तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 March 2018

सेनगांव तालुक्यातील खिल्लार शिवारात विज पडुन 8 शेळ्या ठार


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील मौजे खिल्लार शिवारात दि.11 मार्च रविवार रोजी सायंकाली 4 ते 5 वाजेच्या सुमारास विज अंगावर पडुन 4 शेळ्या व 4 पिल्ले जागीच ठार झाल्याची घटना घडली.
खुडज येथील शेतकरी कुंडलीक झाटे हे आपल्या 20 शेल्या घेऊन माैजे खिल्लार शिवारात दि.11 मार्च रविवारला चारण्यासाठी गेले असता अचानक 4 ते 5 वाजेच्या सुमारास अचानक तेज हवा व विजेच्या गडगडासह पाऊसास सुरुवात झाली यामध्ये झाटे यांच्या 20 शेल्यापैकी 4 शेल्या व 4 पिल्लांचा जागीच मृत्यु झाल्याने झाटे यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले असुन त्यांना तहसिल प्रशासनाने नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी सेनगांव शिवसेना उप तालुकाप्रमुख तथा मा.पं.स.सदस्य पांडुरंग (पिंटु) गुजर यांनी केले आहे. झाटे यांच्या शेल्या विज पडुन ठार झाल्याने सर्वत्र हलहल व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment