तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 11 March 2018

अंबाजोगाईत 13 मार्च ते 18 मार्च या कालावधीत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विशेष शिबीराचे आयोजन

आंतरराष्ट्रिय प्रशिक्षक चिरागदादा पाटील यांची  उपस्थिती

इच्छुकांनी लाभ घ्यावा- आर्ट ऑफ लिव्हिंगचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने युवकांसाठी विशेष युवा आनंद वर्गाचे आयोजन दिनांक 13 ते 18 मार्च 2018 दरम्यान करण्यात आले आहे.या वर्गाच्या पूर्वनोंदणीसाठी समाजातील सर्वच घटकांतून येणाऱ्या युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध युवा प्रशिक्षक चिराग दादा पाटील यांच्या उपस्थितीत आणि प्रशिक्षणाखाली हा वर्ग संपन्न होणार आहे.

एक आंतरराष्ट्रीय युवा प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिराग दादांच्या स्वागतासाठी अंबाजोगाई येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी कॉलेज मधिल नागापूरकर सभागृहात
दिनांक 13 ते 18 मार्च या कालावधीत हे शिबीर होत आहे.आनंद अनुभूती शिबीर हे सर्वांसाठी खुले आहे.हे शिबीर सकाळी 6 ते 9 या वेळेत तर युवा आनंद शिबीर सायंकाळी 5.30 ते राञी 8.30 या वेळेत होईल.वय वर्षे 18 ते 30 गटातील युवकांना या शिबीरात सहभागी होता येईल.
या शिबीराच्या पूर्वनोंदणीला युवकांचा तसेच प्रौढ नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जवळपास सर्वच जागांची नोंदणी पूर्ण होत आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गतवर्षी डिसेंबर-2017 मध्ये चिराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित युवा आनंद शिबिरास लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा एकदा अंबाजोगाई आणि परिसरातील युवकांसाठी तसे एक शिबिर आयोजित करता येईल का अशी विचारणा समाजातील सर्वच घटकांनी आणि विशेषतः युवकांनी केली होती.त्यामुळे हे आयोजन करण्यात येत आहे असे आर्ट ऑफ लिव्हिंग
परिवाराने कळवले आहे.चिरागदादा पाटील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहेत. भारतातील अनेक युवकांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी प्रेरक असे प्रशिक्षण ते सतत आपल्या शिबिरातून देत असतात.त्यांच्या या युवा प्रशिक्षण अभियानास आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवी शंकर यांचा विशेष अनुग्रह प्राप्त झालेला आहे.अधिक माहितीसाठी
(स्वप्निल चामले- 9511121314),
(डॉ.माले- 7774973233)
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

===============

तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी शिबीर
-----------------------------
उत्तम एकाग्रता,सुस्पष्ट विचार,शांत झोप आणि उत्तम शारीरिक स्वास्थ,एकाग्र चिंतामुक्त आणि शांत मन, नकारात्मक भावनांची सुलभ हाताळणी,सशक्त रोगप्रतिकारक शक्ती, उत्तम निर्णय क्षमता, तणावमुक्त जीवन, आत्मविश्वास,निरंतर आनंदी जीवन आणि प्रत्येक क्षण आनंदी राहण्यासाठी या शिबीराचा लाभ होतो.

-स्वप्निल चामले,
(आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार,अंबाजोगाई)

No comments:

Post a Comment