तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 January 2018

दैवज्ञ सोनार समाजाने विभागीय परिचय मेळावा यशस्वी करून कात टाकल्याची प्रचिती दिली


–---------------------------------
    पूर्णा-प्रतिनिधी-{राजेश वालकर} दिनांक28 जाने.2018 हा दिवस दैवज्ञ सोनार समाजातील उपवधू-उपवर यांच्यासाठी पर्वणी ठरला."मी मुंबई, पुणे,औरंगाबाद, नांदेड ,यवतमाळ, वाशीम,लातूर,मुखेड,हदगाव ,नायगाव,कळमनुरी,हिंगोली, वसमत,बिलोली,देगलूर, बाऱ्हाळी,बेटमोगरा,एकलारा,--------------इथून इथून आलोय/आलेय मी डॉक्टर , इंजिनीअर,वकील,पोलीस,शिक्षक,प्राध्यापक,उद्योजक,वास्तुविशारद, शिपाई, कारागीर,,------- --------- आहे."माझ्या वराकडून, वधूकडून अशा अशाअपेक्षा आहेत ".अशा परिचयाची उधळण करीत उपवधू,उपवरांनी------
वासवीमाता परमेश्वरी भवन दणाणून सोडले.निमित्य होते श्री दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड तर्फे आयोजित वधू वर परिचय मेळावा जाने.2018…
ह्या मेळाव्यासाठीची तयारी सुमारे एक महिन्यापासून चालू होती .संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमाचे नियोजन ,तालुकास्तरावरील भेटी,इतर जिल्हा भेटी, यामध्ये अगदी व्यस्त होते ; नव्हे तर त्यांनी हा परिसर पिंजून काढला .
या परिचय मेळाव्यासाठी सर्व समाजबांधव वेळेत उपस्थित झाले .मेळाव्यासाठी श्री मधुकरराव शेलार(औरंगाबाद) ,श्री मोहनसेठ हिवरकर(भोकरदन),मारोतराव गोलेकर(देगलूर),सौ शोभा महामुने(माहूर) ,श्री दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड चे श्री दुर्गादासराव औंढेकर (उपाध्यक्ष),डॉ.श्री .तुकाराम तळणकर(सचिव),युवा संघटन, नांदेड चे अध्यक्ष श्री.दीपकराव महामुने,बागेसरी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. निता रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री संत नरहरी महाराज,प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून या 'जुळून येती रेशीम गाठी ' या पवित्र कार्यक्रमाची सुरवात झाली.प्रास्ताविकात श्री.दैवज्ञ सोनार समाज सेवाभावी संस्था ,नांदेड चे अध्यक्ष व या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिपकराव
बोधने यांनी सद्यस्थितीत विवाह जुळवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे, त्यामध्ये वेळ,पैसा ,प्रवास यांचा होणारा अपव्यय टळावा व विवाह सहज जुळावा यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.व्यासपीठाहून श्री.मोहनसेठ हिवरकर, श्री मधुकरराव शेलार यांनी समाजाला उद्देशून उचित विचार मांडले.श्री.राजीव अंबेकर यांनी कार्यक्रमाचे  उत्कृष्ट सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाची उंची वाढवली.कार्यक्रमाच्या नियोजनात  जीव ओतून समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग व समन्वय होता हे प्रकर्षाने जाणवत होते कुणी बैठकव्यवस्थेत, कुणी वधु वर नोंदणी कक्षात, कुणी भोजन व्यवस्थतेत, कुणी व्यासपीठावर ,कुणी वधु- वरांच्या बैठक व्यवस्थतेत,संगणक तज्ञासोबत ,व्यासपीठ व्यवस्था,चौकशी,देखरेख, सुरक्षा व्यवस्थेत  इत्यादी इत्यादी  ....
छायाचित्रकार, चित्रफीत तयार करणारा, महिला कार्यकर्त्या माहिलांच्या व्यवस्थेत,वधूंच्या नोंदणीच्या कामात व्यग्र असल्याचे, निदर्शनास येत होते .असा सुंदर मिलाप दिसून येत होता
परिचय मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे उपवधु -उपवर ,व त्यांनी अस्खलितपणे दिलेला परिचय ऐकणारे श्रोते समाजबांधव व स्वतःसाठी भावीआयुष्यात स्नेहमयी साथ देणारी/देणारा वधु किंवा वर   शोधणारे भावी वधु -वर .
सुंदर बॅनर मुळे व्यासपीठ सजले होते.तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ औचित्य साधून काढलेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.
खरे तर सुंदर रांगोळीसाठी जसे ठिपके एकमेकांना जोडले जातात त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन या कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे दिसत होते.
याच वेळी संघटनेच्या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व दैवज्ञ सोनार समाज एकाच पुस्तकात एकत्र आणण्याचे काम केले गेले अशा जनगणना संपर्कसूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .हया संपर्क सुचीमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व पाहुण्यांना संपर्क करणे सोपे झाले आहे.
परिचय मेळाव्यात सहभागी होण्याची संधी न सोडलेल्या उपवधू-उपवरांनी सुंदर परिचय दिला . बहुतांश उपवधूंनी 'निर्व्यसनी उपवर असावा 'अशी अपेक्षा केली. तर ' घराला एकत्र बांधणारी उपवधू 'असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.परिचय मेळाव्यात उच्च विद्याविभूषित उपवधू- उपवरांचा लक्षणीय सहभाग होता. तसेच उपवधू -उपवर यांच्या माहितीच्या स्मरणिकेचेही प्रयोजन असल्याचे संयोजकांनी जाहीर केले आहे.
सदरील मेळाव्यास विभागातील जिल्ह्याच्या (औरंगाबाद - श्री दीपकराव महाळनकर,परभणी -श्री बाळासाहेब रोडे,हिंगोली-श्री जयेश खर्जुले)दैवज्ञ सोनार समाज संस्थेच्या अध्यक्षांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .तसेच विशेष योगदान देणारे मान्यवर श्री श्यामराव कळमनुरीकर,सुरेश थोरकर, सतीश महामुने,श्री सुहासराव सावळकर,श्री गोपाळराव कल्याणकर, श्री प्रभाकरराव शेवडकर,श्री गंगाधर पंडित यांचा सत्कार करण्यात आला .मेळाव्यासाठी निधी संकलनासाठी व प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील तालुक्यांच्या संपर्क गटांचेही विशेष सन्मान करण्यात आले .
वधू वरांचा परिचय  व्यासपीठावर शिस्तबद्ध चालावा म्हणून सहाय्यक सूत्रसंचालकाचा भार हा डॉ.सौ.नीता रोडे ,सौ.प्रणिता शेवडकर, सौ.प्रगती गांजरे, श्री.सतीशराव वाकडे,प्रा.श्री.भालचंद्र गांजरे,श्री.संजय  बोधने यांच्यावर टाकण्यात आला .
मेळाव्यात सुमारे 222 वधू- वरांनीआपला परिचय दिला .आयोजकांनी आभार मानल्यानंतर
कार्यक्रमाची सांगता सौ.प्रगती गांजरे यांच्या पसायदानाने झाली.
खरोखरच वधु, वर परिचय मेळावा सामाजिक भान ठेवून केलेला स्तुत्य उपक्रम आहे .आणि स्वप्नातील राजकुमार कींवा राजकुमारी च्या शोधास पूर्णविराम मिळाला.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रकाश लाठकर,श्री उत्तमराव भाले, मनोहरराव कौठेकर,लक्ष्मण राव वाकडे ,गणेश अर्धापुरकर,उमेशराव अर्धापुरकर,बाळासाहेब पाथरकर,चंद्रशेखर ढेपे ,गंगाधर महामुने,गजानन काटकर,गंगाधरराव वालकर,श्याम कुडाळे,श्री.गोपाळराव कल्याणकर,तुकाराम काटकर,अशोकराव रोडे,बालाजी थडवे, -----------------------------व सर्व कार्यकर्ते व बागेसरी महिला मंडळ ,नांदेड. यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------
-----------***********----------

No comments:

Post a Comment