तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 1 March 2018

महाराष्ट्र पेन्शन हक्क संघटनेच्या सहकोषाध्यक्षपदी कैलास आरबड


सुभाष मुळे...
----------------------
गेवराई, दि. 1 __ सार्वजनिक कार्यक्रमात सातत्याने सहभाग दर्शवून निर्माण होणारे प्रश्न धसास लावणारे गेवराई तालुक्यातील कर्तृत्वान शिक्षक कैलास आरबड यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य सह कोषाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य सह कोषाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य सह कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
          नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासनाने नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. या पेन्शन योजनेमध्ये निश्चित असे धोरण नसल्याने या योजनेला विरोध करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी हि संघटना २0१२ पासून काम करत आहे. या संघटनेची राज्यस्तरीय बैठक जालना येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर हे होते तर प्रमुख म्हणून राज्यकार्यकरिणी सदस्य सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. दरम्यान सदरील बैठकीत संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात येऊन नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. या झालेल्या बैठकीत बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई येथील कैलास आरबड यांची कैलास आरबड यांची महाराष्ट्र राज्य सह कोषाध्यक्षपदी म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री.आरबड हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे संस्थापक सदस्य असून त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणीत मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केलेले आहे. जिल्हास्तरीय मोर्चे, आंदोलने बाबत चांगले नियोजन केलेले आहे. गेवराई तालुक्याचे गटसमन्वयक म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पहिले. गेवराई तालुक्यातील सर्व शिक्षकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. सर्व शिक्षकांशी त्यांचे सलोख्याचे संबध असून ते सध्या जिल्हा परिषद शाळा मन्यारवाडी याठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी सदरिल शाळा 100 % डिजिटल केली असून गेवराई तालुक्यात तंबाखुमुक्त शाळा म्हणून त्यांची शाळा प्रसिद्ध आहे. गेवराई तालुक्यातील 100 % शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी ते तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे गेवराई समन्वयक म्हणून काम पाहतात. तालुक्यात आजमितीला 22 शाळा तंबाखूमुक्त आहेत. उर्वरित 100 % शाळा 31 मार्च 2018 पर्यंत तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत.
      श्री. कैलास आरबड हे 2014 मध्ये अंतरजिल्हा बदलीने रायगड येथून बीड मध्ये हजर झाले होते. त्यावेळी संचमान्यता नसल्याने अंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना परत मुळठिकाणी पाठवा हा निर्णय जि. प. ने घेतला. या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाऊन या आदेशाला स्थगिती मिळवली. या लढ्याचे न्यायालयीन कामकाज देखील त्यांनी  व्यवस्थितरित्या त्यांनी पाहिले. या सर्व बाबींचा विचार करून एक धडपड करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य सहकोषाध्यक्ष म्हणून निवड केली. या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्हाध्यक्ष विष्णू आडे, गेवराई तालुकाध्यक्ष जितेंद्र दहिफळे यांसह इतर सहकारी मित्रांनी अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment