तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 February 2018

स्व नितिन महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

पाथरी/प्रतिनिधी:- येथील स्व नितिन कला व विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात बुधवार २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ एच जी काळे, प्रा डॉ एस पी गायकवाड , प्रा रंजित गायके, प्रा विरकर, प्रा भोसले, प्रा दळवी, प्रा शामकुवर, प्रा साफीया, प्रा सोळंके यांची उपस्थिती होती. या वेळी कु शिवकन्या बनसोडे, कु पुनम खिल्लारे, कु अभिलाशा शिंदे, ऋतुजा गोरे यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु दिपाली घांडगे यांनी केले तर आभार प्रा डॉ एच जी काळे यांनी मानले. या कार्यक्रमा साठी विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते

कौसडीत शेतक-याची कर्जास कंटाळून आत्महत्या


परभणी:प्रतिनिधी  जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील रहीवासी शेतक-याने कर्ज बाजारीपणास  कंटाळून मंगळवार दि 27 फेब्रुवारी रोजी किटक नाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
येथील  मंचक गंगाधरराव लेंगुळे वय 45 वर्षे हे अल्पभुधारक शेतकरी असुन सतत होत असलेल्या नापीकीने कर्ज बाजारी झाले होते.
शेती मध्ये लावल्या पुरतेही उत्पन्न  हाती येत नसल्यामुळे त्यांची जिवन जगण्या बाबतची मानसिकता कमजोर होत गेली होती.
कर्जाचा वाढता डोंगर डोक्यावर असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा कर्ज परत फेड कसे करायचे या विवंचनेत शेतकरी मंचक लेंगुळे मागील काही दिवसा पासुन वावरत होते.
कुटुंबात वृध्द आई वडील मुलाबाळाच्या शिक्षणाच्या गंभीर अवस्थे बरोबरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या या सा-या बाबीमुळे ते पुर्णपणे खचुन गेल्याने त्यांनी मंगळवार दि 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कौसडी येथील राहत्या घरी किटक नाशक प्राशन केले होते.त्यांना उपचारासाठी तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा पुर्वीच त्यांचा मुत्यु झाल्याचे डाॅक्टरानी घोषीत केले.
या घटनेने कौसडी गावावर शोककळा पसरली आहे.

धूलिंवदनसाठी परळीच्या बाजारात रंग विक्रीला

परळी/महादेव गित्ते

रंगपंचमी सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे परळी वैजनाथ येथील बाजारात विविध कृत्रिम व नैसर्गिक रंग विक्रीसाठी आले होते.

येथील राणी लक्ष्मीबाई टावर, स्टेशन रोड, मोंढा मार्केट, हैद्राबाद बॅंक रोड, शिवाजी चौक, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन येथे विविध रंगाचे स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय लहान मुलांसाठी असलेले पिचकारी विक्रीसाठी आले होते. यात बच्चे कंपनीसाठी क्रेझ ओळखून छोटा भीम, मोटू - पतलू, बालवीर, अशा विविध कार्टूनच्या शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दराच्या पिचकाऱ्यांचा समावेश असल्याचे रंगाचे व्यापारी मन्मथअप्पा वाघमारे यांनी सांगितले आहे.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                         ╰════════════

गिरगाव येथे ग्राहक पेठ २०१८ चे आयोजन करण्यात आले होते


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २८ गिरगाव म्हटल की सगळ्यात आगोदर टिळकाच्या पुतळ्याची आठवण होते .गिरगाव सगळ्यात प्रसिध्द आहे ते खाण्यासाठी कारण येथे तर खाणर्याची मौज मजा वेगळीच असते .तुम्हाला अस्सल मराठी पदतिची पुरण पोळी हवी असेल तर तिथे नेहमी मिळते .काही गल्याला तर खाऊ गल्ली म्हणून देखील सबोंधले जाते .अस्सल मराठी पेहराव देखील आपणास गिरगावातील दुकानात पाहण्यास मिळतात .लग्न पत्रिकेसाठी सर्वात मोठे मार्केट देखील तिथे आहे .मराठी सण उत्सव देखील जोरदार पदतिने तिथे साजरे होतात .
अश्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम आकांशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदीप दिलीप नाईक यांनी गिरगाव ग्राहक पेठ २०१८ चे आयोजन २३ ते २५ फेब्रूवारी २०१८ रोजी दिनकर झारापकर सभागृह आंग्रेवाडी व्ही.पी.रोड मुंबई येथे आयोजन केले गेले होते .कार्यक्रमाचे उदघाटन  शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केले.त्यावेळी त्याच्या सोबत प्रमुख अतिथि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत , अभिनेते सिधार्थ चांदेकर उपस्थित भव्य शुभारंभ २३ फेब्रुवारी ला दुपारी १२ वाजता  झाला.
कार्यक्रमात विविध पदार्थाचे स्टाँल लावले त्यामध्ये मसाला, पुणेरी मिसळ , कोकणाचा अस्सल पदार्थाचा मेजवानी  , विविध बँक व लोन ची प्रोसेस , विविध साड्यांचे स्टॉल , खादीचे कपडे , विविध हन्डिक्रफ्टाच्या वस्तू , लहान मुलांसाठी खेळ , विविध किचन ,त्यामध्ये होते .

विधान भवनातील दालनात अनाथ बालकांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २८ अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1 टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास यांच्या विधान भवनातील दालनात अनाथ बालकांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल , पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील अनाथ बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या विभागातील महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच अनाथ बालकांना त्यांच्या संस्थेतील कालावधी संपल्यानंतर त्यांना सर्वसाधारणपणे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अनाथ मुलांची जात नक्की माहीत नसल्याने, त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नसल्याने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलतीपासून वंचित रहावे लागत होते ही बाब गांभीर्याने घेवून भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1 टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
18 ते 21 वयोगटातील अनाथ बालकांना स्थैर्य देण्यास वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी संबंधित विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यांना अनुरक्षण गृहात राहण्यासाठीही प्रयत्न करण्यात येईल. शिक्षणात शिष्यवृत्ती देण्यासाठी शिक्षण विभागास महिला व बालविकास विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच अनाथ बालकांना आधारकार्ड लवकरात लवकर मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अनाथ मुलींशी लग्न करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अनाथ बालकांना त्यांच्या संस्थेतील कालावधी संपल्यानंतर त्यांना संस्थेच्या बाहेर जावे लागते परंतु त्यांना राहण्यासाठी कसलाही आधार नसतो यासाठी त्यांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्य देण्यासाठी सकारात्मक विचार करणार आहे, या व्यतिरिक्त अनाथांच्या विविध समस्या इतर विभागाशी संबंधित असल्याने त्या समस्यांसाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रस्ताव तयार करुन त्यांना पाठविण्यात येणार आहे.
15 वर्षापुढील सर्व अनाथ बालकांना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे आणि अनाथ बालकांना त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्यात असलेल्या कौशल्यानुसार विविध कोर्सेसचे प्रशिक्षण त्यांना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  यामुळे अनाथ बालके भावी आयुष्यात स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 211 च्या कामांबाबत आढावा बैठक घेतली.२०१९ पर्यत धावणार रेल्वे


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २८
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 211 च्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीत २०१९ अखेरपर्यंत पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी वेगाने काम करावे असे निर्देश पंकजा मुंडे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
बीडमधील राष्ट्रीय महामार्गांची कामे अधिक वेगाने आणि गुणवत्ता पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी अधिका-यांना दिले. या आढावा बैठकीला आ.भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, उप विभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश महाडीक, प्रियांका पवार, गणेश निऱ्हाळी, रेल्वे अधिकारी विरेंद्र कुमार यांच्यासह विलास माने, विजय वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम.एम.सुरकूतवार, अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी हे उपस्थित होते.
रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरु असले तरी 2019 पर्यंत काम पूर्ण होण्यासाठी कामाचा वेग वाढायला हवा. यासाठी रेल्वे विभागाने तसे नियोजन करावे. वेगात काम करत असतांना गुणवत्ता सांभाळणेही गरजेचे आहे.  रेल्वेचे काम सुरु असतांना ग्रामीण भागातील रहदारी असणारे रस्ते, बंद झाले असल्यास त्याकरीता रेल्वे विभाग पुल बांधणार असून काही ठिकाणी पर्यायी रस्ते तयार करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे. भूसंपादनाचे काम पूर्ण होत आले आहे. भूसंपादनासाठी नागरीक, शेतकरी सहकार्य करीत आहेत.  शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई देण्यात येत आहे.  त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मार्गासाठी केंद्र व राज्य सरकार अर्धा - अर्धा  हिस्सा देत आहे. केंद्राकडून निधी कमी पडणार नाही यासाठी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे  प्रयत्नशील आहेत. आलेला निधी परत जाणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे निर्देश मी दिले. 2019 पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे समस्त बीड जिल्हावासियांचे स्वप्न या निमित्ताने पुर्णत्वास येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.211 साठी संपादीत क्षेत्राअंतर्गत रस्ते प्रकल्प 78.50 कि.मी. लांबीचे आहे. या अंतरामध्ये 31 गावांचा समाविष्ट आहे.  यासाठी 321.70 हे.आर.क्षेत्र लागणार असून 317.19 हे.आर. संपादीत करण्यात आले आहे.  संपादन संस्थेकडून मोबदल्याची 655.69 कोटी जमा झालेले असून 578.22 कोटी वाटप करण्यात आले आहे. हे काम वेगाने करण्याबरोबर गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना देवून कामात काही नागरिकांच्या अडचणी असल्यास ते जिल्हाधिकारी यांनी सोडवाव्यात अशा सूचना दिल्या.
या बैठकीत परळी येथील बाहयवळण रस्त्याच्या कामाचादेखील आढावा घेतला. परळी बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. यामुळे परळीच्या नागरिकांची वाहतूक  कोंडीतून आणि होणाऱ्या अपघातातून मुक्तता होणार आहे.  यासाठी संबंधित यंत्रणांनी या कामाकडे विशेष लक्ष दयावे आणि या परळी-बायपास रोडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि.२८ अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ आणि भाऊबीज भेट रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासून सेवाज्येष्ठतेनुसार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सन २०१७ -१८ पासून भाऊबीज भेट २ हजार रुपये करण्यात आली आहे. सेविका आणि मदतनीस यांच्या सेवासमाप्तीचे वय दिनांक  १ एप्रिल २०१८.पासून ६५ वरुन ६० वर्षे करण्याचाही निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविकांना पुर्वी ५ हजार रुपये मानधन देण्यात येत होते ते आता १ हजार ५०० रुपये वाढविण्यात आले आहे. आता त्यांचे मानधन ६ हजार ५०० अधिक सेवाज्येष्ठतेनुसार ० ते १० वर्षे - ० टक्के वाढ, ११ ते २० वर्ष - ३ टक्के वाढ, २१ ते ३०वर्षे - ४टक्के वाढ आणि ३१ ते ४० वर्षे - ५ टक्के वाढ देण्यात येणार आहे.
मदतनीसांना पुर्वी २५००रुपये मानधन देण्यात येत होते. आता एक हजार रुपये वाढ देण्यात येणार आहे. म्हणजे मानधन ३ हजार ५०० होणार अधिक सेवाज्येष्ठतेनुसार ० ते १० वर्षे - ० टक्के वाढ ,११ ते २० वर्ष - ३ टक्के वाढ, २१ ते ३० वर्षे - ४ टक्के वाढ आणि ३१ ते ४० वर्षे - ५ टक्के वाढ देण्यात येणार आहे.
मिनी अंगणवाडी सेविकांना पुर्वी ३हजार २५० मानधन होते आता ते १हजार२५० ने वाढविण्यात आले आहे. आता त्यांचे मानधन ४ हजार ५०० करण्यात आले असुन वरीलप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ मिळणार आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ आणि भाऊबीज भेट रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा श्रीम. माया परमेश्वर व इतर पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.

अस्मिता निधी' ला ( स्पाॅन्सरशीप ) नागरिकांचा राज्यभरातून उत्स्फूर्त वाढता प्रतिसाद मिळत आहे


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २८
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पांच रुपयांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या 'अस्मिता निधी' ला ( स्पाॅन्सरशीप ) नागरिकांचा राज्यभरातून उत्स्फूर्त वाढता प्रतिसाद मिळत आहे. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अवघ्या पांच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या ग्रामविकास  विभागाच्या अस्मिता योजनेचा शुभारंभ पुढील महिन्यात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी होणार आहे. या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे आठ पॅडचे एक पाकीट पांच रुपयांत मिळणार आहे. ही सवलत अस्मिता कार्डधारक मुलींना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सात लांख मुलींना अस्मिता कार्ड दिले जातील. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पांच रुपयां प्रमाणे विक्री केलेल्या पाकीटांच्या संख्येच्या प्रमाणात प्रति पाकीट १५ रू. अनुदान सरकार महिला बचतगटांना देणार आहे.
मोबाईल अॅप, डिजीटल अस्मिता कार्डच्या माध्यमातून या योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी लोक सहभागाचे महत्व लक्षात घेऊन  'अस्मिता फंड' हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यासाठी कुणीही व्यक्ती मुलीच्या सॅनिटरी नॅपकिन साठी अस्मिता स्पाॅन्सर ( प्रायोजक) होवू शकतो. यासाठी https://mahaasmita.mahaonline.gov.in या वेब पोर्टलवरून कुणालाही आपले योगदान देता येईल.
अस्मिता फंडाचा नुकताच शुभारंभ करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरासाठी ५० मुलींना तर मी १५१ मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी ऑनलाईन रक्कम वर्ग केली. ग्रामीण भागातील मुलींसाठी योगदान म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमाला राज्यातील विविध व्यक्ती, संस्था तसेच सर्व स्तरातील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत दोन हजाराहून अधिक मुलींसाठी लोकांनी यात आपले योगदान दिले आहे.
अस्मिता फंडची सरपंचांमधून पहिली स्पाॅन्सरशिप घेण्याचा मान खंडाळा ता. बीड येथील सरपंच स्मिता मोहन चौरे यांना मिळाला. त्यांनी वरील वेब पोर्टल वरून पांच मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी नॅपकिन साठी ९२९ रू. ऑनलाईन भरणा करून आपले योगदान दिले. त्यांचा हा आदर्श इतर सरपंचांनी देखील घ्यावा जेणेकरून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी मोठी मदत होईल.

प्रभाग क्रमांक १६० चे शाखाप्रमुख मयूर राठोड यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि २८ वाढदिवस म्हटल की आपल्या जीवनातील आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.पण आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे.तूझी अशीच प्रगती होत राहो तूझ्या हातून चांगले काम होत राहो .तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्याआयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे
उपस्थितीत मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रभाग क्रमांक १६०चे शिवसेना नगरसेवक किरण लांडगे ,  शिवसेनाचे  घाटकोपर पश्चिम विधान सभा सघटंक , मा.शाखाप्रमुख  श्री प्रदिप मांडवकर साहेब ,  शाखा क्र 129 शाखाप्रमुख शिवाजी कदम , फैजलभाई , शाखा क्र 129 च्या महिला शाखा संघटक श्रीमती मृणाली राठोड ताई , उपशाखा प्रमुख हनुमंत शिंदे(महाराष्ट्र बँक ),,श्री सलीम भाई व श्री दत्ता करबेले व हेमंत मोरजकर (छोटु भाई), गणेश डोके,पत्रकार बाळासाहेब राऊत ,  आशिष रामाणे, आदित्य बोळे, कुणाल आंबुलकर, नितीन इंगळे, यज्ञेश नरवडे, दिपक नवले, राहुल इंगळे, आशिष सांडभोर, अक्षय सांडभोर

गेवराई तालुक्यातील रंजना नागरे समन्वय व सनियंत्रण समितीवर

सुभाष मुळे....
----------------------
गेवराई, दि. 28 __ पालकमंत्री ना. पंकजाताई व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती( दिशा ) या महत्वाच्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून रंजनाताई नागरे यांची निवड झाली आहे.
    बीड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. सदरील योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ( दिशा ) स्थापन करण्यात आली आहे. खा. प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हाधिकारी सदस्य सचिव असून सर्व विधानसभा सदस्य , जिल्हा परिषद अध्यक्षा , मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी 28 योजनांवर या समितीचे नियंत्रण राहणार असून ना. पंकजाताई मुंडे यांनी मंजूर करून आणलेल्या 10 हजार कोटींच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू असून योजनांची अंमलबजावणी आणि लोकविकास यांच्यात समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी ही समिती पार पडणार आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे अध्यक्ष असलेल्या समितीवर निवड झाल्याने रंजनाताई नागरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अशासकीय सदस्य म्हणून गेवराई तालुक्यातील रंजनाताई नागरे यांची निवड करण्यात आली आहे. अन्य सदस्यांमध्ये सौ. प्रतिभा ज्ञानोबा सुरवसे , सलीम जहाँगिर , रमेश मुंडे यांचा समावेश आहे. पंतप्रधान पीक विमा योजना , अमृत पेयजल योजना , सामाजिक विकास योजना , रेल्वेमार्ग , बिंदुसरा पूल, मुद्रा बँक योजना , केंद्रीय रस्ते ,प्रधानमंत्री आवास योजना , स्वच्छ भारत मिशन , पंतप्रधान कृषी सिंचन योजना , राष्ट्रीय पेय जल योजना , शिक्षण , रस्ते , आरोग्य , बँकिंग , डिजिटल इंडिया , बीएसएनएल संबधित योजना , उज्ज्वला गॅस योजना , राष्ट्रीय आरोग्य मिशन , महावितरण , एकात्मिक बाल विकास , सर्व शिक्षा अभियान मध्यान्ह भोजन आदी प्रकारच्या 28 शासकीय योजना समिती अंतर्गत राबविण्यात येत आहेत. सध्या विविध योजनांच्या माध्यमातून 10 हजार कोटींचा निधी पालकमंत्री पंकजाताई यांनी मंजूर करून आणलेला आहे. ती कामे जिल्ह्यात सुरू आहेत.
     योजनांवर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी समितीवर असणार आहे. दरम्यान पालकमंत्री पंकजाताई व खा. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे ही संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगून रंजनाताई नागरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री पंकजाताई आणि खा. प्रितमताईंच्या मार्गदर्शनाखाली समितीत काम करून शासनाच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविणार असल्याचे रंजनाताई नागरे म्हणाल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

मिञानेच केला मिञाचा घात मानोरा तालुक्यात शिक्षकाची हत्या


तीन दिवसानंतर घटना उघडकीस 

आरोपीनेच दिली हत्येची कबुली ; गुन्हा दाखल आरोपी अटकेत 

मानोरा

एकाच आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दोन शिक्षक मित्र त्यातील एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षकाची हत्या करून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला २५ फेब्रुवारीला ही घटना घडली. आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी आरोपीने स्वतःहुन घटनेची कबुली दिली. या थरारक प्रकारामुळे सर्वत्र एकच चर्चा होती. 
मानोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सविस्तर वृत्त असे की आरोपी गोपाल गजाधरसिंग ठाकूर वय ३८ रा. वसंतनगर, मानोरा हे  धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज माध्यमिक आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी ते पोलीस स्टेशनमध्ये आले व मी हत्या केल्याची कबूल दिली. ठाणेदारांना हे सांगितले व सर्व घटना उजेडात आली. 
फिर्यादी रमजान अन्नू नौरंगाबादे रा. दिग्रस यांनी  पोलिसात अशी फिर्याद दिली की,दि.२५ फेब्रुवारी रोजी मृतक इमरान नौरंगाबाद वय-३३ हा घरून निघून गेला होता.तो परत न आल्याने दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दिग्रस पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर मृतकाचा मित्र आरोपी गोपाल ठाकूर याला विचारपूस करण्यासाठी फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता.तेव्हा मानोरा येथे त्याच्या राहत्या घरी येऊन चौकशी केली असता घराला कुलूप होते.अधिक चौकशी केली असता शाळेची रजा काढून पुणे येथे गेल्याचे समजले. त्यामुळे संशय बळावला दि.२८ फेब्रुवारी रोजी आरोपी सकाळी पोलीस स्टेशन मानोरा येथे हजर झाला. व त्यांने कबूली दिली की ,मी माझ्या मित्राचा खून केला आहे.मानोरा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या चिस्तळा शिवारात प्रेत खड्डा करुन पुरुन ठेवल्याचे सांगितले. मानोरा पोलिसांनी दिग्रस पोलिसांशी संपर्क मृतकांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले व प्रभारी तहसीलदार भोसले व ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनी आरोपीला घेऊन घटनास्थळ गाठले. नातेवाईकांनी ओळख पटवली.त्यानंतर फिर्यादी रमजान नौरंगाबाद यांनी फिर्यादीत असे म्हटले की,मृतक माझा भाऊ व आरोपी हे चांगले मित्र होते. एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी असे फिर्यादीत म्हटले. घटनेचा अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेकर रामकृष्ण मळघणे करीत आहे.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे.मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेमुळे आठवडी बाजारात चर्चा होती.
●●●●●●●●●●●●●●
दि.२६ फेब्रुवारी रोजी दिग्रस पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.तेव्हा दिग्रस पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी तपासाची चक्रे फिरवण्यासाठी डी .बी.पथकाचे अरविंद कोकाटे व नितीन वास्टर यांनी मोबाईल लोकेशन घेणे सुरू केले तेव्हा दारव्हा,धामणगाव देव,बोदेगाव सह अनेक ठिकाणी माहिती घेणे सुरू केले व इतर मित्र नातेवाईक यांची सखोल माहिती घेणे सुरू केले.तेव्हा या मधून तपासाला दिशा मिळत नसल्याने सी. डी. आर व एस.डी. आर . तपासणी करण्यात आली.त्यानंतर संशयित आरोपी गोपाल ठाकूर यांच्या मानोरा बस स्थानक जवळील घरी डी. बी.पथक दिग्रसचे नितीन वास्टर ,अरविंद कोकाटे हे गेले असता घराला कुलूप होते.तेव्हा मानोरा जुन्या वस्तीत वास्तवास असलेल्या आरोपीच्या भावाची एक तास कसून चौकशी करण्यात आली.त्या तपासाच्या धसक्याने आरोपीने स्वतः शरण मानोरा पोलिसात झाला असावा असा तर्क पोलीस विभागात ऐकावयास मिळत होता.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835