तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 February 2018

जवा बघतीस तू माझ्या कडं,मला आमदार झाल्या सारखं वाटतंय

नितिनोत्सव-२०१८ युवक,युवतींचा जल्लोश

किरण घुंबरे

पाथरी:-जवा भरलं तुझं वारं गं मी तुझा उमेदवार गं तुझ्या एक मता साठी माझं काळीज तुटतय जवा तु बघतीस तु माझ्याकडं मला आमदार झाल्या सारखं वाटंतय या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या लोकप्रिय लोकगितांच्या तालावर शुक्रवार ९फेब्रुवारी रोजी येथील स्व नितिन महाविद्यालयातील नितिनोत्सव २०१८च्या स्नेह संमेलनात पहिल्या दिवशी युवक युवतींनी ठेका धरत उपस्थित प्रेक्षकां मध्ये धमाल उडवली.
प्रती वर्षाच्या परंपरे प्रमाणे या वर्षीच्या नितिनोत्सव २०१८ मध्ये महाविद्यालयातील युवक युवतींनी मोठ्या उत्साहात सहभागी होत सकाळच्या सत्रात वैयक्तीक नृत्य आणि सामुहिक नृत्याविष्कारांनी सर्वांची मने जिंकली या वेळी राम प्रसाद सुर्यवंशी या तृितिय वर्षांच्या विद्यार्थ्यी आणि सहका-यांनी 'गोंधळ मांडला भवाणी गोंधळाला ये' हा अधूनिक गोंधळ सवाद्य सादर करून उपस्थितांची मने जिंकत सतत खिळऊन ठेवले या नंतर अजय तायनाक आणि वैजनाथ ढगे यांनी आमदार झाल्या सारखं वाटतय या गितावर उपस्थितांना ठेका धरायला लावले, तर बोल मैं हलगी बजाऊं क्या या बी काॅम तृितिय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समुह डान्स वाहवा मिळऊ गेला या नंतर कु उजगरे आणि सहका-यांनी पतंग उडवत होते हे गित सादर करून उपस्थितांची दाद मिळवली वैजनाथ ढगे आणि संघाच पारूगं पारू पिलोय दिवसा दारू गं या गिताच्या सादरी करणाने वाहवा मिळवली या नंतर पहिली बार दिल बे करार हुआ है सारखे गित सादर झाले या वेळी हर्ष ढवळे यांनी तालसे ताल मिला हे मिश्र डिजे गित सादर केले या वेळी गार्गी या चिमुकली ने दिल है छोटासा छोटीसी आशा हे गित सादर करून सर्वांची मने जिंकली तत्रुर्वी  या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचे उदघाटन सकाळी १० वा प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याचे पुजन आणि दिप प्रज्वलन करून करण्यात आले या वेळी प्रमुख पाहूने म्हणून प्रा डॉ सुरेश सामाले ,प्रा डॉ जगन्नाथ बोचरे सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा तुळशीदास काळे,विद्यार्थी प्रतिनिधी निलेश गौतम,शिवकन्या बनसोडे,तुलसी कासट, पंडीत,सोनवने,जोगदंड यांची या वेळी उपस्थिती होती या वेळी विद्यार्थी संसदेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे सुत्र संचलन कु दिपाली घांडगे यांनी केले या नंतर आनंदनगरी कार्यक्रम संपन्न झाला. या नंतर गितगायन ,मुककोर्ट, वक्तृत्व स्पर्धा आणि शेवटी शेला पागोटे कार्यक्रम संपन्न झाला या स्नेहसंमेलनाचा आस्वाद घेण्या साठी विद्यार्थी पालक आणि परिसरातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतते साठी महाविज्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत

-स्व नितिन महाविद्यालयात सुरू असलेल्या नितिनेत्सव 2018 मधील काही क्षणचित्रे---

No comments:

Post a Comment