहल्ला आदि भागातील मुस्लिम बांधवानी आपल्या वाहनावर सजावट करून हातात झेंडे घेउन धार्मिक गित व घोषणा देत शहराच्या जूनी सराफा लाइन,गुलबावडी,कुंभार गल्ली,बेंदरवाडी,पंचवाट चौक,अष्टभुजा देवी चौक,जामा मस्जिद चौक आसन गल्ली,छत्रपति शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना कोर्ट रोड मार्गे पठानपुरा मस्जिद जवळील जनाजे नमाज मैदानात दुपारी ३ वा येउन थांबली.येथे मिरवणूकीची सांगता झाली.दरम्यान मिरवणूकीत सामिल मुस्लिम समाज बांधवासाठी समाजसेवी संगठन तथा प्रतिष्ठित नागरिकांनी नाश्ता,चहा,पाण्याची व्यवस्था केली होती.

​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​🌾होय आम्ही शेतकरी 🌾​​​​​​​​

उसाला तुरा येण्याची कारणे

डॉ. रामदास गारकर, डॉ. अशोक पिसाळ
तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी.

या वर्षी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिलेले होते. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आलेले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसामध्ये फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊस जातींना तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येणार आहे.

उसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान 

सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरे येतात. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के, साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते.

अशा वेळी उसाच्या शेंड्यातील कायीकपणे वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रुपांतर फुलकळीत होते आणि नंतर साधारण ७ ते १० आठवड्यांनी तुरा बाहेर पडतो. फुलकळी तयार होण्यासाठी उत्तर भारतात ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात तर दक्षिण भारतात जुलै/ ऑगस्ट महिन्यात वातावरण असते. महाराष्ट्रात अशी परिस्थिती साधारणतः ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यान असते.

तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तथापि तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही, तर काही जातीमध्ये उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते.

थंडीच्या कालावधीत अशा प्रकारचे नुकसान  कमी प्रमाणात होते. तथापि, वातावरणातील तापमान जसजसे वाढत जाईल तसे उसाचे वजन व साखर उतारा घटून नुकसान होते. उसाचे वजन व साखर उतारा टिकून रहाणे हे ऊस जातींच्या अनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते.

तुरा येण्यास कारणीभूत घटक
उसाची जात 

उसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते; परंतु जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे त्या जातीच्या अनुवंशिक गुणांवर अवलंबून असते.

को-४१९, को-७२१९, कोसी ६७१ आणि को-९४०१२ या जातींना लवकर तुरा येतो.

को-७४०, कोएम- ७१२५, कोएम-८८१२१, को- ८०१४, को-८६०३२, कोएम-०२६५, एमएस- १०००१ आणि को-९२००५ या ऊस जातींना उशिरा तुरा येतो.

भौगोलिक ठिकाण
तुरा येण्याचे प्रमाण निरनिराळ्या विभागांमध्ये वेगवेगळे असते. उदा.  केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी उसाला तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात येतो. जसजसे उत्तरेकडे जाऊ तसे उसाला उशिरा तुरा येतो.

प्रकाश कालावधी

साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र, प्रकाशाची तीव्रता १०,००० ते १२,००० फूट कॅन्डल्स अशी परिस्थिती किमान १० ते १२ दिवस सलग मिळाल्यास उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास कारणीभूत असते.

राज्यात साधारणपणे असा कालावधी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत असतो. या कालावधीमध्ये वाढ्यात वाढणाऱ्या कोंबामध्ये (मेरिस्टेमॅटिक टिश्‍यू) बदल होऊन त्या भागातील पेशींची वाढ थांबून प्रजननाच्या स्थितीमध्ये स्थित्यंतर होते. प्रकाशमान कालावधी हा जरी तुरा येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असला तरी तो काही दरवर्षी मोठ्या प्रमाणात बदलत नाही.

पाऊस आणि तापमान

ज्या वर्षी पावसाचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असते, त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते, तसेच दिवसाचे व रात्रीचे तापमान यामधील फरक कमी असल्यास तुरा येण्यासाठी पोषक असते तसेच दिवसाचे व रात्रीचे तापमान यामधील फरक कमी असल्यास तुरा येण्यासाठी पोषक असते.

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त (पाणथळ) असेल तर तुऱ्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाचे तापमान २६ अंश ते २८ सेल्सिअस व रात्रीचे तापमान २२ अंश ते २३ अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के हे तुरा येण्यासाठी पोषक असते. रात्रीचे तापमान १७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर तुरा येण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

जमिनीचा प्रकार
ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवले जाते, पाण्याचा निचरा योग्य होत नाही, अशा पाणथळ जमिनीतील उसाला जास्त प्रमाणात तुरा येतो. भारी जमिनीत उशिरा तर हलक्‍या जमिनीत लवकर तुरा येतो.

जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये
पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्राची
उपलब्धता जरी असली तरी त्याचे शोषण पिकाच्या मुळाद्वारे योग्य प्रमाणात न झाल्यामुळे, तसेच जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये असलेला नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पिकाच्या शाखीय वाढीसाठी
आवश्‍यक असणारे नत्राचे प्रमाण कमी होते. अशा ठिकाणी उसाला जास्त प्रमाणात व लवकर तुरा येतो.

लागवडीचा हंगाम

सुरू आणि पूर्वहंगामी हंगामात उसाची लागवड केली तर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो. तथापि मे/ जूनमध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट/ सप्टेंबर या काळात कांड्या सुटण्याच्या अवस्थेत असतो. त्यास ३ ते ४ कांड्या आलेल्या असतात. अशा उसास तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान मिळाले तर त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये तुरा येऊ शकतो.

ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये उसाचे पीक जर उगवण किंवा फुटवा येण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्या उसाला त्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात तुरा येत नाही.

तुऱ्यामुळे उसावर होणारा परिणाम

थंड हवामानात (डिसेंबर ते फेब्रुवारी) तुरा आल्यानंतर साधारणपणे १.५ ते २ महिन्यांपर्यंत उसाच्या उत्पादनात व साखर उताऱ्यात विशेष घट होत नाही. उलट तुरा आल्यामुळे त्या उसाची पक्वता लवकतर येते, त्यामुळे तो उस लवकर तोडणीसाठी घेता येतो, त्यासाठी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्यानंतर प्रथम उसाची पक्वता पाहून त्याप्रमाणे त्याची तोडणी करावी.  उशिरा तुटल्या जाणाऱ्या खोडव्यामध्ये सुद्धा तुऱ्यामुळे नुकसान होते.

तुरा येण्यास सुरवात झाल्यानंतर त्याची पाने अरुंद होऊन पिवळी पडण्यास सुरवात होते. पानांचे क्षेत्रफळ कमी होते, त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पोंग्यामधील असणाऱ्या कोंबाची वाढ थांबून तुऱ्याची वाढ होऊ लागते आणि तुरा पोंग्यामधून बाहेर पडतो, तसतसे कांड्यांवरील डोळे फुटण्यास सुरवात होते, त्यास पांक्षा फुटल्या असे म्हणतात.

तुरा आला की, उसाची शाखीय वाढ थांबून पक्वता येते. त्यामुळे रसाची शुद्धता वाढून साखर उतारा वाढतो, परंतु तुरा आलेला ऊस जर शेतामध्ये १.५ ते २ महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रसाच्या उताऱ्यात जवळ जवळ १८ ते २० टक्केपर्यंत घट येते. ऊस उत्पादनात साधारण २० ते २५ टक्के व साखर उताऱ्यामध्येसुद्धा घट येते.

तुऱ्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना

लागवड शिफारस केलेल्या हंगामात आणि वेळेवर करावी. हंगामानुसार शिफारस केलेल्या जातींची लागवड करावी.

लवकर पक्व होणाऱ्या कोसी-६७१, को-९४०१२, व्हीएसआय-४३४, को-८०१४, एमएस-१०००१ या ऊस जातींची तोडणी अगोदर करावी.

शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी द्यावी.

पाणथळ जमिनीत पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. नत्राची मात्रा विभागून द्यावी.

जुलै/ ऑगस्टमध्ये उसाच्या शेतात पाणी साठून राहणार नाही यातची काळजी घ्यावी.

संपर्क ः डॉ. अशोक पिसाळ , ९९२१२२८००७ 

(प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर)

स्त्रोत्र - ॲग्रोवन

​​

​​​​
​​​​​​​​​​​​​