तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांवात 15 मार्च रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन

तर माणगांव खोरर्यातील जनतेच्या सेवेसाठी रूग्णवाहिका लोकार्पण सोहळाही यावेळी होणार आहे.

माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या 17 मार्च रोजी होणार्या  वाढदिवसा निमित्त कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन, असे मोठे आरोग्य शिबिर हे जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे.अशी माहिती स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस विशाल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली..यावेळी स्वाभिमान युवकचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा अध्यक्ष आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष विनायक राणे, स्वाभिमानचे कुडाळ तालुकाध्यक्ष दिपक नारकर आदि यावेळी उपस्थित होते..

पत्रकार परिषदेत बोलताना विशाल परब म्हणाले की, कुडाळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने माणगांव, घावनळे, साळगांव, हिर्लोक, वेताळबांबर्डे या जिल्हा परिषद मतदार संघातून येत्या 15 मार्च2018 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाडोस हायस्कूल येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..यावेळी माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांच्यावतीने सकाळी 9-30 वाजता माणगांव खोरर्यातील जनतेच्या सेवेसाठी रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे..तर यावेळी नेत्र तपासणी व चष्मा वाटप, त्वचारोग, ह्रदयरोग, कान, नाक, घसा आदींची मोफत आरोग्य तपासणी ठेवली आहे..माणगांव येथे हे असे प्रथमच असे मोठे आरोग्य शिबिर घेण्यात येत असल्याने यावेळी 500 चष्माचे वाटप करण्यात येणार आहे..असेही श्री परब म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, पडवे येथील मेडिकल कॉलेज, जसलोक व लिलावतीमधील तज्ञ डाॅकटरांची टीम या महाआरोग्य शिबिरात रूग्णांची तपासणी करणार असल्याचे यावेळी बोलताना श्री विशाल परब यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment