तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 March 2018

रखरखीत्या उन्हात शेतकरी मोर्चामध्ये सामील होऊन जाणून घेतल्या समस्या : आमदार  कपिल पाटील


प्रतिनिधी :बाळासाहेब राऊत
दि.१२ शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी, व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्ज माफी, अशा विविध मागण्यांसाठी नाशिक येथून सुरू झालेला किसान सभेचा मोर्चा मुंबईचत  पोहोचला आहे.महिला वर्गाची मोठी संख्या असलेल्या या मोर्चामध्ये प्रतिकूल परिस्थिती आणि अडथळ्यांची शर्यत पार करून मोर्चेकरी आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होण्याची शक्यता आहे
आज शेतकरी मोर्चा मध्ये आमदार कपिल पाटील , जालिंदर सरोदे . काँम्रेड अशोक ढवळे, अजित नवले, मरीम्मन ढवळे, आमदार गावीत , आमदार जयंत पाटील हे शेतकरी मोर्चामध्ये सामील होऊन रखरखीत उन्हात प्रवास करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकरी खूप अडचणीत आहे. अनवाणी पायाने चालतो आहे. त्याचा लढा यशस्वी होवो. ईडा पिडा जावो बळीच राज्य येवो.अशी आशा व्यक्त केली .
.

No comments:

Post a Comment