तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 30 December 2017

गोहत्या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलींसह 9 जणांना पोलीस कोठडी.


_________________________________

उत्तर प्रदेश मधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेल मध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही मुलींना पोलिसांनी सज्ञान असल्याचं सांगत न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानंही त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.भारतात गोहत्या करण्यास बंदी असतानाही उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. चार आरोपींनी पलायन केलं असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सर्व आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडीत पाठवलं आहे. 12 वर्षं आणि 16 वर्षं वयाच्या या दोन्ही मुलींना बालसुधारगृहात पाठवणं आवश्यक होतं. परंतु तसं न करत पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल करत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. आधार कार्ड पाहिल्यानंतर मुली अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे.एका मुलीचा जन्म 2001 साली, तर दुसरीचा जन्म 2005 साली झाल्याचं आधार कार्डमुळे स्पष्ट झालं आहे. 29 डिसेंबर रोजी पोलिसांनी मुजफ्फरपूर मधल्या दोन घरांवर छापेमारी केली होती. छाप्यादरम्यान पोलिसांना या दोन्ही घरात गोमांस आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी 5 महिलांसह एकूण 9 जणांना अटक केली होती. परंतु या अल्पवयीन मुलींचीही तुरुंगात रवानगी केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.

ऊसतोड कामगारांच्या दोन चिमुकल्यांचा उकळत्या पाण्याने भाजून मृत्यू.

__________________________________

माजलगाव शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे  आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,विजय जाधव हा उसतोड कामगार असून तो व त्याची पत्नी हे ऊसतोडीसाठी गेलेले होते. त्याची दोन मुले वैभव व वैष्णव ही आजी-आजोबांसोबत माजलगाव शहरातील बंजारानगर भागात राहतात. 29 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलांच्या आजीने आंघोळीसाठी पाणी ठेवले होते. झोपडीवजा घर असल्यामुळे त्याच्या बाजूलाच तीन ते चार फुटांच्या अंतरावर हे दोन चिमुकले झोपलेले होते. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते भांडे हे अचानक कळवंडल्यामुळे उकळते पाणी या दोन्ही मुलांच्या अंगावर पडले आणि ते यात चांगलेच होरपळले. घटना घडल्यानंतर आजी आजोबांनी एकच आरडा ओरडा केला, त्यानंतर सदर मुलांना दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु दोन्ही मुलांच्या अंगावरील कातडी गरम पाण्यामुळे पार सोलून निघाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लातूर येथे रुग्णालयात नेण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान दोन्ही मुलांचा करुण अंत झाला. अठराविश्व दारिद्र्य असलेल्या वैभव आणि वैष्णव यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातच त्यांच्या दोन्ही मुलांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कठीण परिस्थितीत जीवन जगणा-या जाधव याच्यावर कोसळलेल्या या दुःखामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच केले लंपास.

________________________________

पुणे - नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. हीघटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नव्हते. या प्रकरणी हिताची सर्व्हिसेस या कंपनीचे चॅनल मॅनेजर देविदास अय्यर (वय 45, रा. वारजे माळवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील खडी मशीन चौकातून दिवसरात्र वाहतूक असते. अशा अहोरात्र वाहतूक असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील बधेनगर मध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम सेंटर केवळ एक महिन्यापूर्वीच सुरू झाले आहे. या एटीएम सेंटरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. एटीएम मशीनची वायर कापली व कशाच्या तरी सहाय्याने एटीएम मशीन उचकटून ती मशीनच चोरुन नेली. या एटीएम मध्ये 4 लाख 54 हजार 900 रुपये होते. याच इमारतीत राहणारे एटीएम असलेल्या दुकानाच्या मालकाना सकाळी सहाच्या सुमारास एटीएम फोडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यात या एटीएम सेंटरमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले.एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही लावलेले असतात. अनेक ठिकाणी केवळ एटीएम मशीनवरच फक्त कॅमेरा असतो. या ठिकाणी तुम्ही पैसे काढले तरच मशीनमधील कॅमेरा फोटो काढतो. आता एटीएम मशीनच चोरुन नेल्याने व तेथे सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे चित्रीकरण मिळू शकलेले नाही. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे अधिक तपास करीत आहेत.

मौजे बोरखेडी (बाळु मामाची )येथे अखंड हरीनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचे आयोजन


साखरा.प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे
सर्व भाविक भक्तना कळवन्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षी प्रेमाने याही वर्षी मौजे बोरखेडी (बाळु मामाची )येथे अखंड हरीनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या पंच कोशितिल सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा या सप्ताहाची सुरुवात दि.1/1/2018 सोमवार ला  सुरू होत आहे या सप्ताहाची कार्यक्रम सकाळी काकडा.दुपारी श्रीमद  भागवत कथा सायंकाळी सहा वाजता हरिपाठ.व नऊ वाजता नामाकिंत महाराजाचे कीर्तने होतील कीर्तने या प्रमाणे होतील दि.1/1/2018 ;श्री.ह.भ.प.सुरेश महराज आळंदीकर दि.2/1/2018/श्री.ह.भ.प.आदींनाथ महाराज.लाड़.दि.3/1/2018/; श्री.ह.भ.प.निर्गुण महाराज.परळीकर दि.4/1/2018/ श्री.ह..भ.प.गजानन महाराज कळमनुरीकर दि.5/1/2018/श्री ह.भ.प.अजय महाराज आळंदीकर दि;6/1/2018  श्री .ह.भ.प.माणिकचंद महाराज रेंगे परभणीकर दि.7/1/2018/श्री.ह.भ.प.दत्तात्रय महाराज हळदे आळंदीकर दि.8/1/2018/सोमवार सकाळी 11वाजता श्री.ह.भ प.संतोष महाराज अभंगराव (पंढरपूर )यांचे काल्याचे कीर्तन होईल या सप्ताहाचे नियोजन श्री मंगलराव हराळपाटील हें करीत आहेत या पंच कोशितिल सर्व भाविक  भक्तांनी दर वर्षी प्रमाने याही वर्षी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढ वावि सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वहिनी
साखरा.प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे मो.नं व्हट्स्प.नं.8007689280

पाथरीत जायकवाडी परीसरात पाईप लाईन फुटली,हजारो लिटर पाण्याची नासाडी


प्रतिनिधी
पाथरी:-शहरातील जायकवाडी परीसरात न प ची पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली असून अनेकांना न प च्या पाणी पुरवठ्या पासून वंचित राहावे लागल्याचे नागरीकांनी सांगितले.
पाथरी शहरातील जायकवाडी वसाहत भागातील दक्षिने कडील प्रवेश व्दारा जवळ असलेल्या सिमेंट रस्त्या लगल नगरपरिषदेची पाईप लाईन फुटली असून रविवारी सकाळी या भागात न प च्या वतिने पाणी सोडण्यात आल्या नंतर या भागात फुटलेल्या पाईप लाईन मधून पाण्याचा लोंढाच बाहेर पडून हजारो लिचर पाण्याची नासाडी झाली असून या ठिकाणी राहात असलेल्या रहीवाश्यांच्या घरा समोर पाण्याचे तळे साचले आहे .या ठिकाणची फुटलेली पाईप लाईन त्वरीत जोडावी अशी मागणी नागरीकां मधून होत आहे

पत्रकारां वरील हल्ल्यांची संख्या कमी,खोट्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक


मुंबई:-महाराष्ट्रात 2017 मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या 56 घटना घडल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे कायद्याचे भय,पत्रकारांचे मजबूत संघटन आदिमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा हल्लामध्ये लक्षणीय म्हणजे तब्बल 24 ने घट झाली झाली हे दिलासा देणारे असले तरी तरी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या घटना चिंता करावी एवढया वाढल्या असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आलं आहे.
2012 पासून पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या सातत्यानं वाढत गेलेली दिसते.2012 मध्ये 45 पत्रकारांवर हल्ले झाले होते,2013 मध्ये हा आकडा 65 वर गेला,2014 मध्ये 66 पत्रकारांची डोकी फुटली होती,2015 मध्ये 77 पत्रकार हल्लेखोरांचे शिकार ठरले होते.2016 मध्ये तब्बल 80 पत्रकारांवर हल्ले झाले होते.चढत्या क्रमानं वाढत गेलेल्या या हल्ल्यांची संख्या 2017 मध्ये प्रथमच घटली असून यावर्षी परवा माथेरानमध्ये झालेल्या हल्ल्यांसह 56 पत्रकारावर हल्ले झाले आहेत.
पत्रकारांवर दाखल केल्या जाणार्‍या गुन्हयांच्या संख्येत मात्र मोठी वाढ झाली आहे.यावर्षी अमरावती,उदगीर,आष्टी निलंगा,सातारा,येथील पत्रकारांवर दाखल केल्या गेलेल्या खोटया गुन्हयांसह राज्यात एकूण 18 पत्रकारावर असे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे.गेल्या वर्षी ही संख्या 14 एवढी होती.पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्याना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.खोटया गुन्हयांबरोबरच पत्रकारांना धमक्या देण्याच्या घटना देखील वाढल्या असून यावर्षी तब्बल 26 पत्रकारांना धमक्याचे फोन आल्याच्या किंवा रस्त्यात अडवून धमक्या दिल्याच्या घटना घडल्या आहेत.माध्यमांच्या कार्यालयांवरील हल्ले,महिला पत्रकारांचे विनयभंग अशा काही घटनाही यावर्षात घडल्या आहेत.
हल्ले,धमक्या देऊनही एकाही हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाल्याचे एकही उदाहरण समोर आलेलं नाही.पत्रकार संरक्षण कायदा 7 एप्रिल 2017 मध्ये मंजूर झालेला असला तरी तो राष्ट्रपतींकडे गेलेला असल्यानं अद्याप या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.कायद्याची अंमलबजावणी लवकर करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पत्रकात करण्यात आली आहे.

‘प्रसार माध्यमे’ विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद

संपत रोडगे
गंगापूर:-तालुक्यातील रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूल मध्ये शिक्षक आणि स्कूल लाईफ ग्रृप यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षभरापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमातून विविध क्षेत्रात कार्यरत नामवंतांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात येत आहे. शनिवारी (दि.३०) पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी ‘प्रसार माध्यमे’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्कूल लाईफ ग्रृपचे साईनाथ ईष्टके, शाळेचे मुख्याध्यापक ए.एस.मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षांचा असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देखील यशस्वी होतात. यासाठीच रघूनाथनगर येथील न्यू हायस्कुल मधील शिक्षकांनी दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना बोलावून विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राचा परिचय करून देण्यात येतो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले आणि तयारी करत असलेले विद्यार्थी देखील या केंद्रात मार्गदर्शन करण्यासाठी येतात. यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर माने आणि माजी विद्यार्थ्यांचा ‘स्कूल लाईफ ग्रृप’ मुख्याध्यापक ए.एस. मगरे, आर.एन. वाघमारे, आर.एस. कापडणीस, व्ही.एम. डुकरे, व्ही.आर. पवार, डी.एस. पराड आदीजण पुढाकार घेत आहे.
शनिवारी पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी ‘प्रसार माध्यमे’ याबाबत माध्यमांचे प्रकार, कार्य करण्याची पद्धती, या क्षेत्रातील संधी, सामाजिक माध्यमांचा वापर आदी बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन आर.एन. वाघमारे यांनी केले, तर आर.एस. कापडणीस यांनी आभार मानले. यावेळी दहावी, अकारावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक शर्मा यांचा सत्कार

अरुणा शर्मा

पालम :- पोलीस स्टेशन चे नव्याने रुजू झालेले पोलीस निरक्षक एम.एम. शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
पालम पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले एम. एम. शर्मा काही दिवसा पूर्वी रुजू झाल्याने त्यांच्या कामाची पद्धत चांगली असून सामान्य जनतेला योग्य ते न्याय देण्याचे कार्य करतात. ते अगोदर सोनपेठ येथे काम केलेले आहे. त्या ठिकाणी पण त्यांच्या कामाची नेहमी प्रश्नशा होत होती.  ते आता पालमला रुजू झाल्याने इथे पण त्यांचे कार्य अतिशय छान आहे. ह्या पुढे त्यांच्या कार्यास सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यांचा सत्कार करतांना पेठशिवनी येथील तंटामुक्ती अध्यक्ष वामनराव बरडे, भाजपा अ.मो. जिल्हासरचिटणीस डॉ. शेख बडेसाब, बालाजी बरडे, ज्ञानोबा रोकडे, मन्मथ बरडे, यण. यु. राठोड जमादार, सतीश कुरेवार गुप्त शाखा, डी. बी.बेंद्रे जमादार, बी.एस. पोले, क्राईम रायटर, सुभाष गोरे जमादार, सत्कार करताना आदी कर्मचारी उपस्थित होते.

बोंडअळीनंतर शेतकरयांवर घाटअळीचे संकट

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील शेतकरयांवर कापसावरील बोंडअळीनंतर हरभरा पिकांवर आलेल्या घाट अळीचा संकट उभे राहिले आहे. त्याच बरोबर सोयाबीन वर करप्या रोग पडला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. यंदा सुरुवातीला कापसाचे पीक बहारुन आल्याने शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पहिल्या, दुसरया वेचणीनंतर कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकरयांचे अल्पावधीत होत्याचे नव्हते झाले. कापसाचे पीक तांबडया अळीने खाल्ल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. खरीपाचे नुकसान रब्बीत भरुन काढू असा विचार करून अनेक शेतकरयांनी हरभराची पेरणी केली. हे पीक चांगले उतरले. ऐन घाटयात असतानाच निसर्गाचा लहरीपणा सुरु झाला. ढगाळ वातावरणामुळे हरभरयावर घाट अळीचे संकट उभे राहिले. बिकट परिस्थितीवर मात करून शेतकरी वाट काढत असला तरी संकट मात्र त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. हरभरयाला लागलेली फुले व घाटे टिकलण्यासाठी शेतकरी जीवतोड प्रयत्न करीत आहे. आता पर्यंत औषधांचा मोठा खर्च झाला आहे. बोंड आळी नंतर घाट आळीचे संकट आल्याने पिकावर लावलेला खर्चही निघतो की नाही हा प्रश्न आता उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी हरभरा हिरवागार दिसतो. मित्र घाटयांना आळयांनी पोखरल्याने उत्पन्न झिरो झाले आहे.

शेतकरयांकडे भाजीपाला येताच भाव घसरलेबळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले ; 40 रुपये किलोचा कांदा 15 रुपये

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातच नव्हे तर सर्वत्र शेतकरयांच्या शेतात सध्या भाजीपाला जोमात आला आहे. परंतू शेतकरयांकडे भाजीपाला येताच बाजारामध्ये भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत असल्याने कुठेही जा शेतकरयांचे नुकसान ठरलेलेच अशी परिस्थिती आहे.
57 दिवसांच्या उघडीपीमुळे शेतकरयांच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, तूर इत्याती खरिपाची पिके थोडया प्रमाणात आली. ज्यामुळे लागवड खर्च सुध्दा वसूल होणे शक्य नाही. कापूस या पिकावर बोंड अळीने घाला घातल्याने कापूस उत्पादन घटले आहे. कापसाला भाव नाही. शेतकरयांनी भाजीपाल्याला चांगला भाव येतो म्हणून शेतात मिरची, टमाटे, कारले, भेंडी, आवरा, चवळी, पालक, मैती आदि भाजीपाला लावला. परंतू आता हा भाजीपाला हाताशी येत असताना बाजारातील भाजीपाल्याचे भाव घसरले. पंधरा दिवसांपूर्वी कांदा 40 रुपये किलो होता. आता फक्त 15 रुपये किलो झाला. तर टमाटे, मिरची, भेंडी, कारले इत्यादी भाजीपाला पालम येथील आठवडे बाजारात 10 रूपये किलोपेक्षा कमी विकावा लागत आहे. गावरानी लिंबू उन्हाळयात दोन रुपयाला एक तर आज रुपयाला दहा मिळत आहे. उन्हाळयात हिरवी मिरची 80 रुपये किलो होती. तीच आता 15 रुपये किलो शेतकरयांना विकावी लागत आहे. ही शेतकरयांसाठी शोकांतिका म्हणावी लागते. एकंदर शेतकरयांकडे भाजीपाला येताच बाजारभाव घसरले. काहीही झाले तरी शेतकरयांचे नुकसानच म्हणावे लागेल.

डिग्रस येथील गोदावरी नदीवरील बंधारा ठरतोय वरदान पालम,गंगाखेड,पूर्णा तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेकडो एकर जमिनीवर होतेय ऊसाची लागवड

अरुणा शर्मा

पालम :- तालुक्यातील डिग्रस येथील गोदावरी नदीपात्र बांधण्यात आलेल्या उच्चपातळी बंधारयात पाणी अडविण्यात आले आहे. बंधारयाच्या वरच्या बाजूस गोदापात्र पाण्याने तुडूंब भरलेले असून गोदाकाठ परिसरातील शेतकरयांनी शेकडो एकर जमिनीवर ऊसाची लागवड करुन पाण्याचा लाभ घेतांना दिसत आहेत. यावरून डिग्रस बंधारा हा शेतकरयांसाठी एकप्रकारे वरदानच ठरत असल्याचे दिसून येते.
  आघाडी सरकारच्या काळात गोदावरी नदीवर नांदेडपासुन पैठणपर्यंत 11 बंधारयांची साखळी पध्दतीने बांधण्याच्या कामास मंजुरी मिळालेली होती. जलसंपदा विभागांतर्गत पालम तालुक्यातील डिग्रस येथील गोदावरी नदीपात्रात उच्च पातळीचा बंधारा  बांधण्यात आला. बंधारयाचे काम पूर्ण झाल्यावर अडविण्यात आलेले पाणी नांदेड जिल्हाला सोडण्यासाठी पालम तालुक्यातील शेतकरयांनी विरोध करुन जोरदार आंदोलनही केले होते. डिग्रस बंधारयात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे पालम, गंगाखेड, पूर्णा या तिन्ही तालुक्यातील गोदाकाठावरील गावच्या शेतकरयांना पिण्याचे पाणी व शेती सिंचनासाठी चांगलाच उपयोगी होत आहे. दरम्यान यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पालम, पूर्णा, गंगाखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हात फारसा पाऊस न झाल्याने कोरडया दुष्काळाचे संकट निर्माण झाले. त्यातच पालम, पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील शेतकरयांच्या सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे मोठे नुकसान झाले. तसेच कापसावरही आलेली गुलाबी बोंडअळी यामुळे शेतकरी खर्च करूनही कंगाल झालेला आहे. यातच डिग्रस बंधारा गोदाकाठ परिसरातील शेकडो शेतकरी सोयाबीन व कापूस पिकाचा नाद सोडून नव्या उमेदीने ऊस लागवडीचा निर्णय घेऊन कामाला लागलेले दिसत आहेत. सद्यस्थितीत गोदाकाठ परिसरातील डिग्रस, आरखेड, फळा, बरबडी, उमरथडी, फंरकडा, पालम, घोडा, गुळखंड, सोमेश्वर, जवळा, धनेवाडी, सायाळा, सावंगी, रावराजूर, भुजबळ पूर्णा तालुक्यातील महागाव, मुंबर, बानेगाव, धानोरा काळे, देऊळगांव दुधाटे, कळगाव गंगाखेड तालुक्यातील काही गावच्या शिवारात मोठया प्रमाणात शेतकरी ऊसाची लागवड करीत आहेत. सदरील ऊसाला अडविण्यात आलेल्या पाण्याचा लाभ होत आहे. एकंदरीत अशा परिस्थितीत ऊस शेतीसाठी डिग्रस बंधारा हा भाग्याचा ठरत आहे. यामुळे हा बंधारा शेतकरयांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसुन येत आहे.

करणीच्या बाहुल्यांपासून वनराईची मुक्तता, ‘अंनिस’ची मोहीम : मांढरदेव गडावरील बाहुल्या, चिठ्ठ्यांचे केले दहन.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा, वाई व पुणे येथील टीमने करणीच्या बाहुल्यांपासून मांढरदेवगडावरील वनराईची करणीच्या बाहुल्या, लिंबे, बिबे व चिठ्ठ्यांपासून मुक्तता केली. शनिवारी सकाळी धडाक्यात ही मोहीम राबविण्यात आली. हिरव्यागार वनराजीला अंधश्रद्धेच्यापोटी रक्तबंबाळ करणाऱ्या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाऊल टाकले. मांढरगडावर झाडांना खिळे मारून ठोकलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात आले. मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा 1, 2 व 3 जानेवारी 2018 रोजी होणार आहे.इथे पशुबळी अथवा लिंबू , बिबे ठेवणे, झाडाला खिळे मारणे, वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील मांढरदेवगडावर असे प्रकार होताना सर्रासपणे दिसतात. या माध्यमातून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा बेत ‘अंनिस’ने हाणून पाडला.प्रशांत पोतदार, वीर पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, हौसेराव धुमाळ (सातारा), डोंबलीकर, हरीश दिवार, प्रमोद भिसे, आशिष बनसोडे, संजय सकटे (वाई), नंदिनी जाधव, सुभाष सोळंकी, मोहिते, श्रीराम नलावडे, वल्लभ वैद्य (पुणे) यांनी शनिवारी झालेल्या बाहुल्या हटविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.या सर्व सर्व बाहुल्या, चिठ्ठ्या, लिंब व बिबे गोळा करुन मोकळ्या जागेत त्यांचे दहन करण्यात आले. या माध्यमातून प्रबोधनाचा जागर करण्यात आला. करणी केली म्हणून कुणाचेही वाईट होत नाही, त्याउलट या प्रकारामुळे वनराईचे नुकसान होत आहे. ही बाब सगळ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी ‘अंनिस’ने स्पष्ट केले.मांढरदेवी मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडे आहेत. त्या झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, लिंबू, चिठ्ठ्या लावून खिळे ठोकले जातात. अशा अघोरी प्रथा करून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. यामुळे जास्त प्रमाणात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे.या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे. असे अघोरी प्रकार होत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेता येऊ शकतो.