तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 22 January 2018

अजितदादा कॉफी पिण्या साठी टपरीवर थांबतात तेव्हा

टपरीवरची कॉफि एकदम बेस्ट…


कळमनुरी:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे. काल माहूर येथील सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत होती. प्रवास करत असताना अजितदादांना कॉफिची तल्लफ लागली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली… रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नव्हते म्हणून चालक गाडी थांबवण्यासाठी थोडे शाशंक होते. मात्र अजितदादांनी कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबवून तिथेच कॉफि पिणे पसंद केले.


नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र अजितदादांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून कॉफि प्यायल्यामुळे सर्वांच आश्चर्यचकित झाले.


कॉफि बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरुवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला. अजितदादांना माणूस जीवाभावाचा… असं म्हणतात याचा प्रत्यय यावेळी उपस्थितांना आला.


No comments:

Post a Comment