तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

गेवराई : गारपीट ग्रस्तांसाठी 3 कोटी 49 लाख 47 हजार मंजूर

सुभाष मुळे....
--------------------
गेवराई दि. 12 __  गारपीटीने नुकसान झालेल्या गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांना भरपाई म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 कोटी 49 लाख 47 हजार पाचशे चाळीस रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
     गेवराई तालुक्यातील काही भागात फेब्रुवारी  या महिन्यात झालेल्या गारपीटीने गहू, हरभरा, मका, फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी घरांची पडझड झाली होती. तहसीलदार संजय पवार यांनी गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पिक पंचनामे झाले आहेत, मात्र पडझडीचे पंचनामे पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले, परंतू त्याचा अहवाल तहसील कार्यालयात पोहचला नाही. ही दिरंगाई आहे, त्यामुळे या प्रकरणी आमदार पवार यांनी बीडीओला जाब विचारला आहे. पंचायत समितीच्या विभागाने दिरंगाई केल्याने पडझडीची रक्कम शासनाने जाहीर केली नाही. गारपीटीने नुकसान झालेल्या गावाला अनेकांनी भेटी दिल्या होत्या. शासन व लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांच्या पाठिशी असून, तात्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून म्हणून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दरम्यान पिक पंचनामे झालेल्या गावांमध्ये खळेगाव , पौळाचीवाडी , म्हांडूळा, शेकटा, हिवरवाडी , उमापूर , मारूतीची वाडी , माटेगाव व ब्रम्ह्गावचा समावेश आहे. या गावांसाठी शासनाने 3 कोटी 49 लाख रुपये मंजूर केले आहेत.
तेजन्यूज ..✍
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment