तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 3 March 2018

परळी जिल्हा होण्यासाठी जुगलकिशोर लोहिया यांनी नेतृत्वाची ही धुरा हातात घ्यावी-जितेंन्द्र मस्के 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- नव्याने होणार्‍या जिल्हा निर्मितीस महाराष्ट्रात हालचाली चालु झालेली आहे. परळी इतर तालुक्यापेक्षा आघाडीवर आहे. यामध्ये बारा ज्योतिर्लिंगा देशातुन एक वैद्यनाथ देवस्थान तसेच रेल्वे जंक्शन, वीज निर्मिती केंद्र मराठवाडा परळी वैजनाथ येथेच आहे. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहियांनी जिल्हा निमिर्तीसाठी ना.पंकजाताई व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निर्मितीची धुरा हाती घ्यावी अशी माहिती जितेंन्द्र मस्के यांनी दिली.

    भौगलिक दष्टया सर्व सोयींनी युक्त आहे. तसेच पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वडिलांनी दिवगंत नेते गोपीनाथराव मुंडे साहंबांनी जसा परळी तालुका निर्मिती केली त्या प्रमाणे ताईंनी परळी जिल्हा करावा. परंतु या आंदोलनाचे नेतृत्वाची धुरा उद्योगपती लोकभिमुख प्रसिध्द जुगलकिशोर लोहिया यांनी धुरा हातात घ्यावी. तरच परळी जिल्हा निमिर्ती होऊन शकते. अशी चर्चा परळी पंचकृषीत होतांना दिसत आहे. 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा.प्रितमताई मुंडे या राज्यात व केेंद्रात सत्तेत सत्ताधीश असल्यामुळे खासदार व आमदार ताईचे विश्वास खातीवर जुगलकिशोर लोहिया यांनी परळी जिल्हयाची मागणी धुरा हातात घेवून लढा उभारल्यास परळी जिल्हा होणारच. यात कांही शंका नाही. जुगलकिशोर लोहियाच्या कार्याचा आढावा पाहता परळी शहरातुन सर्वच राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विविध संघटण्याच्या कार्यकर्त्यांचे म्हणजे आहे की, जुगलकिशोर लोहियांनी परळी जिल्हा निर्मितीसाठी पुढे यावेत. लोकनेते दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बीड नगर परळी रेल्वे प्रश्न दिलेला शब्द व साहेबांचे स्वप्न दोन्ही ताई पुर्ण करीत आहेत. त्याच प्रमाणे खासदार ताई व आमदार ताई पुर्ण करतील अशी चर्चा परळी शहरात होतांना दिसत आहे. अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात जितेंन्द्र मस्के यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment