तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 3 March 2018

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे 5 मार्च रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलनएक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा -विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांचे आवाहन
-----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय व जिल्यातील प्रलंबित मागण्यासाठी सोमवार दिनांक 5 मार्च 2018 रोजी
अरुणभाऊ गाडे (केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या) यांच्या नेतृत्वाखाली
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.याच आंदोलनाचा एक भाग म्हणून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनासाठी सकाळी 10.00 वाजता जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लातूर विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे यांनी केले आहे.यावेळी जिल्हाधिकारी साहेब याच्या मार्फत निवेदन मा.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन ही देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शासकीय व जिल्हा परिषद कमचारी व आरोग्य विभाग,एनसीडी आरोग्य विभाग,महसूल विभाग,बांधकाम विभाग,पाटबंधारे विभाग,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दिी.5 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्ये धरणे आंदोलनाबाबत अरुणभाऊ गाडे केंद्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार,भैयासाहेब सेलारे केद्रित उपाध्यक्ष,करुणा सागर पगारे केद्रीय उपाध्याक्ष, मा.गजानन थुल केद्रीय सरचिटणीस, मा.प्रभाकर जिवणे केद्रीय महासचिव, मा.एस.एस.हुमणे केंद्रिय उपमहासचिव सामान्य प्रशासन मुबंई,सुर्यकांत जोगदंड केद्रीय सहसचिव मा.हर्षवधन सोनवने केद्रीय उपाध्यक्ष यांनी आदेशित केले आहे. तरी तसेच महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सर्वे जिल्हा शाखा वतीने महासंघास संलग्न सर्व संघटनाचे पदाधिकारी यांना दिनांक 5 मार्च 2018च्या भव्ये धरणे आदोलनात सहभागि व्हा.भागीदारी करणे बाबत कर्मचा-यां मध्ये प्रसिध्दी करण्यात येऊन धरने आदोलन यशस्वी करावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येते.निवेदनात करण्यात येणार्‍या मागण्या 1 ते 17 मुद्दे सर्वसमावेशक आहेत त्यामुळे 5 मार्च2018 चा  धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी धरणे आंदोलनात सहभागी होणे आवश्यक आहे.“अभी नही तो कभी नही" या धोरणाने संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी 5 मार्च रोजी होणार्‍या एक दिवसीय आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सचिव सुर्यकांतजी जोगदंड, विभागीय अध्यक्ष सोनवणे बालासाहेब, पोटभरे तात्या,विभागीय सचिव राजेंद्र कांबळे,विभागीय उपाध्यक्ष केशव आठवले,जिल्हाध्यक्ष दिनकर जोगदंड,जिल्हा सचिव राजेंद्र गालफाडे, आरूणाताई आठवले, वाजेद भाई, जिल्हा उपाध्यक्ष हणुमंत आडागळे,पंडीत मुने,जिल्हा कोषाध्यक्ष वाघमारे धनंजय, आरोग्य विभाग प्रमुख नितीन महुवाले,सुनिल बळवंते,पांडुरंग भुतपल्ले,सुनिल जावळे, सुमेद जोगदंड, मनोज पतंगे,टाकणखार सर आदींनी केले आहे.धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे शिंदे प्रमोद,जोगदंड गौतम,पारवे गौतम, गायकवाड एम एम,गायकवाड दिपक,गायकवाड सचिन,गायकवाड बि एन,रमेश लोखंडे, बनसोडे आत्माराम, तोडकर रामराजे,गडदे प्रल्हाद,गडदे संभाजी, गडदे शंकर,लगस्कर सोनेराव,बालासाहेब राऊत, कदम बप्पाजी, मस्के विष्णू,कदम विष्णू,सावंत जे. डी,गुहाडे साहेब, भोसले सर,पोटभरे राहुल,भालेराव सर,सरवदे विकास, शिरसाट सर,घागरमाले सर,डोंगरे लक्ष्मण, चव्हाण धोंडीराम, चव्हाण व्ही के,राठोड विनायकराव,घुमरे सर,रमेश कांबळे, शेख युनूस,पतकराव सर,इंगोले सर, डॉ.कांबळे साहेब, सोनवणे संभाजी, सरवदे ग्रामसेवक,जितेंद्र जोगदंड,सरकटे राजेंद्र, विनोद कवठेकर,रवि आचार्य,बोबडे संतोष, जोगदंड बालासाहेब, भुंम्बे मॅडम,शालन जोगदंड, नालंदा जोगदंड, सोनकांबले आम्रपाली मॅडम,साळवे पंचशिला मॅडम, गायकवाड मॅडम,दासुद रमा मॅडम,सुनिता उजगरे, कापसे कमल मॅडम, प्रदिप समुद्रे, सोनवणे नागनाथ, सरवदे आनंद,लांडगे सर सह सर्व पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.

कास्ट्राईब कल्याण महासंघाच्या प्रमुख मागण्या अशा :-
----------------------------
 1) राज्यातील मागासर्वगिय कर्मचारी यांचा अनुशेष यामध्ये (OBC/SC/ST/NT/SBC/VJNT) आणी ईतर भरण्यात यावा यामध्ये तीन लाख मागासर्वगिय कर्मचारी यांचा अनुशेष आहे तो भरण्यात यावा., 2) राज्यातील कर्मचारी यांचा 2004 पासुन झालेली पदोन्नति शासनाच्या चुकिमुळे रद्द केली असुन ती चालु करण्यात यावी.,3)कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाची पदोन्नति बाबत दिल्ली येथे सुप्रीम कोटात चालू असलेली केस., 4)अंशदायी पेन्शन योजना रद्द करा., 5)सातवा वेतन आयोग तात्काळ लागु करा.,6) निवृत्तीचे वय 58 वर्ष ठेवावे.,7)सहा दिवसाचा आठवडा ठेवावा.,8) वेतन त्रुटी दुर करा.,9)महिला कर्मचार्‍यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजुर करा.,10)अनुकंपा तत्वावरील सर्वांची भरती करा., 11) कंत्राटीकरण रद्द करा,व राज्यातील आरोग्य विभागातील एनसीडी कर्मचारी यांना स्थायी करावे.,12) कर्मचारी कपातीचे धोरण रद्द करा.,13) चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या पाल्यास वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्यात यावे.,14)अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना चतुर्थ वेतन श्रेणी लागु करण्यात यावे.,15) गटप्रर्वतक यांना स्थायी करुण वेतनश्रेणी लागु करण्यात यावी., 16) समान काम समान वेतन सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार लागु करण्यात यावे.,17)  महाराष्ट्र शासनाच्या नोकरकपात बाबत. तसेच या व्यतिरीक्त इतर राज्यस्तरीय मागण्या बाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment