तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 9 December 2017

घरफोडी प्रकरणातील तीन आरोपी मुद्देमालासह गजाआड


४नानलपेठ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी-पानसरे ४ एका फरारी आरोपीचा शोध सुरुच ४सोने व रोकड केली जप्त
परभणी :  
    शहरात गेल्या मार्च महिन्यात नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरटयांनी धुमाकुळ घातला होता. या प्रकऱणी मुद्देमालासह तीन आरोपींना गजाआड करण्यात नानलपेठ पोलीसांना यश आले असून पोलासींनी कौतुकास्पद कामगीरी केली असल्याचे परभणीचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पत्र परिषदेत माहीती दिली.
    यावेळी बोलतांना पानसरे पुढे म्हणाले मार्च महिन्यामध्ये रात्री अपरात्री चोर्टे बंद घर शोधून आजुबाजूच्या घरांना बाहेरून बंद करून चोºया करणाण्याचे प्रकार घडले होते. यामध्ये वैभव  नगर, खाजा कॉलनी येथे घर मालक रमेश दत्तराव पामे हे घरास कुलुप लावून गेले असता चोरट्यांनी घराची खिडकी तोडून व आजुबाजुच्या गराचे कडी कुंडे लावून नगदी अडीच लाख रुपए व सोने चांदी असा एवज लंपास केला .
    तसेच लक्ष्मी नगरात गणेश तुकारामपंत जोशी यांच्याक ड घरफोडी केली, सिंचन नगररातील बाबाराव भागुजी सोनेवणे यांच्याकडून घरफोडी करून सोने लंपास केले.  या घरफोडी प्रकरणात चार चोरांची टोळी सक्रीय झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अत्यंत सुतावरून स्वर्ग काढत पोलीसांनी कामगिरी केली. या प्रकरणामध्ये शेख सिद्दीकी शे. नुर हा २७ वर्षीय अटो चालक , तसेच सय्यद सोंनू सय्यद इमाम यास दु:खी नगर जालना येथून आणि पुर्णा येथून नरेश अशोक कोटलवार यास शिताफीने अटक करून जेरबंद केले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत  करण्यात आला. याकामी नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अनिल सनगल्ले (पी.एस.आय),बाबासाहेब लोखंडे (पी.एस.आय),सचिन द्रोनाचार्य, सय्यद उमर,संजय पुरी,मळजीराम मुजमुले, यांनी उत्कृष्ट कामगिरी करत २ लाख ४६ हजार मुद्देमाल व रोकड ७१ हजार आणि गुन्हयात वापरलेले मोबाईल व अ‍ॅटोरिक्षा १४ हजार रु.आदी जप्त केले. दरम्यान या चोरट्यांनी परभणी येथील सराफा व्यापाºयास चोरीचे सोने विक्री केले.या प्रकारावरून या सराफावर लवकरच कायदेशीर कार्यवाही कऱण्यात येईल असा यावेळी विश्व पानसरे यांनी दिला.चोरीचे सोने घेण्यासाठी तरबेज सोने व्यापारी यांच्यावर कार्यवाही का होत नाही याकडे लक्ष वेधले असता पानसरे यांनी  कुणालाही सोडले जाणार नाही अशी ग्वाही दिली.

गेवराई येथील आश्रम शाळेत स्वच्छता सप्ताहाचे आयोजन

 

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 10 __ स्वच्छता अभियान अंतर्गत नगर परिषदेच्या वतिने शहरात स्वच्छता सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली असून यामध्ये विविध शाळा काॅलेज तसेच आदिंनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भागात स्वच्छता करून मोहीमेत सहभाग घेतला आहे. 
      स्वच्छता अभियान अंतर्गत सुशिल शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेने स्वच्छता सप्ताह अंतर्गत दि. 6 डिसेंबर रोजी शाळेची स्वच्छता मोहीम, दि. 8 डिसेंबर रोजी नाईक नगर, कोल्हेर रोड येथील स्वच्छता मोहीम राबविली. दरम्यान ओला, सुका, घातक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. दि. 9 डिसेंबर रोजी संजय नगर, इस्लामपुरा, सावता नगर मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली. यामध्ये सुविचार फलक, स्वच्छतेचे नारे देत सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
     यावेळी शिवराज पवार, नगर परिषद कर्मचारी वाव्हळ, मुख्याध्यापक पवार, मुख्याध्यापक चव्हाण, प्रा. जावेद जमादार अदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  दि.11 सोमवार रोजी शाळेत विविध स्पर्धा व उपक्रम घेऊन स्वच्छता सप्ताह संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वादे, येवले, कोलंगडे, जगधने, सिरसाट, नावडे, अशोक राठोड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

लोणार सरोवर जतन व सवर्धन बैठक


लोणार :- प्रतिनिधी
लोणार सरोवर जतन व संवर्धन संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली असुन या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागाच्या प्रमुखाना आदेश दिले की 15 दिवसाच्या आत राहीलेले सर्व कामे पुर्ण करावे त्यांनतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल तसेच या बैठकिसाठी सर्व विभाग प्रमुखाने प्रामुख्याने उपस्थीत राहावे असे सक्तीचे आदेश या बैठकीदरम्यान दिले
लोणार सरोवर जतन व संवर्धन संबधात अनेक बैठका आजपर्यत घेण्यात आल्या मात्र या बैठका वाझोटया ठरल्या आहे . पुन्हा सरोवराचे जतन व संवर्धन आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी लोणार येथील पर्यटन संकुल येथे आयोजीत केली होती या बैठकीसाठी जिल्हाधिकारी पुलकुंडवार हे अध्यक्ष होते तर या बैठकीसाठी पुरातन विभागाचे नागपुर येथुनआलेले हाशमी, पर्यटन संकुल विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश आपार, तहसिलदार सुरेश कव्हळे, सरोवर जतन व संवर्धन समितीचे सदस्य प्रा. गजानन खरात उपस्थीत होते यावेळी बैठकीमध्ये विविध मुदयावर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जागतिक किर्तीच्या लोणार सरोवराचे जतन व संवर्धन व्हावे यासाठे शासनाने लोणार अभारण्यामध्ये महाराष्ट्रातील प्रथम पर्यटन पोलीस स्टेशन ची स्थापना करण्याची परवाणगी दिली त्याबददल लवकरा लवकर हे पोलीस स्टेशन कार्यरत करण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या तसेच पुरातन विभागाच्या कार्यक्षेली मुळे तसेच पर्यटन विभागाच्या मदतीने पुरातन्‍ा विभागाचे 15 मंदीरे हे मस्ट सी मध्ये समावेश करण्यात आल्याने लोणार येथे पर्यटकाचा कल वाढण्यास मदत मिळेल याबाबत जिल्हाधिकारी यांनी पुरातन विभागाचे अधिकारी यांचे सत्कार केला तसेच शासनाच्या वतीने 93 कोटी रूपयाचा निंधी मंजुर झालेला आहे यामध्ये सरोवरा परिसराचे तांरकंपन व्यवस्थीत करणे वन्यजिव अभारण्याची देखभाल करणे पर्यटकाच्या सुविधा उपलब्ध करूण देणे आदीचा समावेश आहे यामध्ये पर्यटन विभागाचे कामाचे 11 कोटी रूपयाचे टेंडर निघाले असुन लवकरच हे काम सुध्दा सुरू होणार आहे या व्यक्तीरिक्त्‍ा राहीलेले सर्व कामे येत्या 15 दिवसात लवकरात लवकर करावे अशा सुचना यावेळी आढावा बैठकी मध्ये दिल्या
बॉक्स 
वनविभागाचे एकही वरिष्ठ अधिकारी गैहजर
अत्यंत महत्वाचा विषयासंदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी सरोवर जतन व संवर्धन समितीची आढावा बैठक आयोजीत केली होती परंतु या बैठकीसाठी वनविभागाचे एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने वनविभागचे प्रश्न अंधारतीच राहीले यावेळी जिल्हाधिकारी यांनी ठणकावुन सांगीतले की 15 दिवसानंतर होणा-या आढावा बैठकीला कोणत्याही विभागाचा अधिकारी गैहजर राहता कामा नये असे आदेश दिले
बॉक्स
दैनिक पुण्यनगरीच्या वृत्ताची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल
लोणार सरोवर जतन व संवर्धन संदर्भात सर्वात प्रथम दै. पुण्यनगरीने महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन पोलीस स्टेशन निर्माण होणार तसेच लोणार सरोवराच्या परिसरातील 15 मंदीराचा समावेश मस्ट सी या यादीमध्ये करण्यात आल्याचे वृत्त प्रथम पुण्यनगरीने प्रकाशीत केले होते यावेळी त्यानी या वृत्ताची दखल घेत पर्यटन विभागाचे तसेच पुरातन विभागाचे अधिकारी यांचा सत्कार केला ही विशेष बाब या आढावा बैठकी मध्ये घडली

आलापुर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

   प्रतिनिधी : भोकरदन

    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आलपुर येथे सर्व तेली समाज व सर्व गावकारी मंडळी तर्फे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित साडूसेट इंगळे ,गणेश भवर , रामेश्वर सोनवणे , प्रकाश इंगळे , संजय ईगळे योगेश इंगळे , संतोष सोनवणे , रतन पाखरे , शिवाजी इंगळे , मधुकर इंगळे , मदन पाखरे , जयवंत जाधव ,ज्ञानेश्वर सोनावणे सतीष पाखरे,उमेश इंगळे ,गणेश म्हसके दीपक सोनवणे , उमेश घोडके , विशाल पाखरे , शुभम इंगळे , सचिन इंगळे , हरिदास गायकवाड़ स्वप्निल वाघ सागर घोड़के तसेच सर्व गांवकरी मंडळी उपस्थित होते.

    
     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯

सावंगीकरांची त्रिशंकु अवस्था कायम तालुका निर्मितीचा तडाखा: पालम व गंगाखेडच्या हद्दीच्या वादात विकास ठप्प

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील सावंगी (भुजबळ) या गावाची दोन तालुक्याच्या विभाजनात त्रिशंकू अवस्था झाली असून या गावचा विकास पुर्णत: खुंटला असल्याची खंत सावंगीकरांनी सोमवारी राज्याचे महसुलमंञी चंद्रकांतदादा पाटील यांच्या समक्ष केली. गंगाखेड तालुक्याचे विभाजन करीत पालम तालुक्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी महसुल प्रशासनाने या नवनीर्मिती पालम तालुक्यांतर्गत गावांसह सिमारेषा, भौगोलिक क्षेत्र निश्चित केले. त्या प्रमाणे सावंगी भुजबळ हे गाव पालम तालुक्यात समाविष्ठ केले. परंतू या प्रक्रियेत कागदोपत्री तांत्रीक नोंदणीत अधिकारयांसह कर्मचारयांनी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे या गावची त्रिशंकू अशी अवस्था झाली असल्याचे मत या गावचे लक्ष्मणराव भुजबळ, वसंतराव भुजबळ, मारोती भजबळ, गोंविद भांगे, हनुमंतराव भुजबळ, बळीराम भुजबळ यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली. सद्यस्थितीत हे गाव पालम तालुक्यात आहे. हे पालम तहसिलमध्ये समाविष्ठ आहे. परंतू अर्धेगाव पालम पंचायत समितीत व अर्धे गाव गंगाखेड पंचायत समितीत समाविष्ठ आहे. गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच हे गाव समाविष्ठ असून न्यायालय, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यक्षेत्र पालम तालुक्यात असतांना बाजार समितीसाठी हे गाव गंगाखेड तालुक्यात समाविष्ठ आहे. महावितरणचे कार्यालय पालम असतांना महावितरणच्या पुरवठयाकरिता गंगाखेडला धाव घ्यावी लागत आहे. गंमत म्हणजे तलाठी सज्जा पालम तालुक्यातील रावराजुर असतांना या गावची ग्रामपंचायत गंगाखेड तालुक्यातील मसल्याला जोडल्या गेलेली आहे. असे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. दरम्यान या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव धुळखात
सावंगी भुजबळ या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी वर्षानुवर्षापासून केली. यासाठी 24 आँगस्ट 2017 रोजी निवेदन दिले. उपोषण सुध्दा सुरु केले. त्यावेळी उपविभागीय अधिकारयांनी स्वतंत्र ग्रामपंचायत विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले. गंगाखेडच्या गटविकास अधिकारयांनी लोकसंख्येच्या व गावच्या अडचणी लक्षात घेवून प्रस्ताव पाठवु असे म्हटले. जिल्हाधिकारयांनी सुध्दा 22 आँगस्ट रोजी या अनुषंगाने प्रस्तावाबाबत आश्वासन दिले. परंतू या अनुषंगाने महसुल प्रशासनाद्वारे पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
     विकास कामे ठप्प
सावंगी हे गाव मसला ग्रामपंचायतीत समाविष्ठ आहे. त्यामुळे अनंत अडचणी उदभवत आहेत. सावंगी पालम तालुक्यात तर मसला गंगाखेड तालुक्यात समाविष्ठ असून त्याचा परिणाम गावच्या विकास कामांकडे गंगाखेड व पालम प्रशासन पुर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. या गावास स्वतंत्र ग्रामपंचायत नाही रस्ता नाही रस्ता नसल्याने बससेवा सुध्दा सहा महिने बंद होत राहिली आहे. गावात स्वस्त धान्य दुकान नाही. अन्य मुलभूत सोयी सुविधा सुध्दा नाहीत. यासह अन्य विकास कामे रखडली आहेत. या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणुक प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा दिला होता. बहिष्कार सुध्दा टाकला होता. परंतू आश्वासनापलिकडे आजपर्यंत काहीही प्राप्त झाले नाही.

जुनेद भैय्या युवा मंचच्या वतिने मदत केंद्राचा प्रारंभ

पाथरी/प्रतिनिधी:-शहरातील जुनेदभैय्या दुर्रानी युवा मंचच्या वतिने माजी नगराध्यक्ष तथा न प गट नेते जुनेद खान दुर्रानी यांच्या संकल्पनेतून येथिल ग्रामिण रुग्नालयात येणा-या रुग्नांची गैरसोय होऊ नये म्हणून  शनीवारी 9 डिसेंबर रोजी मदत केंद्राची सुरूवात करण्यात आली.
या वेळी या मदत केंद्राच्या नाम फलकाचे अनावरवरन जुनेद खान दुर्रांनी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायुकाँ शहराध्यक्ष खालेद शेख,राविकाँ तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील, शहराध्यक्ष अमोल भाले पाटील यांच्या सह जुनेद भैय्या मित्र मंडळाचे चक्रधर चिंचाने, बालाजी लांडे, नारायन आम्ले, मुंजा शिनगारे ,शरद गिराम, भागवत पितळे, किरण गायके, नितिन थोरे,दत्ता शिनगारे, लाला, आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते या मदत केंद्राच्या वतिने रुग्नांना येणा-या अडचनिंची तात्काळ सोडवणूक करण्यात येणार आहे रुग्नांना ग्रामिण रुग्नालयात काही अडचनी आल्यास या नाम फलका वरील मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन जुनेद भैय्या मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.

आई महोत्सव समर्थ नगर नळणी येथे संपन्न..,३० कलापथकांनी नोंदवला सहभाग..

   प्रतिनिधी : भोकरदन

    जेष्ठ लोककलावंत शाहिर गुलाबराव नळणीकर यांच्या मातोश्री  गयाबाई नारायण नळणीकर यांच्या चतुर्थ स्मृति दिनानिमित्त ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते ११ या कालावधित समर्थ नगर नळणी गावात सांस्कृतीक आई महोत्सव संपन्न झाला.

    आई हे देवीचे रूप अशी मांडणी करीत ४ तास रंगलेल्या या आई महोत्सवात ३० कलापथकांनी सहभाग नोंदविला.यामध्ये लक्ष्मण ताकमोघे,विकास ढवळे,काकासाहेब चिंचोले,जनार्दन ठोंबरे,शिलाबाई खरात,स्वरजित नळणीकर,शाहिर पिंपळे,उत्तम तळेकर,अनिल भदर्गे यांनी दर्जेदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

   ढोलकी सम्राट राजुभालेराव व हार्मोनियम वादक विजय चव्हाण यांच्या वादन क्षेञातील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.आई महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठ,े विश्व शाहिर परिषदेचे विभागिय अध्यक्ष शाहिर दिलिप पिंपळेहोते.महोत्साचे आयोजक शाहिर गुलाबराव नळणीकर यांनी सर्व कलावंत व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.

    
     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯

अवैध रेती वाहतूक करणा-या वाहनांवर धडक कार्यवाही..


सब हेडिंग
पूर्णा तहसिलदार श्याम मदनुरकर यांची कार्यवाही.
पूर्णा (प्रतिनिधी){राजेश वालकर}
मागिल काही दिवसांपासून पुर्णा गोदावरीच्या पात्रात रेती उपसून साठे निर्माण केलेल्या ठिकाणी महसूल यंत्रणेने ताब्यात घेतलेल्या अवैध रेती वाहतूकदारांनी आपला मोर्चा वळवीण्याचा प्रयत्न केला परंतु पूर्णेच्या तहसिलदार श्याम मदनुरकर यांनी अवैध रेती वाहतूक करणा-या विरोधात कार्यवाही चंग बांधीत तो हाणून पाडला.
त्यांनी चार वहानांवर दंडात्मक कार्यवाही करत ९२ हजार ४०० रुपये महसूल गोळा केला.
   या बाबत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील पूर्णा व गोदावरी नदिच्या पात्रता मागिल हंगामात रेती उपसा करण्यात आला होता मुदत संपण्यापूर्वी काही जणांनी हा रेती नदीपात्राताच्या बाजूस शिवारात गोळा केला होता. हा गोळा केलेला रेती साठा महसूल यंत्रणेने ताब्यात घेतला ताब्यात घेतलेल्या रेतीवर रेती तस्करांनी आपली नजर कायम ठेवली व पूर्णा तहसिल अंतर्गत मागिल आठ दिवसांत चार वाहनांनी अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शाम मदनुरकर यांना मिळताच त्यांनी या वाहनांवर छापा मारत हे वाहने पूर्णा तहसिल कार्यालयात लावली व प्रत्येकी तिस हजार रुपये दंड वसूल केला.तर सातेफळ हद्दीत चोरटी वाहतूक करण्या-या एका टॅक्ट्ररला छापा मारुन चुडावा पोलिस ठाण्यात ताब्यात दिला.

नांदेड व पूर्णा रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीचे सत्र सुरूच

रेल्वेचे पोलीस निरीक्षक तपास कामी  अकार्यक्षम ठरले
पूर्णा प्रतिनिधी {राजेश वालकर} नांदेड रेल्वे स्थानक हे चोराच्या विळख्यात असल्याने सर्वसामान्य प्रवाशी वर्गाला प्रवास करणे कठीण झाले आहे ,असाच एक प्रकार दिनांक 3 डिसेंम्बर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देवगिरी एक्सप्रेस वर घडली होती, नांदेड रेल्वे स्थानक प्लॅट फार्म 2 नंबरवर  पूर्णा येथील युवक अक्रम खान पठाण याच्या सोबत घडली आहे.पाच दिवस होऊनही चोरीला गेलेला मोबाईल चा तपास मात्र शुन्यच ,गर्दीचा फायदा घेत गाडी मध्ये जागा धरण्यासाठी प्रयत्न करत असताना प्रवस्याचे पर्स ,पॉकेट,मोबाईल,दाग दागिने ,लंपास करणे या सारखे प्रकार रोजच घडत असतात, परंतु चोऱ्या करणारे चोर मात्र मोकाटच रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या हातावर तुरी देत फरार होतात,अद्यापपर्यंत चोराचा सुगावा न लागल्याने पोलीस प्रशासना वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे? ही घटना ताजीच असता ,कृष्णा एक्सप्रेस मध्ये अंदाजे 32 लाखाचा धाडशी दरोडा झाला याही प्रकरणाचा तपासात पोलीस निरीक्षक अकार्यक्षम ठरले त्यामुळे अकार्यक्षम पोलीस निरीक्षकाची उचल बांगडी करावी असे सर्वसामान्य प्रवाशी वर्गातून ऐकावयास मिळत आहे.
अक्रम खान पठाण याचा देवगिरी एक्सप्रेस मध्ये चढतेवेळेस पँटीच्या खिशातून विवो वी 5 गोल्ड या कंपनीचा मोबाईल चोरी गेला या मोबाईल ची किंमत सोळा हजार पाचशे रुपये असून चोरी गेलेला मोबाईल मिळावा यासाठी एफआयआर दाखल करण्यात आले आहे, चोरी गेलेला मोबाईल व चोरास पकडण्यात रेल्वे पोलीस निरीक्षकांना कितपत यश मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे ?

आमदार चषक सामन्यांचे मोठ्या थाटात उद्दघाटन..

भोकरदन- जाफराबादचे १८ संघ सहभागी..

  प्रतिनिधी : सोयगाव देवी

सांघीक खेळ खेळत असताना जिद्द असायला हवी,स्पर्धेच युग आहे, हरला तरी जिद्दी ने पुढे सराव करून जिंकण्याची जिद्द ठेवावी तर जिकलेल्यांनी पुढे आणखी जिंकण्याची जिद्द ठेवावी कारणं हा कलाविष्कार तथा क्रिडाविष्कार ज्याच्या अंगी असतो तो पुढे जिद्दी ने आपल्या क्षेत्रात यशस्वी होतो. ग्रामीण भागातील खेळाडूना जिद्दी ने पुढे नेण्यासाठी व एकमेकांत सांघिक बाधीलंकी निर्मान होण्यासाठी आज आ संतोष पाटील दानवे याच्या वाढदिवसाच निमित्त साधुन भारतीय युवा मोर्चा ने भोकरदन जाफ्रराबाद मतदार संघातील 16 जिल्हा परिषद गट व भोकरदन-जाफ्रराबाद शहरासह 18 संघाचा सहभाग असलेला संघाचे रणांगणास च्या उदघाटन प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांनी सांगितले. 
दरम्यान आज सकाळी 11 वा भोकरदन तालुका क्रीडा संकुलानावर आ संतोष पाटील दानवे यांच्या 15 डिसेंबर च्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिपक पा जाधव व त्यांच्या टिम ने 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान भोकरदन तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट व जाफ्रराबाद तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व भोकरदन आणि जाफ्रराबाद शहर अशा 18 संघाचा सहभाग असलेला संघाचे रणांगणास आज भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा रावसाहेब पा दानवे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूनी आपल्या अंगी असलेला क्रिडा गुण विकसित करून जिद्दीने पुढे जायायला पाहिजे खेळामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहते आपल तरूण वय अभ्यासाबरोबर आपल्या अंगी असलेल्या क्रिडा कौशल्यावर ही खर्च करत जा. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी आहे संधीच जिद्दी न सोनं करा हरला तर जिद्दी जिकंण्या साठी पुढे जा व जिंकला तर आणखी पुढे कसें जाता येइल ती जिद्द बाळगा.
ह्या वयातच जिद्द ठेवावी म्हणजे आपणं पुढे ज्याही क्षेत्रात जावु तर जिद्दी ची सवय पडल्यामुळे आपणं आपल्या क्षेत्रात यशस्वी पुढे जातच राहु. माझ क्षेञ राजकिय असल्यामुळे मीही या क्षेत्रात गावचा सरपंच ते भाजपा चा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास जिद्दी नेच यशस्वी केला. स्पर्धा खेळी मेळीत व खेळाडूवृत्ती ने खेळा,सामाजिक व सांस्कृतिक,सांघीसांघिक बाधीलंकी जपा. नेहमीच चांगले आरोग्य राखण्यासाठी खेळ खेळत रहा,व्यसनापासून दूर रहा असे आवाहन ही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे यांनी केले.

यावेळी या कार्यक्रमांची सत्कार मुर्ती आ संतोष पाटील दानवे यांनी ग्रामीण भागातील खेळाडू प्रोत्साहन देण्यासाठी,शारीरिक आणि मानसिक श्रमदान देण्यासाठी व सामाजिक व सांघिक बाधीलकी जोपासण्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य खेळाडू चा समावेश अशी ही क्रिकेट स्पर्धा आहे. 
या स्पर्धेमुळे विचारांची देवाण घेवाण,ओळख,शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती होते त्यामुळे सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होवुन शांततेत खेळ खेळावा. असे आवाहन आ संतोष पाटील दानवे यांनी केले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब पा दानवे व आ संतोष पाटील दानवे यांनी सहभागी झालेल्या क्रिकेट संघाचा परिचय करून त्यांना शुभेच्छा दिल्या. व सुरूवातीच्या पिंपळगाव रेणुका ई विरूद्ध टेभुणीॅ या सामना चा टाॅस हि केला. 
दरम्यान या आ संतोष पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा च्या उदघाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख,जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई मुकेश पांडे,माजी जि प अध्यक्ष तुकाराम जाधव,भोकरदन पंचायत समितीचे सभापती विलासराव आडगावकर, उपसभापती पदी गजानन नागवे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतीकराव जगताप,शालीकराम म्हस्के,रामेश्वर सह साखर कारखाना चे चेअरमन विजयनाना परिहार,गणेश फुके,सर्जेराव शिंदे,भाऊसाहेब जाधव,रामलाल चव्हाण,मुश्ताक पठाण,इरफान पठाण,नगरसेवक राहुल ठाकुर,दिपक बोर्डे,नगरसेविका सौ आशाताई माळी,सौ शोभाताई मतकर,आयोजक भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिपक पा जाधव,विठ्ठलराव चिचंपुरे, गजानन तादुंळजे,विजय मतकर,सतीश रोकडे, विजय कड,विनोद मिरकर,शांताराम गव्हाणे,मानिक दानवे,शेख नजीर,बाळुशेठ औटी,इम्रानखान पठाण,सह भोकरदन जाफ्रराबाद तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,भाजपा पदाधिकारी,क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     
कोट-÷ भोकरदन तालुका क्रीडा संकुलासाठी सांस्कृतिक तथा क्रिडा मंत्री विनोद तावडे यांनी एक कोटी रूपये चा निधी मंजूर केला असुन पुढील वर्षी या संकुलावर विविध स्पर्धा होतील अशी ग्वाही आ संतोष पाटील दानवे यांनी दिली.

     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯