तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 6 January 2018

पाचोरा येथे बँक उप व्यवस्थापकाची रेल्वे खाली आत्महत्या.

गोंदिया येथील मूळ रहिवासी व पाचोऱ्यातील महाराष्टू बॅंक शाखेत उपव्यवस्थापक पदी म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय मिनाल कठाणे या तरूण बॅंक अधिकाऱ्याने आज (शनिवार) दुपारी धावत्या रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केल्याची घटना घडली. वडिलांचा अबोला व एकाकी पणा याला कंटाळून जीवन संपवित असल्याचे पत्र लिहून ठेवत त्यांनी आत्महत्या केली.गाळण (ता. पाचोरा) शिवारातील रेल्वे मार्गावर आज दूपारी एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असताना, सदर मृतदेह महाराष्ट बॅंकेच्या पाचोरा शाखेत उपव्यवस्थापक मिनाल कठाणेयांचा असल्याचे उघडकीस आले. मयताने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात एकाकीपणामूळे मी या अगोदर ही जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडीलांना मुलापेक्षा आपलागर्व व अहंकार महत्त्वाचा आहे. आठ महिन्यांपासून मी वडिलांच्या फोनची वाट पहात होतो. पण त्यांनी एक कॉल देखील केला नाही. वडिलांच्या एका शब्दासाठीमी तरसत राहिलो, म्हणून एकाकीपणामुळे मला जीवनाचाकंटाळा आला असून मी स्वतः हून स्वईच्छेने जीवन संपवित आहे, त्यासाठी कुणालाही दोषी धरू नये. असा उल्लेख चिठ्ठीत आहे. तरूण बॅंक अधिकाऱ्याच्या आत्महत्येमूळे हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक सचिन सानप व हंसराज मोरे करीत आहेत.

ओ.बी.सी.फाऊंडेंशनच्या तालुका सचिवपदी कृष्णा ढाकणे यांची निवड

महादेव गित्ते
--------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- तालुक्यातील कृष्णा भीमराव ढाकणे यांची ओबीसी फाऊंडेशनच्या इंडिया कृती वंजारी सेवा महासंघाच्या कृषी आघाडीच्या तालुका सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.  

ओ.बी.सी.फाऊंडेंशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वातीताई मोराळे यांच्या सुचनेवरुन बीड जिल्हाध्यक्ष महेश राख यांनी कृष्णा ढाकणे यांची नुकतेच नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली. कृष्णा ढकाणे यांची सर्वानुमते परळी तालुका कृषि आघाडीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत. ढाकणे यांची सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात तसेच शेतकर्‍यांच्या विविधे प्रश्न व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून ते सहभाग असतात म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओ.बी.सी.फाऊंडेंशनच्या ध्येयधोरण त्याचा प्रसार आणि प्रचार करुन ओबीसी फाऊंडेशनच्या मजबूतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ढाकणे यांनी यानिवडीनंतर सांगितले आहे. 

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
संपर्क ः- 9623921114
                          ╰════════════╯

माळशिरस तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते यांची एक हृदयस्पर्शी आठवण


पिलीव/सुजित सातपुते
  गेल्या आठवड्यात माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिटिंगला गेलो होतो. येताना कण्हेर येथील कन्हेरसिध्दाचे दर्शन घेतले. माझे मित्र किरण काळे यांचेकडे जेवण केले. जाताना माझे स्नेही भरतबापू माने यांनी चहासाठी बोलाविले. चहा घेत असताना एक ७० वर्ष वयाच्या आजीबाई आल्या. त्यांनी डाक्टर साहेब... अशी हाक मारली. मी विचार करत राहिलो. कारण आवाज किंचित ओळखीचा वाटला व दिलेली हाक अंतःकरणापासून दिलेली होती हे जाणवलं . चहा पित  पित  आजीबाईंनी जी कहाणी सांगितली ती ऐकुन  माझे मन झर्रकन १० वर्षांपूर्वीच्या इतिहासात गेले.
माझी बदली माढा येथुन  प्रा.आ.केंद्र.माणकी येथे झाली. माणकी म्हणजे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले छोटेसे गाव. त्यात  प्रा.आ.केंद्राची इमारत गावापासून ३ किमी. अंतरावर ओसाड माळरानावर होती. तरीही प्रा.आ.केंद्र सर्वांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची संस्था म्हणून पुढे आली. मी या काळात ४ वर्ष कण्हेर येथील उपकेंद्रात राहण्यास होतो . माझी कन्या श्रावणी कन्हेरच्या प्राथमिक शाळेत जात होती. माझी पत्नी मुलगी यांना खेडेगावात राहण्यास थोडा त्रास व्हायचा. तरीही गावकरी फार मदत करायचे. मी रात्रीच्या वेळेत कण्हेर मध्ये काही पेशंट आले तर उपचार करायचो.
            यातच या केंगार आजी  उपचारासाठी माझेकडे यायच्या. यायच्या नाही त्यांना शेजारी हाताला पकडून आणायचे. कधी कधी भरतबापु त्यांच्या गाडीवर उचलून आणायचे. त्या पुर्ण अंध होत्या. मी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करायचो. त्यांनी एकदा सांगितले रक्तदाब व इतर आजारांमुळे माझे डोळ्याचे ऑपरेशन होत नाही. खासगी दवाखाना उपचार घ्यायाला पैसे नाहीत. मला वाईट वाटायचे. मी त्यांच्या रक्तदाबावर सलग चार महिने उपचार केले. रक्तदाब नॉर्मल झाला. एक दिवस त्यांना मी स्वतः पुणे येथे पाठवून मोतीबिंदुचे ऑपरेशन  करून आणले. भरतबापूच्या पत्नी स्वतः त्यांच्याबरोबर गेल्या. काय आश्चर्य  आजी आठ दिवसात जग पाहू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आजी पण एवढी हट्टी की तीन चार महिन्यांनी त्यांनी मला न सांगता  माझे नाव सांगून स्वतः जाऊन दुसऱ्याही डोळ्याचे ऑपरेशन केले आणि एका जाग्यावर सहा वर्षांपासून बसून असलेल्या आजी पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरू लागल्या.

          माझे मन वरील कथेत गुंतून गेले होते. माझी पत्नी नेहमी म्हणायची आपण खेड्यात राहिल्याने आपल्या दोन्ही मुलीच्या शिक्षणाचे नुकसान झाले. पण सदरची घटना एकूण आमच्या कुटुंबातील तो गैरसमज दूर झाला. मी  कण्हेर व माणकी  परिसरात गेलो कि सहज १०-२० माणसे तर सांगतात. डॉक्टरसाहेब तुम्ही आमच्या गावाची सेवा केली. तेव्हा मन भरून येते. स्वतःचाच अभिमान वाटतो. आपल्या नुकसानापेक्षा दुसऱ्याचा काही फायदा झाला यांचे हे उदाहरण समोर येते .
         केंगार आजीचं एकाच वाक्य असायचं डाक्टर साहेब कायच दिसत नाही. कुत्रं बी खातय ... अन मांजर बी खातय .....पण हे वाक्य आज आजीचा भुतकाळ होता. रात्री ८.३० वाजता मी चष्मा लावून जेवढे पाहू शकत नव्हतो ते आजी सहज पाहु शकत होत्या ....आजी आनंदाने भूतकाळातील कथा सांगत होत्या .मी आणि कण्हेर मधील काही ग्रामस्थ मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो .....वाऱ्याच्या थंड झुळुकीबरोबर मन हवेत तरंगत होते .......

शासन आणि जनतेचा दुवा म्हणजे ग्रामीण वार्ताहर : धनंजय फराटे यांचे प्रतिपादन.

शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीवर लक्ष ठेऊन निर्भीड लिखाण करून आपली अस्मिता जपावी विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेची गरज असून पत्रकारांनी समाजाचे स्वास्थ्य आणि सलोखा राखायला मदत झालेली आहे .आपल्या परिसरातील माहितीचे सुक्ष्म निरक्षण करावे व जी खरी माहिती आहे ती आपल्या लेखणीतून व्यक्त करावी कारण आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघीतले जात आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भिड व निसंकोचपणे आपली लेखणी वापरावी आज आपण दर्पन दिन साजर करतो पण ऐक गोष्ट लक्षात ठेवने गरजेचे आहे असे प्रदिपादन धनंजय फराटे यांनी केले.
दि 6 जानेवारी रोजी लोणी वैजापुर तालुक्यातील लोणी खुर्द येथे पञकार दिनाच्या निमित्ताने पञकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन वाटप व शस्त्र प्रदर्शन व प्रशिक्षण कार्यामाचे आयोजन करण्यात आले होते
आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञकार संघाचे तालुका अध्यक्ष शांताराम मगर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे.होते यावेळी पंचायत समिती सदस्य राजेन्द्र मगर सरपंच रिखब पाटणी पी.आर.जाधव माधवराव जाधव बाबासाहेब जाधव केंद्र प्रमुख एम.जी  राऊत विनायक विद्यालयाचे प्राचार्य रंजित ठाकरे कुंडलीक वाळेकर पञकार संघाचे तालुका सचिव राधाकृष्ण सोनावणे सोमनाथ तांबे आरुण सोनावणे आप्पा तांबे भिकन सोमासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोलताना पंचायत समिती सदस्य राजेन्द्र म्हणाले
की, पत्रकार हा वंचित समाजाच्या हितासाठी काम करतो त्यामुळे  समाजालाही आधार वाटतो.  तालुक्यातील राजकारण व समाजकारणात पत्रकारितेच्या माध्यमातून चांगले झाले आहे. तालुक्यातील पत्रकारांचे ग्रामीण विकासात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे राहीले आहे. राजकारणी लोकांच्या ज्या ठिकाणी चुका झाल्या तो विषय बातमी होऊन समाजापुढे येतो. चुका लक्षात आणून दिल्या पाहिजेत, परंतू त्याच बरोबर वस्तुस्थिती जाणून घेऊन पत्रकारांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्य राजेन्द्र मगर यांनी व्यक्त केली.

सरपंच रिखब पाटणी बोलताना म्हणाले की
शासन अनेक कल्याणकारी योजना राबवते,  ह्या योजना  आणि उपक्रम लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचे महत्वपूर्ण काम वार्ताहार करत असून  वार्ताहाराने नेहमी सकारात्मक लिखाणावर भर द्यावा. अशा सकारात्मक लिखाणामुळे समाजातील अनेक जण प्रेरित होऊन निश्चितच बदल घडवून आणतील असा विश्वास लोणी खुर्द येथील सरपंच रिखब पाटणी यांनी व्यक्त केला.
शेवटी अध्यक्षीय भाषणात शांताराम मगर म्हणाले की
पोलीस आणि पत्रकारांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. शासनाच्या योजनांना गावकुसा पर्यंत पोहचवण्याचे माध्यम म्हणजे ग्रामीण वार्ताहर आहे. दैनिकाच्या पायाभूत श्रोत आहे तसेच समाजातील महत्वाचा घटक हा ग्रामीण वार्ताहर असल्याने माध्यमाच्या बदलत्या प्रवाहाची माहिती वार्ताहरांना होणे गरजेचे आहे शासन प्रणालीचा चैथा आधार स्तंब समजल्या जाणार्या पञारांच्या लेखन स्वातंत्र्यावर गदा येत आहे पञकारांवर हल्ले करणार्यावर कडक कायदा करायाला हवा राज्य घटनेने दिलेले आधिकार लेखन स्वातंत्र्य आधारित आहावे आसेल प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात शांताराम मगर यांनी केले.

■शस्त्र प्रदर्शनाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.■
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्य पोलीस खात्याबाबतची खरी माहिती शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे व जनतेशी सुसंवाद साधत शस्त्रास्त्र प्रदर्शन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने आहे आसे धनंजय फराटे यांनी सांगितले
  यावेळी लोणी खुर्द तलवाडा येथील ग्रामपंचायतीच्या व पंचायत समिती जिल्हा परिषद शाळा. विनायक विद्यालय यांच्या वतीने पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन,त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमचे सुञसंचालन गाणेश सोनावणे तर आभार बापु जाधव यांनी मानले केले.कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

देवगड तालुक्यातील पोंभुर्ले हे गाव मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत दत्तक घेऊन आदर्श गाव बनविले जाणार:-कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली घोषणा


मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक "दर्पण"कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या "दर्पण" पुरस्काराने "कोकणचा तडाखा" या साप्ताहिकाचे संपादक व दैनिक "सामनाचे" पत्रकार तसेच कोकणचा तडाखा या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा,आबा खवणेकर यांचा शाल स्मृतीचिन्ह व जांभेकर यांचे दुर्मिळ छायाचित्र व पुस्तके देऊन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

देवगड :-पोंभुर्ले हे गाव मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत दत्तक घेऊन आदर्श गाव बनविले जाणार आहे,अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोंभुर्ले ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या ‘दर्पण’ वृत्तपत्राचा वर्धापनदिन अर्थात ‘राज्यस्तरीय पत्रकार दिन’ आणि ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारितेचा गौरव’ समारंभ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले इथल्या ‘दर्पण’ सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्ले ग्रामस्थ आणि  जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिन आणि  जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव समारंभ आज शनिवारी पोंभुर्ले इथं दर्पण सभागृहात झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखी भव्य मिरवणुक काढुन राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक आणि  ऐतिहासिक खेळ असलेल्या लाठीकाठी तसेच तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला हार घालून आणि  दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवंगत मान्यवर पत्रकार आणि  संपादक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विचारपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, देवगड पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री आडीवरेकर, अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, विजय मांडके, अलका बेडकिहाळ, पोंभुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, निशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. "कोकणचा तडाखा" या साप्ताहिकाचे संपादक व दैनिक सामनाचे पत्रकार आबा खवणेकर यांच्यासह सिंधुदुर्ग  जिल्ह्यातल्या विविध पत्रकार, संपादक, साप्ताहिकांचे संपादक, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे रिपोर्टर यांचा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते दर्पण पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले..

तर यावेळी उत्तम वाडकर साप्ताहिक कडेलोट, हर्षवर्धन धारणकर साप्ताहिक सत्यप्रकाश, श्रीमती संजीवनी देसाई साप्ताहिक व्याध, सौ.दिव्या वायंणकर साप्ताहिक सिंधुप्रगती, नंदकिशोर महाजन साप्ताहिक आघाडी, राजेंद्र खांडाळेकर साप्ताहिक जनयुग, सौ.सिमा मराठे साप्ताहिक किरात, आनंद लोके साप्ताहिक देवदुर्ग, प्रविण बांदेकर साप्ताहिक वैनतेय, मनोज माळकर साप्ताहिक दोडामार्ग एक्सप्रेस, रवी गावडे साप्ताहिक सुसाट, विलास कुडाळकर युवा पत्रकार, नितीन तळेकर साप्ताहिक सुजन सिंधु, वसंत केसरकर साप्ताहिक हरहर महादेव, दिलीप हिंदळेकर साप्ताहिक कनकसिंधू, महेश खोत साप्ताहिक अणुरेणू, पी.एफ.डाॅन्टस साप्ताहिक सरहद्द, दयाळ कांबळे साप्ताहिक कोकणी दणका, दयानंद मांगले दैनिक रत्नागिरी टाईम्स, संतोष कुलकर्णी सकाळ, गणेश आचरेकर पुण्यनगरी, राजन नाईक प्रतिनिधी दुरदर्शन, विजय गांवकर प्रतिनिधी दुरदर्शन, निलेश जोशी प्रतिनिधी आकाशवाणी, विजय पालकर आपला सिंधुदुर्ग वेब, विशाल रेवडेकर आपला कोकण लाईव्ह, यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान दर्पण पुरस्कार देऊन करण्यात आला.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने राज्यात प्रथमच जेष्ठ आणि  गुणवंत पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देण्यास १९९३ पासून सुरुवात केली. गेली २५ वर्षे हे पुरस्कार नियमित दिले जातात. आचार्य जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मरणकार्यलासुद्धा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर ऐतिहासिक अशा दोन्ही रौप्य महोत्सवी उपक्रमाअंतर्गत सामाजिक कृतज्ञता म्हणून दर्पणकारांचा वारसा जपणाऱ्या पुरस्कारांचा सन्मान केला जात असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र बेडकिहाळ यांनी बोलताना व्यक्त केले. तर पोंभुर्ले हे गाव मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत दत्तक घेऊन आदर्श गाव बनविले जाईल अशी घोषणा कुलगुरू श्री.डाॅ. देवानंद शिंदे यांनी यावेळी केली..

एक निर्भिड,सडेतोड पत्रकार,कोकणचा तडाखा या साप्ताहिकाचे संपादक,दैनिक सामनाचे पत्रकार, लोकसंदेश समाचार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी, कोकणचा तडाखा या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा,महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशनचे कोकण विभागिय अध्यक्ष, केळूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त श्री.आबा खवणेकर यांना 'दर्पण' पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने  श्री खवणेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आनंदवन इन्टरनॅशल स्कुल पाथरी मध्ये मिळणार आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे बारावी पर्यंत मोफत शिक्षण- डाॅ.सलीम शेख.

प्रतिनिधी
पाथरी:- येथील आनंदवन ईन्टरनॅशल स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाथरी, मानवत,सोनपेठ,सेलु या परिसरातील आत्महत्या ग्रस्त शेतकर्याच्या मुलांना नर्सरी  (3वर्षे वयापासून ) ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याच  डाॅ.सलीम मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फाउंडेशन चे सचिव डाॅ.सलीम शेख यांनी सांगितले.
आत्महत्या ग्रस्त शेतकर्याच्या मुलांना बारावी पर्यंत मोफत शिक्षणा सह सर्व शालेय साहित्य व ग्रामीण भागापासुन  शाळे पर्यंत  प्रवास खर्च देण्याचा निर्णय घेतल्या च सांगितले आहे. 
तसेच इतर गरीब/ श्रिमंत सर्वांना सोयिस्करपणे प्रवेश मिळावा ह्या उद्देशाने फिस मध्ये  अनेक सवलती देत असल्याचे कळवण्यात आले आहे.
संबंधितांनी शैक्षणिक वर्ष 2018-19साठी  मोफत प्रवेशासाठी अथवा सवलती मध्ये प्रवेश घेण्यासाठी  1 फेब्रुवारी पुर्वी आनंदवन ईन्टरनॅशल स्कुल पोलिस क्वाॅरटर च्या मागे  पाथरी येथे   नोंद करण्या चे आवाहन डाॅ.सलीम शेख यांनी केले  

कारखान्याची मालमत्ता शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : तालुक्यातील सायखेडा येथील महाराष्ट्र शुगर या कारखान्याकडे थकीत आसलेल्या ऊस बिलाची रक्कम मिळावी यासाठी नांदेड, जालना व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता ही कारखान्याकडे बिले आसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी चुन्नीलाल कोकणी यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
सोनपेठ तहसिल कार्यालयात महाराष्ट्र शुगर या कारखान्याचा जाहीर लिलाव तिसऱ्यांदा ठेवण्यात आला होता.
कारखान्यावर बँकेचे आसलेले देणे व शेतकऱ्यांचे उसाचे थकलेले बिल यांच्या पेक्षा जास्त किंमतीत या कारखान्याचा जाहीर लिलाव होत आसल्याने हा कारखाना घ्यायला कोणताही कारखानदार,उद्योगपती इच्छुक नसल्यामुळे कारखान्याकडे उसबिलाचे पैसे थकलेल्या नांदेड, जालना व परभणीच्या शेतकऱ्यांनी आज सोनपेठ तहसिल कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी प्रशासनाकडुन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेमकी प्रक्रिया कशी सुरू आहे यासाठी शेतकरी आज तहसिलवर जमा झाले होते. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला होता. सोनपेठ तालुक्यातील पंडितराव भोसले उपस्थित होते.

खंडाळा येथे मीनाताई ठाकरे यांना अभिवादन

 

तेजन्युज हेडलाईन प्रतिनिधी - वैजापूर

मिनाताई ठाकरे यांची जयंती निमित्त सहा जानेवारी शनिवार सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात अभिवादन करण्यात आले. 

या वेळी बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी उप सरपंच साजिद खान,ग्रा.पं.सदस्य विजय मगर, भिमराव बागुल, रामभाऊ त्रिभुवन, दिगविजय पवार, दशरथ दारवंटे, अरुण जाधव,भरत घोडेकर आदि उपस्थित होते

परळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारीणी जाहिर तालुका सरचिटनीस पदी अँड.सतीश काळे यांची निवड


नितेश काळे

परळी वै.दि.06......................परळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारीणी जाहिर करण्यात आली असुन, आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, न.प गटनेते वाल्मिकअण्णा कराड, युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटनीस पदी सिरसाळा येथील अँड.सतिष काळे, यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना ना.धनंजय मुंडे यांनी निवड प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी काम करणार असल्याची भावना  नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी व्यक्त केली. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, पंचायत समितीचे उपसभापती पिंटु मुंडे, युवा नेते अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली तात्या गडदे, राहुल केंद्रे, दिनेश गजमल, राहुल भोसले, संदिप दिवटे, नासरदादा शेख, लखन गायकवाड, व्यकटराव हारनावळ, जयदत्त नरवटे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------