तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 March 2018

योग्य ज्ञानार्जनाने जीवनावर वाईट परिणाम होत नाही - प्रानेश पोरे

सुभाष मुळे....
----------------------
गेवराई, दि. 13 ___ आयुष्यात सर्वांवरच नानाप्रकारचे प्रसंग येतात. सुखाचे वाटेकरी अनेक असले तरी दुखाःत मात्र संख्येने कमीच असतात. परिणामी संगित विषयाचे ज्ञानार्जन केल्यास मानवी जीवनावर कसलाही वाईट परिणामाचा शिरकाव होत नाही असे मौलिक विचार माजलगाव येथील संगित क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक प्रानेश पोरे यांनी व्यक्त केले.
       रुक्मिणी - जनार्दन प्रतिष्ठान संचलित समर्थ संगित विद्यालयाच्या वतिने गेवराई येथील मेन रोड जवळील हनुमान मंदिरात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, कौतुक व मान्यवरांचा सन्मान या आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रानेश पोरे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गेवराई येथील नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अमोल करांडे हे होते. याप्रसंगी पत्रकार सुभाष मुळे, विनायक खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वतीचे पुजन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी माजी गटशिक्षणाधिकारी कै. विश्वनाथराव खंडागळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जीवनातील संगित्यिक योगदानाबद्दल जेष्ठ हार्मोनियम वादक शाहीर राम मुळे दादा यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन सन्मान करण्यात आला. संगित विशारद नारायणराव गाडेकर तसेच त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांनी मान्यवरांसह सर्व उपस्थित पालक, नागरीक व महीला मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. पुढे बोलताना प्रानेश पोरे सर म्हणाले की, प्रत्येकांच्या आवडी निवडी विविधांगी आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उत्तम कार्याअंती सुख आणि समाधाचे जीवन जगावे ही पालकांची इच्छा असते, त्याप्रमाणे परिस्थिती नूसार जनमानसाने ज्ञानार्जनाच्या माध्यमातून जीवनाला कलाटणी द्यावी असे मत व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांकडून सुरेख अशा गायन व वादनाच्या कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांना मिळाली.
           याप्रसंगी स्वप्निल ठेंगरे, नारायण मुळे, गणेश मढिकर, वैभव गलधर, विशाल मुळीक, महेश गायकवाड, हरिदास मुळीक, निलेश खरात यांच्यासह अभिजित गाडेकर, ईश्वरी नाईकवाडे, श्रेया कदम, वृषाली तारुकर, चैत्राली आलगुडे, गौरांगी माने, सिध्देश भोसले, वैष्णवी गाडेकर, कोमल कांडेकर, अभिषेक पांगरे, यशवंत जाधव,  ह्रषभ केशभट, अदित्य हात्ते या संगित क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कार्यक्रमात योगदान राहीले. दरम्यान माधवी अशोक गायकवाड, अजयपाल सिध्दार्थ मुनेश्वर, सोनाली सुरेश सोलाट, ज्ञानेश्वर सुभाष चव्हाण, पंडित अनिल बुधवंत, शौर्य संदिप देशमुख, प्रथमेस प्रताप देशमुख, विनायक धन्यकुमार कोल्हे, अभिषेक गणेश पांगरे, पार्थ किशोर पंडित आदींना प्रमाणपत्र व भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला आणि संगितप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन घुमरे अध्यापक विद्यालयाची विद्यार्थीनी निकीता गिरी व प्रतिक्षा साळवे यांनी केले. शेवटी वैष्णवी गाडेकर हिच्या वंदे मातरम् या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

तेजन्यूज -
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment