तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

केन्द्र शासनाकडून अॅन्यूटी अंतर्गत 173 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर

सुभाष मुळे....
---------------------
गेवराई दि. 12  __ तालुक्यातील महारटाकळी (महंत) ते सावरगाव तालुका माजलगाव रस्ता कामासाठी केन्द्र शासनाकडून अॅन्यूटी अंतर्गत 173 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या रस्त्याची दैना फिटणार आहे.
      गेवराई तालुक्यातील महारटाकळी ते सावरगाव तालुका माजलगाव रस्त्यासाठी अॅन्यूटी अंतर्गत 173 कोटी रुपये मंजूर करून मोठे झाले आहे. महारटाकळी उमापूर मार्गे रा.म. 211 हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे ते काम वगळून उर्वरित रा.म. 211 ते सावरगाव तालुका माजलगाव हे काम अॅन्यूटी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे होणार असून भविष्यात त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणार आहे. सदरील काम दर्जेदार करण्यात येईल, ज्यामुळे रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होईल. गेवराई - शेवगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामाच्या प्रतिक्षेत आहे. नगर, शिर्डी येथे जाण्यासाठी प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागला. दोन वर्षातील काळात उमापूर पर्यंत चांगला रस्ता करून काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला.
     आता महारटाकळी ते सावरगाव, टाकरवण पर्यंतच्या रस्ता कामासाठी 173 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून केन्द्र शासनाच्या अॅनिव्हीटी योजनेंतर्गत हा निधी आणला आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment