तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

सेलूत पोलिसांनी पकडलेल्या 'त्या' दारूचे नेमके झाले काय ? दारू पकडली 15 जणांची ;गुन्हा दाखल एकावर.

आठवड्यानंतरही चर्चा सुरूच

परभणी/प्रतिनीधी

सेलू तालुक्यात  धुळवड साजरी करण्यासाठी मद्यपींनी तर दारू विक्री करण्यासाठी एका बारचालकाने दारूची वाहतूक करीत असताना पोलीस असे सांगून दारू पकडण्यात आली. तर यापैकी फक्त एकाच व्यक्तीवर दारू बाळगल्याच्या प्रकरणी दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. परंतू एका बारचालकासह दहा ते पंधरा व्यक्तींकडून जप्त करण्यात आलेली दारू नेमकी कोणी पकडली? आणि संबंधीतांकडून कशी जप्त केली? या बाबतची चर्चा धुळवड संपली तरी आठवड्यानंतरही सुरूच आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे – धुलिवंदन सन शांततेत पार पडावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेलू पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. धुळवड घरी, शेतात व आपल्या सोयीप्रमाणे साजरी करण्यासाठी शहरासह तालुक्याती मद्यपींनी आपल्या शोकांना बंदचा फटका बसू नये, दारूची जमावजमव केली होती. त्यासाठी दारू शोकीनांनी स्टेशन रोडवर असलेल्या दारू विक्रेत्या दुकानावर मोठी गर्दी केली होती. परंतू या मद्यपींच्या पाळतीवर असलेल्या पोलिस वेश नसलेल्यांनी या मद्यपींजवळ असलेले बॉक्स, खंबे व साठा जप्त केला. यामध्ये दारू विक्री करण्याकरीता नेणाऱ्या एका बारच्या माणसाजवळ असलेली दारूही जप्त करण्यात आली. मग ही दारू पोलीसांनी पकडली असे या जप्त करणाऱ्याचे म्हणणे आहे. पण आपली फक्त दारू जप्त झाली पण कारवाईची झंझट वाचली म्हणून मद्यपी खूश झाले. पण दारू पिण्याचा शोक पुर्ण करण्यासाठी पुन्हा दारू खरेदी करावी लागली. आणि ती दारू पिल्यावर जप्त दारू प्रकरणावर चर्चा झडल्याने हे प्रकरण सार्वत्रिक झाले. कोणाची किती दारू पकडली पण पोलीस ठाण्यात मात्र तालुक्यातील राधे धामणगाव येथील रामदास ज्ञानोबा हिरवे यांच्याकडून देशी दारूच्या 48 बॉटल जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 2496 रु. एवढी दाखवण्यात आली. मग इतर अनेकांकडून पकडण्यात आलेल्या दारुच्या साठ्यावर कोणी ताव मारला? याची नुसती चर्चाच सुरू आहे. कारण पोलीस दप्तरी त्याची नोंद नाही. 

या सर्व प्रकाराची पोलिसांनी शहनिशा केल्यावर पकडण्यात आलेली दारू नेमकी कोठे गेली हे निश्चित झाल्यावरच चर्चा थांबेल असे एकंदरीत चर्चेवरून दिसून येत आहे.

सेलू:दारूची खरेदी करण्यात मग्न झालेल्या प्रेमींनी अशी केली गर्दी

No comments:

Post a Comment