तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 23 December 2017

भानेश्वर विद्यालयात स्व.गोविंदराव कोटकर-पाटील यांच्या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगाव:-  दि.२४ डिसेंबर रविवार रोजी सकाळी १० वाजता भानेश्वर विद्यालयात   स्व . गोविंदराव बळीरामजी कोटकर पाटिल यांच्या पंधराव्या स्मृतिदिना निम्मित त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
सेनगाव कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती स्वर्गिय गोविंदराव कोटकर-पाटील यांच्या पंधराव्या पुण्य स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस पुष्पहार वाहुन पुजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेचे सदस्य मारोतराव अन्ना देशमुख, किशोर गोविंदभाऊ कोटकर, मुख्याध्यापक प्रदीप बुद्रुक , शिक्षक रोडगे आर आर ,भोपाळे एन ए, मोरे के जी,शिंदे बी एस, गोरे जी बी, चोपड़े व्ही के, वाबळे आर डी,सूर्यवंशी एस जी,इसाये जी डी,वाबळे आर एल,जाधव व्ही एन, मारकळ एम एस,कानडे बी एस,तिड़के डी एम,झाडे एस डी,बुद्रुक पी व्ही, शिंदे एस एस, लिपिक थिटे डी एस, सेवक कोटकर के बी,खंदारे जी एम, भाले जी एन, वानरे एम एस व शेख शिकुर व विद्यार्थी उपस्थित होते.

पालम तहसील कार्यालयात आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते चार लाखाचे धनादेश वाटप

अरूणा शर्मा

पालम तहसील कार्यालयात दि.23 डिसेंबर रोजी दुपारी गंगाखेड विधानसभेचे आमदार श्री मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. दि 20 ऑगस्ट रोजी पारवा गावातील लेंडी नदीत दोन सख्ख्या चुलत बहिणी कीर्ती सोपान येवले वय 19 व आम्रपाली भगवान येवले वय 12 ह्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला.
यामुळे मुलीच्या वारसास प्रत्येकी दोन - दोन लाखाचे धनादेश मा.प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधितुन मुलीचे वारस भगवान किशन येवले, सोपान किशन येवले यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार मधुसूदन केंद्र, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार जिवराज डापकर, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष वसंतकाका सिरस्कर, जिय्या पठाण, नायब तहसीलदार एस.आर.कदम, व्ही.एस.भराडे, आर.आर.जैस्वाल, कादरभाई गुळखंडकर, सदानंद हात्तीअंबिरे, विजय घोरपडे, आर.पी.पटेल आदी पालम तहसील कार्यालय हाजर होते.

सरकार विरोधात पालम येथे काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

अरुणा शर्मा

पालम :- तालुका कॉग्रेस आय व युवक कॉग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुख्य चौकात  शेतकरयाच्या विविध प्रश्नांवर रास्तारोको आंदोलन करण्यात आला. या वर्षी शेतीला शेतीची भयानक स्वरुपाची दयनिय आवस्था झालेली आहे. पेरणीच्या वेळी पाऊस काळ व्यवस्थीत पडला नसल्यामुळे दुबार पेरण्याकरुन सुध्दा धान्य उगवली नाही. काही तरी उगवली ती सुध्दा वाया गेली. आज सुगीच्या दिवसात शेतकरी समृध्द असावयास पाहिजे परंतू शेतकरयांवर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. या करिता शेतकरयांच्या विविध मागण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता पालम मुख्य चौकात पालम शहर युवक कॉग्रेस च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व कॉग्रेस तालुका अध्यक्ष गुलाबराव सिरस्कर व युवक शहर अध्यक्ष रामप्रसाद कदम यांनी केले. तर मार्गदर्शन मा.खा. तुकारामजी रेंगे पाटील यांनी केले. यावेळी  रेंगे म्हणाले कि शिवसेना व भाजपा सरकारणे जनतेस दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. देशातील संपुर्ण शेतकरयांनी या सरकारला वेटीस धरले आहे. सध्या शेतकरयांची विज तोडणी थांबली पाहिजे. सरकार विरोध पक्षा कडे लक्ष देण्यास तयार नाही. येणारया निवडणूकी मध्ये जनता त्याची जागा त्यांना दाखविल. अशा विविध प्रश्नावर सरकार विरोधात भाषने झाली. यावेळी समशेर वरपुडकर, नागशेन भेरजे, तब्बू पटेल, गुलाबराव सिरस्कर, कृण्णा भोसले, सुरेश देशाई, बाळुकाका देशमुख, शेख आहेमद, वैजनाथ हात्तिअंबिरे, साबेर खुरेशी, रामप्रसाथ कदम, उत्तमराव गादगे,भगवान जंगले, माधव फाजगे, शेख रमजान, शेख जब्बार, बाळासाहेब काचोळे, पांडुरंग उगले, तालुक्यातील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पालम तहसीलचे नायब तहसीलदार एस.आर. कदम यांना निवेदन देण्यात आलेया वेळी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी मोठा पोलिस  बंदोबस्त लावण्यात आला होता.

सोन्याची अंगठी मोडून शाळेची दुरुस्ती, शिक्षकाचा होणार सन्मान साहित्य संमेलनात दोन अंगठ्या देणार

बार्शी : इमारतीच्या दुरुस्तीसह ई-लर्निंग शाळा बनविण्यासाठी शिक्षकाने भविष्य निर्वाह निधीतून कर्ज काढले. ते कमी पडले म्हणून सोन्याची अंगठी मोडली. त्यातून शाळा अत्याधुनिक बनवली. विद्यार्थीस्नेही शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा त्यासाठी अंबाजोगाई येथे होणाºया ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सपत्नीक नवीन कपडे, सोन्याच्या दोन अंगठ्या देऊन विशेष सत्कार केला जाणार आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देटेवाडी हे अतिशय दुर्गम भागातील २० कुटुंबांचे गाव. येथे पोहोचण्यासाठी रस्ताही नाही. गावात एक वर्गखोली आणि एक शिक्षकी शाळा आहे. बार्शी तालुक्यातील पाथ्री गावाचे रवींद्र गायकवाड हे शिक्षक २३ मार्च २०११ रोजी रुजू झाले. तेव्हा पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत केवळ ११ विद्यार्थी होते. त्यांच्या विविध प्रयोगांमुळे दोन वर्षांतच विद्यार्थ्यांची संख्या २० वर पोहोचली.२०१४-१५ मध्ये सर्वत्र ई-लर्निंगचे वारे होते, आपलीही शाळा दुुरुस्त करून ई-लर्निंग झाली पाहिजे, हे गायकवाड यांनी ठरविले. मात्र पैसे नव्हते. गायकवाड यांनी भविष्य निर्वाह निधीतून ३५ हजार रुपये उचलले. तरीही शाळेच्या भिंतींचे प्लास्टर, रंग, पत्रे यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडला. तेव्हा त्यांनी स्वत:ची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी मोडली. त्यातून १४ हजार रुपये मिळाले. अंगठी मोडताना पत्नीसोबत वादही झाला.रवींद्र गायकवाड यांच्यासारखे विद्यार्थ्यांसाठी समर्पित शिक्षक आजही आहेत. त्यांना शोधून त्यांचा समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे.

आयटीत मंदीची भीती नारायण मूर्ती यांचा इशारा

मुंबई : अमेरिकेत वाढत असलेली आयटी क्षेत्रातील गुंतवणूक भारतीय आयटी क्षेत्राला धास्तावणारी आहे. याचा परिणाम भविष्यात थेट नोकऱ्यांच्या निर्मितीवर होणार आहे, अशी चिंता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांच्या या चिंतेला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही दुजोरा दिला.देशातील आयटी क्षेत्र हे प्रामुख्याने परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प सरकारने देशातच सेवा पुरविणाऱ्या कंपन्या स्थापण्याचा निर्णय घेतल्याने, तेथे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ लागली आहे. परिणामी, भारतीय आयटी व्यवसायात मंदी आली आहे. भविष्यात नोकऱ्यांची संख्याही कमी होऊ शकेल, असे मूर्ती म्हणाले. आयआयटी मुंबईतील ‘मूड आय’ महोत्सवानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.मूर्ती यांचा हा मुद्दा पुढे नेत चिदंबरम म्हणाले की, यापूर्वी दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालेला तरुण बेरोजगार आहे, असे ऐकण्यात येत होते. मात्र आता आयआयएम किंवा आयआयटीमधील पदवीधरही बेरोजगार असल्याचे भीषण वास्तव दिसते.अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांमुळे देशाचा विकास होतो आहे असे वाटते का, या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम यांनी जीएसटी आणि नोटाबंदी या निर्णयांचा चांगलाच समाचार घेतला. जीएसटी म्हणजे देशात कराचा एकच दर. पण आपल्याकडे लागू करण्यात आलेल्या जीएसटीमध्ये आठ वेगवेगळे दर आकारण्यात आले आहेत. याचबरोबर नोटाबंदी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या तीन उद्दिष्टांपैकी एकही उद्दिष्ट साध्य करणे या सरकारला शक्य झाले नसल्याचेही चिदंबरम म्हणाले.

बार्टी संस्थेच्या वतीने दाभोळकरांना पुस्तक भेट


प्रा. डॉ. संतोष रणखांब तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
     सोनपेठ : येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे मुख्य प्रकल्प संचालिका - श्रीमती प्रज्ञा वाघमारे, विभागीय प्रकल्प संचालक श्रीकांत देशमुख आणि  प्रकल्पाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हमीद दाभोळकर यांच्यासोबत मान्यवरांचे स्वागत पुस्तके भेट देऊन करण्याचा उपक्रम राबवला.
बार्टीने पुस्तके वाचल्याने मस्तक सुधारते आणि सुधारित मस्तक चांगल्या विचारांना वाव देतं या उक्ती प्रमाणे पुस्तके भेट देण्यात नेहमी अग्रेसर राहत असते.
परभणी जिल्हा दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोळकर आणि माधव बावगे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव आणि आठवणी - लेखक नानकचंद रतु हा पुस्तक रुपी ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच सोबत भारतीय संविधान प्रास्ताविका भेट दिली या दोन्ही भेटीे आनंदाने स्विकारून डॉ. हमीद यांनी बार्टी संस्थेच्या समतादूत प्रकल्पाला मन भरून शुभेच्छा दिल्या. उपस्थित समतादूतांच्या या कल्पकते बद्दल कौतुक केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बार्टी संस्था वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने संयुक्त पणे कार्यक्रम परभणी जिल्हाभर राबवत असतात.
यावेळी बार्टीचे समतादूत पालमचे स्वन्पिल खाते, गंगाखेडचे संतोष तेलंगे, सोनपेठचे अंकुश रसाळ, अनिस गंगाखेडचे  प्रकाश शिंगाडे आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हत्ता (ना) येथे एलसीबी पथकाने मटका बुकीवर धाड टाकुन १२ हजार ५०० रु.चा मुद्देमाल केला जप्त


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील हत्ता (ना.) येथे हिंगोली येथील एलसीबी पथकाने दि.२३ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी ०४ च्या सुमारास धाड टाकून चार आरोपी सह १२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची घटना घडली.
अधिक माहीती अशी की,  हत्ता (ना.) येथे एका शेतामध्ये मटका घेत असल्याची गुप्त माहीती एलसीबी पथकाला लागली असता हिंगोली शहरवाहतुक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.आर.बंदखडके यांच्या पथकाने मटका बुकीवर धाड टाकली असता आरोपी पुंजाजी लोभाजी गडदे, अरुण त्र्यबंक भुतेकर, संजय भागुजी चेक्के व एक इतर हे एका शेतामध्ये मोकळ्या जागेत मटका जुगाराच्या आकड्यावर पैसे लावुन मिलन नावाचा मटका जुगार खेळवित असतांना दिसुन आले. आरोपी जवळुन रोख रक्कम ८४८० व चार मोबाईल असा मुद्देमाल व मटका जुगाराचे साहीत्य जप्त करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन रात्री उशीरा ०८-२० वाजता चार ही आरोपीवर मुंबई जुगार कायद्यान्वे कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास सेनगांव पो.नि.मधुकर कारेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.शेख हे करीत आहेत.

चुकीचे व्यवहार करणारा सोबत फेडरेशन नाही - सुरेशराव वाबळे

सुभाष मुळे...
----------------
गेवराई ( सुभाष मुळे ) विश्वासार्हतेने काम आता होऊ लागल्याने या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध असून सहकार वाढीस मल्टीस्टेट सोसायटीचे फार मोठे योगदान आहे. ज्या कोणत्या मल्टीस्टेट चुकीचे व्यवहार करत आहेत त्यांच्या सोबत फेडरेशन नाही असे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशजी वाबळे यांनी केले.
       गेवराई येथील छञपती मल्टीस्टेटच्या कार्यालयात मल्टीस्टेट फेडरेशनची बैठक मल्टीस्टेट फेडरेशन पुणे अध्यक्ष सुरेशजी वाबळे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते. यावेळी बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सर्वांनी फेडरेशनचे सभासद होणे आवश्यक आहे. जानेवारी २०१८ मध्ये राज्यस्तरीय सहकार परिषद बीड येथे घेण्याचे ठरले. या बैठकीला संबोधित करताना सुरेशराव वाबळे म्हणाले की, ज्या मल्टीस्टेट चुकीचे व्यवहार करत आहेत त्यांच्या सोबत फेडरेशन नाही. त्यांनी सर्व संस्था चालकांना मल्टीस्टेट मधील ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित राहतील व ठेवीदारांना मागेल त्यावेळी ठेवीची रक्कम परत मिळावी असे व्यवहार मल्टीस्टेटने करावेत. मल्टीस्टेट सोसायटीबद्दल समाजात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी पारदर्शक व्यवहार करावा. देशात मल्टीस्टेट सोसायटीने सहकार चळवळीस मोठे योगदान दिले असून देशातील जवळपास ६०० मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना काम मिळाले आहे. छोटे-मोठे उद्योग व्यवसायांना गती देण्याचे कामही सहकार चळवळ करत आहे. राष्ट्रियकृत बँकेतील गर्दी कमी करून ग्राहकांची उत्तम सेवा मल्टीस्टेट पतसंस्था पुरवत आहेत. त्यामुळे समाज मनात मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत चांगला संदेश देण्याचे  काम करावे असे आवाहन केले.
       या बैठकीस मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, चंद्रकांत शेजूळ, संतोष भंडारी, अभिनाथ शिंदे, प्रभाकर पराड, रमेश ढगे, साईराम परभणे, रंजित टाकणखार, गौतम वैराळे, रविंद्र कानडे, दिलीप पारेकर, सिध्देश्वर वायकर, अनंत शेंडगे, ओंकार खुर्पे, भूषण चित्ते, सतीश सावंत, अशोक सोळंके, विष्णू लांडे, संजय सपाटे आदी उपस्थित होते. सुञसंचलन साईनाथ परभणे यांनी केले तर आभार प्रभाकर पराड यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

बीड जिल्ह्यात होणारे तीन टोलनाके रद्द करावेत-जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे


सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 23 __ महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास सर्वत्र टोलमुक्ती करू अशी वल्गना करणाऱ्या भाजपा सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या या जिल्ह्यातील होणारे तीन टोलनाके रद्द करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे.
          राज्यात एकीकडे टोलमुक्ती बद्दल रान पेटवणारे या सरकार मधील काही धेंडे आज मुग गिळून गप्प आहेत. या बीड जिल्ह्य़ात भाजप सत्तेच्या काळात नवीन तीन टोलचे काम होत आहे. भाजपने सत्तेवर येण्या अगोदर राज्यभरात सर्वत्र टोल मुक्ती करू असे सांगितले होते. राज्यात इतर ठिकाणी सुरू असलेल्या टोल नाक्या बाबत मोठं मोठी आंदोलने होत आहेत. राज्य व केंद्रातील हे सरकार याबाबत ठोस निर्णय घेत नाही. भाजपने सत्तेवर येण्या अगोदर राज्यभरात सर्वत्र टोल मुक्ती करू असे सांगितले होते. आता काम सुरू असलेले हे तीन टोलनाके रद्द करावेत अशी मागणी करत यावर निर्णय न झाल्यास सोमवार, दि. 1 जानेवारी रोजी टोल नाक्याच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी दिला आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पालम तालुक्यातील चाटोरी येथे भव्य कबडी स्पर्धा व जंगी कुस्त्याचे आयोजन

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील चाटोरी येथे दिनांक 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत गहिनीनाथ उर्फ गैबीसाहेब यांच्या यात्रा महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 डिसेंबर रोजी भव्य प्रमाणात संदल निघणार आसुन दि.25 डिसेंबर रोजी भव्य पशु प्रदर्शन आयोजीत केले आहे. व दिनांक 25 ते 26 डिसेंबर यावेळी भव्य कबडी स्पर्धा चे आयोजन असुन या चे उदघाटक आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे उपस्थित रहाणार आहेत. कबडी चे प्रथम परितोषीक 31001/- रुपये आमदार केंद्रे यांच्या कडून ठेवण्यात आले. तर द्वितीय परितोषीक 25001/- रुपये मा.श्री गणेशराव रोकडे (दादा) यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. तृतीय परितोषीक 17001/- श्री डॉ. उमाकांत मस्के यांच्या कडून ठेवले आहे. तर दिनांक 27 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्या चे उदघाटक मा.श्री संतोषजी मुरकुटे शिवसेना विद्यानसभा प्रमुख गंगाखेड हे करणार आहेत. तर यावेळी कुस्त्यासाठी देणगी देणारे प्रमुख पाहुणे संतोष मुरकुटे 31001/- रुपये, श्रीकांतराव चव्हाण 15001/- रुपये, श्री भरत घनदाट (जि.प.संदस्य परभणी), श्री आण्णासाहेब किरडे 11001/- रुपये, चरणदास दिवसे यांच्या कडून 11001/- रुपये, सौ.विमलताई साळवे सरपंच भालकुडकी 11001/- रुपये, नाईक विद्या मंदिर प्रा.मा.व.उच्च मा. चाटोरी 11001/- रुपये, विशाल दादेवाड सरपंच खडी 10001/- रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र चाटोरी 5001/- रुपये, शिवाजीराव कदम 5001/- रुपये, जि.प.प्रा.शाळा चाटोरी 5001/- रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले असून शेवटची कुस्ती बक्षीस प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळनर यांच्या तर्फे 5001/- रुपये देणार आहेत. दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत संघाने उपस्थित रहावे व नंतर येणारया संघास प्रवेश दिला जाणार नाही. पंचाचा निर्णय अंतीम राहील. खेळाडुच्या जिवी त्याची हामी स्वता:वर राहील, कबडी संघास प्रवेश फि 200 रूपये राहील, हारलेल्या पहेलवानास प्रवास भांडे मिळणार नाही. तरी भाविका यांचा लाभ घ्यावा. अशी मागणी समस्त गावकरी मंडळी चाटोरी यांनी केले आहे.

सिकंद्राबाद-मुंबई देवगिरी एक्स. रद्द तीन रेल्वे रद्द झाल्याने सुट्टीचे प्रवाश्यांनी केलेले नियोजन कोलमडले


 

सेलू/प्रतिनीधी

सिकंद्राबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स. (17057) ही गाडी 23 डिसेंबर रोजी धावणार नसून काचीगुडा-मनमाड पँसेंजरदेखील गाडी क्र. (57561) ही ही शनिवारी 23 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.  तसेच 25 डिसेंबर रोजी मुंबई ते सिंकद्राबाद दरम्यान धावणारी गाडी क्र. 17058 देवगिरी एक्स. रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सेलूचे स्टेशन मास्तर यांनी सांगीतली. यासंदर्भात माहीती याप्रमाणे – हैदराबाद डिव्हीजनमधील आप्पालावी शिरणापल्ली या स्टेशनदरम्यान तिरुपती-निजामाबाद गाडी क्र. 12793 ही घसरल्यामुळे देवगिरी एक्स. तसेच काचीगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन्हीही धावणार नसल्याची माहिती सांगण्यात आली.

उस्मानाबादेत महिलेच्या गळ्यात चपला घालून धिंड

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये एका महिलेची गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चहाड्या सांगितल्याच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती आहे.
आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादच्या अलूर गावात ही घटना घडली. या महिलेनं चहाड्या सांगितल्या आणि घरातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा राग मनात धरुन आरोपींनी तिची धिंड काढली.
सुदैवाने सरपंचांनी मध्यस्थी करुन महिलेची सुटका केली. या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मुरुम पोलिसात दाखल करण्यात आली आहे.संबंधित 55 वर्षीय महिलेला उमरग्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

वाचनामुळे माणुस सुसंस्कृत होतो- तहसिलदार संजय पवार

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 23 __ वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सामाजिक संस्थांनी उपक्रम राबविले पाहिजेत, परिणामी विद्यार्थ्यांना देखील उत्तम संधी उपलब्ध होईल. वाचनामुळे माणुस सुसंस्कृत होतो म्हणूनच वाचक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन तहसीलदार संजय पवार यांनी येथे केले.
        गेवराई येथील नागेबाबा मल्टिस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त गेवराई शहरातील कुलकर्णी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी तहसीलदार संजय पवार हे बोलत होते. संत नागेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर सरकारी अभियोक्ता एन. बी. धोंगडे , कृषी सहायक संतोष विठ्ठल घसिंग, पत्रकार सुभाष मुळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सुभाष सुतार, जेष्ठ कार्यकर्ते बप्पासाहेब बेदरे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पवार म्हणाले की, वाचना शिवाय पर्याय नाही. किती ही जग पुढे जावू द्या, पुस्तक हातात घेऊन डोक्यात ठेवले तर माणुस यशस्वी होऊ शकतो. वाचनामुळे माणुस घडतो व तो सुसंस्कृत होतो, त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा ही तहसिलदार पवार यांनी व्यक्त केली. अभियोक्ता धोंगडे , जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार, कृषी अधिकारी संतोष विठ्ठल घसिंग यांनीही विचार व्यक्त केले. वाचकांच्या हितासाठी या पुस्तक प्रदर्शनात केवळ साठ रुपयात कोणतेही पुस्तक घेता येईल असे नागेबाबा मल्टी स्टेट बँकेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आहे.
         या कार्यक्रमास वैभव शहाणे, डॉ. सचिन म्हेत्रे, डॉ. किशन देशमुख, प्रा. सुनिल मुंडे, अमित शिखरे, तसेच व्यापारी, खातेदार, कर्जदार, हितचिंतक, विद्यार्थी व विद्यार्थीनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन संस्थेचे लिगल ऑफिसर भरत दारुंटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गेवराई शाखेचे शाखाधिकारी रामेश्वर गर्जे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेवराई शाखेचे संजय शिंदे, केशव पंडीत यांचे  विशेष सहकार्य लाभले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯