तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 4 March 2018

कुंभार समाजाचा विविध मागण्यासाठी  विधानभवनावर धडकणार मोर्चा

वैजापुर - सुधीर बागुल

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी पाच मार्च रोजी
मुबई येथील विधानभवनावर मोर्चा धडकणार असल्याची माहिती कुंभार समाज
महासंघाचे औरंगाबाद  जिल्हाध्यक्ष प्रकाश बहाळस्कर यांनी दिव्यमराठीला माहिती
दिली.
कुंभार समाज अनेक पिढ्या पासून सुख सोइ पासून दुरावला गेला असून
त्यास महत्व पूर्ण अशा अद्याप सवलती पासून मुकावे लागले आहेत.
या करीत कुंभार महासंघाच्या वतीने खालील मागण्यासाठी मोर्च्याचे आयोजन
करण्यात आले आहेत. त्यातील काही मागण्या खालील प्रमाणे आहेत
कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डची स्थापना करावी,
महाराष्ट्र शासनाने कुंभार समाजाचा एन.टी प्रवर्गात समावेश करावा,
गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर ढोकी उस्मानाबाद या तीर्थक्षेत्रास अ
दर्जा द्यावा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे,मातीवर आकारलेले
संपूर्ण रॉयल्टी माफ करण्यात यावी,माती वाहतूक व वीट भट्टी परवान्याच्या
जाचक अटी रद्द करून ओळखपत्रावर परवाना मिळावा.,राखीव असणाऱ्या
कुंभार खाणीवरील अतिक्रमण दूर करावे,अशा विविध मागण्यासाठी
मुंबई येथील विधानभवनावर  पाच मार्च सोमवार रोजी मोर्चा  काढण्यात
येणार असून या मोर्चात कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी
व्हावे असे आव्हान औरंगाबाद  जिल्हाध्यक्ष प्रकाश बहाळस्कर यांनी केले
आहेत

No comments:

Post a Comment