तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 January 2018

जेटली की पोटली - अर्थ संकल्प २०१८


____________________________________
अमृत योजनेअंतर्गत 500 शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहचविण्याचं लक्ष्य.

* 56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर. तर अनुसुचित जमातींच्या विकासासाठी 39,135 कोटी रूपयांना निधी मंजूर.

* इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधान स्वत: आढावा घेत असतात.

* नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार.

* वस्त्रोद्योग विकासासाठी 7,140 कोटी रुपयांचा निधी

* मुद्रा योजनेमध्ये 76 टक्के लाभधारक महिलाअसून, 50 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी आहेत, 3 लाख रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे.

* स्टार्ट अप आणि उद्योग विकासासाठी मोदी सरकारचा नवा प्लान. नोटबंदीनंतर उद्योगांचं नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3 हजार 700 कोटींची तरतूद.

* महिला कर्मचा-यांचा ईपीएफ 8 टक्के करण्याची शिफारस - अरुण जेटली.

* नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत नदी स्वच्छतेच्या 187 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 16173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

* टीबी रोखण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद.

* नवी मेडिकल कॉलेज देशभर उभारणार. 3 लोकसभा मतदान संघाच्या मागे एक मोठं हॉस्पिटल उभारणार.

* 'राष्ट्रीय स्वास्थ विमा' योजना 1200 कोटी रूपये खर्च करून देशभर उभारणार.

* प्रत्येक राज्यामध्ये किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल

* आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम राबविण्याचा निर्णय.त्या कुटुंबाना प्रतिवर्ष पाच लाख रुपये रुग्णालयाचा खर्च मिळणार.

* 10 कोटी गरिबांसाठी नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन योजना, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाखांची मदत - अरुण जेटली

* 10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणत आहोत, त्याचा 50 कोटी लोकांना लाभ मिळणार.


* आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार.

* नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाखसेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार , 12 हजार कोटी यासाठी मंजूर - अरुण जेटली

* प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहील याची काळजी घेणार.

* 1 लाख कोटी रूपयांचा निधी शिक्षणाच्या क्षेत्रात खर्च करण्याची जेटलींची घोषणा.


* प्राइम मिनिस्टर फेलोशिप योजनेतून 1000 बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार

* शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याकडे भर. 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम.डिजिटल शिक्षण देण्याची योजना.

* शिक्षणाचा दर्जा अद्यापही चिंतेचा विषय, दर्जेदार शिक्षक असल्यास दर्जा आपोआप सुधारेल - अरुण जेटली

* ग्रामीण भागात जीवनाश्यक वस्तू पोहोचाव्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न, 14 लाख कोटी खर्च करण्यात येणार - अरुण जेटली.

* पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी पेक्षाजास्त घरे बांधली जात आहेत.

* प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देण्याची योजना.

* सहा कोटींपेक्षा जास्त शौचालयं उभारण्यात आली, पुढील वर्षात 2 कोटी शौचालयं उभारण्याचा निर्धार - अरुण जेटली

* गरिबांच्या घरात वीज यावी यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजना सुरु करण्यात आली होती, 4 लाख घरांपर्यंत वीज पोहोचली आहे- अरुण जेटली

* उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देशातील 8 करोड महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार.

+ कृषी क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी 22 हजार कोटींची तरतूद.

* 100 बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार.

* नाबार्डच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

* मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद.

* बांबू शेतीसाठी 1290 कोटी रुपयांची योजना.

* अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 1400 कोटींची तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय.

* 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटींची तरतूद - अरूण जेटली.

* 470 एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत, 585 शेती मार्केटच्या सुधारणांसाठी 2 हजार कोटींची तरतूद.

* विशेष कृषी उत्पादन मॉडेल विकसित करण्याची गरज - अरुण जेटली


* यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधांन्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे - अरूण जेटली.

* शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य सोई पुरवायला राज्यांबरोबर मिळून आम्ही काम करणार- अरूण जेटली.

* शेतकऱ्यांप्रती कटीबद्ध असलेलं सरकार. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं ध्येय- अरूण जेटली.

* ट्रेनच्या तिकिटांपासून ते इतर महत्त्वाची सगळी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध- अरूण जेटली.

* कमी किंमतीत जास्त उत्पन्न घेता यावं यासाठी शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न - अरुण जेटली

* शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार.

* डिजिटलायझेशनला वेग, कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध होतात - अरुण जेटली

* कोटी घरांना वीज पुरवण्याचं काम सध्या सुरु आहे - अरुण जेटली

* गाव-खेड्यांचा विकास करणं हे आमचं लक्ष्य असेल - अरूण जेटली.

* यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित - अरुण जेटली

मूकनायक दिवस परळी पत्रकार संघाच्यावतीने साजरा


परळी (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईतून मूकनायक वृत्तपत्र  सुरू केले आणि देशात नव्या क्रांतीस सुरूवात झाली. तसेच शोषित वंचितांचा आवाज मूकनायक वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी लेखणीच्या माध्यमातुन जगापुढे आणला असे प्रतिपादन पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केले. ते परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मूकनायक दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते. 

परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्मक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने हे होते. पुढे बोलताना काळे म्हणाले की, भारतीय इतिहासात 1920 हे वर्ष नवे वळण देणारे ठरले. 31 मार्च 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक सुरू करून हजारो वर्ष व्यवस्थेने ज्यांचा आवाज दाबला होता त्यांना बोलते केले. त्यानंतर बहिष्कृत भारत, जनता व प्रबुध्द भारत अशी वर्तमानपत्रे सुरू केली. भगवान साकसमुद्रे यावेळी बोलताना म्हणाले की, भारताच्या पहिल्या महिला संपादिका महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय चळवळीची जाण असणार्‍या तानूबाई बिर्जे यांनाही उपेक्षित ठेवले. त्यांनी दिनबंधू पत्रक चालविले.

या कार्यक्रमात कामगार कल्याण अधिकारी आरिफ शेख,  विलास रोडे, प्रेमनाथ कदम, रवी जोशी, मोहन व्हावळे, रानबा गायकवाड, सुकेशनी नाईकवाडे, प्रा.दशरथ रोडे, महादेव गित्ते, आकाश सावंत, महादेव शिंदे, चंद्रमणी वाघमारे, अमोल सुर्यवंशी, अनिल चिंडालीया, संतोष बारटक्के, संजीव रॉय आदि उपस्थित होते.

आमचं गांव आमचा विकास उजळणी या तीन दिवशीय कार्यशाळेत प्रविण पट्टेबहादुर सन्मानित


फुलचंद भगत
वाशिम - जिल्हा परिषद वाशिम  राष्ट्रिय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तिन दिवशीय आमचं गांव आमचा विकास या उजळणी कार्यशाळेला 29 जानेवारी रोजी प्रारंभ झाला होत. या कार्यशाळेचे उदघाट्न जिल्हा परिषद अतीरिक्त मुख्याधिकारी प्रमोद कापडनिस यांनी केले होते.
      या तीन दिवशीय कार्यशाळेत 14 व्या वित्त आयोगातुन कोणकोणत्या बाबी करता येतील .व अग्रक्रमाने यातून कोणकोणते प्रभावी कामे करता येतील याची उजळणी करण्यात आली.या कार्यशाळेला आमचं गांव आमचा विकास यातील मास्टर ट्रेनर सर्वजण यावेळी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शक म्हणून सौ काटे , कु प्रियंका सरनाईक,धनंजय राठोड यांचे तीन दिवशीय कार्यशाळेला मोलाचे मार्गदर्शन केले.या समारोपीय कार्यशाळेत जिल्हा परिषद पंचायत विभाग विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितिन माने यांच्याहस्ते मास्टर ट्रेनर प्रविण पट्टेबहादुर यांना सन्मानपत्र देवूंन सन्मानित करण्यात आले. ,विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व प्रविण प्रशिक्षक उपस्थित होते .यावेळी राजकुमार पडघाण,सौ संध्या सरनाईक,भूषण मोरे भिमआर्मीचे जिल्हाप्रमुख अड़ सचिन पट्टेबहादुर,अजय परसे,एकनाथ राठोड, अनिल गायकवाड, सिद्धार्थ खंडारे,राजेश इंगोले,प्रमोद सावळे, सावळे,संतोष इंगळे धम्मपाल पट्टेबहादुर ,विनोद जटाळे, रमेश गोडघासे यांनी अभिनंदन केले.

फुलचंद भगत
मो.9763007835

तिहेरी दुर्घटनांत चार जण ठार रेवकी गावकर्‍यांवर शोककळा


सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि.31 __ येथील वायरमनचा कणकवली भागामध्ये शॉक लागून एकाच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आणण्यासाठी भाऊ,पुतण्या आपल्या नातेवाईकांसह गेले होते. मृतदेह घेऊन येताना त्यांच्याही गाडीला मादळमोहीजवळ अपघात होऊन त्यामध्ये पंधरा वर्षीय पुतण्यासह चालकाचा मृत्यू झाला तर यांच्या अंत्यसंस्कारासाठी रेवकी-देवकीवरून मोटारसायकलवर निघालेल्या दोघांना रात्रीच भरधाव वेगात येणारा वाळुचा ट्रॅक्टरच्या धडकेत त्यामध्येही एक जण जागीच ठार झाला असून  अन्य एक जखमी झाला. या विचित्र आणि रेवकी-देवकीवर शोककळा पसरवणार्‍या तीन घटना २४ तासांमध्ये घडतात. दुसरीकडे संतापलेले रेवकीदेवकीचे नागरीक तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद करा,त्यांना अटक करा म्हणत बीड-जालना महामार्गावर ठिया मांडून बसले व जोपर्यंत वाळू माफियावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे गेवराई तालुक्यात पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनात गोंधळ उडाला असून रेवकीदेवकीवर मात्र प्रचंड शोककळा पसरली.
या दुर्दैवी तिन अपघातांची सविस्तर माहिती अशी की मूळचे रेवकीदेवकी येथील गेवराई येथे राहणार्‍या कृष्णा मस्के हे कणकवली भागामध्ये वायरमन म्हणून काम करतात. काल त्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मस्के कुटुंबियांना झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आणण्यासाठी भाऊ बंडु मस्के, त्यांची पत्नी आणि बंडु मस्के यांचा १५ वर्षीय मुलगा वैभव मस्के हे तिघे कणकवलीला गेले. रात्री कृष्णा मस्के यांचा मृतदेह घेऊन ते गेवराईकडे येत असताना मादळमोहीजवळ मध्यरात्री दरम्यान चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, गाडीने तीन ते चार पलट्या घेतल्या. या अपघातात पंधरा वर्षीय वैभव मस्के आणि स्विफ्ट कारचा चालक विशाल अशोक घोडे (रा. राजपिंप्री) हे दोघे जागीच ठार झाले. तर गाडीमधील बंडु मस्के व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेपाठोपाठ कृष्णा मस्के यांचा मृतदेह गेवराईत येणार आहे म्हणून रेवकी येथील आदिनाथ बाबूराव बाबरे व अशोक साहेबराव थोरात हे दोघे मोटारसायकल (क्र. एम.एच. २३ ए.व्ही. ५८०४) ने गेवराईला येत असताना या मोटारसायकलला वाळुच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. त्यामध्ये आदिनाथ बाबरे हे ठार झाले तर अशोक साहेबराव थोरात हे जखमी झाले. कृष्णा मस्के यांच्या मृत्यूनंतर गेवराईत दोन अपघात झाले असून मोटारसायकलला वाळुच्या ट्रॅक्टरने उडवल्यामुळे रेवकी-देवकीचे नागरिक प्रचंड संतापले. या गावातील चौघा जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अख्खं गाव गेवराईत डेरेदाखल झाला असून रुग्णालयात आलेल्या लोकांनी संतापून जावून वाळु माफीयांवर कठोर कारवाई करा म्हणत दवाखान्यासमोरील राष्ट्रीय महामार्ग २११ वर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. पाऊन तासाच्या आंदोलनामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली. या घटनेने संतापलेले लोक पाहता घटनास्थळी तहसीलदार पवार पोलिस निरीक्षक आहेर आले परंतु या दोघांच्या आश्‍वासनावर लोक उठत नसल्याने जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि पंचायत समिती सभापतीचे पती अभयसिंह पंडित हे घटनास्थळी आले. या वेळी विजयसिंह पंडितांनी वाळु माफीयांचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असं म्हणत उपस्थित गावकर्‍यांना शांत केले यानंतर त्यांच्या मध्यस्थिने हे आंदोलन मागे घेण्यात आले.यानंतर या सर्वांवर वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

’धम्म-भूषण’ पुरस्काराने धम्मानंद मुंडे यांचा गौरव


परळी (प्रतिनिधी) ः परळी येथील परळी भूषण, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक तथा रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल धम्मानंद मुंडे यांना ’धम्म-भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना दि. 3 फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी 1 वाजता 26 व्या अखिल भारतीय  बौध्द धम्म परिषदेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तथागताचे धम्मचक्र गतीमान करण्यासाठी आणि सारा भारत बुध्दमय करणे ही डॉ. बाबासाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरीता आपण धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय व सांस्कृतिक कार्य केले आहे. हे अंत्यत कौतुकास्पद आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून त्यांना ’धम्म-भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळयास भंते धम्मप्रिय महाथेरो (कपिलवस्तु) यांच्या हस्ते व भंते डॉ. आनंद ज्योती (बुध्दगया) यांच्या अध्यक्षतेखाली आणि भदन्त एन चंद्ररत्नेथेरो (सांची), भदन्त शिवली (श्रीलंका), थायलंड येथील भिक्कू संघ, भदन्त ज्ञानरत्न आग्र्रा, भिक्षु प्रज्ञादीप (बुध्दगया), प्रा.आनंद सुमेधबोधी  महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत  महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी याठिकाणी देण्यात येणार आहे. सदरील धम्म परिषद ऐतिहासिक असून या परिषदेसाठी जगभरातून बौध्द उपासक येतात हि परिषद आठ दिवस चालते.

धम्मानंद मुंडे यांची ’धम्म-भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन रिपाइंचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, पत्रकार मोहन व्हावळे यांनी कौतुक केले आहे.

 

दिलखुलास कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


         
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘बीड जिल्ह्याचा विकास’ या विषयावर ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
            ही मुलाखत गुरुवार दि. 1 आणि शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील रेल्वे विकास, जलसंधारण प्रकल्प, रस्ते विकास, पर्यटन विकास, जिल्ह्यात राबविण्यात येणारे स्वच्छ भारत अभियान, तीर्थक्षेत्र तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत श्रीमती मुंडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

दैवज्ञ सोनार समाजाने विभागीय परिचय मेळावा यशस्वी करून कात टाकल्याची प्रचिती दिली


–---------------------------------
    पूर्णा-प्रतिनिधी-{राजेश वालकर} दिनांक28 जाने.2018 हा दिवस दैवज्ञ सोनार समाजातील उपवधू-उपवर यांच्यासाठी पर्वणी ठरला."मी मुंबई, पुणे,औरंगाबाद, नांदेड ,यवतमाळ, वाशीम,लातूर,मुखेड,हदगाव ,नायगाव,कळमनुरी,हिंगोली, वसमत,बिलोली,देगलूर, बाऱ्हाळी,बेटमोगरा,एकलारा,--------------इथून इथून आलोय/आलेय मी डॉक्टर , इंजिनीअर,वकील,पोलीस,शिक्षक,प्राध्यापक,उद्योजक,वास्तुविशारद, शिपाई, कारागीर,,------- --------- आहे."माझ्या वराकडून, वधूकडून अशा अशाअपेक्षा आहेत ".अशा परिचयाची उधळण करीत उपवधू,उपवरांनी------
वासवीमाता परमेश्वरी भवन दणाणून सोडले.निमित्य होते श्री दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड तर्फे आयोजित वधू वर परिचय मेळावा जाने.2018…
ह्या मेळाव्यासाठीची तयारी सुमारे एक महिन्यापासून चालू होती .संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमाचे नियोजन ,तालुकास्तरावरील भेटी,इतर जिल्हा भेटी, यामध्ये अगदी व्यस्त होते ; नव्हे तर त्यांनी हा परिसर पिंजून काढला .
या परिचय मेळाव्यासाठी सर्व समाजबांधव वेळेत उपस्थित झाले .मेळाव्यासाठी श्री मधुकरराव शेलार(औरंगाबाद) ,श्री मोहनसेठ हिवरकर(भोकरदन),मारोतराव गोलेकर(देगलूर),सौ शोभा महामुने(माहूर) ,श्री दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड चे श्री दुर्गादासराव औंढेकर (उपाध्यक्ष),डॉ.श्री .तुकाराम तळणकर(सचिव),युवा संघटन, नांदेड चे अध्यक्ष श्री.दीपकराव महामुने,बागेसरी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. निता रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री संत नरहरी महाराज,प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून या 'जुळून येती रेशीम गाठी ' या पवित्र कार्यक्रमाची सुरवात झाली.प्रास्ताविकात श्री.दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड चे अध्यक्ष व या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिपकराव
बोधने यांनी सद्यस्थितीत विवाह जुळवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे, त्यामध्ये वेळ,पैसा ,प्रवास यांचा होणारा अपव्यय टळावा व विवाह सहज जुळावा यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.व्यासपीठाहून श्री.मोहनसेठ हिवरकर, श्री मधुकरराव शेलार यांनी समाजाला उद्देशून उचित विचार मांडले.श्री.राजीव अंबेकर यांनी कार्यक्रमाचे  उत्कृष्ट सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाची उंची वाढवली.कार्यक्रमाच्या नियोजनात  जीव ओतून समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग व समन्वय होता हे प्रकर्षाने जाणवत होते कुणी बैठकव्यवस्थेत, कुणी वधु वर नोंदणी कक्षात, कुणी भोजन व्यवस्थतेत, कुणी व्यासपीठावर ,कुणी वधु- वरांच्या बैठक व्यवस्थतेत,संगणक तज्ञासोबत ,व्यासपीठ व्यवस्था,चौकशी,देखरेख, सुरक्षा व्यवस्थेत  इत्यादी इत्यादी  ....
छायाचित्रकार, चित्रफीत तयार करणारा, महिला कार्यकर्त्या माहिलांच्या व्यवस्थेत,वधूंच्या नोंदणीच्या कामात व्यग्र असल्याचे, निदर्शनास येत होते .असा सुंदर मिलाप दिसून येत होता
परिचय मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे उपवधु -उपवर ,व त्यांनी अस्खलितपणे दिलेला परिचय ऐकणारे श्रोते समाजबांधव व स्वतःसाठी भावीआयुष्यात स्नेहमयी साथ देणारी/देणारा वधु किंवा वर   शोधणारे भावी वधु -वर .
सुंदर बॅनर मुळे व्यासपीठ सजले होते.तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ औचित्य साधून काढलेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.
खरे तर सुंदर रांगोळीसाठी जसे ठिपके एकमेकांना जोडले जातात त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन या कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे दिसत होते.
याच वेळी संघटनेच्या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व दैवज्ञ सोनार समाज एकाच पुस्तकात एकत्र आणण्याचे काम केले गेले अशा जनगणना संपर्कसूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .हया संपर्क सुचीमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व पाहुण्यांना संपर्क करणे सोपे झाले आहे.
परिचय मेळाव्यात सहभागी होण्याची संधी न सोडलेल्या उपवधू-उपवरांनी सुंदर परिचय दिला . बहुतांश उपवधूंनी 'निर्व्यसनी उपवर असावा 'अशी अपेक्षा केली. तर ' घराला एकत्र बांधणारी उपवधू 'असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.परिचय मेळाव्यात उच्च विद्याविभूषित उपवधू- उपवरांचा लक्षणीय सहभाग होता. तसेच उपवधू -उपवर यांच्या माहितीच्या स्मरणिकेचेही प्रयोजन असल्याचे संयोजकांनी जाहीर केले आहे.
सदरील मेळाव्यास विभागातील जिल्ह्याच्या (औरंगाबाद - श्री दीपकराव महाळनकर,परभणी -श्री बाळासाहेब रोडे,हिंगोली-श्री जयेश खर्जुले)दैवज्ञ सोनार समाज संस्थेच्या अध्यक्षांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .तसेच विशेष योगदान देणारे मान्यवर श्री श्यामराव कळमनुरीकर,सुरेश थोरकर, सतीश महामुने,श्री सुहासराव सावळकर,श्री गोपाळराव कल्याणकर, श्री प्रभाकरराव शेवडकर,श्री गंगाधर पंडित यांचा सत्कार करण्यात आला .मेळाव्यासाठी निधी संकलनासाठी व प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील तालुक्यांच्या संपर्क गटांचेही विशेष सन्मान करण्यात आले .
वधू वरांचा परिचय  व्यासपीठावर शिस्तबद्ध चालावा म्हणून सहाय्यक सूत्रसंचालकाचा भार हा डॉ.सौ.नीता रोडे ,सौ.प्रणिता शेवडकर, सौ.प्रगती गांजरे, श्री.सतीशराव वाकडे,प्रा.श्री.भालचंद्र गांजरे,श्री.संजय  बोधने यांच्यावर टाकण्यात आला .
मेळाव्यात सुमारे 222 वधू- वरांनीआपला परिचय दिला .आयोजकांनी आभार मानल्यानंतर
कार्यक्रमाची सांगता सौ.प्रगती गांजरे यांच्या पसायदानाने झाली.
खरोखरच वधु, वर परिचय मेळावा सामाजिक भान ठेवून केलेला स्तुत्य उपक्रम आहे .आणि स्वप्नातील राजकुमार कींवा राजकुमारी च्या शोधास पूर्णविराम मिळाला.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रकाश लाठकर,श्री उत्तमराव भाले, मनोहरराव कौठेकर,लक्ष्मण राव वाकडे ,गणेश अर्धापुरकर,उमेशराव अर्धापुरकर,बाळासाहेब पाथरकर,चंद्रशेखर ढेपे ,गंगाधर महामुने,गजानन काटकर,गंगाधरराव वालकर,श्याम कुडाळे,श्री.गोपाळराव कल्याणकर,तुकाराम काटकर,अशोकराव रोडे,बालाजी थडवे, -----------------------------व सर्व कार्यकर्ते व बागेसरी महिला मंडळ ,नांदेड. यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------
-----------***********----------