तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 January 2018

मूकनायक दिवस परळी पत्रकार संघाच्यावतीने साजरा


परळी (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईतून मूकनायक वृत्तपत्र  सुरू केले आणि देशात नव्या क्रांतीस सुरूवात झाली. तसेच शोषित वंचितांचा आवाज मूकनायक वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी लेखणीच्या माध्यमातुन जगापुढे आणला असे प्रतिपादन पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केले. ते परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मूकनायक दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते. 

परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झालेल्या कार्मक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने हे होते. पुढे बोलताना काळे म्हणाले की, भारतीय इतिहासात 1920 हे वर्ष नवे वळण देणारे ठरले. 31 मार्च 1920 रोजी बाबासाहेबांनी मूकनायक सुरू करून हजारो वर्ष व्यवस्थेने ज्यांचा आवाज दाबला होता त्यांना बोलते केले. त्यानंतर बहिष्कृत भारत, जनता व प्रबुध्द भारत अशी वर्तमानपत्रे सुरू केली. भगवान साकसमुद्रे यावेळी बोलताना म्हणाले की, भारताच्या पहिल्या महिला संपादिका महात्मा फुले यांच्या सत्यशोधकीय चळवळीची जाण असणार्‍या तानूबाई बिर्जे यांनाही उपेक्षित ठेवले. त्यांनी दिनबंधू पत्रक चालविले.

या कार्यक्रमात कामगार कल्याण अधिकारी आरिफ शेख,  विलास रोडे, प्रेमनाथ कदम, रवी जोशी, मोहन व्हावळे, रानबा गायकवाड, सुकेशनी नाईकवाडे, प्रा.दशरथ रोडे, महादेव गित्ते, आकाश सावंत, महादेव शिंदे, चंद्रमणी वाघमारे, अमोल सुर्यवंशी, अनिल चिंडालीया, संतोष बारटक्के, संजीव रॉय आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment