तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 5 March 2018

कारंजा लाड येथील पोलिस कर्मचारी चर्तुभुज


मोटार सायकल चोरी प्रकरणात लाच मागणे भोवले 

फुलचंद भगत-वाशिम

कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी अनिल तुकाराम राठोड यांना तक्रारदारा कडे त्याच्या मित्राने ठेवलेली मोटार सायकल चेारीची आहे. त्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी 90 हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबी ने दुपारी ताब्यात घेतले. कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले अनिल तुकाराम राठोड नाईक पोलिस काॅन्स्टेबल बक्कल नं. 182 राहणार मेाहगव्हान तालुका मानोरा यांना लाच मागितल्या प्रकरणी ५ मार्च रोजी वाशिम एसीबी ने कारवाई करून ताब्यात घेतले. तक्रारदाराने २३ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराच्या मित्राने तक्रारदाराकडे अंदाजे 1 महिन्यापूर्वी मोटारसायकल ठेवून पायाच्या आॅपरेशन करिता १० हजार रूपये नेले. पायाचे आॅपरेशन असल्याने त्याला मोटारसायकलचे काम नसल्याचे सांगून त्याची मोटारसायकल तक्रारदारास चालविण्यास दिली. ती मोटारसायकल चोरीची असून, तक्रारदाराकडे असल्याने तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी लोकसेवक पोलिस जमादार अनिल राठोड यांनी तक्रारदारास १ लाख रूपये लाचेची मागणी केली. त्याच वेळी आरोपी राठोड यांनी तक्रारदाराच्या खिशातून १७ हजार रूपये घेतले. व ९० हजार रूपये घेवून बोलावले. अशी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून २३ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता. आरोपी अनिल राठोड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अनिल राठोड यास तक्रार दारावर संशय आल्याने व तसा तक्रारदाराने त्यांचा जबाब दिल्याने आरोपी लोकसेवक अनिल राठोड यांस ताब्यात घेवून पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत भिवरे, पोलिस उपअधिक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक एन.बी.बोराडे पोलिस हेडकाॅन्स्टेबल दिलीप बेलोकार, विनोद सुर्वे, विनोद अवगळे व चालक रामकृष्ण इंगळे यांनी केली. 

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment