तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 February 2018

भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉग ला कार्यकर्त्याचे उत्तर

प्रिय भाऊ तोरसेकर,

तसे आपण फार ज्ञानी आणि प्रत्येक विषयात "तज्ञ" आहात असे मला वाटते, त्यामुळे मी आपल्याला काही सांगणे म्हणजे मुंगीने पर्वत उचलण्यासारखे होईल पण तरीही थोडी उठाठेव करून आपल्याशी बोलण्याची मी हिंमत करण्यास कारण आपण लिहिलेला ब्लॉग "शरद पवारांचा हल्ला हो अखबार."

शरद पवारांच्या निमित्ताने मुस्लीम समाजातील महिलांच्या प्रश्नात लक्ष घालून त्यावर आपल्याला ब्लॉग लिहावा लागला ह्याबद्दल तर पवारांचे अभिनंदन करावे तितके कमीच कारण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदुत्ववादी दहशतवादी सापडल्यानंतर आपण त्याला राजकीय खेळीचे नाव देऊन सोयीस्कर पाठींबा दिल्याचे मी कसे विसरू शकेल. कमालीचे विज्ञानवादी आणि हमीद दलवाईवर श्रद्धा ठेवून(?) त्याकाळच्या पुरोगामी चळवळीत भाग घेणारा आपल्यासारखा माणूस कुराण धर्मग्रंथावर श्रद्धा ठेवतो आणि ते वाचण्याची तसदी घेतो हे कौतुकास्पद आहे.

एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर कुठलेही भाष्य न करण्याइतपत सामान्य ज्ञान पवारांकडे आहेच म्हणून त्याच्या निर्णयापर्यंत वाट पाहणे त्यांनी योग्य मानले असावे. परन्तु आपणास इस्लामबद्दल अचानक इतके प्रेम व्हावे नी त्याबद्दल लिहावे वाटणे हिपण बाब नक्कीच अभिनंदनास्पद आहे.
आपण कुराण आणि शरियाचा काहीही संबंध नाही हा जो शोध लावला आहे त्याबद्दल तर आपणास मुस्लिम संशोधक म्हणून नावाजले गेले पाहिजे तरी आपल्या ज्ञानात भर म्ह्णून सांगतो "शरिया" ही मुस्लिमांच्या पवित्र "कुराण" आणि "हदीथ" वर आधारित जीवांची नियमावली आहे.

त्यापुढे जाऊन आपण जो शोध लावला त्याबद्दल आपणास धर्मसंशोधक म्हणून नावाजले गेले पाहिजे, तरी आपल्या गाढया इस्लाम अभ्यासातून आपणच नवीन नियमावली बनवलीत तर जगातील तमाम मुसलमान आपले उपकृत असतील. सुप्रीम कोर्टाने देखील तीन तलाकविषयी याचिकेत म्हणणे मांडण्यासाठी पर्सनल लॉ बोर्डाऐवजी आपणास पाचारण करायला हवे होते त्यांनीदेखील आपल्याला डावलून इस्लामविषयीच्य आपल्या अभ्यासाचा अवमान केला ह्याचे शल्य आपणास बोचत असणार म्हणून मागील दोन महिन्यांपासून चालू असलेल्या हल्लाबोल आंदोलनाटतील पहिला टप्प्यात विदर्भातील पदयात्रेत तब्बल १५४ किमीची पायपीट करीत व दुसरा टप्पा मराठवाड्यातील तालुक्या-तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांच्या ऐकलेल्या समस्या समजून घेत असताना शेतकऱ्यांनी बोण्डअळीमुळे तोंडचा घास हिरावून सरकार जखमांवर चोळत असलेले मीठ आणि सरकारी योजना कशा पोकळ आहेत हे पवारांनी उपस्थित केलेले आपल्याला जाणवले नाही, तसेच उस उत्पादक आणि साखर कारखान्यांबाबत त्यांनी व्यक्त  केलेली चिंता आपल्याला महत्वाची वाटली नाही किंवा त्यावर एखादा ब्लॉग आपल्याला लिहावा वाटलं नाही; कारण आपल्याला चिंता होती ती केवळ तीन तलाकची.

शेतकऱ्यांची दुरावस्था, पिकांचे पडणारे दर, वाढते कर्ज आणि सरकारचे तुटपुंजे धोरण ह्यामुळे १६,००० शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्या हे पवारांनी उपस्थित केलेले आपणास जाणवले नाही कारण मागील काळात आपण केलेला गाढा इस्लाम अभ्यास आपणास केवळ तीन तलाक पुरतेच आठवण करून देत असावा.

हल्लाबोल भाषणातील शेतकऱ्यांच्या तुरी आणि धानावरचा तुडतुड्या रोग तुम्हाला दिसला नाही करण तुम्हाला काळजी होती तर...
हे सगळे तुम्हाला करायचेच होते कारण तुम्हाला ना काळजी होती इस्लामची, ना काळजी होती शेतकऱ्यांची.. तुम्हाला तर काळजी होती फक्त ह्याचवेळी हल्लाबोल वर टीका करणाऱ्या फडणवीसांकडून पाठ थोपटवून घेण्याची...

आपला हितचिंतक- अक्षय पाटील.

1 comment: