तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 March 2018

नांदेड १एप्रिल च्या मेळाव्यास पण प्रचंड विरोध !

"यूथ" च आंदोलन जोरदार होणार

परभणी
नांदेड येथील बहुचर्चित २४व२५चा वधु वर परिचय मेळावा प्रचंड गोंधळ नियोजनाचा अभावाने गाजला आणि समाज बांधवांनी पाठ फ़िरवल्या मुळे तर आर्थिक नुकसान सह वादा वादित पार पडला यूथ च्या पदाधिकार्यांना अटक होई पर्यन्त प्रश्न येरनिवर आला अटक झाल्या मुळे आयोजक कोणत्या कार्यवाही पर्यन्त जाउ शकतात याचा अनुभव या निमित समाजाला आला आहे
आता १एप्रिल रोजी गरज नसताना आयोजित केलेला मेळावा होत आहे या मेळाव्यास पण आर्य वैश्य यूथ महाराष्ट्र या युवकांच्या संघटनेचे हजारो नाराज युवक यांच्या विरोधाला  सामोर जान्यासाठी आयोजक  ततपरता दाखवत आहेत.
चला आज बऱ्याच लोकांना वाटत की मेळावा घेणे म्हणजे समाज होय...कारण की समाज सर्व एकत्र येतो गरीब श्रीमंत लोकांना थोडा आधार लागतो या गोष्टीचा विचार करून समाज पण याला एक समाज कार्य समजत आहे पण समाजातील मताप्रमाणे समाज कार्याची व्याख्या वेगळी आहे....
     यापुढं जाऊन काही घटकासाठी समाज कार्य आपण करू शकतो जसे की असे अनेक कामे आहेत
आज समाजात किती तरी आई बहिणी लोकांच्या घरी धुनी भांडी करून  उदरनिर्वाह करीत आहे,त्यांचं पुनर्वसन करा किंवा अश्या महिलेसाठी जिल्ह्यापातळीवर एक उद्योग उभारा...व त्यांना रोजगार द्या
आज  समजातिल किती तरी मुलं लोकांच्या दुकानात काम करीत आहे,ऑटो चालवत आहे,खरमुरे विकत आहे अश्या मुलांसाठी एखादा मोठ्या ठिकाणी माता वासवी च्या नावाने उद्योग उभारणी करून रोजगार द्या.
आज पण गरीब कुटूंबातील मुलं हुशार असून सुद्धा पैश्या अभावी शिक्षण घेऊ शकत नाही,अश्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारून राहण्याची सोय करून देणे ही गरज आहे
ज्या सामान्य कुटूंबातील मुली आपल्या वडिलांच्या निधनानंतर अनाथ झाल्या त्यांच्या आईवर संपूर्ण भार पडल्या अश्या मुली एक सामाजिक बांधिलकी समजून दत्तक घेऊन शिक्षणाचा व तिच्या लग्नाचा खरच उचला.
आज संपूर्ण महाराष्ट्रात एक समाजाचा सर्व्ह करून खरच कोणाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे,याची माहिती घेऊन योग्य ती मदत पुरविणे गरजेचे आहे
समाजातील जी मूल हुशार आहे परंतु आर्थीक परिस्थितीने शिक्षण घेऊ शकले नाही अश्या सर्व मुलांचं पालकत्व घेऊन समाज कार्य कराने गरजेचे आहे
समाजातील काही अपंग मुलं मुली आहे यांच्या साठी जसे असे भरगच्च मेळावे घेतात त्यांच्या साठी ज्यास्तीत ज्यास्त मेळावे घेऊन त्यांच्या संसाराची उभारणी करुन खरी समाज सेवा ठरू शकते
असे विविध समाज कार्य आहे,पण हे आम्हाला होणार नाही कारण आम्हाला या मध्ये प्रतिष्ठा, मानपण हारे तुरे, सत्कार ड्रेस कोड या गोष्टीचा आनंद मिळणार नाही ही खूप रिक्स आहे,पण खऱ्या समाज कार्याची व्याख्या अशी आहे,जी पडद्या मागून समाज सेवा केली जाते, आपण जी समाज सेवा करीत आहोत ती उच्च पातळीची सेवा आहे,त्यात ज्यास्तीत ज्यास्त स्वतःच प्रदर्शन आहे. म्हणून समाजाच्या  सर्व स्तरातून प्रचंड विरोध होत आहे
   सामाजिक कार्य हे केव्हा ही जमिनीवर राहून करावं
लागतं.....स्टेज वर चढून हार तुरे करून ड्रेस कोड घालून,सत्कार करून,बॅनर लावून,समाज कार्य होत नसत....
जेव्हा तुम्ही समजातिल तळागाळातील घटका पर्यंत पोहचाल त्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवाल त्याला समाज कार्य म्हणतात.
अशी चर्चा सदया समाज उघड़ पणे चर्चिली जात आहे
अश्या वातारनात १एप्रिल चा मेळावा होत असल्याने समाजात नाराजी जास्त आहे याच आयोजक मंडळी न या मेळावे घेण्याच्या अट्टहासाला कुठ तरी थांबुन खरया समाज कार्याची गरज आहे

प्रा. डॉ. माधव शेजूळ यांचा कौतुक सोहळा.


माजलगाव तालुक्यातील आबेगावचे भुमीपुत्र व परभणी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रा.डॉ. माधवराव देसाई शेजूळ यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा यथोचित सन्मान व्हावा या हेतूने आंबेगाव येथील समस्त ग्रामस्थांच्या व यशवंतराव चव्हाण क्रीडा मंडळाच्या वतीने शुक्रवारी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
      यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबेगावच्या सरपंच सौ. वसुधा भागवतराव शेजूळ ह्या होत्या,तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा.प्रा.डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, मा.एस.बी. बागल मा. आ. मोहनराव  सोळंके, मा. आ. राधाकृष्ण होके पाटील, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके,  मा.एम.टी. देशमुख,प्रा. अतकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार परभणी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे माधवराव शेजूळ यांना प्राप्त झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार गावात आयोजित केला होता. बैलगाड़ी सजवून वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील सुहासनींनी त्यांचे घराघरा समोर औक्षण केले. कार्यक्रमात त्यांनी केलेल्या कार्याचे व जिवन संघर्षाचे वर्णन सर्वांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मा.आशोकराव डक, जयदत्त नरवडे, दिपक जाधव,  मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी,  क्रीडा शिक्षक, व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वांच्या उपस्थितीत त्यांच्या मातोश्री, सुविद्यपत्नी यांच्यासमवेत सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गावकऱ्यांचे माझ्यावरील प्रेमाचा मी कृतज्ञ असून त्यानींच मला घडवले आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अनुशाल्व शेजूळ व सौ. विजया शेजूळ यांनी केले, प्रास्ताविक सोमेश्वर पुरी तर आभार  तुळजाभवानी मल्टीस्टेटचे प्रशासकीय आधिकारी शहाजी शेजूळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रसंगी गावकरी, परिसरातील नागरिक व क्रिडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महाराष्ट्रावर कोसळू शकते चीनची प्रयोगशाळा

दि. ३१ मार्च २०१८

सावधान! चीनने अंतराळात पाठविलेली टायोगोंग-1 ही प्रयोगशाळा पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असून, ती एक एप्रिलच्या पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. खगोल शास्त्रज्ञांनी या प्रयोगशाळेची कक्षा अभ्यासूनऔरंगाबाद, जालना, देऊळगाव राजासह राज्यातील अनेक ठिकाणी या प्रयोगशाळेचे तुकडे पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. एमजीएम अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे.

चीनची पहिली अंतराळ प्रयोगशाळा टायोगोंग-1 पृथ्वीच्या वातावणात शिरण्याच्या स्थितीत असून *1 एप्रिल रोजी  भारतीय वेळेनुसार पहाटे 1 वाजेपासून सायंकाळी 7 पर्यंत* ती कधीही पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनने व्यक्त केली आहे.

या प्रयोगशाळेच्या कक्षेत *महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे असून यात शेवगाव, पैठण, जालना, देऊळगावराजा, अमडापूर, अकोला, बाळापूर, परतवाडा, करंजगाव* आदींचा समावेश आहे.

जगभरातील अवकाश संशोधन संस्था या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.  30 मार्चला अमेरिकेतील एरोस्पेस कॉर्पोरेशनने ही प्रयोगशाळा कोसळण्याची वेळ निश्चित केली असून याला युुरोपियन स्पेस एजन्सीनेही दुजोरा दिला आहे.

टायोगोंग-1 पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून संपूर्ण जळून खाक होईपर्यंत साधारण 2000 कि.मी. अंतर पार करेल व त्याचे तुकडे सुमारे 70 कि.मी. रुंदीच्या पट्ट्यात विखुरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकाशात उल्कावर्षाव दिसेल, अशी माहितीही औंधकर यांनी दिली.

गेवराई भुमिअभिलेख कार्यालयात अर्थपुर्ण व्यवहार बोकाळला

सुभाष मुळे...
-------------------
गेवराई, दि. 31 __ येथील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरु आहे. शिपाई ते उपअधिक्षकापर्यंत सर्वांनाच शेतकऱ्यांकडून अर्थपुर्ण व्यवहाराची अपेक्षा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र हेलपाटे मारावे लागत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
      गेवराई येथील भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांना उद्धटपणाची भाषा वापरत असून मनमानी कारभार हाकत आहेत. या कार्यालयावर वरिष्ठांचा धाक आहे की नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान शासन नियमाप्रमाणे रितसर फिस भरूनही वेळेवर कामे होत नसल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील शेतीसंबंधी लागणारे नकाशे, विविध कागदपत्रे तसेच जमीन मोजणी, हद्द कायम आदी विविध शेतकऱ्यांची महत्वाची कामे येथील उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातून होतात. ही कामे करून घेण्यासाठी शेतकरी शासन नियमाप्रमाणे फिस चलनाद्वारे भरतात. कार्यालयात असलेले शिपाई, कर्मचारी, अधिकारी यांना देखील शेतकऱ्यांकडून चिरीमिरीची आशा असून ती दिल्याशिवाय कामे होतच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. अधिकारी, कर्मचारी पैसे घेऊन जमीन मोजणीच्या तारखामध्ये आदलाबदल करत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. याठिकाणी असलेल्या दप्तराची देखील मोठी दुरावस्था झालेली आहे.
     दरम्यान शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे, नकाशे घ्यायची असतील तर कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय ती देत नाहीत. त्यामुळे या कार्यालयात शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट होत असताना दिसून येते. वरिष्ठ देखील याकडे डोळेझाक करत आहेत. तरी याठिकाणी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

महाविर जयंति निमित्त भव्य शोभायात्रा


फुलचंद भगत
मंगरुळपीर
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर भगवान
महावीर स्वामी यांचे जन्मोत्सवानिमित्त
श्री आदीनाथ दिगंबर जैन मंदीरात विविध
कार्यक्रमाचे आयोजन दि२९रोजी करण्या
त आले.प्रथमत:मंदिरात जेष्ठ समाजबांधवांच्या हस्ते पुजन व ध्वजावरोहण केल्यानंतर मंदीरापासुन पारंपारीक मार्गाने प्रभात फेरी व रथ यात्रा काढण्यात आली.रथयात्रा मंदीरात आल्यानंतर समाजातील जेष्ठ सबांधवांच्या हस्ते अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहचविणारे भगवान महाविर स्वामींच्या प्रतिमेचे
पुजन करण्यात आले.महाविर स्वामीच्या
नामाचा जयघोष व गाजत निघालेल्या रथ यात्रेमुळे संपुर्ण शहरात महावीरमय
वातावरण निर्माण झाले होते.
महावीर स्वामिंना अभिषेक झाल्यानंततर
आरती झालि. शेवटी प्रसाद वितरित करण्यात आला.कार्यक्रमच्या यशस्वीते
साठी दिगंबर जैन युवक मंडळाचे कार्यकर्ते स्वप्निल होटे,चेतन होटे,नरेंद्र
येलवणकर,विराग होटे,आयुष येलवणकर
तुषार होटे,श्रेयस होटे,सतिष होटे,सुयोग
मांडगे,सागर होटे,रोहीत होटे, बाळु डावरे यांचे सह समाजातील महीला पुरुषांनी अथकपरिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन  मंदीराचे सचिव राजेश
येलवणकर यांनी केले.             फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम  मो.9763007835

गेवराईत शिक्षणाची वारी कार्यक्रमातून शैक्षणिक जनजागृती

सुभाष मुळे...
-----------------
गेवराई, दि. 31 __ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी तालुकास्तरीय मेळावा व शिक्षणाच्या वारीचे शनिवार, दि. 31 मार्च 2018 रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती गेवराई यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून उत्कृष्ट अशी शैक्षणिक जनजागृती करण्यात आली.
         या कार्यक्रमाला पहिल्या सत्रात माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, गटशिक्षणाधिकारी आनंद मसरे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, तालेब साहेब, मिलिंद तुरूकमारे, जिल्हा परिषद सदस्य थडगे, फुलचंद बोरकर, पंचायत समिती सदस्या कु.पुजाताई मोरे, कु. मोनिका खरात, संजय जाधव, संदीप लगड, जयसिंह जाधव मार्केट कमिटी उपसभापती शामराव मुळे आदींची उपस्थिती होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला गती देण्यासाठी शिक्षणाची वारी हा कार्यक्रम राज्यस्तरावर व विभाग स्तरावर घेतला जातो, तो आता तालुकास्तरावर घेतला जात आहे. सदरील वारीमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीध्यक्ष तसेच सदस्य, सरपंच, मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते. याप्रसंगी एकूण 32 स्टॉलची उभारणी करुन यामधून गेवराई तालुक्यात सुरू असलेल्या शिक्षण क्षेत्रातील नवनवीन उपक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले. या शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रेरणा करुन उपक्रमाचे सार्वत्रिकीकरण करण्यात होणार आहे. या वारीत सकाळी 9 ते 12 स्टॉलची पाहणी  दरम्यान सर्वांनी केली. यावेळी आश्चर्यकारक कृती काही विद्यार्थ्यांनी केल्या. त्यात मार्च मध्ये पहिलीला दाखल झालेल्या हर्ष शाळा जिल्हा परिषद बागपिंपळगावने सर्वांना समोर उतारा वाचन करून दाखवले. इयत्ता पहिलीचा गौरव विकास गवते या विद्यार्थ्याने गुणाकार व भागाकार करून दाखवला. 12 ते 1 दरम्यान मधुकर बैरागी व त्यांच्या टीम ने शाळा व्यवस्थापन समिती यांची कार्य व जवाबदारी उपस्थितांना पथनाट्यातून समजावून दिली. ISO शाळा यांची यशोगाथा सांगून नंतर परिसंवाद व सादरीकरण हे कार्यक्रम संपन्न झाले. झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ विस्तार शिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी, गटविकास अधिकारी राजगुरू एन टी. तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी, तालुक्यातील जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल कुलकर्णी, कैलास आरबड कैलास पट्टे, जगन्नाथ जाधव, निकाळजे अशोक, बनसोडे राजाभाऊ, येडे भारत, चव्हाण अंकुश, महादेव दाभाडे, विष्णू आडे, विशाल घोलप, आदिनाथ भारती, आरदड अच्युत, दिवेकर शांताराम, अशोक कदम यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन धर्मराज करपे व ज्ञानेश्वर मस्के यांनी यावेळी केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

अपयशाने खचून न जाता आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा - ना पंकजाताई मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अॅकॅडमीतर्फे परळीत भरली स्पर्धा परिक्षेची जत्रा ; तालुक्यातील पहिलाच ऐतिहासिक उपक्रम

बीड/परळी दि. ३१ ----- सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खडतर मेहनत तर घ्याच पण थोड्याशा अपयशाने खचुन जाऊ नका. आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा असा मोलाचा सल्ला राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे विद्यार्थ्यांना दिला.

     जवाहर शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अॅकॅडमी तर्फे परळी येथे इयत्ता ५ वी ते ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शालेय पातळीवर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर आज आयोजित करण्यात आले होते. तोतला मैदानावर झालेल्या या शिबीरात परळी तालुक्यातील दीडशेहून अधिक शाळांमधील सुमारे दहा ते बारा हजार  विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात या विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

     दुपारी शिबीराचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आयआयटी प्रतिष्ठान व करिअर स्पेक्ट्रम पुण्याचे संचालक संजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्ताप्पा इटके, सुरेश अग्रवाल, सुरेश चौधरी, विजय वाकेकर, कैलास घुगे, प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर आदी उपस्थित होते.

   दीपप्रज्वलन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. ना. पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांचे संस्थेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. पंकजाताई मुंडे  म्हणाल्या की, या वयातच आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे. आजची पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे.  व्यसन लावून घ्यायचेच असेल तर ते यशाचे लावून घ्या. ते लागले तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.आजचे युग हे डिजिटल झाले आहे. त्याचा उपयोग करत स्पर्धेत कायम टिकून रहावे. आपल्या भागातील विद्यार्थी मेहनती आहेत स्पर्धेत राहून त्यांनी परळीचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपले आयुष्य हे आनंदी मनाने रेखाटून आपल्या आई वडिलांचे स्वप्न आत्मविश्वासाने पुर्ण करा. राजकारणाच्या माध्यमातून परळीचा विकास एवढेच फक्त मला करायचे नाही तर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे चांगले विचार, चागले संस्कार असणारी भावी पिढी मला निर्माण करायची असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी देखील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परिक्षांना धाडसीपणाने सामोरे जावून आयुष्य घडवावे असे आवाहन केले.   स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
●●●●

ब्रह्मगाव येथे गुरुपूजन महासोहळा सम्पन्न आणि सप्ताह सांगता


बीड प्रतिनिधी
तालुक्यातील ब्रह्मगाव या ठिकाणी शुक्रवारी गोरक्षनाथ टेकडी येथील महान संत नवनाथ बाबा यांचा गुरुपुजान कार्यक्रम मोट्या उत्सवात संपन्न झाला या वेळी गावकर्यांनी ढेकनमोह ते ब्रम्हगाव पर्यंत मोठी मिरवणूक काढली या मिरवणुकीत लहान मुली आणि महिला कळस डोक्यावर घेऊन होत्या सम्पूर्ण गावातील महिला पुरुष मोट्या संख्येने उपस्थित होते तर महिलांनी लैझीम खेळत आपल्या गुरुचे स्वागत केले तर टाळकरी आणि गावकऱ्यांनी लैझीम खेळत जुन्या पारंपरिक लैझीम खेळाची एक पर्वणी दिली ,ढोल ,हलगी,टाळ, मर्दन्ग, च्या जय घोषयात निघालेल्या या मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी या सह मोट्या लवाजमा असल्याने एक छान स्वरूप प्राप्त झाले होते.
गोरक्षनाथ टेकडी येथील महंत नवनाथ बाबा यांचे ब्रम्हगावात जंगी स्वागत करण्यात आले .
  ब्रम्हगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नवनाथ महाराज यांच्या काळाच्या कीर्तने झाली किर्तनानंतर म्हाप्रसादाचे पाटप करण्यात आले तर या  56 व्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताह चालवान्याची प्रपंरा गावकर्यांनी सम्भाली त्या बद्दल बाबांनी कौतुकाची थाप गावकर्यांना दिली या सप्ताह दरम्यान विविध कीर्तन ,भजन ,आणि अध्यात्माची उधळण झाली हि परंपरा अक्खन्ड चालूच राहणार असल्याचा संकल्प गावकऱ्यांचा आहे असे मत गावकऱ्यांनी सांगितले तर गुरु पूजन सोहळ्यात मुलींचा आणि महिलांचा लैझीम ,फुगडी,आणि वारकरी पाऊल हे मुख्य आकर्षण राहिले .सप्ताह दरम्यान सुदाम महाराज घोरड,बंकट घोरड,राजेंदर घोरड,मधुकर घोरड,बाप्पासाहेब हरिभाऊ घोरड,प्रा बंडू घोरड,संतोष बिडवे,दता महाले,पंडित घोरड,गंगावजने महाराज आदी सह सर्वच गावकर्यांनी मोठी महिनात घेतली.

Friday, 30 March 2018

श्रीरामभक्त हनुमान

जगातील सात चिरंजीवात ज्याची गणना आहे अशा श्रीराम-भक्त हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेलाअंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला. भगवान शंकराचे देऊळ जसे नंदीशिवाय पूर्ण होत नाही तसे भगवान श्रीरामाचे देऊळ हनुमंताच्या मूर्तीशिवाय पूर्ण  होत नाही आणी यावरूनच भक्ताशिवाय भगवान अपुरा या भावनेचे दर्शन होत. 

तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघूनइंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमान मृत्युमुखी पडला. नंतर देवांनी त्याला 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.हनुमान हा पवनदेवाचा पुत्र असल्याने पवनदेवाने क्रोधात येऊन आपला प्रवाह बंद केला. अनेक जीवश्रुष्टी बंद पडला श्रुष्टीचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि त्यातच सर्व देवदेवताने पवनदेवाकडे विनंती करून प्रवाह चालू केला आणि हनुमंताला अमरत्वाचे वरदान दिले. पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. वनवासात रावणाने सीतेचेअपहरण केले तेव्हा रावणाच्या लंकेत जायला प्रभू श्रीरामाला सेतु बांधावा लागला तर हनुमान उड्डान करून गेला. हनुमंताच्या उड्डाणाने भक्ताचा महिमा वाढला. मुलाच्या पराक्रमाने बाप आनंदीत होतो, शिष्याकडून हरण्यात गुरु गौरव मानतो, तशी भक्ताच्या महिमावृद्धिमध्ये प्रभु प्रसन्नताच अनुभवतो.ज्याचे चिंतन भगवान करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहे.माणसे तर त्याचे चिंतन करतीलच आज हजारो वर्षापसून जनसमुदायाच्या ह्रदयात रामाएवढेच आदरणीय स्थान हनुमंताला लाभले आहे. उत्तरकांडात राम हनुमंताला प्राज्ञ, धीर, वीर, राजनितीपुण वगैरे विशेषनांनी संबोधतो, यावरुन त्याची उच्चतम योग्यतेची कल्पना येऊ शकते.हनुमान सितेचा शोध घेऊन आला तेव्हा राम म्हणतो:हनुमंता ! तुझे माझ्यावर अगणित उपकार आहेत , त्याच्यासाठी एक एक प्राण कढून दिला तरी ते कमीण पडेल .कारण तुझे माझ्यावरील प्रेम पंचप्राणपेक्षा विशेष आहे , म्हणुन मी तुला फक्त     आलिंगनच          देतो.       

*'एकैकस्ययोपकारस्य प्राणान् दास्यामि ये कपे।'*

  श्रीराम म्हणतो की, हनुमंताने इतके दुष्कर कार्य केलेले आहे की,इतर लोक ते स्वप्नातही करू शकणार नाहीत. धन्य हनुमान की, जो वानर असूनही,ज्याने प्रभुच्या स्वमुखातून 'पुरुषोत्तम' पदवी प्राप्त करुन, प्रभुच्या बरोबरीचे स्थान प्राप्त केले! हनुमान जन्माष्टमी साजरी केली जाते. कारण हनुमंताने स्वत:च्या अंतर्बाह्य शत्रूंवर विजय  मिळविला होता, इंद्रजितासारख्या बाह्य शत्रु तर या इंद्रियजित हनुमंताने जिंकलेच होते पण मनामध्ये असलेल्या काम, क्रोध ,मद, मत्सर, मोह,लोभ इ. असुरावरही त्याने विजय प्राप्त केला होता. सितेच्या शोधासाठी तो लंकेत गेला त्यावेळी त्याने अनेक सुंदर स्त्रियांना पाहिले पण त्याचे मन चलित झाले नाही.भगवान रामासारखा खजिना ज्याला प्राप्त होता त्याला आणखी संसारी सुखसंपत्तीचा लोभ कोठून असनार ! स्वत:जे काही केले आहे ते रामाच्या शक्तिमुळेच घडलेले आहे अशी अंत:करणापासूनची भावना जेथे असेल येथे मद व अभिमान कोठू न संभवतील ! हनुमान बल-बुद्धी-संपन्न होता.त्याला  मानसशास्त्र, राजनिती ,साहित्य ,संगीत, तत्वज्ञान वगैरे शास्त्रांचे सखोल ज्ञान होते.त्याला अकरावा व्याकरणकार व रुद्राचा अवतार मानण्यात येते त्याच्यात फार मोठी विद्वता होती.त्याची वकृत्व-शक्तीदेखील अजब होती. हनुमंताच्या वाणीतुन  ज्ञाननिष्ठ वैचरिक प्रवाह आणि सरळ पण अर्थगंभीर भाषाप्रवाह वाहत आहे असे ऐकनाराला वाटत असे. हनुमंताला मानस-शास्त्राचा फारच सखोल आभ्यास होता.त्याच्या मुत्सेगिरीवर व विद्वतेवर रामाचाही अद्भुत विश्वास होता. बिभीषण शत्रुराज्याचा सचिव व रावणाचा भाऊ रामाकडे येतो .तो कोणत्या हेतुने आला आहे ,त्याला स्वपक्षात घ्यायचे की नाही;याबाबतीत रामाने सल्ला विचारताच सुग्रीवापासुन प्रत्येकाने आशा आटितटिच्या वेळी बिभीषनाचा स्वीकार करायला नकार दिला. सर्वांचे ऐकून घेतल्यावर रामाने हनुमंताचे मत विचारले. हनुमंताने तात्काळ स्विकार करावा आसे मत दिले. रामाने हनुमंताचे मत मान्य केले.कारण,राम हनुमंताची मानसाला ओळखण्याची शक्ती जाणत होता. सीता संशोधनाचे कार्यदेखिल रामाने जेवढ्या विश्वासाने त्याच्यावर सोपविले होते, तेवढ्याच विश्वासाने त्याने ते कार्य पारही पाडले .सुंदरकांड हनुमंताच्या लीलांनीच भरलेले आहे. भगवद्भक्तची लीला प्रभुला आणि ऋषिंमुनींनानाही सुंदर वाटते .म्हणूनच ज्या कांडात हनुमंताची लीला आहे त्याचे नाव सुंदरकांड ठेवले आहे. हनुमंताजवळ स्वातंत्र्य बुद्धि आणि प्रज्ञाशक्ती होती आशोवाटीकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या  सीतेला प्रभु रामचंद्राचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून इक्ष्वुक कुळाचे वर्णन सुरू केले.हनुमंताने मानसीक भुमीका तयार करुन सीतेच्या ह्रदयात विश्वास निर्माण केला;त्यानंतर रामदुत म्हणुन स्वत:चा परिचय करुन दिला. लंका-दहन हे काही माकडचेष्टा नव्हती, तर राजकारण विशारदाचे पूर्ण विचार करुन केलेले कृत्य होते. लंकादहनामध्ये पूर्ण राजनिति आहे. त्याच्याद्वारे त्याने लंकेतील राक्षस प्रजेचा आत्मप्रत्यय खलास केला. लंका दहन करुन हनुमंताने युद्धाचे अर्धे काम पुरे केले आहे. हनुमान रामाचा पूर्ण भक्त होता.रामाचा त्यावर पूर्ण विश्वास होता .रावणाला मारल्यानंतर सीतेला संदेश पोहचविण्यासाठी राम हनुमंताला पठवतो.कारण आनंदाचा समाचार सरळ कळला तर कदाचित ह्रदय बंद पडून जाईल.आयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी भरताच्या चेहर्यावर रामाच्या आगमनाचा विकार होतो की नाही ते पाहण्यासाठी देखिल राम हनुमंतालाच पाठवतो. अर्थात् या नाजूक प्रसंगी महत्त्वाची कामगिरी पुर्ण बद्धी चालवून हनुमानच करु शकतो नाजूकात नाजूक कठोरात कठोर कामही हनुमान सफलतेने पार पिडीत असे.
            हनुमंताचा दास्य भावही अतिशय उत्कृष्ट आहे. राम हनुमंताला विचारतो : 'तुला काय पाहिजे ? ' त्यावेळी,' माझी तुमच्यावरील प्रेमभक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव न निर्मान व्हावा एवढेच पाहिजे 'असे उत्तर त्याने दिले होते.जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील.
           हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचा सहयोग !भक्ती व शक्ती यांचा सुगम संगम ! रामाच्या सेवेत प्राण देण्याची गरज पडली तर त्यासाठी त्याची तयारी होती.तसे पाहिले तर रामायणात  हनुमंताएवढाच रावणही बलवान होता. पण रावणाचे बल भोगाला अर्पण केलेले होते.   एकाने रामपत्नी पळवून नेली , दुसर्याने ती परत शोधून काढली . भक्तीशुन्य शक्ती माणसाला राक्षस बनवते,तर भक्तीयुक्त शक्ती माणसाला देवत्व प्रदान करते . या गोष्टीचे सुंदर चित्रण वाल्मीकिने रामायणात या दोन पात्रांच्या चरित्रचित्रणाने केले आहे. आज ठिकठिकाणी रावण व कुंभकर्ण भरलेले आहेत.यावेळी रामाचे काम करणाऱ्या हनुमंताची गरज आहे.रावणी विचार व वृती यांचे दहन करणार्या वीर-मारुतीची गरज आहे.रामाच्या संस्क्रूतीचे रक्षण करणार्या दास मारुतीची आज समाज मागणी करीत आहे. तसे होण्याचा प्रयत्न करणारेच हनुमान जन्माष्टमी करायला अधिकारी आहेत.आपण तर आज दोन पैशाच्या तेलात एक आण्याच्या माळेत हनुमंताची किंमत करुन टाकली आहे ! शनिवारी एवढे करुन शेंदूराचा टिळा लावण्यात आपली सर्व भक्ति जणू येऊन जाते ! रामाच्या सैनिकांची ज्यावेळी गरज आहे अशा वेळी आपण झोपून राहिलो तर ते चालणार नाही.आपल्याला उठावे लागेल,जागावे लागेल,हनुमंताप्रमाणेच राम-कार्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल.            

        ••●●संकलन●●••
    अर्जुन तुळशीराम फड     इतिहास अभ्यासक व लेखक
www.arjunphad1005.blogspot.com