तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 129 तर्फे महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई : दि १४ आज २१व्या शतकात महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..आणि हे कौतुकास्पद आहेच..खरच स्त्री खुप पुढे निघुन गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसते..पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या सांभाळून देखिल आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे..
स्त्री मुळातच सामर्थ्यवान आहे...आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेंत. शिक्षण खाते आहे सरस्वतीकडे .अर्थ खाते दिले आहे लक्ष्मीकडे तर संरक्षण खाते दुर्गा मातेकडे आणि अन्न खाते अन्नपूर्णा देवीजवळ
घाटकोपर विधानसभा (पश्चिम )शिवसेना शाखा क्रमांक 129 जागतिक महिला दिना निमित्त ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजेंद्र राऊत साहेब व महिला विभाग संगटिका डाॅ.भारतीताई बावधाणे यांच्या मार्गदर्शन खाली शाखा क्रमांक 129 चे शिवसैनिक मोहम्मद आमीन (फैसलभाई )(उपअध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेना)घाटकोपर विधानसभा संघटक मा.शाखाप्रमुख प्रदीप मांङवकर यांच्या अथक सहकार्याने महिलांना चषक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मोहम्मद अमिन( फैसलभाई) यांच्या सहकार्याने घाटकोपर विधानसभा (पश्चिम )मध्ये अनेक सामजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत .
या कार्यक्रमाला उपस्थित शाखाप्रमुख शिवाजी कदम,  महिला शाखा संघटिका मृणाली राठोड ,व सामजिक कार्यकर्ता सौ.अंजली पारकर, सौ सविता देसाई , युवा समाज सेवक गणेश डोके व सर्व पदाधिकारी महिला उपशाखा संघटिका व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख , युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment