तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 March 2018

पालम पोलीस स्टेशन येथे महिला दिना निमित्त महिलाचा सत्कार संपन्न

अरुणा शर्मा

पालम :- पोलीस स्टेशन येथे जागतीक महिला दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुढील कार्यक्रम चालु करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस उपविभागीय अधिकारी आब्दुल गण्णी खॉन हे होते. यावेळी आब्दुल गण्णी खॉन व पोलीस निरक्षक महेश शर्मा यांनी महिला सुरक्षा समिती अध्यक्ष अरुणा शर्मा, पोलीस कर्मचारी दिपिका चांदमारे, केसर पाटवदे, अर्चना नरवाडे अदिंचा सत्कार केला. महिला विषय खॉन यांनी भाषन केले. यावेळी पोलीस स्टेशनचे फोजदार जाधव, कुरेवार, सांवत, राठोड, मुंडे यासह कर्मचारी उपस्थित होते. आभार डि.एस.बि. चे कुरेवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment