तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

स्वा. वि. दा. सावरकर पुतळयाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरीत अटक करा-राजेश विभूते

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

संभाजीनगर मधील समर्थनगर येथे सावरकर चौकामध्ये असलेल्या स्वा. वीर सावरकर यांच्या पुतळयाची विटंबना अज्ञात समाजकंटकाने केली. शिवसेनेचे परळी शहरप्रमुख राजेश विभूते यांनी हि विकृती केलेल्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

शुक्रवार दि.9 मार्च रोजी मध्यरात्री नंतर संभाजीनगर येथील समर्थनगर मधील सावरकर चौकामध्ये स्थित असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळयाची विटंबना काही अज्ञात समाजकंटकानी पुतळयावरती डांबर टाकुन विटंबना केली. ही घटना निंदनीय असून स्वा.वि.दा.सावरकर यांच्या पुतळयाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकास त्वरीत जेरबंद करून काठोर शासन  अशा घटना करणाऱ्या समाजकंटकावर त्वरीत कार्यवाही करुन त्यांना लगेच अटक करण्याची मागणी यावेळी शिवसेना परळी शहरप्रमुख राजेश विभूते यांनी केली.

No comments:

Post a Comment