तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 16 December 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

________________________________

= कल्याण मध्ये पार्किगच्या वादातून एकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घरासमोर गाडी पार्क केल्याबाबत आक्षेप घेतला म्हणून हुक्का पार्लरच्या मालकाने गोळ्या घालून या व्यक्तीची हत्या केली.

=  उल्हासनगर -  विनातिकीट प्रवास केल्यामुळे पकडलेल्या एका अल्पवयीन तरुणीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी रेल्वेच्या तीन तपासनीसांना बेड्या पडल्या आहेत. विशेष म्हणजे, संबंधित तरुणीने तक्रार दाखल केल्याच्या पाच महिन्यांनंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


= माजलगावात मुस्लिम युवकांचा राजस्थानी स्विटमार्टवर हल्ला.

= ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ झालेच पाहिजे! - शिवसेना

= वादग्रस्त इस्लामी धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक विरोधात पुरावे नसल्याचे सांगत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला. झाकीर नाईकशी संबंधीत माहिती हटवावी, असे निर्देश इंटरपोलने सर्व कार्यालयांना दिले असून या निर्णयामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांना हादरा बसला आहे.


= अर्ज न करता जळगावात राष्ट्रवादीचे खासदार वसंतराव मोरे यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचं समोर आलंय.

= एक्झिट पोलचे अंदाज खोटे, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार. - जिग्नेश मेवाणी

= हैदराबाद येथे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एक टॉलीवूड अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील महिला टीव्ही कलाकार अटकेत.

= तामिळनाडू - समुद्रात बुडत असलेल्या श्रीलंकन मच्छिमाराला भारतीय मच्छिमारांनी दिले जीवदान, समुद्रातून बाहेर काढून केले तटरक्षक दलाच्या हवाली.

= चंद्रपूर - आनंदवनच्या स्वरानंदनवनच्या बसला अपघात, मूर्तिजापूर येथील कार्यक्रमावरून परतताना अपघात, खांबाडा-टेमुर्डा येथे उभ्या ट्रकला बसची धडक, अपघातात विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू.

= नवी दिल्लीत काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांना भोजनासाठी केले निमंत्रित.

= नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पालिका निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू, पहिल्या एक तासात अत्यल्प प्रतिसाद, अनेक केंद्रावर शुकशुकाट.

= वाशिम येथे वानराला मारहाण करणारे तीन जण ताब्यात, वनविभागाने घेतले ताब्यात.

= पाकिस्तानचे नापाक कारस्थान उधळले! भारतीय अधिकाऱ्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा होता डाव.

माजलगावात मुस्लिम युवकांचा राजस्थानी स्विटमार्टवर हल्ला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातल्या आंबेडकर चौकातील दोन स्वीटमार्टच्या दुकानात घुसून 15 ते 20 मुस्लिम युवकांनी दुकानातील फर्निचरची तोडफोड केली. ही घटना शनिवारी सायंकाळी 8 वाजता घडली. या हल्ल्यात दुकानातील 2 नोकर जखमी झाले. राजस्थानात काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद प्रकरणात एका मुस्लिम तरुणाची हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात आयोजित केलेल्या मुस्लिम संघटनेच्या चिथावणीखोर सभेनंतर हा हल्ला झाला. शहरातील आंबेडकर चौक येथील ठक्कर बाजार शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या महादेव स्विट मार्ट व आंबेडकर चौकातील मधुबिकानेर स्विट मार्ट या दोन दुकानांवर हल्लेखोरांनी तोडफोड केली. गज, टॉमी, विटांनी दुकानातील काचा, फर्निचर, फ्रिज, टिव्ही आदी साहित्याची तोडफोड करण्यात आली. कोणाला काही कळायच्या आतच दुकान फोडून युवकांनी पळ काढला. या हल्ल्यात महादेव स्विट मार्ट दुकानातील 2 कारागिरांच्या हातात काचा घुसल्यामुळे ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक या दुकानांवर हल्ला झाल्यामुळे अजुबाजुच्या दुकानदारांनी आपआपली दुकाने तात्काळ बंद केली. दरम्यान, राजस्थानमध्ये अफ्राजुल खान याची लव्ह जिहादच्या संशयातून काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती, त्यातील आरोपीस फाशी देण्यात यावी यासाठी आज शनिवारी मुस्लिम नुमाईंदा काऊन्सिलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर रात्री राजस्थानी स्वीट मार्टवर हल्ला झाला हे विशेष. हल्लेखोर हे हिंदीतून मारो तोडो असे म्हणत असल्याचे दुकान मालकांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये दोन्ही दुकांचे मिळून जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पालम शहरात श्री रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

अरुणा शर्मा

पालम :- शहरातील गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या भव्य दिव्य मंदिरात आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्री रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांच्या 48 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम मोठया उत्सवात संपन्न झाले. प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्री रंगनाथ महाराज (गुरुजी) यांच्या 48 व्या पुण्यतिथी सोहळा निमित्त दिनांक 7 डिसेंबर पासुन ते 14 डिसेंबर पर्यंत या  7 दिवसात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन, भागवत, भजन असे अदिं विविध कार्यक्रम संपन्न झाले. दिनांक 14 डिसेंबर रोजी रंगनाथ महाराज मंदिरा पासुन रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमाची भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली. या शोभायात्रेत भागवताचार्य नारायण महाराज शास्त्री पालमकर, भजनी मंडळी, किर्तनकार, आर्य वैश्य समाज बांधव, नेते मंडळी, पत्रकार, गावातील प्रतिष्ठिट नागरीक, महिला अदिं मोठया संख्येने सहभागी होते. हि शोभायात्रा गावातुन बस्टेशन रोड येथुन रंगनाथ महाराज यांच्या मंदिरात गेल्यानंतर काल्याचे किर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.

आज तलवाडा येथे भव्यगटशेती मेळाव्याचे आयोजन

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि.16 __ तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी महाविद्यालय याठिकाणी कापसे चॅरिटेबल फाॅऊन्डेशन व महाराष्ट्र ग्रामीण बॅक यांच्या सौजन्याने छञपती सेवाभावी संस्था संचलित त्वरितापुरी महाविद्यालय तलवाडा यांनी शेतक-यांसाठी भव्य गटशेती मेळाव्याचे आयोजन आज रविवार दि.17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी ठिक 11 वाजता केले असून या गटशेती मेळावा कार्यक्रमाचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
     या भव्य गटशेती मेळावा कार्यक्रमास उदघाटक म्हणून जी.जी.वाकडे ( सहव्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक औरंगाबाद ) व अध्यक्षस्थानी अॅड.सुरेश हात्ते ( संस्थापक अध्यक्ष, त्वरितापुरी महाविद्यालय तलवाडा ) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गेवराईचे तहसिलदार संजय पवार, कृषि अधिकारी - संदीप स्वामी, तलवाडा महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे व्यवस्थापक - एस.एन.चव्हाण, सरपंच राधाकिसन महाराज शिंगणे हे उपस्थित राहणार आहेत. गटशेतीचे महत्व शेतक-यांना समजावून सांगण्यासाठी डाॅ.भगवानराव मा.कापसे ( फळबाग तज्ञ, गटशेती प्रणेते व अध्यक्ष जनजागृती प्रतिष्ठाण ) हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत.  आज रविवारी सकाळी ठिक 11 वाजता त्वरितापुरी महाविद्यालय तलवाडा या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य गटशेती  मेळाव्याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन कापसे चॅरिटेबल फाॅऊन्डेशन व महाराष्ट्र ग्रामीण बॅक औरंगाबाद तसेच त्वरितापुरी महाविद्यालय तलवाडा यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

बलात्कार प्रकरणी पिडित महिलेचा तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल, सोन्ना येथील घटना!


सेलु;प्रतिनिधी 

 तालुक्यातील सोन्ना येथील एका तरूणाणे सरपण देण्याचा बहणा करून महिलेवर विनयभंग व त्या नंतर बलत्कार केल्या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादी वरून सेलु पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या सविस्तर माहिती अशी की सोन्ना येथील एका पिडीत महिलेस गावातील तरूण युवक डिंगाबर शिवाजी मगर (वय 22) यांने 12 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सेलवाडी शिवारातील पाहुण्याच्या शेतातुन सरपण देतो आसे म्हनत पिडित महिलेस दुचाकीवर सोबत नेऊन सदर पिडित महिलेचा विनयभंग करून नंतर बलत्कार केला  अशी फिर्याद पिडित महिलेने सेलु पोलीस ठाण्यात 16 डिसेंबर रोजी  दिली आहे. या फिर्यादी वरून  आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रेणूका वागळे करीत आहेत.

अखेर प्रांतांनी दिले वेळापूर येथील 'त्या' शेतजमिनीच्या चौकशीचे आदेश!


--------------------------
पिलीव/सुजित सातपुते
   माळशिरस तालुक्यात सद्या शेत जमिनीची प्लॉट पडून विक्रीचे प्रमाण वाढत असून अनधिकृत बिन शेती भासवून स्थानिक भ्रष्ट  महसूल कर्मचार्यांना हाताशी धरून गरजू ग्राहकांना फसविण्याचा फंडा जोमात असून महसूल विभाग मात्र कोमात आहे यामुळे सर्व सामान्यांना त्रास होत असून या प्रकारांची प्रशासनाने गंभीर दाखल घेण्याची गरज आहे .सध्या असाच काहीसा प्रकार वेळापूर ( ता. माळशिरस) येथील शेत जमिनी गट न १२१३,१२१४/ १ या गटात मा.उपविभागीय अधिकारी सो. (महसूल) माळशिरस विभाग अकलूज , यांचा तात्पुरता एन .ए आस आदेश असताना सदर जमीन मालकाने स्थानिक महसूल प्रशासंनातील कर्मचार्यांना हाताशी धरून अनधिकृतपणे या  गटात प्लॉट पाडून विक्री केली शिवाय  विक्री केलेल्या प्लॉटचे ७/१२ तयार केले आशी चर्चा असल्याने सदर या गटांचे बिनशेती हा आदेश रद्द करावा व यातील स्थानीय महसूल अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आशी  तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुनील ओवाळ यांनी मा. उपविभागीय अधिकारी सो यांचेकडे दि .२२/११/२०१७ केली होती मात्र त्यावर कोणतेही कार्यवाही  न झाल्यान सुनील ओवाळ हे दि.१६/१२/२०१७ रोजी सदर कार्यालयापुढे  आमरण उपोषणास बसले होते त्यावेळी त्यांना क्रमांक :-कार्या /अ-३/जमीन /१६८२/२०१७ हे लेखी पत्र देऊन मा.तहसीलदार ,माळशिरस यांना सदर जमिनीची  सविस्तर  चौकशी व कार्यवाही करून १५ दिवसात अहवाल या कार्यालयास सादर करावा असे सक्त आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज  यांनी दिले. यापुढे चौकशी पूर्ण होई पर्यंत सादर गटातील प्लोट घेण्यापूर्वी सुजान नागरिकांनी  दक्षता घ्यावी असे आवाहन  सुनील ओवाळ यांनी केले .

आन्वी येथे स्व गोपीनाथ मुडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


अभिमान मुडे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

हिवराराळा/प्रतिनिधी बदनापूर तालुक्यातील आन्वी येथील

लोकनेते प्रतिष्ठान आन्वी च्या वतीने लोक नेते तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी अभिमान मुडे यांचा  दि १५ रोजी व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अंबड चे नगराध्यक्ष देविदास कुचे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी   नाभिक महा संखाचे अध्यक्ष कल्याण दळे  कोग्रेज नेते राजेंद्र राख युवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण रामदास बारगजे प्रदेश सचिव कॉंग्रेस कमिटी म.रा. सत्संग मुडे भगवान सिंह डोभाळ भगवान बारगजे मराठवाडा उपाध्यक्ष रासप अशोक लांडे जगत घुगे संचालक शिक्षक पतसंस्था बबलू चौधरी डॉ आदिनाथ पाटील बाबासाहेब सोनवणे प्रदीप साबळे लोकनेते प्रतिष्ठान आन्वी चे अध्यक्ष राजेंद्र दिगंबर ढाकणे उपाध्यक्ष प्रल्हाद विश्वनाथ ढाकणे स्वप्नील ढाकणे यांच्यासह ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होतोय? अशी करा खात्री!


________________________________

अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी आता 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढही करण्यात आलीय. अशा वेळी तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा वेळी आपल्या आधार क्रमांकाचा वापर आपल्याशिवाय इतर कुणी चुकीच्या कारणासाठी तर करत नाही ना? याची खात्री तुम्ही करून घेऊ शकता. या नवीन सुविधेचं नाव आहे 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'..

.कसा कराल या सुविधेचा वापर?-

UIEDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार सर्व्हिसेस खाली 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'वर क्लिक करा- 'आधार ऑथेन्टिकेशन हिस्ट्री'च्या पेजवर आपला आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड एन्टर करा. यानंतर एक ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल- नव्या पेजवर ऑथेन्टिकेशन टाईप सिलेक्ट करा. डेट रेंज, नंबर ऑफ रेकॉर्डस आणि ओटीपी एन्टर करा- हे सबमिट करताच ऑथेन्टिकेशन हिस्ट्री उघडली जाईल. यामध्ये ऑथेन्टिकेशनडेट, टाईम, टाईप, आयडी आणि रिस्पॉन्ससारखी माहिती मिळेल- जर इतर कुणी तुमचं आधार कार्ड वापरलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथं उपलब्ध होईल आधार क्रमांक हा गोपनीय क्रमांक नाही आणि जर एखाद्या आधार धारकाला सरकारी कल्याण योजना किंवा इतर सरकारी सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला संलग्न अधिकृत एजन्सीजला आपला आधार क्रमांक द्यावा लागेल, असं UIEDAI नं अनेकदा स्पष्ट केलंय. आधार निगडीत फसवेगिरीपासून सावध राहण्यासाठी आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करणंही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

परभणी जिल्हाधिकारी यांना अटक करण्याचे हरित लवादाचे आदेश!


राज्यातील 11 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे
आदेश

राष्ट्रीय हरित लवादाने निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्त केली.

जिंतूर : फ्लोराईडचं मिश्रण असलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आदेश देण्यात आले होते, त्या आदेशांचं पालन न करणाऱ्या राज्यातील तब्बल 12 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यासंदर्भात जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश?

1. नांदेड
2. चंद्रपूर
3. बीड
4. यवतमाळ
5. लातूर
6. वाशीम
7. परभणी
8. हिंगोली
9. जालना
10. जळगाव
11. नागपूर
12. भंडारा

या बाराही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठीच्या बोअरवेलचे प्रमाण जास्त आहे. दोन बोअरवेलमधील अंतर आणि खोली यासंदर्भात नियमावली आहे. मात्र त्यांचे पालन होत नसल्याची तक्रार करत अॅड. असीम सरोदे यांनी 2013 साली हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती.

फ्लोराईडमिश्रित पाण्यासंदर्भातील आदेशांची अंमलबाजवणी न झाल्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांकडून हरित लवादाला सांगण्यात आले. शिवाय, काहीजणांनी उत्तरच दिले नाही. शिवाय, ज्यांनी उत्तरं दिली, त्यांची उत्तरं समाधानकारक नव्हती. त्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय हरित लवादाने निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

चिक्की प्रकरणी विरोधक तोंडघशी!


अनिल घोरड तेज न्यूज हेडलाईन जिल्हा प्रतिनिधी
एसीबीची ना. पंकजाताई मुंडेंना क्लिन चीट

मुंबई दि. १६ ----- बालकांसाठी खरेदी केलेल्या खाद्यपदार्थाच्या खरेदी प्रकरणात कसलाही भ्रष्टाचार आणि अनियमितता आढळून आली नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना क्लिन चीट दिली आहे. या प्रकरणावरून ना. पंकजाताई मुंडेंना टार्गेट करणारे विरोधक पुन्हा एकदा चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि काॅग्रेस नेते सचिन सावंत यांनी यांनी याप्रकरणी ना. पंकजाताई मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी २० मे आणि १० डिसेंबर २०१५ रोजी याबाबत स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या  तर सचिन सावंत यांनी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे २४ जून २०१५ रोजी तक्रार दाखल केली होती.

  एसीबीने प्राथमिक चौकशी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाकडे ८ डिसेंबर २०१६ रोजी आपला ४२ पानी अहवाल सादर केला. धनंजय मुंडे यांनी बुधवारी जेंव्हा विधान परिषदेत या प्रकरणाच्या चौकशीच्या स्थिती बाबत विचारणा केली तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी एसीबीने अहवाल सादर केल्याचे सांगत याप्रकरणी शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सांगितले होते.

   बालकांसाठी खरेदी करण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या प्रकरणात धनंजय मुंडे व सावंत यांनी एकूण १८ आरोप केले होते. चिक्की खरेदी प्रकरणात एवढी मोठी खरेदी विना निविदा कशी करण्यात आली याविषयी मोठा गदारोळ केला होता. महिला बालविकास विभागाने एकाच दिवशी खाद्य पदार्थाच्या खरेदीचा दोन डझनहून अधिक आदेश काढले होते, असा आरोपही त्यांनी केला होता. चिक्की प्रकरणात सावंत यांनी असा आरोप केला होता की, ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सिंधुदुर्ग सहकारी संस्थेला १२३ कोटी रुपयांच्या चिक्की पुरवठ्याचा आदेश देण्यात आला होता, आणि संबंधित संस्थेने निकृष्ट दर्जाच्या मालाचा पुरवठा केला होता. परंतु या सर्व प्रकारात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही अथवा त्यात अनियमितता आढळून आली नसल्याचे एसीबीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

धनंजय मुंडे, सावंत तोंडघशी
चिक्की खरेदी प्रकरणावरून ना. पंकजाताई मुंडे यांना सातत्याने    अडचणीत आणणारे आणि सभागृहात मोठा गहजब करणारे  धनंजय मुंडे आणि सचिन सावंत एसीबीच्या या अहवालाने पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी ना. पंकजाताई मुंडे यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आह

जिंतूर तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी अकबर सिद्धीकी

जिंतूर:-दि 16  अखिल भारतीय पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड दि 16 रोजी पत्रकार भवन येथे करण्यात आली
       जेष्ठ पत्रकार डॉ सुभाषचंद्र राठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जेष्ठ पत्रकार एम. ए. माजीद ,विनोद पाचपिले यांनी काम पाहिले. यावेळी अध्यक्ष म्हणून अकबर सिद्दीकी,कार्याध्यक्ष प्रभाकर कुरे,सचिव मारोती गायकवाड,सहसचिव वासुदेव देशपांडे,उपाध्यक्षपदी रंगनाथ गडदे,तुकाराम सर्जे,रामप्रसाद कंठाले, मो.या.शेख,कोषाध्यक्ष अशोक बुधवंत,सहकोषाध्यक्ष सय्यद शकील, सदस्य म्हणून एम.एजाज,सय्यद एफतेखान,भास्कर चोधरी, किशनप्रसाद खाडे, रामकिशन गरगडे यांची निवड करण्यात आली. तर मार्गदर्शक म्हणून एम.ए. माजीद,दिपक राजूरकर,विनोद पाचपिले,एम. के.कादरी,निहाल अहमद,गजानन चौधरी हे राहणार असून निवडीनंतर डॉ सुभाषचंद्र राठी यांनी नवीन पदाधिकार्यांचा सत्कार केला.