तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यासाठीचे स्वीकृती पत्र आज ‘एल अँड टी’ला विधानभवन, मुंबई येथे प्रदान केले


प्रतिनिधी : बाळासाहेब राऊत
मुंबई दि २ आमचे थोर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यासाठीचे स्वीकृती पत्र आज ‘एल अँड टी’ला विधानभवन, मुंबई येथे प्रदान केले. प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्र आणि देशाने वर्षानुवर्षे वाट पाहिली आहे. येणार्या पावसाळ्यापूर्वी या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा, असे निर्देश यावेळी दिले. अतिशय विक्रमी वेळात या स्मारकासाठी लागणाऱ्या या प्रत्येक परवानगी आम्ही प्राप्त केल्या आहेत. यावेळी माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री चंद्रकांतदादा पाटील, श्री विनोद तावडेजी, श्री महादेव जानकरजी, श्री जयकुमार रावल आणि स्मारक समितीचे अध्यक्ष श्री विनायक मेटे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.

No comments:

Post a Comment