तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

गेवराई येथे 21 एप्रिल पासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

सुभाष मुळे...
----------------------
गेवराई, दि. 12 __ शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान विषयी माहिती मिळावी याकरिता यावर्षी देखिल 21 ते 24 एप्रिल दरम्यान गेवराई याठिकाणी 4 दिवसीय राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती कृषी प्रदर्शन आयोजन समितीचे संयोजक महेश बेदरे यांनी दिली.
      मराठ्वाड्यातील शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञाना विषयीची माहिती होण्यासाठी किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून गेवराई येथे या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे . मागील  वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ मिळवण्यासाठी बीड येथे प्रथमच या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सदरिल प्रदर्शनास 1 लाख शेतकऱ्यांनी भेट देवुन या प्रदर्शनात नंवतत्रज्ञानाचा लाभ घेतला. दरवर्षी गेवराईत होणारे प्रदर्शन गेवराईतच घ्यावे, शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे पुन्हा या प्रदर्शनाचे आयोजन गेवराई येथे केले असुन यात प्रकल्प संचालक, आत्मा महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा विशेष सहभाग असणार आहे. कृषी  प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञाना विषयी माहिती मिळणार आहे. या चार दिवशीय प्रदर्शनात भव्य अशा 8 दालनामध्ये तब्बल 200 कृषी उत्पादनाचे स्टॉल यामध्ये असणार आहेत. 21 एप्रिल रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडणार असून दि. 22  एप्रिल रोजी या तंत्रज्ञानाची चर्चासत्रे होणार आहेत. दि 23 एप्रिल रोजी पशु प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि 24 रोजी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणून दुष्काळ परिस्थितीवर मात करणारे तंत्रज्ञान या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार असून प्रदर्शन उत्पादक ते ग्राहक या मोहीमेस प्रतिसाद मिळविण्यासाठी धान्य महोत्सवाचे आयोजन केले असुन शेतकऱ्यांना यात मोफत स्टाॅल दिले जाणार आहेत. सदरील प्रदर्शन हे शासनाच्या विना मदीतीने होत असून सर्व काही एकाच छताखाली आहे.
      डोम स्ट्रक्चर मधील या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन वाणाच्या बियाण्यांपासून खते, किटकनाशके, शेती उपयोगी अवजारे, सुक्ष्म सिंचन प्रणाली, गरजेवर आधारीत शेतीचे आधुनिक तंत्र, दुध काढणी यंत्र, पॉलीहाऊस, शेडनेटमधील शाश्वत शेती, चारा व्यवस्थापन, हायड्रोपोनिक फॉडर, अझोला, मुरघास, शेततळे, शेततळ्यातील मोत्यांची शेती, त्रिस्तरीय मत्स्य संवर्धन, मल्चिंग, रो- कव्हर यासह तज्ञांकडून फायदेशीर शेतीचा सल्ला मिळू शकणार आहे. शासकीय योजनांपासून ते बँक कर्ज तसेच विविध जातीच्या देशी व विदेशी पशुधन यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाचा गेवराई शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीचे गणेश बेदरे, शिवाजी मोटे, राजेंद्र आतकरे, नानासाहेब पवार, गणेश सावंत, शिनुभाऊ बेदरे, धनंजय बेदरे, महेश बेदरे आदीनी केले आहे

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment