तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 28 February 2018

मिञानेच केला मिञाचा घात मानोरा तालुक्यात शिक्षकाची हत्या


तीन दिवसानंतर घटना उघडकीस 

आरोपीनेच दिली हत्येची कबुली ; गुन्हा दाखल आरोपी अटकेत 

मानोरा

एकाच आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दोन शिक्षक मित्र त्यातील एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षकाची हत्या करून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवला २५ फेब्रुवारीला ही घटना घडली. आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी आरोपीने स्वतःहुन घटनेची कबुली दिली. या थरारक प्रकारामुळे सर्वत्र एकच चर्चा होती. 
मानोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सविस्तर वृत्त असे की आरोपी गोपाल गजाधरसिंग ठाकूर वय ३८ रा. वसंतनगर, मानोरा हे  धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज माध्यमिक आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी ते पोलीस स्टेशनमध्ये आले व मी हत्या केल्याची कबूल दिली. ठाणेदारांना हे सांगितले व सर्व घटना उजेडात आली. 
फिर्यादी रमजान अन्नू नौरंगाबादे रा. दिग्रस यांनी  पोलिसात अशी फिर्याद दिली की,दि.२५ फेब्रुवारी रोजी मृतक इमरान नौरंगाबाद वय-३३ हा घरून निघून गेला होता.तो परत न आल्याने दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दिग्रस पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर मृतकाचा मित्र आरोपी गोपाल ठाकूर याला विचारपूस करण्यासाठी फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता.तेव्हा मानोरा येथे त्याच्या राहत्या घरी येऊन चौकशी केली असता घराला कुलूप होते.अधिक चौकशी केली असता शाळेची रजा काढून पुणे येथे गेल्याचे समजले. त्यामुळे संशय बळावला दि.२८ फेब्रुवारी रोजी आरोपी सकाळी पोलीस स्टेशन मानोरा येथे हजर झाला. व त्यांने कबूली दिली की ,मी माझ्या मित्राचा खून केला आहे.मानोरा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या चिस्तळा शिवारात प्रेत खड्डा करुन पुरुन ठेवल्याचे सांगितले. मानोरा पोलिसांनी दिग्रस पोलिसांशी संपर्क मृतकांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले व प्रभारी तहसीलदार भोसले व ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनी आरोपीला घेऊन घटनास्थळ गाठले. नातेवाईकांनी ओळख पटवली.त्यानंतर फिर्यादी रमजान नौरंगाबाद यांनी फिर्यादीत असे म्हटले की,मृतक माझा भाऊ व आरोपी हे चांगले मित्र होते. एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी असे फिर्यादीत म्हटले. घटनेचा अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेकर रामकृष्ण मळघणे करीत आहे.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे.मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेमुळे आठवडी बाजारात चर्चा होती.
●●●●●●●●●●●●●●
दि.२६ फेब्रुवारी रोजी दिग्रस पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.तेव्हा दिग्रस पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी तपासाची चक्रे फिरवण्यासाठी डी .बी.पथकाचे अरविंद कोकाटे व नितीन वास्टर यांनी मोबाईल लोकेशन घेणे सुरू केले तेव्हा दारव्हा,धामणगाव देव,बोदेगाव सह अनेक ठिकाणी माहिती घेणे सुरू केले व इतर मित्र नातेवाईक यांची सखोल माहिती घेणे सुरू केले.तेव्हा या मधून तपासाला दिशा मिळत नसल्याने सी. डी. आर व एस.डी. आर . तपासणी करण्यात आली.त्यानंतर संशयित आरोपी गोपाल ठाकूर यांच्या मानोरा बस स्थानक जवळील घरी डी. बी.पथक दिग्रसचे नितीन वास्टर ,अरविंद कोकाटे हे गेले असता घराला कुलूप होते.तेव्हा मानोरा जुन्या वस्तीत वास्तवास असलेल्या आरोपीच्या भावाची एक तास कसून चौकशी करण्यात आली.त्या तपासाच्या धसक्याने आरोपीने स्वतः शरण मानोरा पोलिसात झाला असावा असा तर्क पोलीस विभागात ऐकावयास मिळत होता.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment